“ भारताची मुलगी आहेस का तू? अहं,एक मिनिट! स्वतंत्र भारताची स्वावलंबी,कर्तबगार मुलगी आहेस तू.. हो ना?हा हा हा..”
रॉनी,एक श्रीमंत मुलगा आपल्या मित्रांसोबत नेहमीप्रमाणे बस स्टॉपवर प्रीतची खिल्ली उडवत होता.
रॉनी,एक श्रीमंत मुलगा आपल्या मित्रांसोबत नेहमीप्रमाणे बस स्टॉपवर प्रीतची खिल्ली उडवत होता.
मागील काही दिवसांपासून प्रीत जराशी डिस्टर्ब होती.नेहमी निर्भिड,खंबीर असणारी प्रीत आज मात्र मुकाट्याने या मुलांची छेडछाड सहन करत होती.आपली डॅशिंग मैत्रीण इतकी हरलेली पाहून तिच्या मैत्रिणी देखील हतबल झालेल्या होत्या.
तेवढ्यात तृतीय पंथीयांपैकी एक नंदा गायकवाड या नेहमीप्रमाणे बस स्टॉपवर आल्या.त्यांनी त्या मुलांकडे रागाने पाहिले. रॉनी आणि त्याचे मित्र उपहासाने त्यांच्याकडे वळले.
“ काय गं? अरे पण तुला काय रे म्हणायचं की काय गं म्हणायचं हा एक यक्षप्रश्न आहेच नाही का?( नंदाच्या केसांची लट हळूच उडवत) चल मग येते का तूही माझ्या सोबत आज रात्री मला खुश करायला?( शेजारीच उभ्या असलेल्या प्रीतच्या अगदी जवळ उभे राहत) उद्या हिला घेऊन जाईल..( सगळ्या मुलींना बीभत्स नजरेने न्याहाळत) एकेका मुलीचा नंबर येईलच पण ही जी आहे ना,( प्रीतचा हात धरत) जास्त फटाकडी वाटते. तुम्ही साऱ्या ना लवंगी फटाका आहात पण ही प्रीत मात्र ॲटम बॉम्ब वाटते यार..लवकर ये गं प्रीत माझ्या मिठीत..”रॉनी
स्मिता दुरूनच हा प्रकार बघत होती.काहीतरी करायला हवे असे स्मिताला वाटत होते.ती प्रीतची बेस्टफ्रेंड तर होतीच पण सोबतच लाडकी बहिण देखील होती.
हा किळसवाणा प्रकार आता वाढतच चालला होता.थंडीचे दिवस होते. संध्याकाळी स्मिता बसची वाट पाहत उभी असताना रॉनीची टोळी तिथे आली.बस स्टॉपवर कोणीही नव्हते.आता मात्र गप्प बसायचे नाही असे मनाशी ठरवून ती रॉनीच्या पुढ्यात उभी राहिली अन् म्हणाली,
“ ए बस झाली तुमची गुंडागर्दी.आम्ही मुली असलो म्हणून काय झालं?तुमच्यासारख्या गुंडांना सरळ करण्याची आमच्याही मनगटात चांगलीच ताकद आहे,समजलं?”
“ हो का? कोण आहे रे हे इतकं बोलणारं
पाखरू?”रॉनी
पाखरू?”रॉनी
“ रॉनी ही स्मिता, त्या प्रीतची बहिण.”रॉनीचा एक मित्र बोलला.
“ अच्छा! मग आज रात्रीचं माझं काम झालं.तशीही थंडी,दारू आणि कोवळ पाखरू,काय सुरेख कॉम्बिनेशन आहे यार...”रॉनी
आता मात्र स्मिता घाबरली.आज आपलं काही खरं नाही असे तिला वाटले.तिने तिथून पळ काढण्याचा प्रयत्न करताच रॉनीने तिला आपल्या जवळ खेचले.
“ आता तुला वाचवायला कोणीही नाहीये इथे. हा हा हा..एवढं मला बोलण्याची हिंमत केलीस ना,मग आता तयार रहा..तुझ्या जवानीचा रस मी आज पिणार.. मजा येणार फार.. हा हा हा..घेऊन चला रे हिला आपल्या सोबत..”रॉनी
राकेश,रॉनीचा मित्र मध्येच म्हणाला,
“रॉनी,पण आज तर तू ती तृतीय पंथीयांपैकी एक नंदा गायकवाड हिच्यासोबत रात्र घालवणार होतास ना?”
“रॉनी,पण आज तर तू ती तृतीय पंथीयांपैकी एक नंदा गायकवाड हिच्यासोबत रात्र घालवणार होतास ना?”
रॉनीेने राकेशच्या तोंडात जोरदार लगावली आणि म्हणाला,
“ ए,तू कोण मला सांगणारा?( राकेशच्या अजून जवळ जात.. ) एवढी हौस असेल तर तू झोप त्या अर्धनारीनटेश्वरजवळ..चल सरक..( पुन्हा स्मिताजवळ जात) आज मी स्मिताचा आस्वाद घेणार आणि उद्या हिच्या बहिणीचा..”
“ ए,तू कोण मला सांगणारा?( राकेशच्या अजून जवळ जात.. ) एवढी हौस असेल तर तू झोप त्या अर्धनारीनटेश्वरजवळ..चल सरक..( पुन्हा स्मिताजवळ जात) आज मी स्मिताचा आस्वाद घेणार आणि उद्या हिच्या बहिणीचा..”
रॉनी आणि त्याच्या मित्रांनी स्मिताला बळजबरी खेचत गाडीत टाकले.
“ वाचवा,वाचवा ..” गाडीतून येणारा तिचा आक्रोश ,आक्रंदन कोणाच्याही कर्णोपकर्णी पडत नव्हता.
गाडीत ५ मुलांसोबत ती एकटीच होती.आपले सर्वस्व आज आपण गमावणार ही भावना तिच्या हृदयाला चिरून टाकत होती.हे सर्व केवळ आपण आपल्या ताईमुळे भोगत आहोत असे तिला वाटत होते. काहीही झाले तरी या नराधमाच्या जाळ्यात अडकण्याआधी आपली अब्रू वाचली पाहिजे याचा ती विचार करू लागली.
क्रमशः
©® सौ प्रियंका शिंदे बोरुडे
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा