आता रॉनी कावराबावरा झाला आणि आपले कपडे शोधू लागला.
प्रीत टाळ्या वाजवून म्हणाली,
“ गर्ल्स,करा आता याच्यावर बलात्कार..”
“ गर्ल्स,करा आता याच्यावर बलात्कार..”
रॉनी हात जोडून म्हणाला,
“ थांबा.. असं करू नका.. मला माफ करा..”
“ थांबा.. असं करू नका.. मला माफ करा..”
“ एक माफी पुरेशी वाटते तुला मुलीच्या आयुष्याशी खेळताना? काय म्हणाला असेल कोलकताच्या त्या डॉक्टर मुलीचा जीव? काय वाटलं असेल त्या बदलापूरच्या छोट्या मुलीला? कसा सहन केला असेल त्यांनी हा आघात?पीडित मुलींसारखी वेळ स्वतःही
अनुभवल्यावर चारही धामाचे देव आठवले का?”प्रीत
अनुभवल्यावर चारही धामाचे देव आठवले का?”प्रीत
एव्हाना रॉनीचा जीव काकुळतीला आलेला होता. तो क्षमायाचनेने विव्हळून म्हणाला,
“ ताई-माईंनो मला आज चांगलाच धडा मिळाला आहे. इथून पुढे मी कधीही कोणत्याही बाईकडे, मुलीकडे वाईट नजरेने बघणार नाही. प्लीज माझी इथून सुटका करा. मला माफ करा.. माझी अब्रू वाचवा..”
सगळ्या मुली, प्रीत तसेच नंदा गायकवाड त्याच्यावर हसू लागल्या.आपल्यावर हास्याचा झालेला वर्षाव पाहून रॉनी पुरता खजील झाला.
सगळ्या मुली संतापाच्या आगीने पेटून उठत एकच नारा बोलू लागल्या,
“आम्ही अबला नव्हे सबला,आम्ही अबला नव्हे सबला,
आम्ही अबला नव्हे सबला,आम्ही अबला नव्हे सबला..”
त्या सर्वांचे रौद्र रूप पाहून रॉनीने तिथून पळ काढला. आपले कपडे कसेबसे गोळा करत तो गाडीत बसला आणि निघून गेला.
स्मिता देखील बरी होऊन घरी आली. आपल्या ताईचे बदललेले रूप पाहून आणि तिच्यामुळेच एरियातील सगळ्या मुलींची रॉनीच्या त्रासापासून सुटका झाली असे कळल्यानंतर ती सुखावली.आईने देखील आपल्या लेकींना आणि नंदा गायकवाड यांना भरभरून आशीर्वाद दिला.सर्वांनी मिळून अगदी जल्लोषात एका नव्या क्रांतीचे स्वागत केले.
वाचकहो,आपल्या आजूबाजूला महिलांबद्दल अशा अनेक घटना घडत असतात..आपण त्याकडे बऱ्याचदा दुर्लक्ष करतो किंवा अशी बातमी अगदी खोलवर जाऊन वाचून सोडून देतो; पण मग हे सारे रोखण्यासाठी स्त्री शक्तीचा जागर होणे गरजेचे आहे असे तुम्हाला वाटते ना? खरंच मनापासून वाटते.आज आपल्या घरातील स्त्री तरी कुठे सुरक्षित आहे? आपल्या आजूबाजूला असणाऱ्या स्त्रियांना अबला नव्हे तर सबला करण्यासाठी जाणून घेऊया स्त्री शक्तीचा जागर म्हणजे काय ते..
सर्वप्रथम स्त्री नावाचं हे रसायन काय असतं?
" तू ध्यास,तू विश्वास,
तू बळ,तू भरारी,
तू जिद्द,तू चिकाटी,
तू धैर्यशील,तू रणरागिणी,
तू पूजनीय,तू मानिनी.."
खरंच, स्त्रीला शब्दात व्यक्त करणे म्हणजे प्राजक्त गंधातील स्तुतीसुमनांची बरसात होय.एका गहिऱ्या धैर्याचा,नव्या सूर्योदयाच्या प्रारंभ होय.
" तू ध्यास,तू विश्वास,
तू बळ,तू भरारी,
तू जिद्द,तू चिकाटी,
तू धैर्यशील,तू रणरागिणी,
तू पूजनीय,तू मानिनी.."
खरंच, स्त्रीला शब्दात व्यक्त करणे म्हणजे प्राजक्त गंधातील स्तुतीसुमनांची बरसात होय.एका गहिऱ्या धैर्याचा,नव्या सूर्योदयाच्या प्रारंभ होय.
स्त्रीशक्ती म्हणजे काय?
स्त्री म्हणजे शक्ती, शुद्ध ऊर्जा यांचे मूर्त स्वरूप.महिलांच्या प्रयत्नातून संभाव्य किंवा वास्तविक शक्ती.एक गट म्हणून स्त्रियांचा प्रभाव.
जागर म्हणजे काय?
एक विधी म्हणून, जागर हा एक मार्ग आहे ज्यामध्ये देव आणि स्थानिक देवतांना त्यांच्या सुप्त अवस्थेतून जागे केले जाते आणि कृपा किंवा उपाय मागितले जातात.
स्त्री म्हणजे शक्ती, शुद्ध ऊर्जा यांचे मूर्त स्वरूप.महिलांच्या प्रयत्नातून संभाव्य किंवा वास्तविक शक्ती.एक गट म्हणून स्त्रियांचा प्रभाव.
जागर म्हणजे काय?
एक विधी म्हणून, जागर हा एक मार्ग आहे ज्यामध्ये देव आणि स्थानिक देवतांना त्यांच्या सुप्त अवस्थेतून जागे केले जाते आणि कृपा किंवा उपाय मागितले जातात.
म्हणूनच करूया स्त्री शक्तीचा जागर आणि बनवूया तिला अबला नव्हे तर सबला..
समाप्त..
©® सौ प्रियंका शिंदे बोरुडे
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा