नव्याने सुरूवात करू भाग 1

झाल गेल विसरून प्रेमाने रहायला हव
नव्याने सुरुवात करू भाग 1

©️®️शिल्पा सुतार
.........

दुपारच जेवण झालं. रमा नुकतीच पुस्तक घेवून सोफ्यावर बसली होती. आज मी हे पुस्तक संपवणार. खूप छान लिहिल आहे. उद्या सकाळी लायब्ररीत जावुन बदलून आणता येईल.

दार वाजलं. तिची मैत्रीण सीमा आली होती. ती शेजारी रहात होती. " रमा आजकाल फिरायला का येत नाही? "

"येईल उद्या पासून." दोघी बोलत बसल्या.

"मुल आले नाही का अजून?"

"येतील इतक्यात. आपण छान चहा पिऊ." रमा किचन मधे गेली.

आशिष नेहमी चार वाजता घरी येत होता. तिने त्याला समोसे आणायला सांगितले. श्रेया कॉलेज हून आली. मस्त चहा समोसे खाल्ले. थोड्या वेळाने सीमा गेली.

रमाने संध्याकाळची स्वयंपाकाची तयारी केली.

"आई, बाबा तुला फोन करता आहेत. " श्रेयाने सांगितल.

" हो का बघते. " तिने फोन बघितला. दुपार पासून राजेशचे तीन चार फोन येवून गेलेले होते. झाल काही खर नाही आज. हे बोलतील मला. तिने फोन लावला. "बोला."

"तुला औषध हवे होते ना? लिस्ट पाठव लगेच. मी दुकानात आहे."

"हो देते."

रमा हॉल मधे बसुन टीव्ही बघत होती. राजेश घरी आले. श्रेयाने दार उघडल. त्यांनी औषध, भाजी, थोडा खाऊ आणला होता.

"रमा तुझ लक्ष कुठे असत आता हल्ली? फोन कुठे आहे तुझा? महत्वाच्या कामासाठी फोन केला तरी तू फोन उचलत नाही. मी तिथे दुकानात किती वेळ उभा होतो. "

" सॉरी, मैत्रिण आली होती. बिझी होती मी ." ती परत तिच्या सिरियल मधे रमली.

"माहिती आहे काय करत असणार. उगीच आपल दुसर्‍या बद्दल गाॅसिप करायच. म्हणे मी बिझी होती. " राजेश आत निघून गेले. रमाने ऐकुन न ऐकल्या सारख केल.

जो तो आपल काम करत होत. आशिष कॉलेज मधे होता. श्रद्धा अकरावीत होती . आशिषचा काहीतरी ऑनलाईन क्लास सुरू होता. श्रेया होम वर्क करत होती. ते तिघ नेहमी शांत छान रहायचे. राजेश आले की वातावरण बदलायच.

राजेश फ्रेश होऊन आले. "रमा मला थोडा चहा दे."

"थांबा थोड दहा मिनिट. "

"सिरियलचा एखादा भाग मिस केला तर चालणार नाही का." ते चिडले.

"नाही चालणार. आणि सारख माझ्या सिरियल बद्दल बोलायचं नाही सांगून ठेवते. आता चहा नका घेवू. अॅसिडीटी होते मग तुम्हाला." रमाने उत्तर दिलं.

"अग आता साडे सात झाले. दे थोडा चहा. मन होत आहे." ते वाट बघत होते. रमा उठली नाही. तीच बरोबर होत एवढा त्रास होतो तर घ्यायचा कश्याला चहा.

राजेश चिडले होते.

दोघांनी जर एकमेकांच ऐकल तर काय होईल. दोघ आपला मुद्दा पुढे ठेवत असत. कोणी मागे फिरत नव्हत.

राजेश हट्टाने किचन मधे गेले. स्वतः चहा करून घेतला. रमाने दुर्लक्ष केलं. "काहीही करा. त्रास झाला तर मला सांगू नका."

"नाही सांगणार. तू उठू नको टीव्ही समोरून. बाकी कोणाच काहीही झाल तरी चालेल. तुझा सिरियलचा कोणताच भाग मिस नको व्हायला." ते बडबड करत होते.

श्रेया येवून बघून गेली. "आई बाबा प्लीज गप्प बसा."

दोघ पाच मिनिट गप्प बसले. सिरियल मधे ब्रेक झाला.

"रमा अजून स्वयंपाक झाला नाही?" राजेश मधेच बोलले.

"मुल नऊ वाजता जेवणार आहेत. पाव भाजी तर करायची आहे. कुकर झाला आहे. करेन साडे आठ वाजता."

सिरियल सुरू झाली.

"मुलांना भूक लागली असेल. श्रेया बाहेर येवून गेली."

"ते तुम्ही मला नेहमी बोलत असतात म्हणून बघायला आली होती. मुलांनी खाल्ल आहे. नऊ वाजता जेवणार आहेत ते. त्यांनीच सांगितल. तुम्ही सारख मधे मधे बोलू नका."

तो त्यांच्या रूम मधे निघून गेला. आज मी बोलणार आहे रमा सोबत. काय आहे एवढ टीव्हीत?

रमाची सिरियल संपली. ती खुश होती. काय दिसतो तो हीरो. त्याच्या साठी बघते मी ही सिरियल. किती प्रेमाने वागतो तो त्याच्या बायकोशी. तिची काळजी घेतो. तिच्या मागे पुढे असतो. खरच असे नवरे असतात का?

राजेश तर किती सिम्पल आहेत .अजिबात रोमँटिक नाहीत. नुसत आपल घर काम आणि कर्तव्य यात माझ आयुष्य गेल. कधी कुठे जाण नाही की दोन प्रेमाचे शब्द नाही. साध कधी प्रेमपत्र लिहिल नाही यांनी मला. माझी हौस राहून गेली. या वयात आता कोण करणार माझ कौतुक. तिने स्वयंपाकाला सुरुवात केली.


🎭 Series Post

View all