नव्याने सुरूवात करू भाग 3

झाल गेल विसरून प्रेमाने रहायला हव
नव्याने सुरुवात करू भाग 3

©️®️शिल्पा सुतार
.........

सकाळी रमाच डोक खूप दुखत होत. आता हल्ली तिला कोणी काही बोललं की सहन होत नव्हत. ती त्रास करून घेत होती.

"आई तू जा झोप मी करतो." आशिष पोहे करत होता. श्रेया त्याला मदत करत होती.

राजेश उठून आले. "काय झाल? तुम्ही मूल का नाश्ता तयार करता आहात? रमा कुठे आहे? मुलांना उशीर होतो आहे. ही अस कस आरामात बाहेर बसली आहे. का अशी करते?"

श्रेया चिडलेले होती. "बाबा पुरे. सदोदित आईला बोलण बंद करा. तुम्ही आईची अजिबात काळजी घेत नाही. तिला उलट बोलण, सारख रागावण, कमी समजण अस नका करू. तिला नाही सहन होत आता हल्ली. जरा तिच्या कलाने घ्या. करू द्या तिला हव ते. अजिबात बोलू नका. तिच्या वयाचा विचार करा. या काळात तिला मानसिक आधाराची गरज आहे. हे काय मी सांगायला हव का तुम्हाला. आठ पंधरा दिवस काही बोलू नका तिला. जरा तिच्या मना प्रमाणे घ्या. मग बघा तुमच दोघंच आयुष्य किती छान होईल."

खूप बोलली ती. राजेश गप्प होते. ते आवरून ऑफिस मधे गेले. तिथे त्यांच कामात मन लागत नव्हत. माझ खरच चुकत का. मी आधी सारख वागतो आहे रमाशी. ती पूर्वी मी म्हणायचो ते ऐकायची. आता हल्ली ती विरोध करते. त्रास करून घेते. पण टीव्ही बघणं चुकीच आहे. त्या सिरियल साठी ती कोणा कडे लक्ष देत नाही.

लंच ब्रेक मधे त्याने ही गोष्ट त्याच्या मित्राला सांगितली. "मी तर नेहमी प्रमाणे वागतोय. आता हल्ली रमा त्रास करून घेते."

"प्रेमाने वाग थोड. सॉफ्ट बोल. घरच्या बायकांना कोण आहे आपल्या शिवाय? पूर्ण आयुष्य आपल करण्यात वेळ गेला त्यांच्या. थोडी अपेक्षा असतेच. त्यांना प्रेम आधार मिळाला पाहिजे. तु थोडा वेळ दे वहिनींना."

रमा गोळी घेवून झोपली. दुपारी बर वाटत होत. तिने रात्री साठी स्वयंपाक करून घेतला. मुल आले. ते आल्या मुळे रमा खुश होती. ते दोघ आधार होता तिचा. राजेश कडून काही अपेक्षा नव्हती.

" आई चल फिरून येवू." ती श्रेया फिरायला निघाले. मस्त पाणी पुरी खाल्ली.

" आई एक बोलू."

"बोल ना."

"बाबांच बोलण तू मनाला नको लावून घेवू."

"नाही ग कधीच सोडल मी. काय करणार स्वभावाला औषध नसतं. पण माझ कधीच नीट होणार नाही का श्रेया? आता पन्नाशी येत आली. "

"होईल आई तू प्रयत्न कर. बाबांशी नीट बोल .काहीही झाल तरी जून आठवायचं नाही टोमणे मारायचे नाहीत. " श्रेया समजावत होती.

" इतके वर्ष तेच तर करते. समजून घेते त्यांना.... त्यांचा घरच्यांना. म्हणून गृहित धरलं त्यांनी मला. माझ म्हणजे चुकलेले असत. " रमा चिडून बोलत होती.

" हेच म्हणते मी त्रागा करायचा नाही. गेले आता आजी आजोबा त्यांनी तुला त्रास दिला हे मान्य आहे. पण आता त्या गोष्टी आठवून तू आजचा दिवस खराब करू नको . माझ्याशी दादाशी कस प्रेमाने बोलते तस बाबांशी बोल ना."

" मी प्रयत्न करेन. "

" प्रयत्न नाही तुला हे कराव लागेल. हव ना शांत आयुष्य. "

" हो ठीक आहे. "


🎭 Series Post

View all