नव्याने सुरूवात करू भाग 4 अंतिम

झाल गेल विसरून प्रेमाने रहायला हव

नव्याने सुरुवात करू भाग 4 अंतिम

©️®️शिल्पा सुतार
.........

दोघी घरी आल्या स्वयंपाक तयार होता. पोळ्या बाकी होत्या. तिने सिरियल लावली. आवडता हीरो डोळ्या समोर होता. तिच्या चेहर्‍यावर हसू आलं. टीव्ही बघत असतांना राजेश आले. तिने हसून स्वागत केल.

"बर वाटत का रमा?" त्यांनी प्रेमाने विचारल.

ती आश्चर्यचकित झाली.

"हो, तुम्हाला चहा हवा का? करून आणते."

"नको स्वयंपाक झाला का?"

"हो पोळ्या बाकी आहेत." ती उठत होती.

"आठ नंतर कर. तू बघ टीव्ही." ते आत गेले रमा परत टीव्ही सिरियल मधे रमली. नंतर तिने छान पोळ्या केल्या. मुलांच्या आवडीची दाल माखनी केली होती.

राजेशला दाल चालत नव्हती तरी ते गप्प होते. शांत जेवत होते. इतर वेळी त्यांनी आरडा ओरड केली असती.

रमाने त्यांना कढी वाढली. भेंडीची भाजी दिली. ते बघत राहिले. त्यांची दाल माखनीची डिश तिने स्वतःला घेतली.

"रमा एवढे प्रकार का केले?" त्यांनी विचारल.

"खा हो तुम्हाला नाही चालत डाळ. एक वाटी भाजी करायला मला काही त्रास नाही. कढी राहिली तर उद्या सकाळी खाईन मी. मला आवडते." रमा प्रेमाने बोलली.

शांततेत जेवण झाल. दोघांनी एकमेकांना टोमणे मारले नाही. राजेश श्रेया कडे बघत होते." ठीक वागलो ना मी?"

" हो बाबा टार्गेट डे वन सक्सेस फुली कंप्लीटेड. "दोघ हसले.

मुल तिला आवरायला मदत करत होते. रमा रूम मधे आली. राजेश लॅपटॉप वर काम करत होते. तिने हेड फोन लावले. गाणे ऐकले. जरा वेळाने झोपून घेतल.

दुसर्‍या दिवशी सकाळी दोघांना छान शांत वाटत होत. राजेश ऑफिस मधे खुश होते. रमा पण दिवस भर उत्साही होती. ती संध्याकाळी खाली बागेत फिरत होती.

राजेश आले. "आज सिरियल नाही का?"

"आहे ना उद्या बघेल. अहो आज इथे वर्क शॉप होता. त्यात सांगत होते की आपण आपल्याला आवडतो तो छंद जोपासायला हवा. मला ही ते पटलं. मी पेंटिंगचा वर्क शॉप अटेंड करू का? तेच ऐकत बसली होती म्हणून वॉक राहुन गेला. आता अजून स्वयंपाक बाकी आहे. हे बघा."

राजेश माहिती वाचत होते. "छान आहे हे तुला जायच का रोज इथे."

"हो पण संध्याकाळी आहे. "

" काही हरकत नाही. पंधरा दिवस तर आहे. नंतर आपली आपली प्रॅक्टिस करायची. लवकर स्वयंपाक करून जात जा."

"हो चालेल माझ्या मैत्रिणी येणार आहेत." रमा खुश होती. उद्या काय सामान लागेल ते मैत्रिणीचा मेसेज आला.

" श्रेया तू येशील का माझ्या सोबत दुकानात? " रमाने विचारल.

" श्रेया का? मी येवू का?" राजेश अस म्हटल्यावर रमा आनंदाने हो म्हटली.

जेवण झाल्यावर ते दोघ खाली फिरायला गेले. येतांना सामान आणल. मुलांसाठी आइस्क्रीम आणल. रमा अगदी उत्साही होती. तीच सामान नीट ठेवत होती. राजेशने तिला कपाटातला कप्पा मोकळा करून दिला." इथे ठेव तुझ्या वस्तु रमा. "

आशिष बघत होता घरातल वातावरण कस बदललं. आई बाबा अगदी समजुतीने घेत आहेत. श्रेया छान हसत होती. आता असे राहणार आहेत ते.

"थँक्यू गॉड. छान वाटतात ते असे."

दुसर्‍या दिवसा पासुन रमा बिझी होती. भांडण बरेच कमी झाले होते. ते दोघ सदोदित वाद होऊ नये म्हणून काळजी घेत होते. राजेश रमा सोबत पेंटिंग करत होते. एकमेकांना थोडा तरी वेळ देत होते. एकमेकांचे स्वभाव नव्याने समजत होते.

"रमा आज लवकर आवर. आपण छान सोबत वेळ घालवू ." राजेश असे म्हंटल्यावर ती लाजली होती. कित्येक दिवस तिला अस वाटत होत की राजेशने तिला प्रेमाने जवळ घ्यायला पाहिजे. आज ती खुश होती.

वयाच्या या टप्प्यात दोघांना एकमेकांची गरज असते. आधार हवा असतो. सदोदित चिडचिड एकमेकांना वाटेल तस बोलणं. जुन्या गोष्टी आठवून अजूनही भांडत राहण्यापेक्षा प्रेमाने सोबत रहायला काय हरकत आहे. शेवटी ते दोघ राहणार एकमेकांसाठी. मुल नोकरी लग्न करून त्यांचे त्यांचे बिझी होणार.

रविवारी दुपारी छान जेवण झाल. चार वाजता राजेश बाहेर सोफ्यावर बसले होते. "रमा आवरल का?"

"कुठे चालले आहात आई बाबा?" श्रेया विचारत होती.

"आम्ही दोघ फिरायला जातो आहोत. या पुढे आम्ही दोघ सिनेमा नाटकाला जाणार. रमा म्हणेल ते मी करेन." राजेश बाहेर शूज घालत होते.

रमा श्रेया कडे हसुन बघत होती. "थोड प्रेमाने वागल तर इतक चांगल होईल वाटल नव्हत मला. मी पण आता हे म्हणतील ते ऐकेन."

"आई मग तुझ्या सिरियलच काय?"

"सिरियल सारखा हीरो आता माझ्या आयुष्यात आहे. तेवढा हॅन्डसम नाही. पण छान आहेत हे." ती लाजली.

श्रेया हसत होती. "जा फिरून या. लवकर या घरी. फोन उचला आणि. तुमच लक्ष नसत." दोघ हसत होते.



🎭 Series Post

View all