आई मी कुठे आहे,.. मला उठताना खूप त्रास होतोय आई, बाबा, माझं अंग खूप जड झालंय, मला खूप चक्कर येतेय, असं बोलून अक्षता बेशुद्ध झाली. आई – बाबा , दोन बहिणी सर्व जोरजोरात रडू लागले. डॉक्टर, डॉक्टर सगळे ओरडू लागले. डॉक्टर आले आणि बोलले मी तिला इन्जेक्शन दिले आहे ती लवकरच शुद्द्दीत येईल.......डॉक्टर बोलले पोलीस येतच आहेत, तुम्ही जबानी दया, सर्व नीट सांगा, आई रडू लागली.
काय केलंय हे त्या नराधमानी माझ्या लेकीच.... बाबा रडून बोलू लागले. मी त्यांना सोडणार नाही. थोड्याच वेळात पोलीस आले अक्षता अजून शुद्धीवर आली नव्हती. पोलिसांनी चौकशी करायला सुरवात केली. बाबा बोलू लागले. नेहमी अक्षता क्लास वरून नऊ वाजता घरी येते. काल रात्री साडे नऊ वाजत आले तरी ती घरी का आली नाही म्हणून आम्ही तिच्या ट्युशन टीचर ला फोन केला तर त्या म्हणाल्या ती नेहमीप्रमाणेच साडे – आठ ला निघाली.
आता मात्र आम्ही सगळे खूप घाबरलो. तिच्याकडे मोबाईल नसल्यामुळे काय करावे कळत नव्हते. मग मी तिला शोधायला बाहेर पडलो. सगळीकडे शोधाशोध केली साडे – दहा वाजत आले तरी अक्षता चा काहीच पत्ता लागत नव्हता. आम्ही पोलीस स्टेशन ला जायला निघालो तेवढ्यात माझ्या मोबाईल वर एक कॉल आला. अक्षता च्या वहीच्या पहिल्या पानावर माझा मोबाईल नंबर लिहिलेला होता. त्या समोरच्या व्यक्तीने तिच्या बॅग मधून वही काढून बघितली तेव्हा त्यांना हा नंबर दिसला आणि त्यांनी तेव्हा मला फोन केला...
त्या समोरील व्यक्तीने जे सांगितले ते ऐकून मी फोनवर च रडायलाच लागलो. ती व्यक्ती म्हणाली, इथे एक मुलगी असाह्य अवस्थेत आहे तिच्या बॅग मधल्या वही मधून हा नंबर मिळाला आहे. मी बोललो मी तिचा पप्पा आहे काय झालंय तिला... ते बोलले मी आणि माझी पत्नी ह्या रस्त्याने जात होतो तर एका मुलीचा कहण्याचा आवाज आला, म्हणून गाडी वळवली आणि तिथे पोचलो तर हि मुलगी तिथे असाह्य अवस्थेत पडली होती, आम्ही दोघे आमच्या गाडीतून तिला घेवून सिटी हॉस्पिटल ला जातोय तुम्ही पण या पटकन. मी विचारलं काय झालंय तर ते गृहस्थ बोलले तुम्ही या आधी हॉस्पिटल ला .....
आम्ही सगळे लगेचच हॉस्पिटल ल आलो, इथे येवून बघितले तर अक्षताच्या हातावर चाकूने एक वार केलेला होता.. आणि तिचे कपडे पण थोडेफार फाटलेले होते. आम्ही सगळे खूप घाबरलो. तिला हॉस्पिटल ला जे जोडपं घेवून आले होते ते बोलले कि हिच्यावर कोणीतरी जबरदस्ती केली आहे असं वाटतंय....
थोड्याच वेळात डॉक्टर येवून बोलले कि तिच्यावर कोणीतरी अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला आहे आणि त्या मुलाने हातावर वार पण केला आहे, तिला हाताला जास्त लागल नाही आहे, चाकू वरच्यावर लागला आहे त्यामुळे जखम तशी खोल नाही आहे.....एवढचं मी सांगू शकतो. अक्षता शुद्धीत आल्यावर काय घडलं ते कळेल.... पोलीस म्हणाले बऱ...आम्ही आता निघतो, ती शुद्धीवर आली कि कळवा आम्ही जबानी घ्यायला पुन्हा येवू.
अक्षता च कुटुंब मिडल क्लास होत. तिच्या घरी तिचे आई – वडील, दोन बहिणी आणि अक्षता असं पाच जणांच कुटुंब होत. वडील रिक्षा चालवायचे, आई लोकांच्या घरी स्वयंपाक करण्याची काम करत असे. अक्षता घरात सर्वात मोठी मुलगी, ती आता चौदावीला होती. बाकिच्या दोन बहिणी एक दहावी ला आणि एक पाचवीला होती.
जवळ जवळ एक तासाने अक्षता शुद्धीत आली. अक्षता रडू लागली. आई – बाबा बोलले, बाळा काय झालं सांगशील का... अक्षता सांगू लागली मी नेहमीप्रमाणे क्लास वरून घरी येत होते तर एका मधल्या रस्त्याला दोन मुलं उभी होती, ती मुलं माझी छेड काढू लागली. त्यातला एक मुलगा माझा हात पकडण्याचा प्रयत्न करू लागला. मी ये काय करतो आहेस असं ओरडू लागले. त्यातल्या दुसर्या मुलाने पटकन माझ्या चेहऱ्यावर रुमाल बांधला.
तरी पण मी ये काय करताय मला असं ओरडू लागले. त्यातल्या दुसर्या मुलाने मला गाडीत टाकले. आणि थोड्या वेळाने तो पाठचा मुलगा गाडीतचं माझ्यावर जबरदस्ती करू लागला. अर्ध्या तासाने त्यांनी एका निर्जन ठिकाणी गाडी थांबवली आणि दोघांनी मिळून माझ्यावर जबरदस्ती केली मी प्रतिकार करत होते मी ऐकत नाही आहे हे बघून त्यातल्या एका मुलाने मला चाकूचा धाक दाखवायला सुरवात केली. मी जोरजोरात किंचाळत होते. त्यांना मारायचा प्रयत्न करत होते हे बघून त्या मुलाने रागाने माझ्या हातावर वार केला... आणि मग थोड्या वेळाने त्यांनी एका ठिकाणी नेवून गाडीतून मला बाहेर फेकून दिल.
थोड्याच वेळात पोलीस आले त्यांनी अक्षता ची जबानी घेतली, अक्षता ने सांगितल्याप्रमाणे त्या मुलांचे स्केच तयार करण्यात आले.
( पुढच्या भागात आपण बघणार आहोत ती मुलं पकडली जातात कि नाही ते .....)
लेखिका – सौ. सोनल गुरुनाथ शिंदे.
( राहणार – देवरुख – रत्नागिरी )
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा