Login

न्याय - भाग - 2

nyay


न्याय - भाग - 2


मागच्या भागात आपण बघितले - पोलीस आले त्यांनी अक्षता ची जबानी घेतली, अक्षता ने सांगितल्याप्रमाणे त्या मुलांचे स्केच तयार करण्यात आले.........आता पुढे...........


अक्षता ला चार दिवसांनी हॉस्पिटल मधून सोडण्यात आले. अक्षता घरी आल्यावर आई- बाबांना मिठी मारून खूप रडली. आई – बाबा त्या मुलांना शिक्षा झालीच पाहिजे त्यांनी हे का केल माझ्याबरोबर, मी त्या मुलांना ओरडू लागले, प्रतिकार करू लागले म्हणून त्यांनी असं करावं का माझ्याबरोबर...........असं बोलून अक्षता जोरजोरात रडू लागली.......तिच्या दोन्ही लहान बहिणी हि रडू लागल्यावर आई बोलली .....आपण त्यांना जरूर शिक्षा करू हा तू आता शांत हो बघू...तू तोच तोच विचार करू नकोसं हा, सर्व नीट होईल......


अक्षता दहा दिवसांनी थोडी रिकव्हर झाली. पण ती कॉलेज ला जायला तयार होईना, तिच्या मनात खूप भीती साचली होती. ती जरा बाहेर कोणी जोरात ओरडलं तरी घाबरू लागली. आई – बाबा पण तीच हे वागणं बघून सतत काळजीत राहत असत, आपल्या हसत्या खेळत्या मुलीचे हे असे हाल करणार्यांना शिक्षा झालीच पाहिजे असं बोलत असत.


अक्षता बोलू लागली मी घराच्या बाहेर जाणार नाही , मला खूप भीती वाटतेय... ह्या घटनेला एक महिना होत आलेला असतो अक्षता कॉलेज ला जात च नसते. तिला हरतर्हेने समजावून झालं होत. पण तीच मन घराबाहेर पडायला तयारचं होईना, एक महिन्याने पोलीस घरी आले आणि बोलले...


अक्षता चे बाबा, तुम्ही रिक्षा चालवता ना, तुमच्याच पैकी एका सावंत आडनावाच्या रिक्षा ड्रायव्हर ने ह्या मधल्या एका मुलाला ओळखल आहे तो म्हणाला इथे ती मुलं नेहमी मुलींची छेड काढत उभी असतात......मी खुपदा त्यांना ओरडलो आहे, मी ओरडल्यावर ती मुलं तिथून निघून जात असत पण चार दिवसांनी पुन्हा इथे टवाळक्या करत उभी राहत असत.


पोलीस म्हणाले - त्या स्केच मधल्या मिळत्या – जुळत्या चेहऱ्याच्या एका मुलाला आम्ही पकडले आहे पण त्याचा दुसरा साथीदार बड्या बापाचा मुलगा आहे तो ह्या प्रकरणाच्या रात्री पासून चं फरार आहे..... तो अक्षता ला त्यांनी ज्या गाडीतून नेलं ती गाडी घेवून त्या रात्री पासून गायब झाला आहे, त्याच्या घरी पण गेला नाही आहे.......त्याला पण आम्ही लवकरच पकडू पण सध्या त्याचा साथीदार तरी आमच्या ताब्यात आहे....


अक्षता तुला पोलीस स्टेशन ला येवून त्याची ओळख पटवून द्यावे लागेल. पोलीस स्टेशन चं नावं ऐकल्यावर अक्षता रडू लागली. पोलीस म्हणाले हे बघ तुला न्याय हवा आहे ना मग तुला यावेचं लागेल. अक्षता चे बाबा बोलले मी घेवून येतो तीला आम्ही पोचतोच तुमच्या पाठोपाठ, अक्षता पोलीस स्टेशन ला पोचली.


पोलिसांनी पकडलेला मुलगा तोच होता जो पाठी गाडी मध्ये होता. अक्षता ने त्याला ओळखले, आणि रडून बोलली साहेब हाच तो मुलगा आहे... ज्याने माझ्या तोंडाला रुमाल बांधून मला गाडीत ढकलले... पोलीस म्हणाले बऱ तू जा आता आम्ही बघतो आता ह्याच काय करायचं ते , ह्याचा साथीदार पण भेटेल बघ लवकरच.....


पोलिसांनी त्या मुलाला हरतर्हेने टॉर्चर केले पण तो काही केल्या त्याचा साथीदार कुठे आहे ते सांगेना. मध्यंतरी जो मुलगा पोलीस कस्टडी मध्ये होता त्याचे आई – वडील तू केस मागे घे आमच्या मुलाला ह्यातून सोडव अस सांगू लागले. पण अक्षता ऐकली नाही ती त्यांना बोलली कि तुम्ही बोलताय तो चुकला, त्याला माफ कर....पण हे असं कृत्य कोणी तुमच्या मुलीबरोबर केल असत तर तुम्ही त्याला माफ केलं असत का. नाही ना.... मग मी मिडल क्लास घरातली मुलगी आहे, भले आमच्याकडे हि केस लढायला भरपूर पैसे नसतील पण मी मागे हटणार नाही म्हणजे नाही.



तुमच्या मुलामुळे माझं कॉलेज च वर्ष फुकट जातंय मला बाहेर पडायला भीती वाटतेय, लोक नको नको ते प्रश्न माझ्या आई – वडिलांना विचारत आहेत, काय झालं, कोणी केल, का केल ह्याची उत्तर आजूबाजूची लोक सतत विचारतात , त्यांना उत्तर देवून माझे आई- वडील हैराण झाले आहेत.


मला कॉलेज ला जावेसे वाटत नाही आहे सगळ्या कॉलेज मध्ये हा विषय समजला आहे, बाकीची मुलं, मुली माझ्याकडे कुठल्या नजरेने बघतील अस मला सतत वाटतंय....दोषी तुमचा मुलगा आहे आणि हि समाजाची शिक्षा मी आणि माझे घरचे गेले चार महिने भोगतोय....त्या मुलाचे आई – वडील हे सगळ ऐकून रडत घरातून निघून गेले.


ते लोक गेल्यावर अक्षता चे बाबा बोलले आपण असं करू हि रूम विकायला काढू आणि ती विकून आलेल्या पैश्यातून लांब कुठेतरी दुसरी छोटीशी रूम बघू, म्हणजे अक्षताला पण हे सर्व विसरायला मदत होईल... तीच हे वर्ष फुकट चं गेल आहे आपण तिचं पुढच्या वर्षी दुसर्या कॉलेज ला ऍडमिशन घेवू.. तिची आई म्हणू लागली अहो पण माझी स्वयंपाकाची कामे इथे आहेत, बाकीच्या दोघींची शाळा पण इथे आहे कसं जमणार हे सर्व.



अक्षता चे बाबा बोलले, आपण ह्या रूम पेक्षा थोडी छोटी रूम घेवू म्हणजे पैसे पण थोडे उरतील त्यातून ह्यांची नवीन शाळेत ऍडमिशन घेवू आणि त्या ठिकाणी गेल्यावर तू घराबाहेर बोर्ड लाव इथे घरून टीफिन पुरवले जातील. तुझ्या जेवणाला चव तर आहेच येतील बघ लोक बोर्ड वाचून... अशाप्रकारे रूम विकून दुसरीकडे शिफ्ट होण्याचा निर्णय फायनल झाला...


( पुढच्या भागात आपण बघणार आहोत – त्या मुलाचा दुसरा साथीदार कधी भेटतो ते.....)
0

🎭 Series Post

View all