Login

न्याय - भाग - 3

nyay


न्याय - भाग - 3



मागील भागात आपण बघितले - अक्षता च्या घरातले रूम विकून दुसरीकडे शिफ्ट होण्याचा निर्णय फायनल करतात............ आता पुढे ............


अक्षता चे बाबा रूम विकायला काढतात. दोन महिन्यांनी रूम विकली जाते, आणि मग सगळे दुसरीकडे नवीन ठिकाणी शिफ्ट होतात. नवीन घरी एप्रिल महिन्यात्त शिफ्टिंग केल जाते कि जेणेकरून त्यामुळे जून महिन्यात दोन छोट्या बहिणींचा नवीन शाळेत प्रवेश करायला सोप्पं जाईल....आईसाठी घराबाहेर मे महिन्यामध्ये इथे घरून टिफिन पुरवले जातील असा दरवाजाच्या बाजूला बोर्ड लावला जातो.


बाबा नवीन ठिकाणी त्यांची रिक्षा चालवायला सुरवात करतात. जून महिन्यात अक्षता च नवीन कॉलेज ला ऍडमिशन घेतलं जात. बाकीच्या दोन छोट्या बहिणींच पण नवीन शाळेत ऍडमिशन घेतलं जात. सगळं हळू हळू रुटीन ला येत असत. अक्षता मनातल्या मनात बोलते - एका घटनेमुळे काय काय घडलं, रूम बदलावा लागला, शाळा बदलाव्या लागल्या.


जुलै मध्ये पोलीस घरी येतात आणि सांगतात जो मुलगा पोलीस कस्टडी मध्ये आहे त्याला हर प्रकारे त्रास देवून झाले पण तो अजूनपर्यंत त्याच्या मित्राचा पत्ता सांगतच नाही आहे. आम्ही त्या दुसर्या मुलाचा फोन ट्रेसिंग वर ठेवला आहे पण त्याने हि नंबर अजून एवढ्या महिन्यात चालूच केला नाही आहे. मग काय करायचं आणि त्या पहिल्या मुलाला जामीन मिळाला आहे ...अक्षता चे बाबा बोलतात अजून काय करणार आता...बघू तो दुसरा मुलगा मिळतो का ते, वाट बघण्याशिवाय काहीच आपल्या हातात नाही आहे...


अक्षता पोलीस गेल्यावर बोलते , न्याय, समाज, आणि आपण मिडल क्लास माणसं ह्या सगळ्यात जिंकत कोण तर .....जो पैसेवाला असतो तोच वरचढ ठरतो. त्या दुसर्या मुलाला त्याच्या घरी श्रीमंती असल्यामुळे त्याच्या घरच्यांनी सहा महिने झाले तरी अजून लपवून ठेवले आहे , आणि हा जो एक आत होता त्याला हि जमीन मिळाला आहे, काय बोलायचं आता....


का, स्त्री कुठेच सुरक्षित नाहि आहे, जिथे जावं तिथे नराधम आहेतच. असल्या लोकांना जिवंत जाळलं पाहिजे, पण अश्या माणसांना जो पर्यंत कठोर शिक्षा होत नाही तोपर्यंत ह्यात काहीच बदल होणार नाही. आज मी तर उदया दुसरी कोणीतरी मुलगी त्यांच्या तावडीत सापडेल. ज्या मुलांमुळे आज मी त्रासली आहे त्यांच्या घरचे पण दोषी आहेत , त्यांनी असल्या मुलांना घरात का घेतले पुन्हा, त्यांनी असल्या मुलांना घरातून हाकलून द्यायला हवे.


सगळे घरचे तिला समजावतात असंच असत बाळा... तू शांत हो, दुसरा आरोपी मिळेल कधी ना कधीतरी....अक्षता बोलते पण बाबा ह्या सगळ्यात माझं शारीरिक नुकसान झालं त्याच काय, मी पूर्णपणे आतून खचली आहे. मला त्रास होतोय ह्या सगळ्याचा....मी पहिल्यासारखी खंबीर नाही आहे कुठूनही येताना जरा उशीर झाला किंवा काळोख पडायला लागला कि मला खूप भीती वाटू लागते. मला थरथरायला होत. कोणतरी येवून मला पकडेल अशी भीती सतत मनात राहिली आहे त्याचं काय करू मी .......


अक्षता बोलते बाबा माझं हे पंधरावी चं वर्ष पूर्ण झालं कि मी लॉ कॉलेज ला ऍडमिशन घेणार, मला माहिती आहे, आपली आर्थिक परिस्थिती एवढी चांगली नाही आहे पण मी पार्ट- टाईम नोकरी करून शिकेन. मी ह्या न्याय – व्यवस्थेचा अभ्यास करणार मी ह्यात बदल घडवून आणायचा प्रयत्न जरूर करणार..... आई – बाबा तिच्या ह्या निर्णयाचा आदर करतात. आणि बोलतात. आम्ही तुला हवी ती मदत करू बाळा तू शिक, मोठी हो ....



( पुढच्या भागात आपण बघणार आहोत अक्षता कशी आयुष्यात पुढे जाते ते. ...... )
0

🎭 Series Post

View all