Login

न्याय - भाग - 4

nyay


न्याय - भाग - 4


( मागील भागात आपण बघितले - अक्षता लॉ कॉलेज ला ऍडमिशन घेणार असं आई – बाबांना सांगते........... आता पुढे ...... )


अक्षता ची आई तिच्या बाबांना बोलते स्त्री सहनशील असते म्हणून देव पण तिचा अंत बघत असतो, अक्षता बिचारी हल्ली घाबरते कुठल्या हि गोष्टीला, तिच्या मनातून तो विषय जातच नाही आहे. का आपल्याच मुलीबरोबर हे सर्व घडलं. भविष्यात ह्यामुळे तिला काही त्रास नको व्हायला एवढीच त्या देवाला विनंती आहे.


बाबा बोलतात - अशा दुष्कृत्य करणाऱ्या लोकांना भर रस्त्यात फाशी चं द्यायला पाहिजे किंवा काहीतरी अशी शिक्षा द्यायला हवी कि जेणेकरून अस कृत्य हि मुलं पुन्हा करणार नाहीत, तेवढ्यात अक्षता कॉलेजमधून घरी येते. तिने दारात चप्पल काढत असताना आई – बाबांचं थोडसं बोलणं ऐकलेलं असत. ती रडायला लागते आणि बोलते बाबा मी शिक्षा देणार त्या दोघांना बघाच तुम्ही......बाबा तिच्या पाठीवर थोपटतात....


अक्षता पंधरावी होते आणि त्या नंतर वकिलीसाठी ऍडमिशन घेते. ती एका डॉक्टर कडे कंपौंडर ची पार्ट- टाईम नोकरी करून शिकत असते. तिची आई हि आता अक्षता ला मदत व्हावी म्हणून अजून जास्तीची स्वयंपाक करण्याची कामे सुरु करते. त्यातून मिळालेले जास्तीचे पैसे तिची आई अक्षता साठी एका डब्यात साठवत असते....... बाबा हि त्यांना जमेल तशी शिक्षणासाठी पैश्याची मदत करत असतात.


अशीच पाच वर्ष निघून जातात, अक्षता वकील होते ... अक्षता वकील झाल्यावर घरातले सर्व खूप खुश होतात....बाबा आजूबाजूला सर्वाना पेढे वाटतात. अक्षता हि खूप खुश असते. अक्षता घरी सांगते – बाबा मी आता वकील झाली आहे मी त्या मुलाच्या घरी जावून आता त्याला त्याची लायकी दाखवून देणार आहे तो दुसरा साथीदार पण कदाचित आला हि असेल सहा वर्षात पण त्याच्या बापाच्या श्रीमंतीमुळे लपून बसला असेल कुठेतरी, त्या दोघांना आता मी माझ्या परीने उत्तर देणार.....


अक्षता दुसर्या दिवशी पोलीसचौकी मधून पत्ता घेवून त्या मुलाच्या घरी जाते अक्षता तिचा वकिलीचा ड्रेस ( कोट ) घालून जाते. ती रात्री नऊ वाजता त्यांच्या घरी जाते त्यामुळे त्याच्या घरी सगळे असतात. त्याच्या घरातले तिला ओळखतात. तीचा कोट बघून सगळेच अचंबित होतात. सगळे तिच्याकडे बघत बसतात. ती आता एक हुशार वकील, आत्मविश्वासू मुलगी झालेली असते.


तो मुलगा तर मान खाली घालून सोफ्यावर बसूनच असतो. अक्षता ला कोणीच बस असं बोलत नाही, ती स्वतच एका खुर्चीवर बसते. त्या मुलाची आई बोलते कशाला आली आहेस इथे, अक्षता बोलते मी केस रीओपन करतेय आता बघाच तुम्ही, तुमच्या मुलाला मी कशी अडकवते ते......... सगळे तिच्याकडे बघतच राहतात. त्या मुलाची आई बोलते तो आता चांगला नोकरीला लागला आहे त्याच सगळं व्यवस्तीत चालू आहे आता तुला का हे सुचतंय.....




अक्षता बोलते तेव्हा हि केस एखादया वकिलाला द्यायला आमच्याकडे पैसे नव्हते म्हणून आम्ही गप्प होतो पण आता मी वकील झाली आहे आणि आता मी ह्या सगळ्याचा बदला तर घेणारच....... मी उदयाच कोर्टाची नोटीस पाठवते आहे हजर राहा तारखेला....तो मुलगा पुढे येतो आणि बोलतो मला माफ कर माझी चूक झाली....... माझं भविष्य बिघडवू नकोसं......


अक्षता चिडून बोलते आता सहा वर्षाने तुला मी माफ करू, अरे नालायक मुला तुझ्यामुळे आम्हाला घर बदलावं लागलं.... माझं शिक्षण लेट झालं, आम्ही काय काय सहन केलंय ते आम्हाला चं माहित आहे.....तुला आता माफी नाही.....तू आता कसा सुटतोस ते तू बघच....



( पुढच्या भागात आपण बघणार आहोत – अक्षता केस लढते आणि त्या मुलाला काय शिक्षा होते ते. ...... )

( लेखिका – सौ. सोनल गुरुनाथ शिंदे ...)
0

🎭 Series Post

View all