न्याय – भाग – ५
( मागच्या भागात आपण बघितले अक्षता केस लढण्याचा निर्णय घेते .... आता पुढे .....)
अक्षता तिच्या परीने केस पूर्णपणे लढते. त्या मुलाला पोलीस कस्टडी होते, आणि दहा वर्षाची शिक्षा होते, अक्षता आता ठरवते कि दुसरा आरोपी जो फरार असतो, त्याचा शोध घ्यायचा, अक्षता त्याच्या घरी जायचं ठरवते, त्याच्या घरी पोचल्यावर समजत ते कुटुंब एक वर्षापूर्वी नाशिक ला शिफ्ट झालं आहे. अक्षता तिच्या गुप्तहेरांशी संपर्क साधून तिकडचा पत्ता मिळवते.
अक्षता तिकडे जायचं ठरवते, अक्षता तिच्या अजून एका वकील मैत्रिणीबरोबर तिकडे जायला निघते. तिकडे पोचल्यावर कळत, त्या मुलाच लग्न आहे आठ दिवसांनी , अक्षता म्हणते एक मन सांगतय , चांगल्या कार्यात विघ्न आणू नये, पण एक मन सांगतय का सोडावं मी त्या मुलाला, मी जे काही भोगलय, जे काही सहा वर्ष सहन करतेय, त्याची शिक्षा त्या मुलाला मी देणारच त्याच्या घरातले तो फरार आहे सांगून इथे गुपचूप त्याच लग्न लावतायत... नाही मी ह्याला वेळीच शिक्षा करणार....
अक्षता एक दिवस हॉटेल वर थांबून काय करावे ह्याचा विचार करते, आणि मग ती नाही आता मागे हटायचं नाही ह्या निर्णयापर्यंत पोचते, अक्षता बोलते नाही मी मागे हटणार नाही, मी लढणारच.... ती दुसर्या दिवशी सकाळी त्या मुलाच्या घरी जाण्याचा निर्णय घेते. अक्षता ठरवते आधी तिथे जावून बघूया काय बोलतात ते..आणि मग निर्णय घेवूया.......
ती सकाळी दहा वाजता तिच्या मैत्रिणीबरोबर तिथे पोचते, अक्षता ला बघून सगळे हैराण होतात, तिने वकिलाचा कोट घातलेला असतो. त्या मुलाची आई त्याला हाक मारते, तो पण बाहेर येतो.. तो अक्षता ला बघून खूप घाबरतो.....त्याचे वडील , त्याची बहिण सगळे तिला बघून अवाक होतात.
अक्षता ला बघून तो पळून जाण्याचा प्रयत्न करतो, तिची मैत्रीण त्याला अडवते, त्याचे वडील तर तिलाच ओरडतात ये मुली काय हवे आहे तुला , बोल किती पैसे पाहिजेत, किती पाहिजे तेवढे पैसे घे पण गप्प राहा माझ्या मुलाच्या लग्नात विघ्न आणू नकोस असे बोलतात.
अक्षता बोलते, तुम्ही ह्याला फरार दाखवून इथे येवून बस्तान मांडल आहे, त्याचे वडील बोलतात ते तुला काय करायचं आहे तुला किती पैसे पाहिजेत ते बोल. मी लगेच चेक देतो तो घे आणि जा इथून निघून... अक्षता बोलते आता कायदा बोलेल तुमचा पैसा नाही , बघाच तुम्ही......मी आता निघतेय , तुम्हाला लवकरच कळेल कि एक सामान्य कुटुंबातली मुलगी काय काय करू शकते ते.... त्या मुलाचे वडील बोलतात तू कशी इथून तुझ्या घरी पोचतेस तेच बघ तू आता....
अक्षता आणि तिची मैत्रीण तिथून निघतात. आणि सर्वात प्रथम हॉटेल वर पोचतात, आणि एकमेकीला बोलतात कि लागलीच इथून निघूया, नाहीतर आपण ह्या लोकांच्या कचाट्यात सापडू....त्या दोघी निघण्याची तयारी करायला घेतात. तेवढ्यात दहा मिनिटांनी त्यांना बाहेर काहीतरी गोंधळ चालला आहे असं ऐकू येत, त्या दोघी बाहेर येतात तर त्या मुलाचे वडील आणि चार, पाच गुंड त्यांच्या बरोबर आलेले असतात. अक्षता ला मात्र आता काय करावं तेच सुचत नसत. ते लोक अक्षता चा रूम नंबर विचारत असतात.
आता मात्र अक्षता घाबरते , काय करावे तिला समजत नसत, ती काय घडेल ह्याचा विचार करेपर्यंत ते लोक तिच्या रूम पर्यंत आलेले असतात. त्या मुलाचे वडील आणि ते गुंड त्या रूममध्ये घुसतात आणि अक्षता ला बोलतात जर तुझा जीव प्यारा असेल तर हा विषय सोडून दे, ती बोलते मी का माघार घ्यायची मला काय सहन करावे लागले आहे ते मलाच माहित आहे आणि इथे तुम्ही तुमच्या मुलाच खुशाल लग्न लावून देताय. मला मुंबई ला पोचुदेत मग मी काय करते ते दिसेल तुम्हाला... ती असं बोलताच ते गुंड तिला पकडतात आणि बोलतात तू कशी पोचतेस ते बघच तू आता ....
त्या मुलाचे वडील त्या हॉटेल वाल्याला एक पैश्याच बंडल देतात आणि अक्षरशः त्या दोघींना तिथून फरफटत नेतात आणि गाडीत टाकतात. आणि थोड्या वेळाने एका निर्जन ठिकाणी नेवून एका रूम मध्ये बंद केलं जात. अक्षता ला काय करावे हे समजत नसते, ह्या सगळ्या झटापटीमध्ये तिचा मोबाईल हॉटेल रूम मध्येच राहतो. अक्षता देवाचा धावा करत असते... तिला मोबाईल नसल्यामुळे कोणाला काहीच कळवता येत नसते.
तिथे त्यांना दुपारपासून कोंडून ठेवलेलं असतं, आता रात्र होत आलेली असते. अक्षता बोलते आता तर आई – बाबा पण घरी चिंतेत पडले असतील मी फोन उचलत नाही आहे बघून, अक्षताने येताना ती कुठे जातेय किंवा काय करणार आहे ह्या सर्व गोष्टीची माहिती तिच्या एका पोलीस मित्राला दिलेली असते, सेफर साईड म्हणून तिने त्याला हे सगळं सांगून ठेवलेलं असत, पण तिचा मोबाईल तिच्याजवळ नसल्याने तिला त्याला हि कळवता येईना....
( पुढच्या भागात आपण बघणार आहोत – अक्षता च्या मदतीला कोण येत ते ......)
लेखिका – सौ. सोनल गुरुनाथ शिंदे .......
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा