( मागच्या भागात आपण बघितले – अक्षता ला कोंडून ठेवण्यात येत आता पुढे.......)
इकडे अक्षता च्या घरी पण सगळे काळजीत असतात. तिचा फोन कोणीच उचलत नसत. आई तर रडायलाच लागते, रात्रीचे अकरा वाजत आलेले असतात, आता मात्र सगळेच घाबरतात. अक्षता चे बाबा बोलतात मी पोलीस स्टेशनला जावून येतो, ते पोलीस स्टेशन ला जावून येतात. सगळे सकाळ होण्याची वाट बघत असतात. सकाळीच अक्षता चा पोलीस मित्र ज्याला तिने ती कुठे जातेय हे सांगितल असत तो तिचा फोन कोणीच उचलत नाही आहे हे बघून घरी येतो ....
तो सांगतो, काका – काकी तुम्ही काळजी करू नका , मी बघतो काय करायचं ते. तो अक्षता चा फोन ट्रेस करतो, त्याला लोकेशन सापडत. त्या नुसार तो त्याची सूत्र हलवून सगळी माहिती काढतो, त्याला समजत कि हा फोन असलेली मुलगी काल ईथे होती पण तिला काही गुंडांनी इथून पकडून नेल आहे.....तो लगेचच नाशिक ला जायला निघतो ....तो सर्वात आधी अक्षता च्या घरी फोन करून हि सगळी माहिती देतो....
तो त्याच्या बरोबर अजून दोन पोलीस घेवून नाशिक ला त्या हॉटेलला पोचतो. त्या नंतर त्या मुलाच्या घरी जाणार आहे असं अक्षता ने त्याला सांगितलेलं असत त्यामुळे तो तिथे जावून पोचतो, आणि त्या मुलाला आणि त्याच्या वडिलांना ताब्यात घेतो. आणि त्यांनी सांगितलेल्या ठिकाणी जावून अक्षता आणि तिच्या मैत्रिणीला सोडवतो....
त्या मुलाला आणि त्याच्या वडिलांना अटक होते. अक्षता केस लढते त्या मुलाला दहा वर्षाची शिक्षा होते आणि त्याच्या वडिलांना पण शिक्षा होते, अक्षता बोलते आज मला खरा न्याय मिळाला आहे. अक्षता च्या डोळ्यात अश्रू येतात ती आई - बाबांना बोलते, आज खर्या अर्थाने मी हि लढाई जिंकली आहे . आणि त्यामुळे मी एक निर्णय घेतला आहे , माझ्यावर जी परिस्थिती ओढवली ती माझ्या लहान बहिणीं वर कधीच येवू नये म्हणून मी त्यांना कराटे च्या क्लास ला घालणार आहे ...
मुलींनी सेल्फ डिफेन्स हा शिकलाच पाहिजे, कधी कुठला प्रसंग येईल सांगता येत नाही, स्वतःमध्ये त्या प्रसंगाला समोर जायची हिम्मत असायला हवी ना.. समोरच्याला दोन फटके नक्कीच प्रत्येक मुलीला देता आले पाहिजे, आई – बाबा पण म्हणतात हे खर आहे, मुलीना स्व- संरक्षण’ नक्कीच करता आलं पाहिजे ना... हा तू छान निर्णय घेतलास बघ.....बहिणी पण बोलतात ...ताई आम्ही नक्की कराटे शिकायला जाणार....
अक्षता ची आई तिच्या बाबांना बोलते – अहो ह्या सगळ्यात अक्षता चं वय वाढत गेल ह्याचा आपण विचारच केला नाही , तिला एकोणतीस वं वर्ष लागेल तिच्या लग्नाच आता बघायला हवं ना....अक्षता बोलते आई मी हे जे काही माझ्याबरोबर घडलं होत ते लपवणार नाही मी हे सगळं मुलाकडच्याना सांगणार ... मी हा विषय लपवणार नाही हा उगाच भविष्यात प्रोब्लेम नकोत...आई – बाबा बोलतात पण हे सांगून तुला त्यांनी स्वीकारलं पाहिजे ना....
अक्षता बोलते – जे माझ्या नशिबात असेल ते होईल पण मी अज्जिबात हे लपवणार नाही हा..... आई – बाबा मात्र चिंतीत होतात... कारण कितीहि आपण म्हंटल कि आपला समाज आता पुढारतोय तरी पण एकवेळ मुलगा ऐकेल पण त्याच्या घरातले खुसपट काढतीलच.... आई बोलते कसं होणार काय माहिती .... बाबा बोलतात होईल गं सगळ नीट, तू काळजी करू नकोस....
अक्षता तिच्या निर्णयावर ठाम असते. ती म्हणते हा जो कोणी असेल तो हे सगळं स्वीकारून मला स्वीकारेल. मध्यंतरी दोन स्थळ येतात पण एक मुलगा हे ऐकून नकार देतो, आणि दुसरा मुलगा बोलतो मला चालेल पण माझ्या घरातले ह्यावरून तुला भविष्यात कसं समजून घेतील हे मी सांगू आताच सांगू शकत नाही आहे .... अशाप्रकारे दोन्हीकडून नकार येतो....
( पुढच्या भागात आपण बघणार आहोत – अक्षताचं लग्न ठरत का ते ......... )
लेखिका – सौ. सोनल गुरुनाथ शिंदे .......
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा