Login

न्याय - भाग - 7

nyay


न्याय - भाग – 7


( मागच्या भागात आपण बघितले – अक्षताचं लग्न ठरण्यात अडचणी येवू लागल्या होत्या आता पुढे..........)


अक्षता साठी त्या नंतर तीन महिन्यांनी पुन्हा एक स्थळ चालून आलं ह्यावेळी ती तयार च नव्हती पण अक्षता चे आई – बाबा बोलले आपण बघण्याचा प्रोग्राम करण्याआधी त्या मुलाला कुठेतरी बाहेर भेटून तू हे सगळ सांगावस अस आम्हाला वाटत, त्यामुळे घरी ते मुलाकडचे लोक येणार, ते नंतर नाही कळवणार, पुन्हा हिरमोड होणार हे सगळं टाळता येईल... अक्षता पण हो चालेल अस बोलली.


अक्षता ठरल्याप्रमाणे त्या मुलाला भेटायला गेली. तो मुलगा दिसायला छान होता. अक्षता ने त्याला हे सगळं सांगितल्यावर तो शांत च झाला. आणि मग थोड्या वेळाने बोलला हे तुझ्या हातावर निशाण कसले आहे, अक्षता तेव्हाच समजली होती कि ह्याला हे सर्व पटलेले नाही आहे, अक्षता बोलली त्या मुलांनी मी प्रतिकार करतेय हे बघून तेव्हा माझ्या हातावर वार केला होता, त्याच हे निशाण राहिले आहे. तो हाताकडे च बघत बसला.



ते दोघे एका कॉफी शॉप मध्ये भेटले होते, तो मुलगा काहीच बोलत नाही आहे हे बघून अक्षता ने कॉफी पिवून झाल्यावर त्याला निघूया का विचारले, तो पटकन हो म्हणाला..... अक्षता तेव्हाच समजली होती कि हा नकार देणार ...पण तरीही ती घरी आई – बाबांचा उगाच हिरमोड नको म्हणून त्यांना काहीच बोलली नाही त्यांना बोलली तो मुलगा चार दिवसांनी कळवतो बोलला आहे .....


त्या मुलाचा दोन दिवसांनी अक्षता च्या मोबाईल वर फोन आला तो म्हणाला एक विचारायचं होत कि मला तुम्ही पसंत पडला आहात पण एक विनंती होती कि हे सर्व आपण आपल्या दोघातच ठेवलं तर..... हे मी माझ्या घरातल्यांना सांगितल्यावर ते नकार देतील ...... तर प्लीज आपण हे त्यांच्यापासून लपवून ठेवलं तर......प्लीज त्यांना समझल तर ते नकार देतीलच ......


अक्षता चिडली आणि त्याला बोलली आणि दहा वर्षांनी ती मुल सुटून आली आणि त्या नंतर काही गोंधळ झाला आणि तेव्हा समजले तर ....नकोच त्यापेक्षा .... तो मुलगा म्हणाला... अग कसं कळेल कुणाला मी नाही सांगणार कधीच ... अक्षता म्हणाली पण मला कोणाला अंधारात ठेवायचे नाही आहे त्यामुळे मी नकार देतेय तुम्हाला.... अक्षता ने फोन ठेवला, तिला रडू यायला लागल....



असच मध्ये एक वर्ष निघून गेल. अक्षताच वय वाढत चाललं होत त्यामुळे आई – बाबांना चिंता लागून राहिली होती. समोरून हे सत्य ऐकून नकार च येत असे. आई – बाबा आता अक्षता ला सांगू लागले, तू भूतकाळ सांगणारच अशी अट असल्यामुळे तुला कोणी होकार देत च नाही आहे. तू विचार कर ह्या सगळ्यावर... पण अक्षता तिच्या निर्णयावर ठाम राहिली.....


अशीच मध्ये दोन वर्ष अजून गेली आणि अक्षता साठी एक स्थळ आलं... एका वर्षापूर्वी एका मुलीची केस ती लढली होती, त्या मुलीला सासरचे मूल होत नाही म्हणून छळत असत. नवरा दारू पिवून त्रास देत असे, तिला मारहाण करत असे. त्या वेळी त्या मुलीची आई आणि ती नेहमी तिच्या ऑफिस ला केससाठी येत होत्या, अक्षता ने त्या मुलीची घटस्पोट करून सुटका केली होती.

तर आज वर्षभराने त्या मुलीची आई तिच्या ऑफिस ला पुन्हा आली होती. तिला विचारू लागली... तुम्ही कशा आहात... तुम्ही कुठे राहता. लग्न केल नाही कि तुम्ही.... अक्षता बोलली हो बघतोय आम्ही स्थळ... त्या बाई का हे सगळं विचारात आहेत असं अक्षता ला वाटत होते पण त्या बाई अगदी आस्थेने चौकशी करत होत्या, त्यामुळे तिला त्यांच मन मोडवेना... त्या इथे कशासाठी आल्या हे अक्षता ने विचारल्यावर त्या म्हणाल्या, कि इथे जवळच एका नातेवाईकांकडे आली होती तर तुमच ऑफिस जवळ होत म्हणून आली. अक्षता ला हे कारण काही पटले नाही....



अशेच चार दिवस निघून गेले आणि एके दिवशी संध्याकाळी त्या बाई अक्षताच्या घरी आल्या, रविवार असल्यामुळे ती घरीच होती त्यांना दारात बघून अक्षता म्हणाली अरे काकी तुम्ही या ना आत या, त्यांच्या बरोबर त्यांचा मुलगा पण होता. ते दोघे हि आत आले. अक्षता ने आई – बाबांना सांगितले कि मी एक केस लढली होती त्या मुलीच्या आई आहेत ह्या....


आई – बाबा पण मनातल्या मनात विचार करू लागले कि का आलेत हे दोघ इथे ... त्यांचा गोंधळ उडालेला बघून त्या बाई म्हणाल्या हा माझा मुलगा ...( आदित्य ) ... ह्याला अक्षता खूप आवडते... ह्याच्या बहिणीची केस होती तेव्हा त्याने हिला बघितले होते. त्याला हि सोडून दुसर्या कोणाशीही लग्न करायचे नाही आहे अस हा बोलतोय त्या साठी आज आम्ही अक्षता चा हात मागण्यासाठी इथे आलो आहोत.


( पुढच्या भागात आपण बघणार आहोत – आदित्य ला अक्षताचा भूतकाळ माहित असतो का ते आणि त्यांनतर त्याचं लग्न ठरत का ते ......... )

लेखिका – सौ. सोनल गुरुनाथ शिंदे .......
0

🎭 Series Post

View all