Login

न्याय - भाग - 8

nyay


न्याय - भाग – ८


( मागच्या भागात आपण बघितले – अक्षता साठी आदित्य चं स्थळ चालून येत आता पुढे......)



आदित्यच्या आईने हे सांगितल्यावर घरातले सगळे अचंबित होतात. आदित्य दिसायला अगदी सुंदर असा नाही पण नाकी डोळी ... छान होता. अक्षता चे बाबा बोलतात. आदित्य काय करतोस तू बाबांनी विचारल्यावर तो पटकन - बाबा मी आय टी कंपनी मध्ये जॉब ला आहे अस बोलला. तो बाबा बोलला हे बघून सगळे खुश झाले.


आदित्य सांगू लागला. मी चिंचपोकळी ला राहतो, आमचा स्वतचा फ्लॅट आहे , सातव्या मजल्यावर राहतो आम्ही, मला पाच अंकी पगार आहे , माझी आई एका मराठी शाळेवर शिक्षिका आहे, वडील लहानपाणी चं एका अपघातात मरण पावले आहेत. माझी बहिण जिची केस अक्षता ने सोडवली होती तीच दोन महिन्यापूर्वी आम्ही दुसरं लग्न करून दिल आहे, आणि आता ती सुखी आहे.. आता घरी आई आणि मी असे दोघेच असतो.


अक्षता बोलली पण तुला माझा भूतकाळ माहित आहे का, तो ऐकल्यावर तू नकार देशील... आदित्य म्हणाला मला सगळं माहित आहे मी सगळी माहिती काढली आहे तुझ्याबद्दल, आणि मला काहीच हरकत नाही आहे कारण जो प्रसंग तुझ्यावर ओढवला त्यात तुझी काय चूक होती.... तू तर हिमतीने लढलीस त्यात तुझ्या हातावर पण वार झाला होता. ... पण तू जिद्द सोडली नाहीस केस जिंकलीस...

उलट मला तुझा अभिमान वाटतो कि तू स्वतः वकिली शिकून त्या गुंडांना शिक्षा दिलीस... तुझ्यासारखी हिम्मतवान मुलगी मला माझी सहचारिणी झालेली खूप आवडेल... अक्षता रडू लागली. ते बघून पटकन आदित्य म्हणाला अग आता रडायचं नाही मी कायम असेन तुझ्याबरोबर , तुझ्या साथीला.... मी आवडलो कि नाही तुला. अक्षता लाजली...


अक्षता चे बाबा – आदित्य च्या आई ला बोलले ताई तुम्हाला हिच्या भूतकाळाविषयी आदित्य हे सगळं आधीच बोलला होता का .. त्या म्हणाल्या हो मला हे त्याने सांगितलं होत, आणि मला त्या बद्दल काहीच प्रोब्लेम नव्हता. उलट माझी होणारी सून खूप धाडसी आहे अस मी त्याला बोलले....


आदित्य बोलण्यात हुशार आणि समंजस होता. घर आणि नोकरी हि छान होती. त्यामुळे अक्षता चे बाबा बोलले आम्ही उदया तुमच घर बघायला येतो... ते अक्षता ला विचारू लागले आदित्य आवडला कि नाही ती हसली.. सगळे खूप खुश झाले तिच्या आईने लगेच देवाजवळ साखर नेवून ठेवली.


दुसर्या दिवशी अक्षता चे आई – बाबा आणि अक्षता आदित्य चं घर बघायला गेले. त्याचा फ्लॅट खूप सुंदर होता. दहा माळ्याची बिल्डींग होती ह्याच घर सातव्या मजल्यावर होत. आदित्य ने अक्षता ला मेसेज करून तू पण प्लीज ये अस सांगितलं होत त्यामुळे ती पण आई – बाबांबरोबर आली होती.. सर्वाना घर खूप आवडल... आणि मग तिथे लग्नाची बोलणी होतात. आदित्य ची बहिण आणि तिचे मिस्टर पण आलेले असतात. अशाप्रकारे अक्षताच आदित्य बरोबर लग्न ठरत. पुढच्या महिन्यातला मुहूर्त काढूया अस सर्वानुमते ठरत......

( पुढच्या भागात आपण बघणार आहोत – अक्षताच लग्न आणि तिचा संसार...)
0

🎭 Series Post

View all