Login

न्याय - भाग - 10 ( अंतिम भाग )

nyay
न्याय - भाग – 10 ( अंतिम भाग )

( मागच्या भागात आपण बघितले – अक्षताला बाळ होणार असत....आता पुढे ....)


अक्षता सातव्या महिन्यात ओटभरणी करून डिलिवरीसाठी माहेरी येते. नऊ महिन्यांनी अक्षताला गोंडस मुलगी होते, तिला आणि आदित्य ला मुलगीच हवी असते त्यामुळे दोघे खूप खुश होतात. दोन्ही घरात आनंदी – आनंद होतो.. बाळाच बारसं केल जात बाळाच नाव ( अधिरा ) ठेवलं जात. अक्षता तीन महिने माहेरी राहून सासरी बाळाला घेवून जाते....


अक्षता सासरी येते, अक्षता ची सासू बोलते आपण बाळाच्या देखभालीसाठी कोणीतरी बाई ठेवूया का, म्हणजे तू ऑफिस ला जावू शकशील, अक्षता बोलते पण त्या नवीन बाई च्या भरोश्यावर बाळाला ठेवून जाण मला एवढं पटत नाही आहे. सासू बोलते बघूया आपण काही सोय होते का ते. दोन दिवसांनी अक्षता ची सासू बोलते मी राजीनामा द्यायचा विचार करतेय म्हणजे बाळासाठी जी बाई आपण ठेवणार आहोत तिच्या बरोबर घरी कोणतरी सोबतीला हि असलं कि आपल्याला चिंता राहणार नाही.


आदित्य आणि अक्षता नको आई लगेच नोकरी का सोडतेस अशे बोलत असतात, आपण बघू काही सोय होते का ते ..पण सासू ऐकत नाही ती बोलते माझा निर्णय झाला आहे आपल्या बाळाला अशा नवीन बाई बरोबर घरी एकट सोडणं मला योग्य वाटत नाही आहे मी मस्त पैकी बाळाच्या बाललीला बघण्यात दिवसभर आनंदी राहीन.....आणि तसे हि माझं वय चोपन्न होत आलय मला आता घरी आराम करावासा वाटतोय... बऱ चालेल आई ..जशी तुझी इच्छा.. अस आदित्य म्हणतो.


अक्षता आता ऑफिस ला जावू लागते, बाळाला मालिश आणि अंघोळीसाठी एक बाई ठेवली जाते. सासू बाळाला अगदी छान पैकी सांभाळत असते. अशेच दिवस जात असतात..... अधीरा हळू हळू मोठी होत असते. अक्षता च्या दोन्ही बहिणींची मध्यंतरी लग्न होतात. त्यांना हि सुरेख सासर मिळत. अधिरा चार वर्षाची होते तिला शाळेत घालण्यात येत.


एके दिवशी संध्याकाळी अक्षता ची सासू अधीराला घेवून बिल्डींग खाली गार्डनला खेळायला घेवून गेलेली असते. आणि तिला कसतरीच व्हायला लागत. तिला गार्डनमध्येच हार्ट अटॅक येवून ती खाली कोसळते. पटकन सर्व आजूबाजूची लोक तिला हॉस्पिटल मध्ये ऍडमिट करतात, पण तिचा एक तासात मृत्यू होतो. आदित्य आणि अक्षता ह्या घटनेने पार कोलमडून जातात. अधीराला पण आजीचा खूप लळा असतो. ती पण खूप रडत असते.



असेच दिवस जात असतात. अधीरा सात वर्षाची झाल्यावर अक्षता तिला कराटे क्लासला घालते. अक्षता बोलते कराटे शिकण हि आजच्या काळाची गरज आहे त्यामुळे मुलीना स्वतःच रक्षण करता येईल...अधीरा कराटेच्या एक एक करून सगळ्या बेल्टच्या परीक्षा पास होते. मध्ये आदित्यची नोकरीमध्ये बढती होते. अक्षता एका मुलीवरच थांबायचं ठरवते. अधीरा अभ्यासात खूप हुशार असते. अधीरा खूप शिकते आणि मोठी होवून डॉक्टर होते. सगळं खूप छान चाललेलं असत.


आणि एके दिवशी आदित्य आणि अक्षता मार्केट मधून येत असतात तेव्हा त्यांना एक टेम्पोवाला धडक देतो त्यात आदित्यचा जागीच मृत्यू होता. अक्षता थोडक्यात बचावते. अधिरा ज्या हॉस्पिटल मध्ये प्रक्टिस करत असते तिथेच अक्षताला नेण्यात येत. अधीरा बोलते आई तो टेम्पोवाला पळून गेला पण त्याला मी शोधणार मी पप्पाना न्याय मिळवून देणार. अक्षता ला एवढ्या वर्षांनी न्याय हा शब्द ऐकून गलबलून येत, ती रडायला लागते.


आठ दिवसांनी टेम्पो वाला सापडतो त्याने त्या दिवशी खूप दारू पियालेली असते त्यामुळे त्याचा टेम्पो वरचा ताबा सुटतो आणि तो अक्षता आणि आदित्य च्या गाडीला जावून ठोकतो... त्या ड्रायव्हर ला शिक्षा होते. पण ह्यात नाहक आदित्यचा जीव जातो.....


अधिरा भविष्यात तीच छोटसं हॉस्पिटल ओपन करते. अक्षता बोलते हे सर्व अधीरा चं यश बघायला आदित्य हवा होता....... हॉस्पिटल आदित्य च्या नावाने उघडलं जात.
( आदित्य हॉस्पिटल ) असं नावं देण्यात येत.

अशाप्रकारे हि कथा इथे संपते आहे... पुन्हा भेटू लवकरच एका नवीन कथेसह.....

लेखिका – सौ. सोनल गुरुनाथ शिंदे .......
0

🎭 Series Post

View all