Login

ओ मेरे राजकुमार (भाग ११)

Love story

सकाळी ऑफिस मध्ये नेहमी सारखी कामं सुरू असतात.. समीर फारच बिझी असतो. माया येऊन तिच्या कामाला लागलेली असते. अचानक ती थोडा वेळ काढून समीर च्या केबिन जवळ जाते.. आत पाहते तर समीर पेन हातात हलवत, काही कागदपत्र मांडून विचारात गढलेला असतो. माया तशीच त्याचाकडे बघत असते.
समीर सहज समोर बघतो तर त्याला माया दिसते.. त्याला धडधडत असतं की ही काय बोलणार आहे आत येऊन? पण ती आत येतच नसते.. समीर उठून दाराजवळ जातो..
“माया..”
माया भानावर येते. तिला कळतं की आपण वेड्यासारखं समीरकडे बघत बसलो होतो..
“हॅलो.. आत ये.. इथे उभी राहून कोणाकडे बघत होतीस? माझ्याकडे का?” समीर मिश्किल हसतो.
“नाही म्हणजे.. हो.. आय मीन मी तुमच्याशी बोलायला येत होते. मला काही विचारायचं होतं.”
“ माया, केबिन मध्ये ये प्लीज इथे नको.. आत ये.”
आता समीर च्या डोक्यात असतं की ही त्याला जाब विचारणार.. म सगळ्या ऑफिस समोर तमाशा नको!! माया केबिन मध्ये आल्यावर लगेच समीर,
“सॉरी सॉरी, मी काल तुला असं सोडून जायला नको होतं. माझ्या नंतर लक्षात आलं ते आणि तुझा नंबर ही नाही माझ्याकडे.. कालच सॉरी म्हंटल असतं. प्लीज ह्यावरून तू काही बोलू नकोस इथे. वाटलं तर मी शिक्षा भोगेन.. एक कॉफी ची.. तुला मस्त ट्रीट देतो..” समीर गयावया करत असतो..
मायाला हे सगळं ऐकून आणि समीरचा चेहरा पाहून खूप हसायला येतं. ऑफिस मध्ये असल्यामुळे ती जरा कंट्रोल करते.
“सर.. तुम्ही मित्र असला तरी बॉस आहात. मी तुम्हाला काही जाब विचारायला नाही आले. काल तुम्ही मला घरी सोडायचे कष्ट घेतलेत त्याबद्दल थॅंक्स बोलायला आले..”
समीर जरा शांत होतो.. 
“ओके..”
“ सर काल त्या बाईंना तुम्ही कुठे घेऊन गेलात? म्हणजे इतकं उशिरा त्या बाईला कुठलीही पोलीस कंप्लेंट न करता घेऊन जाणं बरोबर नाही ना.. आश्रम असो किंवा काहीही.”
“मी त्यांना आमच्या आश्रमात घेऊन गेलो.. पोलिसांना माहिती आहे आता आमच्या कामाबद्दल.. ते आश्रमात येऊन अश्या मुली, बायकांची चौकशी करतात.. खूप वाईट वाटतं ग हे असं पाहून. सगळ्यांना क्वालिटी लाईफ जगायचा हक्क आहे पण कायम बायका जास्त भरडल्या जातात. वापरायची वस्तू असते असं वाटतं बरेच जणांना. खूप जास्त वाईट वाटतं की काही वेळा आपण काहीच करू शकत नाही. म्हणून आम्ही आश्रमात त्यांना चांगली सेवा देतो..”
समीर खूपच इमोशनल झाला.. मायाच्या ही डोळ्यातलं पाणी आता लपत नव्हते. समीर तिच्याकडे बघतो तर ती डोळे पुसते. 
“ग्रेट जॉब सर.. तुम्ही इतके सेन्सिटिव्ह असाल असं वाटलं नव्हत आधी. तुम्ही ह्या कामासाठी अगदी मला रस्त्यात मध्ये सोडलं असतं तरी मला काही वाटलं नसतं.”
“असं कसं? माझ्या जवळच्या लोकांची काळजी मी आधी घेतली पाहिजे ना?”
मायाला त्याचा बोलण्याचा इशारा कळतो. समीरने हळूच एक पाऊल प्रेमाच्या दिशेने टाकलेलं असतं.. मायाला त्याचा डोळ्यात प्रेम स्पष्ट दिसत असतं. ती थोडी बैचेन होते. काय बोलायचं सुचत नाही.
“सर मला त्या आश्रमाला एकदा भेट द्यायला आवडेल..”
“हो नक्की मी घेऊन जाईन ना तुला. तू सांगशील तेव्हा”
माया थोडा वेळ विचार करते.
“ हो चालेल.. ह्या रविवारी जाऊ.”
“ ठीक आहे मी येऊन तुला घ्यायला.. १० वाजता सकाळी तयार रहा.”
आता दोघंही कामाला लागतात. समीर रविवारची वाट बघायला लागला असतो. माया ने स्वतः त्याचबरोबर येण्याची तयारी दाखवली असते, आश्रमात का होईना.. माया सुद्धा रविवारची वाट बघत असते. नकळत ती सुद्धा समीरला पसंत करायला लागलेली असते..
ती प्रियाला फोन करते, “ हॅलो प्रिया?”
“ बोला.. आज आठवण आली का आमची??”
“ नाही ग.. रोजच येते. पण वेळच नाही मिळत. तुम्हा दोघांना खूप मिस करते मी..”
“हो का.. बरं.. ऐक ना माया.. तुला एक बातमी सांगायची आहे..”
“बोल न.”
“राज ने मला प्रपोज केलं.. वुई थिंक वुई आर मेड फॉर इच अदर.
“काय??? किती नालायक आहात दोघं? कधी झालं हे? मला सांगितलं पण नाही?”
“अगं मला आज प्रपोज केलं त्याने आणि मी आजच हो म्हटलं तर तुला कसं आधी सांगू??”
“ हो तेही बरोबर आहे..”  थोडा वेळ माया गप्प होते.. “प्रिया आय थिंक मी सुद्धा प्रेमात पडले आहे..”
“काय??” प्रिया जवळपास किंचाळते..
“हो. समीर मला आवडायला लागला आहे. मी जो विचार करत होते तसं नाहीये.. तो खूप चांगला आहे, काळजी घेतो” आणि पुढे ती सगळं घडलेलं सांगते..
प्रियाला खूप आनंद होतो “ वाह माया.. मी बोलले होते ना तुला? मी पैज जिंकले. आता पार्टी पाहिजे.”
“हो बाई.. पण हे माझ्या बाजूने आहे. त्याचं काय? तो बॉस आहे माझा सध्या तरी.”
“माया तू वेडी आहेस आणि तो तुझ्या साठी वेडा आहे.. नाहीतर तुझा पत्ता शोधत आला नसता ऑफिस मध्ये. मला तेव्हाच वाटलं होतं की असं होणारच..”
“रविवारी आम्ही आश्रमात जाणार आहोत एकत्र..”
“ही डेट असते का अशी? जरा कॉफी शॉप तरी निवडायचा.”
“गप ग.. डेट नाही त्याने जे काम केलं त्याचं कौतुक समज..”
“ओके तू जा.. पण त्याला जाणवू दे तुझ्या मनात काय आहे.”
“ थांब.. माझं मला क्लिअर करू दे आधी.. मग मी बघेन.. नाहीतर मी खूप घाई केली असं होईल.”
“ओके बाय.. मला फोन कर जाऊन आलीस की.”
दोघी बाय करून फोन ठेवतात.. 
…………………………………………,…..............................
समीर ही रविवारची वाट बघत असतो.. त्याने ठरवलं असतं की मायाला एक छोटंसं गिफ्ट द्यायचं. पण त्याला काहीच सुचत नसतं शेवटी तो फुलांचा बुके घ्यायचं ठरवतो..
मायाला माझं तुझ्यावर प्रेम आहे असं सरळ सांगू का? नको… वाट लागली तर सगळंच जाईल हातातून.. त्यापेक्षा मी तिला परत कुठेतरी बहाणा करून नेईन आणि सांगेन.. काहीतरी मोठं करू का? मी इतक्या मोठ्या कामांना घाबरलो नाही का इतका विचार केला.. पण हे खूपच जड जातंय.. बाकी लोक किती बिनधास्त आय लव यू म्हणतात.. मला का भीती वाटते?
असे असंख्य विचार समीर करत असतो..
“समीर.. काय रे? एवढं मग्न होऊन काम ही नाही करत.. कसला विचार चालला आहे?”
सलील समीरच्या पाठीवर थाप मारतात..
“ ये सब मोह माया है.” निता ने अगदी मनातल ओळखलं होतं त्याचा..
“काही नाही बाबा.. असच.”
“काही नाही काय? मला सांगितलं नीताने सगळं.. तू प्रेमात पडला आहेस ह्यावर माझा विश्वास नाही बसला आधी पण आता तुला पाहून बसतोय.. लगे रहो.. माया ना नाव तिचं? आपल्या ऑफिस मध्ये आहे म्हणे? मी काही जास्त येत नाही पण माझ्या कानावर बऱ्याच गोष्टी असतात.. आता तरी कंपनी चा मालक म्हणून वाग रे मुला.. ही संधी आहे तिला पटवायची..”
“नाही हा प्लीज.. माझं काम अजून झालं नाही आहे.. मला ६ महिने द्या.. बास.. आणि माया वेगळी आहे खूप. तिला असं लालुच दाखवून पटवता येणार नाही. ती साधी सरळ आहे. मला तसच ती माझ्या आयुष्यात हवी आहे.”
तेव्हढ्यात निता बोलते.. “ माझी भेट घालून दे न एकदा.. मला पहायचं आहे तिला..”
“ नो आई.. मी सांगितलं ना तुला वेळ आली की भेट घडवून देईन.. बाबा तूही नाही भेटायचं कळलं?”
“ नाही भेटणार.. चिल्.. तसही मी आणि निता उद्या बेंगलोर ला चाललो आहोत एक विक.. नंतर ची काही खात्री नाही आम्ही भेटण्याची.”
 दोघे हसत बाहेर जातात..
निता परत मागे येते, “समीर एकच गुलाबाच फुल दे तिला गिफ्ट म्हणून तिला हो म्हणायला जास्त काही लागणार नाही.”
नीताने एका वाक्यात समीरचा प्रश्न सोडवला असतो. तो मायाला सरळ प्रपोज करायचं ठरवतो..

(नमस्कार वाचक मित्रांनो आणि मैत्रिणींनो.. काही घरगुती कारणामुळे भाग टाकायला उशीर झाला त्यामुळे क्षमस्व..  या पुढील भाग वेळेत येतील ह्याची खबरदारी घेऊन..)
क्रमशः
(मी पहिल्यांदा कथामालिका लिहीत आहे. कथा पूर्ण काल्पनिक आहे तरी चूकभूल माफ असावी. तुम्हाला ही कथा आवडली तर लाईक करा, कमेंट करा. नाही आवडली तरी कमेंट करा. तुमच्या कमेंट मुळे लिहायला हुरूप येतो)

© स्वराली सौरभ कर्वे

0

🎭 Series Post

View all