आरजूसमोर एक शर्टलेस मुलगा पांढरे टॉवेल गुंडाळून उभा होता. तो तरुण दिसायला अतिशय देखणा , सरळ नाक , आकर्षक डोळे , सिक्स पॅक ऍबस असलेला , गौरवर्णीय , रेखीव दाढीमिश्या आणि खूप हँडसम होता.
आरजू त्याला या अवस्थेत पाहून ओरडली आणि तो व्यक्ती पण ओरडला. पण लगेच त्या मुलाने आरजूच्या तोंडावर हात ठेवून तिला भिंतीवर टेकवले.
"चूप..!" तो व्यक्ती ओरडला.
"भूत दिसतो का मी ? मिलिंद आहे मी. तू माझ्या घरी कशी घुसली ? बोल ना आता. बोलती क्यू नहीं. " मिलिंद
आरजू डोळ्यानेच हातहटवण्याचा इशारा करू लागली.
"ओप्स सॉरी. " मिलिंद लगेच हात हटवतो.
"हे माझे घर आहे. मी घोसलाला रेंट भरलेय. " आरजू
"मी पण आजच रेंट भरलय पण डायरेक्ट ऑनरला. " मिलिंद
मग आरजू घोसलाला कॉल लावते आणि स्पीकरवर फोन ठेवते.
"काका. इथे आधीच हा मुलगा राहतो. मी या मुलासोबत नाही राहू शकत. " आरजू चिडून म्हणते.
"मी पण या मुलीसोबत राहू शकत नाही. " मिलिंद
"अरे पण इथे एक मुलगी राहायची ना. कल्याणी" घोसला
"ती आज सकाळीच गेली आणि तिने मला रूम दिली. ओनरशी बोललोय. " मिलिंद
"थांबा. मी ओनरलाच कॉन्फरन्सवर घेतो. " घोसला
मग ओनर कॉन्फरन्सवर येतो.
"ओह. रायता फैल गया. मिलिंद आणि आरजू एकाच वेळी आले. माझे मत आहे तुम्ही दोघांनी एकत्र रहा." ओनर
"काय म्हणताय ? घोसला अंकल मला दुसरी रूम शोधून द्या. " आरजू
"बेटा. उद्यापासून लॉकडाउन आहे. सर्व घरमालक आता कुणालाच घरी येऊ देणार नाहीत कोरोनामुळे. म्हणून तू इथेच रहा. " घोसला
"मी एका मुलासोबत राहू ? काय म्हणताय ?" आरजू पाणावलेल्या डोळ्यांनी म्हणते.
"मी तुमचे रेंट अर्धे करतो. "ओनर
"रेंट अर्धे करताय. " मिलिंद-आरजू एकाच स्वरात म्हणले. त्यांच्या डोळ्यात चमक येते.
"हो. परिस्थितीच अशी आलीय की संपूर्ण जग घरात बसलेय. त्यामुळे तू किमान एक महिना तरी इथेच रहा. तुला इतरत्र रूम भेटणार नाही. " ओनर
फोन कट होतो. आरजूला दुसरा पर्याय नसतो. तिचे डोळे पाणावतात. शेवटी मिलिंदला राहवत नाही.
"माझ्याकडे पैसे नाहीत म्हणून मी दुसरी रूम बघू शकत नाही. हे ओनर कधीच सेक्युरिटी डिपॉझिट परत देत नाहीत. पण तू सेफ फील कर. मी सच्चा शीख आहे. मुलींना त्रास देत नाही. विश्वास ठेव. " मिलिंद
"हम्म. बेडरूम कुठेय ?" आरजू
"मी आधी कपडे घालू की तुला माझी बॉडी बघायला मजा येत आहे ?" मिलींद हसला आणि चटकन आत गेला.
"माकड कुठला. " आरजू चिडते.
मग मिलिंद कपडे घालून बाहेर येतो आणि टॉवेलने स्वतःचे डोके पुसत असतो. आरजू बेडरूममध्ये जाते.
"शी. कसला पसारा आहे. एकाच दिवसात इतका पसारा ?" आरजू
"मुलांच्या खोली अश्याच असतात. मला काय माहित होते तू रात्री टपकशील ते ?" मिलिंद
"साफ कर हे. मी कशी झोपणार ?" आरजू
"कोण म्हणलं तू झोपशील म्हणून ?" मिलिंद
"ओय. मी बाहेर नाही झोपू शकत. मुलगी आहे मी. " आरजू
"मग ? एक दिवस तू झोपशील आणि एक दिवस मी. समान. समजले का ?" मिलिंद
"हो. पण सध्या खोली साफ करूया का ? झोप नाही येणार मला. "
"अग या पसाऱ्यातच मस्त झोप लागते. " मिलिंद
"देवा. झाडू दे मला. " आरजू
आरजू आणि मिलिंद रूम साफ करू लागतात.
"आ.." आरजू चिरकते.
"काय झाले ?" मिलिंद
मग आरजुच्या झाडूला मिलिंदची अंडरवेअर लागली असते.
"घाणेरड्या. अंडरवेअर कुणी अस कपाटाच्या खाली ठेवत का ? एकच दिवस झालाय ना तूला येऊन. " आरजू
"छानेरडी. तू तर मासा पकडतात तस पकडल. थँक्स मला भेटतच नव्हती ही अंडरवेअर. " मिलिंद
"माकड कुठला. देवा कुठे अडकवले रे. " आरजू
"चल मी थकलोय. उद्या अनारकली येऊन बाकीचे साफ करेल. " मिलिंद
"ए तसले गर्लफ्रेंड वगैरे चालणार नाही बर का ?" आरजू
"अनारकली कामवाली बाई आहे!" मिलिंद
दोघेही हसतात.
आरजू बेडरूममध्ये आणि मिलिंद बाहेर सोफ्यावर झोपी जातो.
सकाळी बेल वाजते. मिलिंद आणि आरजू एकदाच उठतात आणि दार काढतात. समोर अनारकली असते.
जो सोचा था वही हुआ
मिलिंदबाबा को इश्क हुआ
घर में आ गयी उनकी जिफ
अनारकली को मिलेगी रिलीफ..!!
मिलिंदबाबा को इश्क हुआ
घर में आ गयी उनकी जिफ
अनारकली को मिलेगी रिलीफ..!!
~ अनारकली ✍️
आरजू आणि मिलिंद एकमेकांकडे बघतात.
"ओय हा माकड माझा बीफ नाहीये. " आरजू
"ही हडळ पण माझी जिफ नाहीये. " मिलिंद
"तू मला हडळ म्हणालास ? थांब तुला दाखवते पुण्याचे पाणी!!" आरजू ओढणी कमरेला बांधत आणि मांड्या आपटत म्हणते.
"ओय तुस्सी दिखाते पिंड जालंधर का पानी. " मिलिंद पण तयार होतो.
दोघे मारामारी करू लागतात आणि केस ओढू लागतात.
छगडा ही प्यार की शुरुआत है
मानो न मानो दिलों की बात है
किस्मत ने ही आपको मिलाया है
आप न समझे पर मैंने समझा है..!!
मानो न मानो दिलों की बात है
किस्मत ने ही आपको मिलाया है
आप न समझे पर मैंने समझा है..!!
~ अनारकली✍️
मिलिंद आणि आरजू परत एकमेकांकडे बघतात.
"ओय मुघले आझम. आत ये पटकन आणि साफसफाई कर. " मिलिंद
"हो आणि आमच्यात तसलं काही नाही. " आरजू
मग अनारकली आत येऊन साफसफाई करू लागते.
आरजू पटकन फ्रेश होऊन बाहेर जाते. सामान घेऊन परत घरी येत असते. तोच तिला वाटेत काहीजण शिट्टी मारु लागतात. आरजू घाबरते आणि पुढे पुढे सरकते. ते मुले आरजूच्या मागे लागतात. तेवढ्यात तिथे एक बुलेट येऊन थांबते. त्या बुलेटवर मिलिंद बसलेला असतो.
आरजुला मिलिंदला पाहून आनंद होतो आणि ती सुटकेचा निःश्वास सोडते. मिलिंद खाली उतरतो.
" क्यू भाई ? लॉकडाऊन आहे म्हणून हे काम करताय का. वाजव आता शिट्टी !" मिलिंद रागात म्हणतो.
मिलिंदची बॉडी पाहून ते मुले घाबरतात.
"सॉरी दीदी. " ते मुले असे म्हणून पळून जातात.
आरजू हसायला लागते.
"यांना पण दाखवायचे ना पुण्याचे पाणी !" मिलिंद
"नको उगाच. जाऊदे थँक्स. " आरजू
"बस.." मिलिंद
मग आरजू बुलेटवर बसते. मिलिंद आणि ती घरी येतात.
अनारकलीने एव्हाना साफसफाई केलेली असते.
फिरसे आप साथ आए
दोनो की तकदीरे खिले
इश्क नहीं तो क्या है
ये तो प्यार का पैगाम है..!
दोनो की तकदीरे खिले
इश्क नहीं तो क्या है
ये तो प्यार का पैगाम है..!
~ अनारकली ✍️
अनारकली आपला शेर सांगून निघून जाते.
"हिच्याकडे लक्ष नको देऊ. " मिलिंद
"हो. पण तू बाहेर काय करत होता ?" आरजू
"चहा नाश्त्याला गेलो होतो पण बंद आहे सर्व. " मिलिंद
"अरे मी आहे ना. मी पोहे आणि दूध आणलंय. आपण नाश्ता करू. एकदा माझे पुणेरी पोहे खाऊन तर बघ. " आरजू
"ओके. मी पण मदत करतो. " मिलिंद
दोघे मिळून मस्त कांदेपोहे आणि चहा बनवतात. भरपेट नाश्ता करून तृप्त होतात.
"तू खरच मस्त जेवण बनवते. " मिलिंद
"थँक्स. " आरजू
मग बेल वाजते.
आरजू दार उघडते.
"मिलिंद आहे का ?" एक मुलगी म्हणते.
दिसायला खूप मॉडर्न असते. काही न म्हणताच आत येते आणि मिलिंद तिला पाहून उठतो.
ती मुलगी मिलिंदला मिठी मारते..
क्रमश..
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा