ओ मेरी जान ! पार्ट 3

.
"निहाल तू..!" मिलिंद

"निहाल कशाला ? चिटी म्हण ना. " निहाल

मिलिंद लगेच तिला दूर सारतो.

"आरजू. तू आत जा. " मिलिंद

"ओके. " आरजू

मग आरजू आत जाते.

"हे बघ ही माझी नवीन गर्लफ्रेंड आहे. आपले ब्रेकअप झाले आहे. सो तू जाऊ शकते इथून. " मिलिंद

"कोण आहे तुझी गर्लफ्रेंड ? तुझ्यासारख्या माकडाला मी सोडून कोण पटणारे इतक्या लवकर ?" निहाल

"आरजू आहे ती..यार सर्वजण मला माकड का म्हणताय मी किती हँडसम आहे. " मिलिंद

निहालचा चेहरा पडतो. मग मिलिंद लगेच आत जातो.

"आरजू. माझी एक मदत कर. माझी गर्लफ्रेंड बन. " मिलिंद

"काय बोलतोय ?" आरजू

"अग ही निहाल नुसतं मागे लागलीय. प्लिज मदत कर तिला पळवायला. मी पण तुला वाचवले होते ना. खूप वाईट मुलगी आहे. मागेच लागते. " मिलिंद हात जोडून केविलवाणा चेहरा करत म्हणला.

"बर पण एक शेवटचे ! ह्या बाईला दाखवतेच पुण्याचे पाणी . " आरजू कमरेला ओढणी बांधत म्हणते.

मग आरजू पाय आपटत बाहेर येते.

"काय ग सटवे हडळ खविस मकडीची हिरोईन. कनिष्क सरांच्या कथांमधील भूत. " आरजू

"वेट. हू इज कनिष्क ?" निहाल

"तुला कनिष्क सर माहीत नाहीत ?" आरजू निहालला मारते.

"तुला कनिष्क सर माहीत नाहीत. मर कुठेतरी चुल्लू भर पाण्यात. " मिलिंद पण मारतो.

"बाय द वे. कनिष्क कोण आहे ?" मिलिंद हळूच आरजूला विचारतो.

"जा इथून आणि माझ्या इकडच्या स्वारीच्या आसपासही फिरकायचे नाही. नाहीतर मी पुणेरी आहे. परकियांचे आक्रमण कसे थोपवायचे आमच्या रक्तात असते. छत्रपती शिवराय आणि बाजीरावाचे रक्त आहे आमच्यात समजलं का. निघ इथून. " आरजू

"मिलिंद तू हिच्यासाठी मला हाकलून लावतोय. तुला नाही माझ्या पाया पडायला लावले तर नाव निहाल नाही. " निहाल पाय आपटत निघून जाते.

"अग जा. फूट" मिलिंद

"चल चल निकल. छुट्टे नहीं है. " आरजू

मिलिंद आणि आरजू जीभ बाहेर काढून लहान मुलांसारखे तिला चिडवू लागतात आणि एकमेकांना टाळी मारतात.

निहाल लिफ्टमध्ये जाते. आधीच खूप रागात असते. त्यात लिफ्टमध्ये जानकीबाईही असतात. नुकताच त्या हिमालयातून आल्या असतात. कार्तिक-आर्यनचा किस्सा अजूनही ताजा असतो. निहालने वनपीस घातला असतो.

"आजकालच्या मुली. किती लहान कपडे घालतात. आमच्या काळात आम्ही साडी नेसायचो आणि या मुली कमी कपडे घालून मॉडर्न असल्याचे दाखवतात. आपली संस्कृती वाऱ्यावर टाकली. " स्वभावाप्रमाणे जानकीबाई टोमणा मारतात.

"एक्सक्यूज मी. माझी चॉईस मी कोणते कपडे घालेल. तुम्ही जज करायचे नाही आणि मी ह्या सोसायटीत पण राहत नाही. तुमच्या सोसायटीत एक कपल लिव्हइनमध्ये राहते ते बघा. " निहाल

"कोण राहते लिव्हइनमध्ये ?" जानकीबाई

"फ्लॅट नंबर 106. " निहाल

मग कुत्सितपणे हसतच निहाल निघून जाते.

जानकीबाई लगेच बायकांची मीटिंग अरेंज करतात.

"फ्लॅट नंबर 106 मध्ये एक जोडपे लिव्ह इन मध्ये राहतात. हे आपल्या संस्कृतीत नाही. " जानकीबाई

"अग पण आजकाल खूप कॉमन झाले हे. " माधवी मॅडम पॉपकॉर्न खात म्हणल्या.

"तुझा चिंटू उद्या गर्लफ्रेंड घेऊन आला मग ?" जानकीबाई

माधवी मॅडम घाबरल्या.

"अग हिचा चिंटू पाच वर्षांचा आहे फक्त. आणि आपण एकविसाव्या शतकात जगतोय. म्हणून असे बुरसटलेले विचार सोडून द्यायला हवेत. " वृषाली मॅडम माधवी मॅडमला आधार देत म्हणल्या.

"नाही. निषेध निषेध घोर निषेध. " जानकीबाई उठल्या.

पर्यायाने सर्व महिलांना उठावे लागले. साफ करत असलेली अनारकली हे सर्व ऐकते.

" रुक्सत दे हमे काम हो गया है
हमारे जाने का समय आ गया है
इश्क करने वालों को बचाना है
इसी बहाने दिल को सुकून देना है..!!

~ अनारकली ✍️"

"हा जा तू. उद्या लवकर ये. " जानकीबाई म्हणतात.

त्यांना शायरी कळली नसते.

"यार ही किती सुंदर शायरी करते. मी हिच्या शायरी लिपिवर पोस्ट करत जाईल. " वृषाली मॅडम म्हणतात.

इकडे आरजू आणि मिलिंद मस्तपैकी हसत होते.

"यार पण ती परत आली होती मग काय प्रॉब्लेम होता तुला?" आरजू

"ती चांगली नाही मनाने. तिला बॉयफ्रेंड नाही तर बॉडीगार्ड हवा होता. ती मला महागडे गिफ्ट आणायची पण माझ्यासाठी नाही तर तिच्या मैत्रिणीसमोर मी चांगला दिसावा म्हणून ब्रँडेड कपडे आणून द्यायची. मी तिच्यासाठी गाणे लिहायचो आणि ती मैत्रिणीसमोर गायला लावून एंटरटेनमेंट करवून घ्यायची. तिला मी हवाय फक्त टाईमपास म्हणून आणि युज करण्यासाठी. " मिलिंद

"हम्म. जाऊदे. टेन्शन नको घेऊ. " आरजू हातावर हात ठेवते.

तेवढ्यात बेल वाजते. आरजू दार उघडते. अनारकली घामाघूम अवस्थेत असते.

"काय ग अनारकली ? सलीम मेला का ?" आरजू स्वतःच हसू लागते.

" जल्दी से बन जाओ बेहन भाई
  क्योंकि आ रही है जानकी बाई
    इश्क पर बड़ा खतरा आया है
   उस निहाल ने ये फांसा फेका है

~ अनारकली ✍️ "

जानकीबाईचे नाव ऐकताच मिलिंद उभा राहतो. अनारकली मिलिंदला सर्व समजले म्हणून निघून जाते. पण आरजूला काहीच समजत नाही. कल्याणीने मिलिंदला जानकीबाईपासून जपून राहायला सांगितले असते. काही वेळेत जानकीबाई आपल्या सेनेसह येतात.

"दार उघडा. माधवी हा दरवाजा तोड. " जानकीबाई

"मी काय दया वाटले का ?" माधवी मॅडम म्हणतात.
मग जानकीबाई मूठ आवळतात आणि दरवाज्याला मारतात तोच मिलिंद दरवाजा उघडतो आणि त्याच्या कपाळाला लागते.

"अग बाई. सॉरी. " जानकीबाई

"या ना आत. पूर्ण महिलामंडळ इथे ?" मिलिंद

"नाही. या घरात एक मुलगीही राहते ? तुमच्या दोघांचे नाते काय ?" जानकीबाई

"दादा. कोण आहे बाहेर ?" आरजू येते.

"तुम्ही बहीण भाऊ आहात का ?" जानकीबाई

"हो. मी मिलिंद सिंग आणि ही माझी बहिण आरजू पाटील. " मिलिंद

"सॉरी ह. चला महिलासेना. पीछे मूड. " जानकीबाई
मिलिंद दार लावत असतो. क्षणात जानकीबाईच्या लक्षात येते.

"थांबा. तू पंजाबी ती मराठी कस ? ती मुलगी म्हणत होती तुम्ही लिव्ह इन मध्ये राहतात म्हणून. " जानकीबाई

"आम्ही मावस बहीण भाऊ आहोत. मावशीने लव्हमॅरेज केले. ती मुलगी जरा पागल आहे. दादासोबत ब्रेकअप झाले तर उगाच प्रॉब्लेम करत आहे. " आरजू

"ओह. चला येते मी.  " जानकीबाई

मिलिंद-आरजू दोघे सुटकेचा निःश्वास सोडतात.

"पण खरं बोललो असतो तर काय बिघडले असते ? आपण मित्र म्हणून पण फ्लॅटमध्ये राहू शकतो. एक मुलगा आणि मुलगी यांच्यात दोनच नाते असू शकतात का ? एक भावाबहिणीचे आणि दुसरे प्रेमाचे ?" आरजू

"सोड. ती सेक्रेटरी आहे. आपल्याला बाहेर काढले असते. दरवेळी उपदेश देत बसायचे नाही. बाय द वे. आपली ओळख पण नाही झाली. मी मिलिंद सिंग. पिंड जलंधर. जिममध्ये ट्रेनर होतो. युट्युबवर म्युजिक चॅनेलही आहे. जास्त व्युज नाहीत ती गोष्ट वेगळी. पण मला सध्या बेरोजगारच समज. " मिलिंद

"बेरोजगार मी पण आहे. लंडनला जॉब लागणार होता पण नाही लागला. इथे जो जॉब होता तो सोडला. हॉटेल मॅनेजमेंट केले आहे. उद्यापासून मला पण जॉब शोधावा लागेल. मुक्काम पोस्ट पुणे. तस मी पण लेखिका आहे.  पुस्तक प्रकाशित केले आहेत पण सेल नाही झाला ती गोष्ट वेगळी. असो क्रिएशन करणे महत्वाचे आहे. " आरजू

"सही है. " मिलिंद

दोघे हँडशेक करतात आणि मैत्रीच्या नात्याला पालवी फुटते.

क्रमश..


🎭 Series Post

View all