ओ मेरी जान ! पार्ट 4

.
आज आरजू उशिरा उठली. सहजच टेरेसवर गेली. तिथे मिलिंद जिम मारत होता. नकळत आरजूच्या चेहऱ्यावर हसू आले. मिलिंद मन लावून व्यायाम करत होता. आरजू आलीय हे त्याच्या लक्षातही आले नाही. आरजू मात्र मिलिंदची बॉडी पाहून त्याच्या प्रेमातच पडली. पण काही क्षणात भानावर आली आणि तिने स्वतःच्याच हाताने स्वतःच्या डोक्यावर मारले.

"कंट्रोल आरजू. लव्हमॅरेज आपल्या नशिबात नाही. अँड मी या माकडाच्या प्रेमात कशी पडू शकते. "  आरजू स्वतःलाच म्हणते.

मिलिंद काही वेळाने बाहेर येतो. टॉवेलने पूर्ण शरीर पुसतो. त्याच्या देहावर वेगळेच तेज आले होते. इकडे आरजूही आंघोळ करून आलेली असते. आरश्यासमोर स्वतःचे केस पुसत असते. मिलिंद आरश्यासमोर येतो आणि त्याला आरश्यात आरजू दिसते. मिलिंदच्या चेहऱ्यावर आपोआप स्माईल येते. किती निरागसता आहे आरजूच्या चेहऱ्यावर असा विचार मिलिंदच्या डोक्यात येतो. क्षणभर त्याचा आरजूवर क्रश होतो. आरजू मागे वळून मुद्दाम केस उडवते आणि मिलिंद दूर सरतो.

"ओय क्या कररी.." मिलिंद

आरजू हसते.

"चल पटकन नाश्ता करू मग ठरवू कोणता जॉब करायचा आहे ते ?" आरजू

मग दोघे नाश्ता करतात.

"नाव काय म्हणलीस या डिशचे ?" मिलिंद

"सुशीला. " आरजू

"वाह. तुझ्या आजवडिलांनी मस्तच शिकवले आहे तुला स्वयंपाक बनवायला. " मिलिंद

"मला आईवडील नाहीत. अनाथ आहे मी. " आरजू

"सॉरी. " मिलिंद

"डोन्ट बी सॉरी. मला आईवडील आहेत. इथे दिल्लीतच राहतात पण त्यांनी माझा जन्म होताच मला सोडले. " आरजू स्माईल करते पण डोळ्यात एक राग असतो जो मिलिंदला दिसतो.

"मी चहा बनवतो. चहा आणि टोस्ट खाऊ. " मिलिंद मुद्दामहून विषय बदलवतो.

मग चहा पीत दोघे डिस्कस करू लागतात.

"हे बघ आपल्याला सोबत काहीतरी बिजनेस करावा लागेल. " आरजू

"काय करायचा ? लॉकडाऊनमुळे सगळे घरातच आहेत. कसला बिजनेस आणि कसलं काय ?" मिलिंद

"गरज ही शोधाची जननी असते. " आरजू

"म्हणजे ?" मिलिंद

"जाऊदे. आपण लॉकडाऊनकडे एक संधी म्हणून पाहू शकतो. म्हणजे बघ ना तुला जिम वगैरे येते सो तू झूमवर ऑनलाईन क्लास घेऊ शकतो. मला कुकिंग येते सो जे वृद्ध लोक किंवा बाहेरगावी शिकायला आलेले विद्यार्थी जे एकटे अडकलेत मी त्यांच्यासाठी जेवण बनवेल आणि तू सप्लाय डिलिव्हरी वगैरे करशील. बेकरी बंद आहेत म्हणून आपण केक बनवून विकू शकतो. किमान आपल्या आणि आजूबाजूच्या सोसायटीत तरी आपण बऱ्यापैकी विकू शकतो. " आरजू

"वाह. मला योगा , झुंबा डान्स पण येतो. तो पण मी शिकवू शकतो. " मिलिंद

"जर सोसायटीत काही जणांना कुकिंग शिकायचे असेल तर मी कुकिंग क्लास पण घेऊ शकते. " आरजू

"वाह. आपण स्वतःची कंपनी उघडू. " मिलिंद

"काय नाव ठेवायचे ?" आरजू

"मिलिंद + आरजू = म्यार्जु..?" मिलिंद

"गप रे. नाव नाही शिवी वाटत आहे ही. " आरजू

तेवढ्यात बेल वाजते आणि अनारकली येते.

"दिल बिचारा खानाबदोश है
  प्यार के लिए बेकरार है
काम ये तो सिर्फ बहाना हैं
किस्मत को तो तुम दोनों को मिलाना है..!!

~ अनारकली✍️"

"खानाबदोष ? ए माकड. नाव मिळाले. खानाबदोष."  आरजू

"अग पण आपली कंपनी फक्त खाण्याशी रिलेटेड नाहीये ना. " मिलिंद

" माकड कुठला. " आरजू चिडते.

"तू हडळ कुठली. " मिलिंद

"अरे खानाबदोष म्हणजे एकाच ठिकाणी न राहणारे. भटकंती करणारे. लॉकडाऊनमुळे आपण सर्व घरीच अडकलो आहोत पण आपले विचार , आपल्या आयडिया तर कुणी कोंडून ठेवू शकत नाही ना. म्हणून आपल्या कंपनीचे नाव असेल "खानाबदोष" ." आरजू

"आणि उडणाऱ्या कबुतराचे चित्र लोगो म्हणून ठेवूया. " मिलिंद

"ग्रेट.." आरजू

दोघे एकमेकांना हँडशेक करतात आणि कामाला लागतात.

क्रमश...


🎭 Series Post

View all