ओ मेरी जान ! पार्ट 5

.
आरजू लॅपटॉप चार्जिंगला लावते.

"मिलिंद. टाईमपास म्हणून लुडो खेळायचा का ?" आरजू

"लहान आहेस का लुडो खेळायला ?" मिलिंद

"अरे खूप मज्जा येते. प्लिज. " आरजू

" ठिके एका मित्राला विचारतो. तू पण विचार. चौघे खेळू. " मिलिंद

मग मिलिंद एकाला फोन करतो.

"भाई तुझ्याकडे खूप फालतू टाइम आहे. तू घरी रिकामा आहेस पण आम्ही बिझी आहोत. आम्हाला वर्क फ्रॉम होम आहे. लुडो खेळायचा टाइम नाही. " समोरचा म्हणतो.

मिलिंदचा चेहरा उतरतो. आरजूला लक्षात येते.

"काय झाले रे ?" आरजू

"काही नाही ग. बेरोजगार असल्याची फिलिंग जगात सर्वात खराब असते. देव शत्रूला पण बेरोजगार बनवू नये. म्हणजे लोकांच्या नजरेत आपण आयतोबा बनतो. लोकांना बिझी असलेले पाहून आपण किती रिकामटेकडे आहोत असे वाटते. " मिलिंद

" जीवनात अशी स्टेज येतच राहते. पांडव पण वनवासात राहून आले. जीवन परीक्षा पाहत असते. तू मूड खराब नको करू. दोघे लुडो खेळू. खूप मज्जा येईल बघ तू. " आरजू

दोघे मस्त लुडो खेळतात. नंतर आरजू लॅपटॉपवर कंपनीची वेबसाईट तयार करते. सुंदर लोगो बनवते.

"यार तू खरच जिनियस आहेस. तुला वेबसाईट पण बनवता येते. " मिलिंद

आरजू मग तिचे केस डोळ्यासमोर आणते आणि ओठांनी फुंकून उडवते.

अनारकलीने एक खबर दिली होती.

" जानकीबाईच्या घरी आहे मीटिंग
करून टाका बिजनेसची बीगिनींग !" अनारकली

दुपारी मिलिंद आणि आरजू मस्त प्रोफेशनल ड्रेस घालून जानकीबाईच्या घरी जातात. आरजूने तर पीपीटी पण बनवली असते.

"हॅलो लेडीज. तर आमच्या कंपनीचे नाव आहे "खानाबदोष" . " मिलिंद बोलायला सुरू होतो.

आरजू पण समजवून सांगते.

"मला योगा आवडतो पण हे परवानगी देतील की नाही ठाऊक नाही ?" माधवी मॅडम म्हणतात.

"माझी लहान मुलगी खुप आगाऊ आहे. मला करू देईल की नाही ठाऊक नाही. " प्रिया मॅडम म्हणतात.

"दुपारीच थोडा फावला वेळ भेटतो. त्यात लिपिवर लेखन करायचे असते सो सॉरी. " वृषाली मॅडम

"मला तर झोपच सुटते. आणि लॉकडाऊनमुळे आधीच बजेट कोलमडले सो फालतूचा खर्च नकोच." मृणालिनी मॅडम म्हणतात.

"एक मिनीट. ऐकून तर घ्या. " आरजू

"तुम्ही जाऊ शकता. " जानकीबाई

आरजू आणि मिलिंद निराश मुद्रेने घरी परततात.

"आपली कंपनी तर सुरू होण्यापूर्वीच बंद पडली. " मिलिंद

"घी अगर टेढ़ी उंगली से ना निकले तो उंगली को ही टेढ़ा करना पड़ता है. " आरजू

"अरे पागल. घी अगर सीधी उंगली से न निकले तो उंगली को ही टेढ़ा करना पड़ता है. " मिलिंद

"पुणेरी माणसांना शिकवू नको. आम्हाला जन्मतःच सर्व ज्ञान असते. आपल्याला चमच्याने तूप काढावे लागेल. " आरजू

"म्हणजे ?" मिलिंद

" कळेल. " आरजू

रात्री सर्व जेन्ट्स सोडा शॉपवर एकत्र जमलेले असतात. तेव्हा तिथे मिलिंद आणि आरजू भांडण करत येतात. एकमेकांचे केस ओढायला लागतात. जेन्ट्स दोघांना पकडतात आणि दूर करतात. महिला पण तिथे जमतात.

"ऐका ना काका. मी म्हणते की कोरोनामुळे सर्वाना इम्युनिटीची गरज आहे. बरोबर ना ?" आरजू

"बरोबर. " एकजण म्हणतो.

"मग घरात सर्वांसाठी राबराबणारी घराच्या स्त्रीला इम्युनिटीची जास्त गरज नाही का ? तिला फिट राहण्याचा अधिकार नाही का ?" आरजू

"का पण ? घरी काम करतात तेव्हा व्यायाम होतोच की. बरोबर ना काका ? " मिलिंद

"आणि मानसिक आरोग्याचे काय ? आणि घरी काम करून व्यायाम होतो मग जिम बंद करू आणि पुरुषांनाही धुणीभांडी करायला लावू. " आरजू

"स्त्रिया जर व्यायाम करू लागल्या तर मुलांना कोण सांभाळणार ? बरोबर ना काका. " मिलिंद

"का ? मुलांना सांभाळणे ही फक्त स्त्रीचीच जबाबदारी असते का ? घरचे पुरूष काही काळ पण सांभाळू शकत नाहीत का ? तुम्हीच बोला काका. " आरजू

"अरे पण फालतू खर्च कशाला ? आधीच कोरोना महामारी सुरू आहे. " मिलिंद

"महामारी आहे तर थोडा खर्च रोगप्रतिकारकशक्तीवर केला तर काय हरकत आहे ? आपल्याला शिकवत नाहीत का की प्रिकौशन इज बेटर दॅन क्यूअर. त्या जर सावित्री बनून सत्यवानचे प्राण वाचवू शकतात तर मग तुम्ही तिचे आरोग्य सुदृढ रहावे म्हणून काहीच करू शकत नाही का ?" आरजू

"हो. आमच्या बायकांनी निरोगी असायलाच हवे. " सर्वजण एकसुरात म्हणतात.

एव्हाना बायकांनी हा प्रकार पाहिलेला असतो. त्या लगेच योगा क्लासेससाठी परवानगी मागतात. सर्व पुरुषमंडळी परवानगीही देतात. काही पुरुष तर स्वतः पण योगा क्लासेस लावतात. काहीजण झुंबा क्लासेस लावतात. मिलिंद आणि आरजू यांना खूप आनंद होतो.

रात्री दोघेही गच्चीवर जातात आणि पाण्याच्या टाकीजवळ जाऊन बसतात.

"अभिनंदन माकडा. उद्यापासून तू बेरोजगार नसशील. " आरजू

"मिसेस हडळ पण जितकी कमाई होईल ती अर्धी वाटून घ्यायची आहे. " मिलिंद

"अरे पण योगा वगैरे तू घेतोय मग मी का ?" आरजू

"यार मला आकडेमोड जास्त समजत नाही पण तुझ्यावर विश्वास आहे. आणि उद्यापासून फूड डिलिव्हरी पण सुरू करू. खूप जण क्वारंटाईन आहेत मग त्यांना पण टिफिन पोहोचवता येईल. " मिलिंद

"पण यात खूप रिस्क आहे बघ ? विचार कर महामारी चालू आहे. " आरजू

"हो पण समज आपले आईवडील क्वारंटाईन असते तर आपण असेच वागलो असतो का ? माझ्या धर्मात सेवेला आणि अन्नदानाला खूप महत्व आहे. " मिलिंद

"छान. उद्या चौकशी करावी लागेल. आजूबाजूला खरच असे कुणी आहेत का ? मग एकदिवस सर्व भाज्या आणाव्या लागतील. मेनू ठरवावा लागेल. " आरजू

"तू मला लिस्ट देत जा. मी सर्व सामान आणून देत जाईल. " मिलिंद

"हो. ऑल द बेस्ट तुला. उद्यापासून आपल्या खानाबदोष कंपनीचे कबुतर खऱ्या अर्थाने उडायला सुरुवात करेल. " आरजू

दोघे परत हँडशेक करतात.

क्रमश..


🎭 Series Post

View all