Login

ओ मेरी जान ! पार्ट 6

.
सोसायटीच्या लोकांना मिलिंदचे योगा क्लासेस आवडू लागले. सोबतच आरजूनेही टिफिन डिलिव्हरी सुरू केली. काही कोविड ग्रस्त रुग्ण त्यांच्या घरातच क्वारनटाईन झाले होते. जानकीबाईच्या ओळखीचे एक वृद्ध जोडपे असेच कोविडग्रस्त होते. त्यांचे मुले परदेशात होते. मिलिंदने त्या जोडप्याला टिफिन पोहोचवण्याचे काम केले. बरेच विद्यार्थी दिल्लीतच थांबले होते. हॉटेल आणि मेस बंद पडल्यामुळे त्यांच्या जेवणाची तारांबळ उडाली होती. अश्या सर्वाना "खानाबदोष" चा आधार भेटला. आरजू आणि मिलिंद खूप कष्ट घेत होते. आरजू बाजारात फिरून फिरून चांगल्या दर्जाची भाजी निवडत. एकवेळ नफा कमी झाला तरी चालेल पण जेवणाचा दर्जा कमी व्हायला नको हे तिचे तत्व होते. आरजूच्या हातचे पौष्टिक आणि चविष्ट जेवण लोकांना आवडत होते. मिलिंद पण वेळेवर टिफिन डिलिव्हर करायचा. दोघे मिळून घर चालवत होते.

@ एक महिन्यानंतर

" आरजू किती वेळ यार ?" मिलिंद

" अरे थांब ना माकडा. एका महिन्याचा हिशोब करायला वेळ लागतो. " आरजू ओरडली.

" जाऊदे ना मिस हडळ. आपण पार्टी करू. " मिलिंद

" गप रे. हे बघ. महिन्याभरात टोटल पन्नास हजारचा प्रॉफिट झालाय. रेंट वगैरे कट करून. " आरजू

" ग्रेट. खानाबदोषची पहिली कमाई. चल आता तयार हो. शॉपिंग करू. डिनर करू. क्लबला जाऊ. " मिलिंद

" हट. यातले चाळीस हजार बाजूला काढू सेविंग म्हणून. म्हणजे भविष्यात बिजनेस ग्रो करायचा असेल तर कामाला येईल. सध्या वीस हजार खर्चासाठी घेऊ. " आरजू

मग दोघे तयार होऊन बाहेर जातात. आरजूने ब्लॅक रंगाचा वन पीस घातला असतो. त्यात ती खूप सुंदर दिसत असते. मिलिंद पण पांढरा टीशर्ट आणि त्यावर निळे जॅकेट घालतो. दोघे बुलेटवर बसून फिरायला जातात.

" मिलिंद खूप महागडे हॉटेल दिसत आहे रे. " आरजू

" फिकीर नॉट. वर्क हार्ड अँड पार्टी हार्डर. डोन्ट वरी." मिलिंद

" हम्म. लेट्स ऑर्डर समथिंग. " आरजू

दोघे मिळून ऑर्डर करतात.

" एका महिन्यात इतका प्रॉफिट म्हणजे वर्षभरात तर आपली कंपनी कुठल्या कुठे जाईल. " मिलिंद

" तुला वर्षभर दिल्लीतच रहायचे का ? मला तर लंडनला पळून जायचे आहे. " आरजू

" तुझा जॉब गेलाय ना पण !" मिलिंदचा चेहरा अचानक उतरतो.

" अरे हो पण भेटेलच ना कधितरी. मग दिल्लीला आणि खानाबदोषला कायमचा रामराम. " आरजू हसत म्हणते.

" हम्म. तुला बिजनेस ग्रो नाही करायचा ?" मिलिंद

" यार लंडनला चांगला जॉब लागला तर मी इथे टिफिन का देत बसू ? किती कष्ट पडतात ठाऊक आहे तुला ?" आरजू

" आपण कुणालातरी कामाला ठेवू. तुझे काम कमी होईल. " मिलिंद

तेवढ्यात डिनर येते.

" हम्म. बघू. लेट्स डू डिनर. " आरजू

दोघे डिनर करतात. मग मिलिंद आईस्क्रीम मागवतो.

" आरजू. मला तुला काही सांगायचे आहे !" मिलिंद

" बोल ना. " आरजू

मग मिलिंद गुडघ्यावर टेकतो आणि खिशातून अंगठी काढतो.

"आरजू , आय नो खूप घाईत होत आहे. पण प्लिज समजून घे. मी खूप प्रेम करतो तुझ्यावर. तुझ्यासोबत लग्न करायचे आहे. तुला राणीसारखे ठेवायचे आहे. माझ्याशी लग्न करशील ? माझी सरदारनी बनशील ? मी तुला खूप सुखात ठेवेल. तुला हवे तिथे फिरवेल. आय लव्ह यु. वुल्ड यु मॅरी मी ?" मिलिंद