ओढ...

Obsession

आहे आज ते माझे
जे क्षाणिक सुखाचे कारण
परक्या साऱ्या क्षणांनी केले
रूप आपलेपणाचे धारण

आनंदाची चढाओढ सारी
दुखाची टेहाळणी
ओलावल्या शब्दांची
सारी भावना अनवाणी

कधी वाद‌विवाद
कधी हसू ओठांवर
भावनांची चलबिचल ओसंडते
पापणीच्या काठावर

ही आयुष्याची गाथा जरी
असे थोड्याच क्षणाची
मी भांबावली जरी वेंधळी
मज ओढ नश्वर जगाची

~ ऋचा निलिमा