Login

ऑड वाट (भाग-३)

Inspirational story of marathi medium girl.

ऑड वाट (भाग-३)

© प्रतिक्षा माजगावकर 

(सदर कथा पूर्णतः काल्पनिक असून, कथेतील नावे, घटना, स्थळे याचा वास्तवाशी काहीही संबंध नाही. काही संबंध आढळल्यास तो निव्वळ योगायोग समजावा.)
*************************
हेमा आणि निशाची बरीच चर्चा झाली... घरच्यांना कसं विश्वासात घेऊन सगळं सांगता येईल हे सुद्धा दोघींनी ठरवलं... एव्हाना आता ४ वाजले होते... जेनिका आणि जॉन आता उठले.... 

"उठलात तुम्ही! चला आता आपण रानमेवा गोळा करू... संध्याकाळच्या वेळी जरा पोटाला आधार...." निशा म्हणाली. 

"रानमेवा मंजे?" जेनिका ने विचारलं. 

"कळेल कळेल... चला तर..." हेमा म्हणाली. 

सगळे शेतात फिरत होते... चिंचा, बोरं झाडावर दगडाने नेम धरून हेमा आणि निशाने पाडले... जेनिका आणि जॉन ने सुद्धा प्रयत्न केला.... फोटो, व्हिडिओ काढत सगळा रानमेवा गोळा करणं सुरु होतं! भरपूर रानमेवा गोळा करून झाल्यावर हेमाने त्यांना फुलातून मध ओढायला सुद्धा शिकवलं! दोघं खूप खुश झाले.... 

"Waw! What an expirence! Really we enjoyed a lot!" जॉन म्हणाला. 

"आली की नाही मज्जा! आता अजून एक मजा बाकी आहे... थोड्याच वेळात आता सूर्य मावळतीला जाईल... तेव्हाचं दृश्य पण बघा किती छान असेल..." हेमा म्हणाली. 

"Means? We Don't get what you say..." जेनिका म्हणाली. 

"अम्... Sunset! आता sunset होईल ना तो बघा... असं म्हणायचं आहे तिला..." निशा ने सांगितलं. 

"Okey!" जेनिका म्हणाली. 

सगळा रानमेवा संपेपर्यंत सूर्यास्ताची वेळ झाली! सूर्याचा तो लाल केशरट गोळा डोंगराड़ लपायला लागला होता... सगळीकडे लालसर उजेड पसरला... पक्षी आपापल्या घरट्यात परतायला लागले.... चिमण्यांच्या चिवचिवाट सगळी कडे घुमू लागला... जणू, सगळे एकमेकांशी दिवस भरात काय काय केलं याच्या गप्पा गोष्टी करत होते... झाडाची पानं थोडी मिटायला लागली.... कालव्याच्या पाण्यावर सूर्य किरणांमुळे एक वेगळीच चमक आली... पायवाटेवरून हळूहळू इतर शेतकरी आणि मजुरांनी परतीची वाट धरली... दिवसभराची सगळी घाई, शेतात काम करताना येणारा कुदळ, फावड्यांचा आवाज थांबला... सगळं कसं एकदम शांत आणि प्रसन्न झालं! 

"Waw! What's a look! Really, Nature is so beautiful!" जॉन म्हणाला. 

जेनिका आणि जॉन मनसोक्त या क्षणाचा आनंद लुटत होते.... यावेळी दोघांच्याही मनात फोटो चा विचार आला नाही... समोरचं हे मंत्रमुग्ध करणारं दृश्य ते फक्त डोळ्यात साठवत होते... हेमाने हळूच तिथला कॅमेरा उचलला आणि त्यांच्यासाठी हा क्षण सुद्धा कॅमेरात कैद केला... 

"चला गं पोरींनो! घरी जायला उशीर होतोय..." हेमाचे बाबा त्यांच्या दिशेने येत म्हणाले. 

पुन्हा सगळे गप्पा गोष्टी करत घरी पोहोचले. हात पाय धुवून हेमा आई ला मदत करायला गेली... यावेळी जेनिका आणि जॉन सुद्धा मदत करायला आले... 

"आता आमी पन करनार... तुमी आमचा खूप हेल्प केला... आता आमी पन करनार..." जॉन म्हणाला. 

"अहो नको उगाच! तुम्ही आज दिवसभर शेतात दमले असाल... बसा निवांत! झालंच आहे सगळं! हे बघा पानं घेतली आहेत... गरम गरम भाकरी करून वाढते..." हेमाची आई म्हणाली. 

"असा नाय... तुमी पन काम करता... तुमाला पन रेस्ट ची निड आहे... आमी करनार मदत!" जेनिका म्हणाली. 

सगळ्यांच्या मदतीने सगळा स्वयंपाक तयार झाला.... सगळे एकत्रच जेवायला बसले.... गरम गरम वरण भात आणि त्यावर तुपाची धार, तांदळाची भाकरी आणि कांदा बटाट्याची भाजी असा साधासा बेत केलेला... जेवणं झाल्यावर सुद्धा मागची आवरा आवरी करायला या दोघांनी मदत केली.... रात्री छान निरभ्र आकाशाखाली चांदण्या बघत बघत सगळे झोपले... सकाळी जाग आली ती कोंबड्याच्या आरवण्याने... 

"गुड मॉर्निंग हेमा!" जेनिका अंथरुणातून उठत म्हणाली. 

"गुड मॉर्निंग! तुम्ही तुमचं आवरून घ्या... तोपर्यंत चहा तयार होतोय..." हेमा सुद्धा स्मित करत म्हणाली. 

जेनिका आणि जॉन आवरून आले.... 

"हेमा! आमाला आज इंडियन ट्रेडिशन चे गुड्स परचेस करायचे! टुमारो आमी जनार घरी... We have only this day to enjoy with you!" जेनिका म्हणाली. 

"थांबा की अजून दोन दिवस! अजून खूप काही बघण्यासारखं आहे..." हेमाची आई म्हणाली. 

"आमाला पन थांबायचं होता... पन फ्लाईट चा बुकिंग आहे..." जॉन म्हणाला. 

"बरं! हेमा, आज जा यांच्याबरोबर... यांना जे बघायचं असेल ते सगळं दाखव... मी आज प्रवासात खाता येईल असा कोरडा फराळ करून ठेवते..." हेमाची आई म्हणाली. 

"हो आई! मी निशा ला बोलावून येते... मग आम्ही दोघी जाऊ यांच्या बरोबर..." हेमा म्हणाली. 

हेमाने निशाला तिच्या घरी जाऊन बोलावून आणलं! सगळे आता खरेदी साठी निघाले.... 

"हेमा! I want Saree and all indian jewellery! आपन आधी तिते शॉपिंग ला जाऊ..." जेनिका म्हणाली. 

"हो! गावात सदा काकांच कपड्याचं दुकान आहे तिथून आपण तुम्हाला दोघांना कपडे घेऊया... सखू मावशी चं बांगड्यांचं दुकान आहे तिथून टिकल्या, बांगड्या आणि बाकी सामान घेऊ..." निशा म्हणाली. 

सगळे सदा काकांच्या दुकानात आले... जेनिका आणि जॉन ने मनसोक्त खरेदी केली... सहा वारी साडी, नऊवारी साडी आणि जॉन साठी धोतर, पगडी! सखू मावशीच्या दुकानातून जेनिकाने मॅचिंग बांगड्या, टिकल्या, मंगळसूत्र आणि एक हार घेतला... सगळी खरेदी करता करता दुपार झाली... सगळे पुन्हा घरी आले... जेवण झाल्यावर जेनिका ने विचारलं; "मला आता सारी घालायला हेल्प करा ना... I want to click some photos.." 

"साडी घालत नाहीत ओ नेसतात! आणि मी शिकवते तुम्हाला... चला या..." हेमाची आई म्हणाली. 

जेनिकाला तयार करायला हेमाची आई तिला घरात घेऊन गेली... 

"Actually मला पन हे ट्रॅडिशनल वेअर ट्राय करायचं! माझी कोन हेल्प करेल?" जॉन ने विचारलं. 

"एक मिनीट हा! मी बंड्या मामांना सांगते तुम्हाला मदत करायला..." निशा म्हणाली. 

तिने बाजूलाच राहणाऱ्या बंड्या मामांना जॉन ची मदत करायला सांगितली! थोड्याच वेळात जेनिका आणि जॉन छान तयार होऊन आले.... दोघंही भारतीय वेशभूषेत खूपच छान दिसत होते... निसर्गाच्या सानिध्यात दोघांचं फोटो शूट झालं! एव्हाना आता तीन वाजले होते... ते दोघं पुन्हा त्यांच्या पेहरावात आले... आणि आता त्यांची उद्याच्या निघण्याची तयारी सुरु झाली! 

आपापसात बोलत सगळं सामान बॅगेत भरत ते त्यांची आवरा आवरी करत होते.... बॅग भरून झाल्यावर जेनिका ने हेमाच्या आई ला हाक मारली...

"हे आमचा कडून तुमाला गिफ्ट!" जेनिका एक पिशवी त्यांच्या पुढे करत म्हणाली. 

"हे कशाला? नको मला काही..." हेमाची आई संकोचून म्हणाली. 

"असा नाय चालेल... तुमी आमचा साटी एवड केला... तर हे गिफ्ट प्लिझ accept करा.." जॉन म्हणाला. 

जेनिका आणि जॉन च्या आग्रहाखातर हेमाच्या आई ने गिफ्ट घेतलं! जेनिका ने त्यांच्यासाठी छानशी एक साडी घेतली होती... निशाच्या आई ला सुद्धा एक साडी आणि हेमाच्या बाबांसाठी जॉन ने ऑनलाईन मसाजर बुक केला.... 

"कशाला एवढा खर्च केलात! तुम्ही आमचे पाहुणे आहात!" हेमाची आई म्हणाली. 

"तसा काय विचार नका करू... आमी तुमचा इते राहिलो ना... तुमी आमाला घरचा मेम्बर सारखं ट्रीटमेंट दिला! हेमा माज्या यंगर सिस्टर सारखी मंजे तुमी माज्या पन मॉम! Then, सन ने मॉम, डॅड ला गिफ्ट दिला तर चालता..." जॉन म्हणाला. 

त्यांच्या इच्छेचा मान राखून, ते दोघं सुद्धा आपले पणाने करतायत हे जाणून सगळ्यांनी गिफ्ट स्वीकारलं! 

"Hema, Nisha take this! This is our visiting card! आमाला इंडिया मदला सगला फेस्टिवल चा डिटेल्स द्यायचा! आमचा कॉन्टॅक्ट मदे राहायचा!" जॉन म्हणाला. 

"हो नक्कीच! थँक्यू!" हेमा म्हणाली. 

"Wait! Take this also!" जेनिका एक पाकीट पुढे करत म्हणाली. 

हेमा ने ते पाकीट घेतलं आणि उघडून बघितलं तर त्यात पैसे होते... 

"हे कशाला? सॉरी आम्ही हे नाही घेऊ शकत! तुम्ही आमचे पाहुणे आहात! आम्हाला तुम्ही सोशल मीडिया वापरायला शिकवलं, तुमच्यामुळे आम्हाला अजून थोडं फार इंग्लिश बोलता यायला लागलं! नाही.. आम्ही हे नाही घेऊ शकत!" हेमा पुन्हा ते पाकीट जेनिकाच्या हातात ठेवत म्हणाली. 

"But..." जेनिका बोलतच होती, पण निशाने तिला मधेच थांबवलं आणि म्हणाली; "तुम्हाला जर खरंच आम्हाला काही द्यायचं असेल तर तुमचा review द्या!" 

त्या दोघांचे गोंधळलेले चेहरे पाहून हेमाने तिचा टुरिस्ट चा सगळा प्लॅन दोघांना सांगितला! संध्याकाळ झालीच होती त्यामुळे तिथे निशाची आई आणि हेमाचे बाबा सुद्धा उपस्थित होते..

"बाळा पण, हे सोपं नाही... नक्की जमेल का तुम्हाला दोघींना?" हेमाच्या बाबांनी काळजीपोटी विचारलं. 

"Wait uncle! जमनार या दोघीना! खूप चान प्लॅनिंग आहे! आता आमी दोघे याच टुरिस्ट थ्रू इते येनार! इते आल्यावर स्वताचा गरी आला असा वाटता!" जेनिका म्हणाली. 

"थँक्यू सो मच! तुम्हाला इथे येऊन खूप आवडलं आणि तुम्ही आनंदी आहात हे जाणून खूप बरं वाटलं!" निशा म्हणाली. 

"ओके... चला आता review शूट करून टाका.. काय नेम टेवणार टुरिस्ट कंपनी चा?" जेनिका ने विचारलं. 

"अतिथी देवो भव" हेमाची आई म्हणाली. 

"वा आई! छान नाव सुचवलंस! हेच नाव ठेवूया... यात एक घरपण आहे..." हेमा म्हणाली. 

निशा आणि हेमाने मिळून त्यांच्या review चा व्हिडिओ शूट केला... Vlog सुरु करुन त्यांचा पहिला व्हिडिओ पोस्ट झाला... हे सगळं होता होता रात्र झाली.... 

"हे घ्या! यात चिवडा आणि लाडू आहेत! प्रवासात खा... आणि यात अजून काही खाऊ दिलाय तो सुद्धा खावा हा..." हेमाची आई जेनिका च्या हातात खाऊ चे डबे देत म्हणाली. 

"Waw! इंडियन डिश तिते पन खायला भेटणार! थँक्यू!" जॉन म्हणाला. 

"चला आता पटकन जेवण करून घ्या... उद्या सकाळी लवकर उठायचं आहे ना... लवकर झोपा...." हेमाचे बाबा म्हणाले. 

"वहिनी तुम्ही पण इथेच थांबा आज! मी तुमचा सुद्धा स्वयंपाक धरला आहे..." हेमाची आई म्हणाली. 

"बरं! मी दोन मिनिटात आले हा..." असं म्हणून निशाची आई तिच्या घरी गेली... 

तोपर्यंत हेमा आणि निशा हेमाच्या आई ला मदत करत होत्या... दोनच मिनिटात निशाची आई कसल्यातरी पिशव्या घेऊन आली... 

"हे घ्या! हे घरी केलेले पापड, कुरडई आणि लोणचं!" निशाची आई जेनिकाच्या हातात पिशव्या देत म्हणाली. 

"What is this? I don't know recipe!" जेनिका म्हणाली. 

"याला काय रेसिपी! लोणचं म्हणजे पिकल आणि पापड, कुरडई तळून खातात!" निशा म्हणाली. 

"हवं तर पापड आहेत घरात दाखवते तुम्हाला तळून..." हेमाची आई म्हणाली. 

सगळ्यांनी मिळून स्वयंपाक केला आणि जेवणं सुद्धा झाली... 

क्रमशः....
****************************
हेमाच्या वेगळ्याच प्रवासाचा श्री गणेशा तर झालाय... आता पुढे निशा आणि हेमा हे सगळं कसं निभावून नेतायत हे पाहूया पुढच्या भागात... तिच्या या ऑड कल्पनेला कसा प्रतिसाद मिळेल हे पाहणं विशेष असेल... तोपर्यंत आजचा हा भाग कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा... 

🎭 Series Post

View all