ऑड वाट (भाग-८)
© प्रतिक्षा माजगावकर
(सदर कथा पूर्णतः काल्पनिक असून, कथेतील नावे, घटना, स्थळे याचा वास्तवाशी काहीही संबंध नाही. काही संबंध आढळल्यास तो निव्वळ योगायोग समजावा.)
*************************
दुसऱ्या दिवशी सुद्धा सकाळी लवकर उठून व्यायाम झाला! आजचा दिवस रिम्पल आणि रॉबिन गावातले सामान्य लोक जी कामं दिवसभरात करतात ती करणार होते... जॅक आणि जेनी ची जबाबदारी हेमा, निशा कडे होती! त्या दोघांना सुद्धा गावातली मुलं जशी वेळ घालवतात तो अनुभव मिळणार होता... रिम्पल हेमाच्या आई बरोबर थांबली, रॉबिन हेमाच्या बाबांबरोबर शेतात गेला आणि या चिल्लर पार्टी ची स्वारी निघाली गावच्या शाळेकडे!
"Bye mom!" जॅक आणि जेनी हात हलवत त्यांच्या आई ला टाटा करत हसत हसत शाळेला जायला निघाले.
हेमा ने आदल्या दिवशीच त्या दोघांसाठी शाळेचा गणवेश आणला होता... पांढरा शर्ट आणि खाकी पॅन्ट जॅक चा गणवेश तर पांढरा ब्लाउज आणि त्यावर खाकी पेटीकोट हा जेनीचा गणवेश! तेल लावून भांग पाडलेला जॅक गोड दिसत होता तर, पांढरे रबर लावून बांधलेले दोन छोटे छोटे बो जेनी ला खूपच छान दिसत होते! पाच मिनिटं चालल्यावर शाळा आली.... हेमा ने दोघांना अजिबात दंगा करायचा नाही म्हणून समजावलं आणि वर्गात नेऊन बसवलं! तोवर निशा गुरुजींशी बोलून आली... वर्गात खाली सतरंजी वर बसणे, स्कूल बॅग ऐवजी शबनम बॅग हे त्यांना नवीनच होतं! सुरुवातीला दोघं गप्प गप्प राहिले पण, बाकी मुलांची मस्ती बघून ते सुद्धा त्यांच्यात सामील झाले.... कागदाची विमानं करून उडवणे, चोर पोलिसांच्या चिठ्ठया खेळणे सुरु झालं! एवढ्यात गुरुजी आले....
"ए मास्तर आले मास्तर आले...." सगळे एकच गोंधळ करून पुन्हा आपापल्या जागेवर बसले.
"तर, आज आपल्या वर्गात जेनी आणि जॅक नवीन आहेत! त्यांचं सागळ्यांनी टाळ्या वाजवून स्वागत करा..." मास्तरांनी सांगितलं.
सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या... जेनी आणि जॅक ला काही न समजल्या मुळे इतरांचं बघून त्या दोघांनी सुद्धा टाळ्या वाजवल्या... सगळे हसायला लागले... मास्तरांनी टेबलावर पट्टी आपटून सगळ्यांना गप्प केलं!
"Jenny and Jack please come here!" मास्तरांनी त्यांना समोर बोलावलं...
आपण काही चुकीचं केलं का असं वाटून दोघं घाबरले... हेमा आणि निशा तिथेच बाहेर होत्या... त्यांनी फक्त डोळ्यांनी जा म्हणून सांगितलं तेव्हा त्यांची भीती कमी झाली... दोघं समोर येऊन उभे राहिले!
"आजच्या दिवसापुरते हे आपले पाहुणे आहेत! त्यांना समजून घेणं, त्यांना नवीन गोष्टी शिकवणं हि आज आपली जबाबदारी आहे... तुमच्या लाडक्या हेमा दिदी आणि निशा दिदी काय करतायत हे कळायला तुम्ही अजून खूप लहान आहात पण, एक लक्षात ठेवा; त्या जे करतायत त्यामुळे तुमचं भविष्य नक्कीच उज्वल आहे... आता हे आपल्या गावचे पाहुणे आहेत, आपण पाहुण्यांशी असं वागतो का? नाही ना? मग आता सगळ्यांनी या दोघांना सॉरी म्हणा...." गुरुजींनी सगळ्या मुलांना समजावून सांगितलं.
आपण नक्कीच चूक केली आहे हे त्यांना समजलं... सगळ्यांनी एका सुरात दोघांना सॉरी म्हणलं...
"छान! आता आपण आज या दोघांना गाणी, गोष्टी आणि खेळ दाखवायचे आहेत... आज अभ्यासाला सुट्टी..." गुरुजींनी सांगितलं.
सगळ्या वर्गात एकच गोंधळ झाला... गुरुजींनी त्यांना पुन्हा शांत केलं! जॅक आणि जेनी ला पुन्हा जागेवर पाठवलं आणि सुरु झाला शाळेचा दिवस.... जॅक आणि जेनी आता वर्गात छान रुळलेले बघून हेमा आणि निशा थोड्या लांब जाऊन बसल्या.
**************************
इथे घरी रिम्पल हेमाच्या आई ला प्रत्येक कामात मदत करत होती... हेमाच्या आई च बोलणं रिम्पल ला कळत होतं पण, रिम्पल च बोलणं हेमाच्या आई ला कळत नव्हतं! म्हणून रिम्पल ने पहिल्यांदा मराठी बोलायचा प्रयत्न केला... तोडकं - मोडकं का होईना हेमाच्या आई ला समजेल इतपत ती काही शब्द बोलत होती... पहिल्यांदा तिने घरातली एवढी कामं केली होती.... हेमाची आई जसं जसं सांगेल तसं ऐकून ऐकून रिम्पल चे प्रयत्न सुरु होते... घराची झाड लोट, कपडे, आवरा आवरी आणि अगदी स्वयंपाकात सुद्धा रिम्पल हेमाच्या आई ला मदत करत होती... चुलीची सवय नसल्यामुळे तिला थोडा त्रास होत होता पण तरी अगदी जिद्दीने तिने तिथेच बसून हेमाच्या आई ला मदत केली... सगळं काम झाल्यावर दोघी शेतात जेवण घेऊन निघाल्या.
शेतात सुद्धा हेमाचे बाबा जे काही करत होते त्यात रॉबिन त्यांना मदत करत होता.... या दोघी आल्यावर चौघं शेतात बसून जेवले.... थोड्यावेळात रिम्पल आणि हेमाची आई पुन्हा घरी आल्या.
*************************
शाळेत तर आता चांगलीच मजा मजा सुरु होती... गाणी, गोष्टी आणि खेळ झाल्यावर आता मधल्या सुट्टीत सगळ्या मुलांच्यात मिळून मिसळून प्रत्येकासोबत आपला डबा वाटून, त्यांच्या डब्यातल्या सुद्धा खाऊ खाऊन जॅक आणि जेनी एन्जॉय करत होते... मधल्या सुट्टी नंतर पुन्हा काही गमती जमती झाल्या आणि शाळा सुटली.... जॅक आणि जेनी धावत येऊन हेमा आणि निशा ला बिलगले...
"Today we enjoyed lot!" जेनी म्हणाली.
त्या दोघांच्या चेहऱ्या वरचा आनंदच खूप काही सांगून जात होता... हेमा आणि निशा चा हात धरून आता स्वारी घराकडे वळली... रस्त्यातून जाताना हेमाने म्हातारीचे केस आणि दुधाची पेप्सी घेऊन दिली... बोरांनी दोघांचे खिसे भरले.. रस्त्यातून जाताना त्यांना एक सायकलचे टायर दिसले... काठीने ते ढकलत त्याच्या मागे पळत घर गाठलं... घरी आल्यावर आई ला बिलगून शाळेत जी काही धम्माल केली ती दोघांनी रिम्पल ला सांगितली... आजचा दिवस सुद्धा खूप छान गेला.... आज पूर्ण कामात दिवस गेल्याने चौघं दमले होते... जॅक, जेनी आणि रॉबिन लवकर झोपले.... रिम्पल ला शांत झोप लागावी म्हणून हेमा ने तिच्या डोक्याला तेल लावून दिलं! तेलाच्या मॉलिश मुळे तिला सुद्धा झोप लागली... उद्याचा दिवस पूर्ण शॉपिंग साठी होता....
दुसऱ्या दिवशी सवयीप्रमाणे व्यायाम आणि त्यानंतर चहा पाणी... सगळं आवरल्यावर हेमा आणि निशा त्यांना खरेदी साठी घेऊन गेले... भारतीय संस्कृती चे कपडे, दागिने, तोरणं आणि काही हस्तकला केलेल्या फुलदाणी, गालिचे घेतले...
"Hema! I want to purchase some blankets like you gave us everyday... That really cozy and comfortable.." रिम्पल म्हणाली.
"ते ब्लँकेट नाहीये... त्याला गोधडी म्हणतात... जुन्या कापड्यांपासून शिवलेली असते ती! त्यात आपल्या आजीच्या किंवा आई च्या साड्या असतात त्यामुळे त्याला एक मायेची ऊब असते..." हेमा म्हणाली.
"That means I didn't get ready-made stuffs?" रिम्पल थोडी उदास होत म्हणाली.
"अगदीच तसं काही नाही... आपण ज्या आजी गोधडी शिवतात तिथे जाऊन बघूया... त्यांच्याकडे काही जास्तीच्या शिवलेल्या असतील तर मिळतील..." हेमा म्हणाली.
हेमाच्या या बोलण्याने रिम्पल ला जरा बरं वाटलं... सगळे आजींच्या घरी गेले... आजींकडे दोन गोधड्या शिवलेल्या होत्या... रिम्पल ने त्या लगेच विकत घेतल्या. त्यानंतर कडधान्य, मसाले, अत्तर, कापूर अशी बरीच खरेदी झाली... हा दिवस सुद्धा संपला....
चार दिवस कसे संपले हे तर समजलं सुद्धा नाही... बाकी तीन दिवस सुद्धा पारंपरिक वेशभूषेत फोटो काढण्यात, गावच्या देवळात कीर्तन ऐकण्यात, पुन्हा गावकऱ्यांच्या भेटीत आणि पॅकिंग करण्यात संपले! आज पाहुणे माघारी जाण्याचा दिवस उजाडला!
"Thank you so much for this beautiful trip... We enjoyed a lot!" रॉबिन हेमा आणि बाकी सगळ्यांचे आभार मानत म्हणाला.
"तुम्ही एन्जॉय केलंय ना मग झालं तर! आम्हाला आमची पोचपावती मिळाली." निशा म्हणाली.
हेमाच्या आई ने रिम्पल ची ओटी भरली आणि जॅक आणि जेनी च्या हातात खाऊ दिला.
"फार बरं वाटलं तुम्ही आलात... कधी सणाच्या वेळी सुद्धा नक्की या.. आत्ता जेवढं एन्जॉय केलं ना त्याच्या पेक्षा जास्त एन्जॉय कराल..." हेमा म्हणाली.
"Yes! We will definitely come..." रिम्पल म्हणाली.
निघताना रॉबिनने हेमाच्या अकाउंट ला बॅलन्स असलेले पैसे ट्रास्फर केले... हेमाने मेसेज बघितला तर ते जास्त होते...
"तुम्ही जास्त पैसे पाठवलेत... एक मिनीट मी जास्तीचे पैसे पुन्हा पाठवते..." हेमा घाई घाईत म्हणाली.
"No! No! Please keep... Here, all of you give us love, you care for us and main you treat us like your family member... No any other hotel in fact 5 star hotel also don't treat there gust like your 'atithi devo bhav'. So, please it's our request!" रिम्पल हात जोडत म्हणाली.
"हो! हो! तुम्ही हात नका जोडू.. तुम्ही एवढ्या प्रेमाने दिलंय तर आम्ही ठेवतो... थँक्यू!" हेमा म्हणाली.
रिम्पल आणि रॉबिन ने एक स्मित केलं... त्यांच्या बस ची वेळ होत आली होती... हेमा, निशा आणि हेमाचे बाबा त्यांना सोडायला निघाले... बस आल्यावर त्यांना बस मध्ये बसवलं... जॅक आणि जेनी तर हेमा आणि निशा दिसेनासे होई पर्यंत टाटा करत होते... सगळे पुन्हा घरी आले... पुन्हा रोजच्या रुटीन ला सुरुवात झाली.
"पाहुणे आले आले म्हणता म्हणता गेले सुद्धा.. कसा आठवडा गेला समजलं पण नाही ना..." निशा म्हणाली.
"हो! ते तर आहेच... चला आता आपण उद्या पासून दिवाळी साठी स्पेशल ऑफर काय ठेवता येईल आणि काय काय करता येईल याचा विचार करूया... अरे हा तू मेसेज चेक कर मी तुला पैसे पाठवले आहेत!" हेमा म्हणाली.
"काय घाई होती? तू कुठे पळून चाललेली की मी?" निशा म्हणाली.
"बघ मस्करी जाऊदे... पण, मैत्री वेगळी आणि व्यवहार वेगळा... पैसा माणसं जोडतो ना तसाच तोडतो पण..." हेमा निशाला समजावत म्हणाली.
"पण, बघ ना आता आपल्याला आत्मविश्वास येतोय आपल्या Vlog ला सुद्धा चांगला प्रतिसाद येतोय तर आपण लिगली सगळं रजिस्टर करूया का?" निशा ने विचारलं.
"तू म्हणतेस ते पटतंय... आपण आता हेच करणार आहोत तर लिगली सगळं करूया पण, आधी नीट माहिती काढावी लागेल.. एकतर आपलं ऑफिस वैगरे नाही किंवा हॉटेल नाही आपण घरात सगळं करतो मग त्याचे काही वेगळे नियम किंवा प्रक्रिया असेल तर आपल्याला आधी अभ्यासावं लागेल... आपण एक काम करू दिवाळी पर्यंत सगळी माहिती शोधू... पुढच्या महिन्यात दिवाळी आहेच! मग पाडव्याला आपण रजिस्ट्रेशन करूया.. तो साडेतीन मुहूर्तातला एक मुहूर्त सुद्धा आहेच ना!" हेमा म्हणाली.
"हो चालेल... पाहिजे तर आपण यात जेनिका दिदी आणि जॉन दादांची मदत घेऊया..." निशा म्हणाली.
"हम्म... संध्याकाळी आपण त्यांना फोन करणार आहे ना तेव्हा विषय काढूया...." हेमा म्हणाली.
"ओके... चल आता मी घरी पळते... तू सुद्धा आराम कर जरा..." निशा दारापाशी जात म्हणाली.
क्रमशः.....
************************
'अतिथी देवो भव' मध्ये विल्सन कुटुंबीयांनी खूप एन्जॉय केलं! आता हेमा आणि निशा लिगली सगळं रजिस्ट्रेशन करण्याचा विचार करतायत... दिवाळी पर्यंत सगळं अभ्यासून काय करायचं याचा निर्णय त्या घेतील... पण, तोपर्यंत त्यांना अजून गेस्ट मिळतील का? जेनिका आणि जॉन काय सरप्राईज देणार आहेत? पाहूया पुढच्या भागात... तोपर्यंत हेमा आणि निशाची हि ऑड वाट तुम्हाला आवडली का हे नक्की सांगा.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा