भाग 2
इकडे सूरज आई बाबांना काही सांगायला आला होता...आणि त्याने त्याचे ठाम मत व्यक्त करून ,सगळ्यांची चिंता कमी केली..
आई बाबा हॉल मध्ये उभे सुरजचे हे समजदार बोलणे ऐकतच होते ...कधी आपला हा सूरज कुठल्याही गोष्टी साठी हट्ट करत नाही याचे वाईट तर वाटतं होते पण आज जेव्हा त्याच्या भविष्याचा प्रश्न आहे तेव्हा ही कसलाही हट्ट करत नाही ,की मोठा क्लास हवा ,मग मी पास होईल आणि मी MBA पूर्ण करेन ...आज त्याने आई बाबांची मान उंचावली ..आणि तो तितका हुशार आहे की तो ठरवले तर काही करू शकतो.
आई, "सूरज आज मला तुझा जास्त अभिमान वाटतो ,तू नेहमीच समजदार पणा दाखवून मला तरी निदान भारावून टाकतोस ,बाकी बाबा चे मला काही माहीत नाही ,हो पण त्यांचे एक काम वाचवलेस निदान तुझ्या फी साठी लोकांना दिलेले पैसे तरी ह्या निमित्ताने आणले असते "
बाबा ," अग पैसे लोकांना कुठे आपल्या दादाला तर दिले आहेत ,देईल तो असा फार काळ काय उलटला नाही पैसे उसने देऊन ,आणि त्याचा अनिकेत आणि आपला सूरज काय वेगळे नाहीत माझ्यासाठी ,त्याला ही मेडिकलच्या फी साठी लागत होते म्हणून दिले ,तू मन मोठे ठेव जरा"
सूरज,"चला वाद नको ,मी अभ्यासाला लागतो आहे मला डिस्टर्ब नकोय तशी ही काही दिवसांवर परीक्षा आली आहे"
सूरजचा मामा जरा विचारात मग्न होता ,त्याला वाटत होते मी जाऊ की नको जाऊ या मोड वर उठून उभा राहिला, कमरेवर हात टेकवले, आरतीला जरा वळून पाहिले, आणि तोंड नकारात्मक केले.
सोनू तू म्हणतेस मी जावे पैसे घेऊन पण माझे मन पुढे पाऊल टाकायला धजावत नाही ,जणू कोणी मागे ओढत आहे, हा नक्की ताईचा माझ्या बद्दल चा राग आहे.. मी नेहमी काही जुळवण्याचा हेतूने विचार करता तेव्हा ,माझी ताकद कमी पडते आरती, बस मग राहू दे असे वाटते...
मी काही मुद्दाम नाही ग करत...खूप मनातून इच्छा आहे की मी स्वतः जाऊन हे पैसे देऊन यावे, आणि उसने ही नाही ,तसेच द्यावे कारण तिने तुला तिच्याकडे असतांना काहीच कमी पडू दिले नाही..
मग मनात आवाज येतो ,जणू ताई बोलत आहे आणि म्हणत आहे ,मग आरतीला काही कमी पडू दिले नाही तर याची परत फेड आता ह्या पैस्याने करणार का.. इतकीच माझी किंमत केलीस का तू... नात्यातील प्रेम ओढ पैश्याने मोजायला निघालास का !!! आणि टाकलेले पाऊल मागे घेत ग मी..ताई माझ्यापेक्षा मोठी आहे ना म्हणून ऐकून घ्यावे लागते ग, तुला सांगू का ,जशी ती तुझी आई झाली ना तुझी आई गेल्यानंतर तशीच ती माझी आई झाली होती ,अगदी ती 15 वर्षाची होती जेव्हा आमची आई गेली तेव्हा ,कधी माया कमी पडू दिली नाही तिने ,म्हणून मी तिच्यावर किती ही राग आला तरी चिडत नाही आणि कधीच चिडणार ही नाही..आहेच कोण तिच्याशिवाय माझे आणि तुझे आपले असे म्हणायला ग"
आरतीने आत्याला फोन लावला होता ,बाबा तिकडे येत आहे हे सांगायला, पण आत्या समजून गेली नेमका तो का येत असावा, ती म्हणाली ,"अग तू चिंता नको करू पैश्याची ,सगळे बिना पैशाचे होईल, सुरजने तसे वचन दिले आहे, आणि लागलेच तर माझा भाऊ आहे पाठीशी मला माहित नाही का. "
आत्याचे बोलणे ऐकून आरती खूप खुश झाली, तसा ही तिला सुरजच्या जिद्दीवर,मेहनतीवर खूप विश्वास होता ,तो जे ठरवतो तो ते करून दाखवतो..ती देवाकडे त्याच्या यशासाठी प्रार्थना करत होती..
सूरजचा अभ्यास सुरू झाला ,आणि तो जिद्दीने मेहनतीने अभ्यास करत होता, घरात फार कमी बोलणे होत त्याचे ,तो त्याच्या खोलीतच जेवण मागवत असे,रात्रीच्या वेळी जागून त्याने त्याच्या कष्टाचे चीज केले...
त्याला हव्या त्या नामांकित कॉलेज मध्ये सीट मिळवली जिथे लोकांना पैसे भरून ही सीट मिळत नाही तिथे त्याने आपल्या मेहनतीवर जागा मिळवली.. सगळी कडे आनंदाची बातमी पोहचली ,सगळे नातेवाईक खुश होते...आई बाबा तर खूप खुश होते आज त्यांना सूरज च्या मेहनतीवर आणि जिद्दीवर पुन्हा एकदा विश्वास बसला..आज सकाळी त्यांच्या आयुष्यात नवा सूर्य जणू लख्ख प्रकाश पसरला ,त्याच्या आयुष्यात आता सगळेच सुरळीत होईल हे आई बाबांना वाटत होते..
सूरज, "आई आज माझ्या कॉलेज चा पहिला दिवस आहे ,आणि आज मी माझ्या नव्या दिशेवर पहिले पाऊल टाकत आहे, हे मी असेच जिद्दीने पार केले तर तुझे आणि बाबांचे सगळे स्वप्न पूर्ण होतील ,ते मी करेन आणि पूजा ताई साठी ही छान स्थळ चालून येतील ,जे आता आपल्या ताईला नकार देत होते तेच होकार देतील "
आई," सूरज थांब जरा तुझी नजर ही काढते आणि तुझे औक्षण ही करते तुझ्या मार्गावर कोणते ही अडथळे नको हे मी देवाकडे मागणे मागते "
बाबा," घे औक्षण करून आणि मार बाजी आम्ही आहोत तुझ्या पाठीशी तुझ्या प्रत्येक पाऊला वर तुझी सोबत करायला "
सूरज, "नक्कीच बाबा ,"
सुरजच्या ह्या यशाचे पडसाद लग्नासाठी तयार असलेल्या मुलींच्या बापापर्यंत पोहचले होते ,मामाला तर अजून ही खरे वाटत नव्हते ,पण मामाची मुलगी आरती मात्र मनातून त्याचा अभिमान बाळगत होती ..तिला तो एक मित्र म्हणून आवडत होता पण मामाला तो जावई व्हावा असे त्यात काही दिसत नव्हते.. म्हणून ना मामाच्या मनात हे नातं व्हावं असे मनात नव्हते ना सुरजच्या आईच्या मनात नव्हते..पण तिला उगाच असे वाटत की भाऊ आपल्याला पैश्याची मदत फक्त त्याची मुलगी आपल्या घरी सून म्हणून यावी यासाठी करत आहे...
आता त्यांच्या जवळील नातेवाईक सूरज सारखा जावई आपल्याला मिळावा म्हणजे आपल्या लेकीचे कल्याण होईल आणि ती त्याच्यासोबत खूप खुश राहील...भला मोठा पगार ,घर दार, मोठी नौकरी, शहरात बंगला, गाडी म्हणजे आपली मुलगी राज करेन, सासू सासरे ही चांगल्या स्वभावाचे आहेत ...त्यात असेच एक नात्यातील नात्याने सुचवलेले स्थळ होते ...लांबून नातेवाईक होता ..एक मुलगी घरी होती... त्यांना त्यांच्या ह्या सीमासाठी मनात सूरज चे स्थळ होते.. त्यांना माहीत होते की सूरज सारखा श्रीमंत घराचा ,गडगंज पैसा असलेला, मोठी नौकरी करणारा मुलगा आपला जावई व्हावा पण होऊ शकत नाही ,पण मनात हे नाते व्हावे अशी खूप इच्छा होती.. आपल्याला जे सुख लाभले नाही ते आपल्या मुलीला लाभावे.. तिने ह्या मोठ्या घरची सून व्हावी ...
सीमा दिसायला सुंदर होती ,बोलण्याला तरबेज होती ,तिची ही स्वप्न गाव खेड्या पलीकडे शहरात जाऊन रहाण्याची होती, श्रीमंत नवरा, गाडी असावी ,घर असावे ,चैन सुख असावे असे होते.. नौकरी शिक्षण स्वतःच्या पायावर उभे रहावे, स्वतःचे नाव असावे असे काहीच तिच्या मनात नव्हते ,हे सगळे असावे पण ते नवऱ्याचे असावे ,नवऱ्याने कमावलेले असावे आणि आपण ते उपभोगावे हेच तिचे ध्येय होते... तिला सूरज माहीत होता...कितीदा तरी तिने त्याला पहिला होता...तिला यौ दिसायला ही आवडत होता.. पण आपल्या नशिबात हा कुठे असेल ...तो तर माझ्या पेक्षा सुंदर ,शिकलेली नौकरी वाली मुलगी पसंत करेन आपण तर ह्यात कुठेच बसत नाही ,म्हणजे आपली डाळ इथे कधीच गळणार नाही हे निश्चित आहे..
इकडे सीमाच्या वडिलांना सुरजच्या मोठ्या नौकरीचे कळताच त्यांनी सुरजच्या मामाला गळ घालायचा प्रयत्न केला ,पण तिथे ही मामाने ना पसंती दर्शविली ,त्याला माहित होते की ह्याची मुलगी किती आगाऊ आहे ,ती जर ह्यांच्या घरी सून म्हणून आली तर सुरजला कधीच आई वडिलांच्या सोबत राहू देणार तर नाहीच पण राहिलीच तर तिच्या आई वडिलांची सतत लुडबुड असेल ,आणि मी असे होऊ देणार नाही... माझी मुलगी जरी द्यायची नसली तरी माझ्या बहिणीला असले स्थळ सुचवू देणार नाही...
मामाने मात्र तात्पुरते हे नाते आणि त्याच्या बद्दल ताईकडे बोलणे टाळले होते ,त्याला माहित होते की ह्या सीमाचा बाबा फक्त पैश्याचा मागचा आहे ,त्याला नाते व माझ्या बहिणी सोबत नाते जोडणे यात काही स्वारस्य दिसत नाही...
मामा, "हे बघ किसन आता तरी त्याची लग्न करण्याची 3 वर्ष तरी इच्छा नाही ,त्याला अजून लग्नाची घाई नाही,तू तुझ्या मुलींसाठी दुसरे स्थळ तोपर्यंत बघून ठेव म्हणजे जर इकडे नाही जमले तर तिकडे बोलणी सुरू ठेव "
किसन, " आहो तुम्ही मामा आहेत जर तुम्ही आमच्या सीमा बद्दल शब्द टाकला तर जमून जाईल, तसे ही तुम्हाला थोडेच तुमच्या मुलींसाठी सूरज आवडणार आहे ,मग आम्हाला तरी निदान गरिबाच्या पोरीला श्रीमंत मोठा नौकरीवाला मुलगा मिळू द्या तिच्या नशिबाने, बघा वाटल्यास मी उद्या समक्ष तुमच्या बहिणीला भेटतो "
मामाला त्याचे बोलणे हवरट ,लालची असल्या सारखे वाटले,त्याचा श्रीमंती वर आणि पैश्यावर खूप जोर दिसत होता, इकडे मामाच्या मुलीला ही तो माणूस पटला नव्हता.. तो बघूनच तिला तो स्वार्थी वाटला होता...म्हणजे जर मामा मध्यस्थी करणार नसतील तर तो उद्या संध्या ताई कडे स्वतः जाऊन बोलणी करणार होता.. त्याला वाटत होते की इतर कोणी डाव मारून जाऊ नये या आधी आपणच प्रत्यक्ष जाऊन आपल्या मुलींसाठी बोलणी करु, किंवा ह्या मामाच्या मनात आले तर हा तर स्वतःची मुलगीच सख्ख्या आत्याला द्यायला तयार होईल, आणि ते मी होऊ देणार नाही ,हे श्रीमंत स्थळ हातचे जाऊ देणार नाही ..
"आता त्याला माघारी पाठवला पण तो परत उद्या येणार ,तो ताईला भेटायला ..त्याला कसे ही करून थांबवायला हवे किंवा एक तर ताईला ह्या माणसाबद्दल खरी हकीकत सांगायला हवी नाहीतर ह्याच्या सोबत नाते जोडले गेले तर ,होत्याचे नव्हते होईल आणि मग ती हे ही म्हणेन की मला सगळे सत्य माहीत असून ही मी सत्य का लपवली , "..मामा मनातल्या मनात बोलत होता ..
जाणारा तो किसन ,मनात ठरवून गेला होता की, हे माणसे खूप चांगली आहेत ,त्यांना मुलगी दाखवली की आपली मुलगी त्यांचे मन जिंकून घेईलच ही खात्री आहे ,मग काय ते तिच्या गोड गोड बोलणे ऐकून ह्या स्थळाला नक्की हो म्हणतील, आणि जर आई बापाला मुलगी पसंत आहे म्हणजे त्या पोराला ही पसंत पडायलाच पाहिजे, त्याचे काही एक चालणार नाही ,माझी सीमा एकदा सगळ्यांनी पाहू दे ,मग बघा हे घर आणि हा मोठा श्रीमंत बापाचा सूरज तिच्याच तालावर नक्कीच नाचणार ,मी उद्या इथे येणार नाही होकार मिळूनच रहाणार "
आता बघू तो किसन उद्या येतो का ,आला तर त्याला होकार मिळेल का ,मामा सगळे बघत राहिल का, सूरज खरंच आई वडिलांच्या पसंतीच्या मुली सोबत लग्न करेन का ,की त्याला कोणी दुसरी मुलगी आवडत असेल... मामाची मुलगी आरती ,आपली मैत्री मैत्री असेच समजत असेल का...
---?--?---?--?--?--क्रमशः...?--?
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा