आरतीला मनातून वाटत होते की, सूरज इतर कोणासोबत ही लग्न करो पण त्याने एका अडाणी आणि स्वार्थी मुली सोबत लग्नाला होकार नाही देवो..त्याने जरी नकार दिला तरी आत्याने तरी ही गोड भासवणारी सीमा सूरज साठी पसंत ना करो ...
का ? तिला तर सूरज कधीच अवडतला नाही ,ना कधी तिने त्याला त्या नजरेने पाहिले...मग आज किसन आपल्या मुलींसाठी आला आणि आज आरती खूप बेचैन दिसत आहे.. तिला सूरज आवडत असेल का ? की आता कोणी तरी त्याच्या जीवनात येते हे पाहून तिला त्याच्या बद्दल प्रेम तर निर्माण झाले नसेल ना.. आधी हे असे कधीच वागली नाही..आज अचानक तिला ही बेचैनी ??
आरतीला जर सूरज आवडत असेल आणि मीच माझ्या निर्णयामुळे तिला समजून घेत नसेल तर हे योग्य नाही..तसा ही सूरज गुणी मुलगा आहे ,समंजस आहे.. एक जावई म्हणून खरंच तो चांगला आहेच ...मला ही थोडा वेळ कुठे तरी असे वाटले की किसनच्या मुलीचे नाते सूरज सोबत व्हायला नको की काय, याचे कारण हे तर नसेल की मला ही सूरज... !!!
नाही नाही, मला तो कधी ही आरती साठी नकोच असे ठरवले होते आणि मी तेच करणे योग्य आहे.
मामा ही जरा विचारात पडला होता ,जर सीमा आली सूरज च्या आयुष्यात तर जे व्हायचे आहे तेच होणार आहे ,पण मला सगळे सत्य माहीत असून मी गप्प बसून राहू शकत नाही, ह्यासाठी मी काही करेन पण किसन सोबत नवीन नाते होऊ देणार नाही..मग मला माझा निर्णय बदलावा लागला तरी चालेल, तसे ही भाऊजी म्हणत ,अगदी आरती लहान होती तेव्हा पासून ,की आरती आणि सूरज ची जोडी खूप शोभून दिसेल ,आम्हाला आरती सून म्हणून द्याल ना ,तेव्हा मी म्हणायचो बघू पुढचं पुढे , ह्यावर ताईला खूप राग येत ..तिला वाटत की ती सांभाळू शकेल की नाही , आरतीला म्हणूनच माझ्या मनात आरती तिला सून म्हणून देणार नाही ,तिला आरती खूप आवडतं असे ..पण पुढे भविष्य कोणी पाहिले म्हणून मी हे टाळत असे.. गरिबी श्रीमंती कोणाची कधी टिकून रहात नाही ..दिवस कधी ही कोणाचे ही पालटू शकतात... पण असे नाते जुळले की बहिणी भावाचे प्रेम कमी होते ..उरते ते फक्त व्याही विहिन ,म्हणून मी हे नाते नको म्हणत होतो ,पण जर ताईच्या सुखासाठी जर मला हे नाते स्वीकारावे लागले ,आणि व्याही विहिन व्हावे लागले तरी हरकत नसेल... पण तरी तिच्या मनात नसेल तर मी ही गप्प बसेल... मामा स्वतःशी बोलत होता ..त्याला जणू समजत होते आरती कुठे तरी सूरज मध्ये गुंतत जात आहे..
मामा येताच ताईजवळ येतो ,आणि तिला ऊन लागू नाही म्हणून मुद्दाम सूर्याच्या प्रखर प्रकाशात येऊन आडवा उभा रहातो, तिला सावली होऊन स्वतः ऊन सहन करतो ,जणू तिला कसली झळ बसू नये हीच त्याची इच्छा असते आणि आहे व सदैव राहील ...ताईला त्याचा हेतू समजतो आणि ती आपल्या भावाचा हात धरून त्याला स्वतःजवळ बसवते... तो लहानपणापासून जणू तिने मुलाप्रमाणे वाढवला असल्यामुळे ती मायेने त्याच्या डोक्यावरून आईच्या मायेने ,आणि स्पर्शाने डोक्यावरून हाथ फिरवते..
क्रमशः.....
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा