Login

ओढ तुझीच रे फक्त भाग 1

Odh Tujhich Re Phkt


ओढ तुझीच रे !! भाग 1

भाग 1

लेखिका... अनुराधा आंधळे पालवे

सुरज
स्वाती
प्रकाशराव
संध्या
आरती
मामा
सीमा तिचे वडील किसन

सूरज, हुशार ,गुणी ,सालस मुलगा. मुंबई सारख्या मोठ्या शहरात लहानाचा मोठा झाला..वडील मोठे अधिकारी, आई गृहिणी, बहीण पूजा त्यापेक्षा मोठी, ती ही खूप हुशार आणि मेहनती..
छोटे कुटुंब होते,आनंदी होते, संस्कारी, समाजात आपले असे नाव लौकिक होते...

पैसा कमी नव्हता, श्रीमंती ही खूप होती..पण वागणे मात्र मध्यमवर्गीय असे, कसला माज नाही की कसला घमंड नाही... सगळे मध्ये सहज मिळून जात..म्हणून जेव्हा ही लोक नाव काढीत तेव्हा माणुसकीचे उदाहरण म्हणजे प्रकाश राव यांचे नाव सगळ्यांच्या मुखात येई..

लोकांना मदत करण्याचा स्वभाव खूप वाखाणण्याजोगा होता. कधी कधी कोणाला ही मदत लागली तरी सगळ्यात आधी प्रकाशराव हे हजर असत. त्यांचे शेजारी, कर्मचारी, महिला कर्मचारी, नातेवाईक,कोणी अनोळखी ही असू द्या ते आपला स्वभाव कधीच सोडणार नाही. एकदा ठरवले की मग मागे हटणाऱ्या पैकी प्रकाशराव नव्हते... त्या चांगुलपणा मुळे सगळे त्यांना अतोनात मान सन्मान देई...पण अति चांगले आहेत म्हणून काही त्यांची फसवणूक ही करत... दिलेले पैसे ही कधी परत नसे करत.
प्रकाशराव त्यांना ही परत कधी पैसे देण्याबाबत आठवण ही करून देत नसत... ह्यामुळे बायकोला (संध्याताई )त्यांच्या ह्या अति चांगुणपणा असलेला स्वभाव आवडत नसे... त्यावरून कधी कधी त्यांच्यात टोकाचे भांडण होत असे... तुमचा लोक सरळ सरळ गैरफायदा घेत आहेत ,असतात हे दिसत असून ही का तुम्ही त्यांना मदतीला जातात, मदत इथपर्यंत ठीक आहे पण तुम्ही नको तिथे पैसे का उधळत बसतात.. ह्या रोजच्या वाक्यात नेहमीच वाद दडलेला असत..आहो, हे वागणे आता तरी बंद करा... घरात लक्ष द्या...घरात ही तुमची गरज असते , आहे ,हे विसरू नका..मी वैतागले तुम्हाला सांगून सांगून ,जणू सगळे पालथ्या घड्यावर पाणी आहे माझे बोलणे.. तुम्ही काही सुधारायला तयार नाही.. तो चांगुणपणा चा बाणा काही सुटत नाही.. मला वेडीला अक्कल नाही ,मीच का तुम्हाला डोकं लावते मला ही अक्कल नाही..आणि म्हणणार की कोणालाच जर मदत केली नाही तर मग आपल्याला कोण मदत करणार.. हे म्हणून माझे तोंड गप्प करणार.. मग मीच सगळ्यांच्या नजरेत वाईट ठरणार... हे मात्र राजा हरीशचंद्र मी मात्र आगाऊ म्हणून लोकीक मिळणार... माझ्या वाट्याला असेच कसे सगळे येतात कोण जाणे... सगळे भोळे साधे सरळ, वडील ही असेच उदार कर्ण होते... नवरा ही असाच आहे ....मुलगा असा नाही राहिला तर मिळवले... नाहीतर सूरज ही यांच्या पंगतीत बसणार निघाला तर हे घर जणू एक धर्मशाळा करून मोकळे होतील हे बाप लेक...निदान माझ्या लेकीने तरी माझे गुण घ्यावे हीच मागणी आहे माझी देवाकडे...किती ही ओरडा ,किती ही जिवाच्या आकांता पासून सांगा ,मला म्हणतील तू ह्यात पडून तर बघा किती समाधान आहे लोकांना मदत करण्यात..पण ह्यांच्या मध्ये माझी भर म्हंटले की घर वाऱ्यावर सोडावे लागेल आणि आपण भिकेला लागू नाही म्हणजे मिळवलं, नाहीतर आपल्या कोण अशी सढळ मनाने मदत करतील लोक, इतके आपले भाग्य नसो ही पण लोकांनी मात्र भाग्य काढले असे म्हणावे लागेल..
कोण कुठे कुठे काय चांगुलपणाचे रंग उधळून येतील आणि आहे नाही ते खिसे रिकामे करून येतील.. घडा पालथा आहे की आधीपासूनच होता आणि नेमका तो माझ्याच नशिबात यायचा होता का..

"अग काय ग बदबडते तू केव्हाची, तुझे तोंड दुखत नाही का ग, तोंड जर खापराचे असते तर कधीच फुटले असते.. जास्त विचार करू नकोस ..तुझी गाठ माझ्याशी बांधली आहे, ती ही सुटत होती तर तुझ्या आईने घाई गडबडीत येऊन कशी घट्ट बांधली होती आठवते का तुला... ती त्यांची घाई पाहून मलाच वाटले आता तुझ्यातून सुटका नाही माझी.. मी थोडा जरी मोकळा सुटलो की तू मला झटके मारून तुझ्या वळणावर नेशील ,आणि हे माझे समाज सेवी उपक्रमाची जी खाज आहे ती बंद होती की काय.. पण काही उपयोग झाला नाही हो सासूबाईने बांधलेल्या त्या करकच्च गाठीचा ,मी माझा मोकळा तो मोकळाच आहे.. सूत अजून ही सरळ झाले नाही तुझ्याकडून ..मी दिवसेंदिवस अजूनच सैल सुटत आहे बरं, जरा आवळून ठेव नाहीतर जायचो सुटून.." प्रकाश राव यांचे हे tea time भांडण रोजचे झाले होते ,चहा मिळो ना मिळो ,मिळाच तर सोबत बिस्कीट नाही मिळाले तरी हा मस्का पाव ते आपल्या बायकोला रोज मारत असत.. तिच्यासाठी तो मस्का नाही ,पण जुन्या जखमेवर मीठ लावण्यासरखे होते ,

"हो का आता मला ही ही गाठ सैल झाली तरी काही वाटत नाही हो, आता तुमच्या खोडी मी सोडून बळेच ही कोणी सहन करणार नाही, एक दिवस नेले कोणी तरी माझ्या कडे आणून सोडतील तुम्हाला तुमचे नातेवाईक ,नातेवाईक कसले सगळे तर्हेवाईक सगळे... गुळाला मुंगळे जणू..मी तर पी.एच.डी केली आहे सगळ्यांच्या गुणांची. मोठे पुस्तक होईल लिहून ,नाव ही ठरवले आहे ,"

"मी सांगू का,तू काय नाव ठरवले आहेस ते तुझ्या Phd च्या पुस्तकाचे " प्रकाश राव मुद्दाम कळ काढत म्हणत होते

"हो अगदीच माहीत आहेच तुम्हाला ,नाव काय असेल ते "

"अग सोपं आहे नाव ,तूच आत्ता म्हणालीस ना ,नातेवाईक तर्हेवाईक ,तेच अगदी तुझ्या मनात साखरे सारखे घोळत रहाते मग वाटले की ही हेच नाव ठेवणार आहे "

"चला तुम्ही तर रिकाम्या गप्पा मारून मला मुद्दाम चिडवायला लावू नका, पोरचे ही काही पहा,त्याची ट्युशन फी भरा, हो हो म्हणता म्हणता सीट पूर्ण भरल्या जायच्या, आणि मग घरापासून दूर त्याला कुठे लांब जावे लागेल, आणि हो ज्यांना ज्यांना उसने दिले त्यांना सांगा पैसे आणून द्या आता खरी नड आहे मला पैश्याची, मग ते नंतर देऊ, थोडे थोडे देऊ असे कारणं पुढे करतील आणि तुम्ही परत तसेच रिकाम्या हाती याल, आता ह्या वेळेस मी माझ्या माहेरी दादाला पैसे मागणार नाही ,उगाच त्याचे थोर उपकार नको मला, नाहीतर म्हणेन मुलगा मी डॉक्टर करतो पण माझी मुलगी सून करून घ्यावी लागेल,आणि त्याला मी घर जावई करून घेतो.. हे मी कधी ही मान्य करणार नाही हो आणि उद्याच्या उद्याच पैश्याची सोय करा उद्या फी भरण्याची शेवटची तारीख आहे हो "

"अग करणार म्हणजे करणार ,आज पैश्याची सोय करणार आहे ह्या शंका नाही ,कुठे जातील पैसे ज्याने उसने घेतले आहेत तो देणार "

"तुमचा चांगुलपणा आता ही कामी येऊ हीच प्रार्थना" संध्या ताई

"मी लगेच फोन करतो आणि सुधीरला मागतो पैसे"

"बाबा इतकी पण घाई नाही अजून एक आठवडा आहे आपल्या हातात तुम्ही पळापळ करू नका, आई उगीच घाई करते ,आणि तसे ही मला नाही वाटत ,की मी इतका महागडा क्लास लावायला पाहिजे ,त्याची इतकी फी द्यायला मला आवडेल,मी घरीच अभ्यास करेन MBA चा ,एक दोन पुस्तक आणि महिना भर अभ्यास केला की मी नक्कीच विना पैस्याची सीट काढेन .." सूरज

आई, " अरे पण क्लास तर लावावा "

सूरज, "नको मी सक्षम आहे ,जे ठरवले तेच करणार आहे मी ,ते ही विना क्लास लावता, विश्वास ठेवा माझ्यावर,कोणाकडे ही पैसे मागू नका माझ्यासाठी कारण मला स्वतःच्या हिमतीवर पास व्हायचे आहे पैसे मोजून नाही"

इकडे मामाच्या घरी ,आरती मामाची मुलगी , त्याला सांगत होती," आज सूरज ऍडमिशन घेत आहे, तू एकदा आत्याला विचार जर काही पैसे हवे असतील तर, कारण ती ही काही बोलणार नाही आणि तू ही मनात असून कही बोलणार नाही, ही कोंडी निदान आज तरी कोणी तरी फोडा ,सुरजचे स्वप्न महत्वाचे की तुमचे इगो ,नाही हं ,आज नाही ,आजच जर शेवटची संधी असेल आणि पैश्या मुळे जर ऍडमिशन नाही झाले तर बाबा मी तुम्हाला कधीच माफ करणार नाही"

अग ताई म्हणत नाही ,ना काही बोलते ,मग मी जर गेलो तर तिला वाटेल मी उगाच माझी मुलगी तिला द्यावी ,हे नातं व्हावं म्हणून पुढे पुढे करतोय की काय,गोष्टी दिसतात तितक्या सोप्या नसतात, नाते जितके जवळ चे असतात तितके काही काळा नंतर अंतर निर्माण होऊन दुरावता मनाने" बाबा आरतीला समजावून सांगत होता..

ती तरी त्याच्या समजवण्याकडे दुर्लक्ष करत ,त्याच्या अवती भोवती फिरत होती, जणू अबोल शब्दातून सांगत होती, काही असू दे तू मात्र सूरज साठी हे सगळे विसर निदान पैसे घेऊन जा इथे, भले ही आत्या नको म्हणू दे, पण तू दे..

आरती ,गुणी तितकीच प्रेमळ ,नाते जपणारी, हळवी ,सुंदर हुशार मुलगी ,आई गेल्यानंतर बरेच दिवस तर आत्यानेच तिच्या आईची भूमिका निभावली होती... वडील नौकरीला बाहेर गावी होते तेव्हा ती आत्याकडे लहानाची मोठी झाली.. तसा सूरज आणि ती सोबतच वाढले ,सोबतच शाळेत जात, आत्याच्या घरी तिच्या गोड लाघवी स्वभावामुळे सर्वांनाच तिचा लळा लागला होता तिची बडबड ऐकण्याची सवय लागली ,पूजा तर तिची मैत्रीण झाली होती ,तिघे सोबत खेळत, हसत ,खोडी करत ,पण तिघांना ही एकमेकांशिवाय कधीच करमत नसत.इकडे जशी ती मोठी होत होती तशी बाबाला वाटत होते की आरती आता माझ्या सोबत असायला हवी ,कारण आता सूरज ही मोठा होत होता, मग पोरीच्या जातीला जपायला हवे, हे वय खूप नाजूक असते... हुड असते.. आकर्षणाचा परिणाम असलेल्या नात्यावर होऊ शकतो.. म्हणून त्याने आता ह्याच गावी बदली करून घ्यायचे ठरवले... आणि आत्याला सांगितले की आरती माझ्याकडे राहील...तू खूप जपले तिला पण ह्या वळणावर मी जपायला हवे तिला...

भावाच्या अश्या बोलण्याचा आत्याला खूप राग आला होता ,आणि तेव्हा पासूनच तिने त्याच्याबदरल मनात राग धरला होता, जशी पूजा होती तशीच आरती ही ,दोघी माझ्याच लेकी तरी हा असा कसा बोलून गेला, जरा ही वाटले नाही की मला किती वाईट वाटले असेल.. इथेच त्याच्या बद्दल ओढ कमी वाटू लागली ..पण आरती बद्दल अजून ही तिची तशीच ओढ होती ..राग फक्त भावा बद्दल होता...


--??----क्रमशः??------??------??
0

🎭 Series Post

View all