ओढ तुझीच रे फक्त!!!
इथे आज तीन जणांना तीन नात्यांची ओढ लागली होती ,तिघे ही आपल्या प्रेमापोटी नात्यातील प्रेमाची कबुली देणार होते, एकीकडे सुरजने मनात असलेल्या अव्यक्त प्रेमाची एका पूर्णिमा च्या रात्रीला साक्ष ठेऊन कबुली दिली ,तर दुसरी कडे मामा आपल्या ला बहिणीच्या प्रेमा पायी तिच्या वर असलेल्या प्रेमाची कबुली देणार होता ,एका नव्या नात्याची सुरुवात करणार होता .
एकीकडे बहिणीच्या प्रेमाकरिता तर दुसरी कडे आरतीचे सूरजवर असलेल्या प्रेमासाठी आणि सुरजचे आरतीवर असलेल्या प्रेमासाठी आपला विचार त्याग करणार होता.. जे कधीच मनात नव्हते ते जुळून यावे यासाठी धडपड करणे भाग पडत होते.. जेणे करून आरती ह्या घराला जितकी सुखी ठेवणार आहे हे समजत होते तसे इतर कोणी मुलगी नाही करू शकणार हे ही माहीत होते...
आरती मनात बोलत होती, "तुला काय बोलावे ह्या बद्दल मला आज काहीच सुचत नाही ,सूरज मी अगदी बावरले आहे, तू मला एका क्षणात आपले केले आहेस तुझ्या प्रेमाची कबुली देऊन, ना कधी हा विचार केला होता ना कधी मनात ही आले नव्हते की मित्र या पलीकडे ही कधी आपले नाते असेल ...मैत्रिणी म्हणत होत्या की तो तुला नक्कीच त्याच्या मनातले बोलून दाखवेल, कारण तू त्यांना तुझे माझ्यासाठी असलेले प्रेम दिसत होते, पण मला कधीच का नाही ते जाणवले, मी तर तुला मैत्रीच्या नात्यातून पहात होते.. मला हे नवे नाते स्वीकारायला अवधी लागेल ,मी तेव्हाच तुला माझ्या मनातले सांगेन ,वेळ दे मला, जगू दे हे क्षण वेगळे "
सूरज, "आरती तू काय विचार केलास ,"
आरती ," कश्या बद्दल ? " एकदम जसे काही तिला कळलेच नाही असे समजून ती त्याला टाळत होती, त्याच्या बोलण्याकडे लक्ष होते पण त्याच्याकडे बघत नव्हती , जणू आता मित्र नाही राहिला तो , बिनधास्त ती आधी सारखे बोलत नव्हती, ती थोडी विचारात तर कधी त्याच्या बोलण्याकडे लक्ष देत होती... सुचत नव्हते जे आज घडले ते मनाला आतून हलवून टाकणारे होते...तो असा अचानक जवळ येतो काय आणि मनातले ते शब्द माझ्या कानी बोलतो काय... असे काही झाले की कोणत्या मुलीला काही सुचेल ,आणि हा बावळट मित्र म्हणवत होता ,त्याने मला सावध ही होऊ दिले नाही ..आणि बस्स!! हृदयाचे ठोके मात्र वाढवले त्याने... आणि आता परत तेच तसे जवळ येऊन म्हणतो कसा, तू काय ठरवलेस ?.. ही काय गम्मत वाटली का ह्याला... तीची हृदयाची धडधड अजून ही कमी झाली नाही तोच परत समोर आला ,हा काय खेळ आहे का ,कोणी जरा ह्या बिनडोक मित्राला सांगेन का...कमाल करतात मुलं ही...पण मुलीला ही त्याच्या भावना जसं मुलं पटकन बोलून मोकळे होतात तसे मोकळे होता येत नाही, मनातले काही इतक्या पटकन ओठावर येत नाही... त्यांना जरा वेळ घ्यावा लागतो, सारा सर विचार ही करावा लागतो रे ...मी ही तो वेळ घेईल आणि त्याला त्याने आणलेला बेसन लाडू खाऊ घालेन ...
"अग ,काय सांग हं!! मी वाट बघत आहे ,तसा मी तुझ्या तोंडातून मला हवे असलेले ते 3 शब्द ऐकल्याशिवाय घरी जाणार नाही ,विचार कर... इथेच मी ही मुक्काम करेन आणि इतरांना ही मुक्काम करायला लावेन...आणि त्यांनी जर कारण विचारले तर मी खरे ते सांगून मोकळा होईल, मग ठरव तू काय सांगायचे... होकार की नकार .." सूरज आता आरतीला अडवून बघत होता...
मामा ," काय सूरज आज काय इकडे मुक्काम करायचा आहे का ,तुला हवं तर थांब तू "
सूरज, " अरे नाही मामा ते असेच आमचे दोघांचे सुरू होते, आरती म्हणत होती की शर्यत लाव तू मुक्काम करू शकत नाहीस ,मग मी म्हणालो मी शर्यत जिंकली समज "
आरती, "मी कधी म्हणाले तुला हे असे काही, मी तर उलट म्हणत होते की आत्या एकटी आहे तुम्ही लवकर निघायला हवे आता ,हो ना ग पूजा "
पूजा,"बघा बाबा तुम्ही तुमचे ,मी तर तयार आहे मुक्कामाला इथेच . मला तर सवय,सवड आहे आणि आवड ही "
सूरज, "चला मग मी बाहेर ओसरीवर fix ,मी इथेच झोपणार, पूजा तू आणि बाबा घरी जा "
आरती, "अरे तू गाडी चालवणार आहेस ना ,मग ते कसे जातील ,तू जा सूरज ,आत्या एकटी आहे घरी "
सूरज, "अग गम्मत करू ही नको का आता ,इतका ही हक्क नाही का माझा तुझ्यावर ,की तुझी मी गम्मत ही करू शकत नाही"
आरती जरा परत बावरली होती ,आता ही तिला पटले होते की सूरज आता मित्रा पलीकडे असलेले नाते जगत आहे, परत तीच हुरहूर ,आणि तीच धडधड सुरू झाली...तिला आता त्याला मनातले सांगायला भीती वाटत होती...की आत्या ला हे आवडणार नाही मग उगाच हे नाते वाढवायला अर्थ नाही ..माझी जरी परवानगी असली तरी... ओढ तर तिला ही होतीच त्याची ,जी मनात दाबून ठेवली होती..पण आज ती हृदयातून ओठावर शब्दात येणारच होती पण तिने स्वतःला आणि तिच्या भावनांना सावरले होते.. तिने भरून आलेले डोळे पुसले ,हुंदका गिळून परत सूरजकडे आली ,तेव्हा त्याला ती रडते हे जाणवत होते...
सूरज मनातल्या मनात आरती कडे बघून बोलत होता ,आज इतका चांगला दिवस माझा ,मी मन मोकळे करून मनातले भाव तिच्या कडे व्यक्त केले आणि हिला रडू का येते, मी चुकीचे तर नाही ना वागलो..म्हणून तर ती रडत नसेल...मी जास्तच घाई केली का ,की ती मित्र समजत होती आणि मी प्रेम व्यक्त करून बसलो,किंवा तिला मी मित्रच म्हणून आवडत होतो.. नाही नाही, तिला आज काही विचारण्याची घाई करणार नाही ,आणि ही घाई करणे ही चुकीचे आहे यार... आरतीला कसे समजावू की ,माझे बोलणे मनाला लावून घेऊ नको ...मला जे तुझ्या बद्दल वाटते ते तुला ही तसेच वाटावे हा माझा आग्रह नाही .."
"चल सूरज निघायचे ना की पाऊल निघत नाही मामाच्या घरातून ,बाबा कुठेय ? आता आपल्याला निघायला हवे आई वाट बघत असेल, चल आरती आज खूप दिवसांनी खूप मज्जा आली, तुझ्यासोबत गप्पा मारून ही मस्तच वाटले, परत असेच एकत्र येत राहू...खास म्हणजे सुरजच्या हातचे जेवून बनवून इथेच जेवण करत जाऊ.." पूजा
सूरज आरतीकडे बघत बघत पायरी उतरत होता, त्याला तिची नजर आणि त्यातील भाव दिसत होते, तिला दुःखी पाहून तो ही नाराज झाला होता, आणि तिच्याकडे बघता बघता त्याचा पाय घसरला आणि तो पडणार इतक्यात आरती सगळे सोडून त्याला सावरायला पुढे आली, त्याच्या डोळ्यात डोळे टाकून थोड्या क्षणात नजर फिरवली..त्याने ती नजर तीच्या वरून काढली नाही, पण त्याला जाणवले की ती ही प्रेम करते त्याच्या वर पण बोलून दाखवू शकत नाही इतकेच.
इकडे आरती पळत आत गेली आणि तिने सूरज च्या आवडीची खोबऱ्याची वडी आणून त्याच्या हातात देणार असे समजून त्याने हात पुढे केला ,पण तिने ती पूजा कडे दिली.. म्हणाली ," पूजा तुझ्या आवडीची खोबऱ्याची वडी आहे, नक्की खाशील " ..सूरज कडे बघून ती बोलली आणि नेमके कोणाला म्हणायचे हे सुरजला समजला होते... त्याने हसून मामाचा आणि आरतीचा निरोप घेतला...
मामा मुद्दाम आत निघून गेला, त्याला सूरज चे आणि आरतीचे वागणे कळत होते... इकडे पूजा ही पुढे निघून गेली..वडील ही गाडीत बसले हे पाहून पुढे गेलेला सूरज परत फिरून आला आणि आरतीच्या कानात म्हणाला , "मला होकार मिळाला आहे ,तरी तो तुझ्या कडून ऐकण्यात समाधान आहे..मी वाट बघणार आहे..."
"उद्या तुझ्यासाठी आणि माझ्यासाठी खास दिवस आहे सूरज ,बेस्ट लक" आरतीला अजून काही सांगायचे होते पण ती बोलू शकली नाही,तिला आता तिच्यामध्ये आणि सूरजमध्ये दरी निर्माण होणार आहे हे दिसत होते.. जर आत्याने किसन च्या मुलीला स्वीकारले तर सूरज आणि माझ्या मधील ओढ कायम संपून जाऊ शकते.. म्हणूनच व्यक्त करण्यासाठी ती वेळ मागत होती जणू..
उद्या चा दिवस खऱ्या अर्थाने सूरजसाठी खास ठरेल का, ओढ लावून गेलेला सूरज आरतीच्या नशिबात असेल का, की अंतर निर्माण करणारा ठरेल
क्रमशः....
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा