ओढ तुझीच रे फक्त !!
इकडे आत्याने कॉल केला हे समजल्यावर तर आरतीला कळतच नव्हते, आपण कसला आणि का हा विचार करत होतो? तो तर मनातले खरे प्रेमाचे भाव व्यक्त होऊन बसला होता. माझ्या प्रतिक्रियेची वाट बघत...त्याला वाटणे सहाजिक होते की आता मी फोन करेन आणि माझ्या मनातले बोलून जाईन. खरे तर मी इतकी बेभान उगाच झाले, त्याला अजून कुठे कळले होते की मला काय सांगायचे आहे? काय हवे आहे? माझा होकार असेल की नकार? मी त्याला मूर्ख ,नासमज म्हणत असते आणि आज मी त्याच्यापेक्षा ही बिनडोक सारखी कशी वागले..अशी कशी मी वागू शकते. मला कळायला हवं होतं. अधीर.. अधीर.. अधीर..किती हा बावळट अधिरपणा...कंट्रोल कंट्रोल गं आरती.. तू काय केलं हे? तुझे ते बोलणे आत्याने तर ऐकले नसेल ना? असे जर झाले असेल तर तू….तू गेलीस कामातून, म्हणजे हे असं झालं की त्याला माझ्या मनीचे भाव कळण्या ऐवजी आत्यालाच कळले असतील.राम !राम !वाचव रे ...आरती एकटीच बेडरूम मध्ये फेऱ्या मारत हा विचार करत होती... सतत बोटे पिरगळुन काढत होती, तर मध्येच कुठे नखं खात होती. आत्याने उगाच बाऊ केला तर? बाबांना सांगितले तर? त्या आधी हे तिकडे जाऊन सगळे क्लिअर करावे लागेल. त्याला ही सांगावे लागेल जे मनात आहे ते.. आणि आत्याला ही सांगेन की जे तू ऐकले ते साफ-साफ खोटे आहे...
आत्याचा परत फोन येतो. \"अगं निघाली नाहीस का अजून? पाहुणे आलेच गावात...किती ग वेंधली तू , किती वेळ लागणार तुला आवरायला?\"
हो हो आत्या मी लगेच निघते. बाबा सोडून देत आहेत. मी आवरून निघालेच आहे. चप्पल घालते आहे. अगं पर्स पण घेऊन येते. हे बघ बसले आणि ही निघाले."
आरती आत्याला घाबरल्या त्या प्रकरणामुळे वेंधळत बोलत होती. मी कशी शुन्य मिनिटांत निघाले याचे सेकंदाचे अपडेत देत होती. आत्याला काय कसे बोलू हेच तिला सुचत नव्हते. इतके वर्ष सूरज आणि ती सोबत राहिलेले, पण कधी तिला आणि त्याला एकमेकांबद्दल प्रेम भावना निर्माण होईल असे तिला ही वाटत नव्हते आणि हे तिने आत्याला पटने चुकीचे होते. ती लगेच 15 मिनिटांत घरी पोहचली होती. दारात ती येताच सूरज उभा होता. तिचे दिसणे आता सुखावतं होते. ती येताच हृदय बंद पडेल की काय असे त्याला वाटत होते.
तिच्या डोळ्यात जे दिसत होते ते ती ओठांवर आणू पहात होती, पण ती बोलून दाखवत नव्हती. ती तिच्या मनातले कधी ओठावर शब्द रुपी आणणार याची तो वाट बघत होता. तिला जरा..सकाळी घडलेला प्रकार मनातून बोचणी देत होता. आत्याला कशी नजर मिळवू हा एकच विचार घोळत होता. सोबत आणलेल्या पर्स चा गोंडा हाताने फिरवून फिरवून तोडला होता, त्याचे मनी सर्व घर भर झाले होते. तिला कळले ही नव्हते परत विचारांच्या नादात दुसरा ही गोंडा पिळत होती. आत्या कुठून येईल आणि मला त्या वकिली नजरेने गुन्हेगार ठरवून जाब विचारेल, ह्या नादात दुसरा ही गोंडा तोडला होता, त्याचे ही मनी घरभर झाले होते. इकडे सूरज तिच्या कडे बघत होता. ही वेडी आहे का..आता तिसरा गोंडा तुटून त्याचे मनी घरभर करण्या आधी तिला आवरावे, आणि तिला खाली बसवावे... असा विचार करत असतांना आई आली. दोघे ही चोर पकडले गेल्या प्रमाणे वागत होते. तिचा हात परत गोंडया कडे जाणार इतक्यात सुरजने तिचा हात पकडला तशी ती दचकली आणि त्याच्या कडे बघत राहिली. काय झाले अशी खूण करून बघत होती. आई दोघाकडे बघत होती. तितक्यात त्याने तिला खुणवून खाली बघायला सांगितले. खाली बघ जरा...डोळे फरशी कडे करत म्हणाला ," काय केलेस तू ते बघ..अगं सगळे मोती मोती करून ठेवलेस घर भर, "ते तुला सांगत होतो आणि एकदम आईकडे बघून तिला ही जणू क्लेरिफिकेशन दिले की मी तिचा हात फक्त ह्यासाठी पकडला होता बाकी मनात काही नव्हते.
"चला मॅडम.. आत चला, एक तर उशीर केला आणि पुन्हा गप्पा मारण्यात उशीर नको " आत्या जणू सकाळचे प्रकरण काही न समजल्या सारखे दाखवत तिला आत घेऊन गेली. तिला सगळे काम सांगून परत पुजाची तयारी करण्याचे आदेश दिले.
"आत्या अगं नेमके कोणाला पहायला पाहुणे येणार आहेत गं पूजाला की.. चेहरा उरलेला होता,मनात चलबिलचल सुरू होती.मान खाली करून ती परत बोलू लागली) म्हणजे
सुरजला का गं?" आरती
सुरजला का गं?" आरती
आत्याचे लक्ष तिच्या बोलण्याकडे नव्हते, तिला मिक्सरच्या आवाजामुळे काहीच ऐकू नाही गेले. तिला वाटले की आरती काही विचारत होती, मग जरा मागे वळून तिने आरतीला विचारले ,"काय विचारत होतीस का तू? मी नाही ऐकले नीट से!
अगं काय विचारते मी तुला आरती, काय कुठे गुंग होतेस गं तू आज काल अशी. मी तुझ्या बापाला सांगणारच आहे, लगे हात पूजा सोबत हीच पण लग्न करून मोकळे होऊ ते ही एकाच मांडवात!"
आरती मिश्किल हसली,म्हणाली," तुला काय जड झाले का गं आत्या,अशी तू आधी कधीच नाही म्हणालीस, तू तर म्हणतेस की मला तू तुझ्या जवळच ठेवणार कायमची, मी तुला आणि बाबाला सोडून कुठे नाही जाणार, आणि हो माझी पूजा ताईच्या लग्नात डान्स करायची ती इच्छा अपूर्ण राहील ना ग ती पूर्ण झाली की मी लगेच त्याच मांडवात म्हंटले तरी दुसऱ्याच दिवशी लग्नाला उभी राहील "
पूजा,धावत स्वयंपाक घरात येते आणि म्हणते, "अग बाई तू इथे काय कांदे कापायला आली आहेस का, वेडी चल आधी चल, उठ ते पाहूणे येणार आहेत, आणि मी अजून तयार झाले नाही,"
आरती आत्याकडे बघत होती, जणू तिची परवानगी घेत होती नजरेने.. " आत्या जाऊ का गं मी? आल्यावर मदत करते तुला, "
अगं जा ग, तुला मी काही कामासाठी नाही बोलावले ,पूजाच्या तयारी साठीच बोलावले होते, जा जरा तू गप्पा ही मार आणि तिला तयार ही कर... तुला ही कधी येतीलच की पाहुणे बघायला.. " आत्या हसून म्हणत होती..
आरती आणि पूजा.. वर तिच्या खोलीत गेल्या, तेव्हा आरतीला पूजाच्या आनंदात एक वेगळीच चमक दिसत होती.. कोणी एका अनोळखी साठी इतके उत्सुक कसे असू शकते...मी तर अशी कधी आनंदी होऊ शकणार नाही... त्या अनोळखी साठी इतकी उत्सुकता... मला तर असा कोणी असावा जो मला चांगल्या प्रकारे ओळखू शकेल ...ते ही माझ्यापेक्षा ही जास्त... मी त्याच मुलांसोबत राहू शकेल ज्याचे घर,नाते माझ्या किमान ओळखीचे असतील, घर, गाव ,शहर ,देश हे आपल्या पाहण्यात असावे. परक्या देशात, परक्या गावात ,परक्या घरात.. ते परके लोक ह्यांना मी कशी ओळखू शकेल? कोण कसले काय... मला कधी नाही जमणार हे...मी कसे ही ऍडजस्ट करेन पण परके पणा नाही..मुळीच नाही.... काय ही माझी विचारांची दिशा.. जणू काय ह्याच घराकडे मला घेऊन जात आहे ..जणू मला सूरज योग्य आहे असे मन सांगत आहे...
"पूजा मला कळत नाही तू परक्या कोण्या व्यक्तीसाठी इतकी कशी खुश होऊ शकतेस गं कोण कुठला,कसला तो येणार आणि तो पसंती ठरवणार का माझ्या बहिणीची? तो जर म्हणाला पसंत तर पसंत..आणि नाही तर नाही.. काय माहीत आहे गं त्याला तुझ्या बद्दल असे? आला मोठा शहाणा.. का आवडला तुला तो? पाहिलेस का त्याला? तू बोललीस का त्याच्यासोबत? स्वभाव आणि विचार पडताळून पाहिलेस का? जर हे सगळे येस असेल तर ठरव तू तुझे आणि नसेल तर उगाच आई वडील म्हणतात म्हणून करू नकोस बरं... घाई करू नकोस.. मी आणि सूरज आहोत तुझ्या सोबत"
" काय काय? आणि कोण कोण आहे माझ्यासोबत म्हणालीस? परत एकदा बोल. कोण मुलगा म्हणालीस तू?" पूजा
"अग तुझा दादा आणि मी आहोत तुला सोबत, जर तुला मुलगा नसेल आवडला तर गं, त्यात काय जर मी सूरज म्हणाले तर "
"अगं गम्मत केली, खरं सांगू का आरती तुला, मला ना नेहमीच हे वाटते की कोणी एखादी अनोळखी मुलगी घरात सूरज ची बायको म्हणून येण्यापेक्षा, ती आईची सून, माझी वहिनी, म्हणून ही यावीनआणि तू एकदम परफेक्ट आहेस त्याच्यासाठी, डोळे झाकून तू ही हो म्हणून टाक, त्याने काल केलेल्या प्रॉपोजलला हो म्हणून टाक " पूजा आरतीला गमतीने का असेना मनातलं बोलून गेली होती..
आरती, "पूजा मला खर सांग हं, जो मुलगा येणार आहे त्याला तू ओळखतेस का? नात्यातला आहे का? की या उपर तुमचे काही प्रेम प्रकरण वैगरे आहे की काय? का तू मगाच पासून इतकी खुश दिसतेस... खुश नाही तर अति खुश...खरच आहेस? की आव आणते तू खुश असल्याचा?"
पूजा वॉशरूम ला जाऊ येते असं म्हणत जाताना आरतीच्या गालाची पापी घेते, तिला गोल गोल फिरवते, "अग माझी गोड गोड गोलू तू किती चिंता करतेस ग, अग मलाच जर तो नसता आवडला तर कोणी मला बळजबरी नसती केली मुळीच, पण तो मला खूप आवडला आहे. तो माझ्या रूपाची नाही तर माझ्या फिलिंगस ची खऱ्या अर्थाने कदर करतो. मी सावळी की गोरी च्या पलीकडे जाऊन मला मनाने सुंदर मानतो.होतकरू आहे,शिकलेला आहे, पण थोडा आपल्यापेक्षा गरीब आहे इतकेच...तसा ही तो लाथ मारेन तिथून पाईप लाईन सुरू करेल,घर ही होईल, आम्ही करू दोघे मिळून, शेती आहे.. आई बाबा साधे आहेत..त्यांना हुंडा नकोय..अजून काय हवंय ग...आणि मी ही जवळच्या शहरात आहे.. म्हणून तो मला आणि मी त्याला पसंत आहे ग शोना, आता फक्त तुम्ही हो म्हणा "
"Ok, असे आहे तर..म्हणजे तू किती समजदार झालीस गं पूजा? मला ही हे समजायला हवे वेळीच " आरती म्हणाली
"हो यार तू ही लवकर वेळेत निर्णय घे, तू घेतलास की सूरज घेईल..आई तर अधीर आहेच..मग मामा ही तुझ्या आनंदासाठी हो म्हणेल..आणि आपले सगळे कसे मनासारखे होईल, हॅपी हॅपी..दुरावलेले मन जवळ येतील आणि त्यांची ओढ वाढेल "पूजा आरतीला समजावत होती..
"हो ग ,पण तुला हे कसे माहीत की सूरज ने मला प्रपोज केले ते" ,आरती
"मुझे सब पता है! म्हणूनच तर त्याने त्या दिवशी मामाच्या आवडीचे जेवण त्याच्या हाताने केले होते खास.. जसे कोणाला पटवायचे असेल तर त्याच्या मनात जाण्यासाठी आधी पोटातून जावे लागते..असे काही तरी मी ऐकले होते आणि पोटात जाण्यासाठी आधी तोंड गोड करावे लागते.समथिंग समथिंग मी ऐकले होते..मग तसेच सूरज ने तुला प्रपोज करण्यासाठी आधी मामाच्या मनात जाण्यासाठी त्याच्या हाताने जेवण केले होते... मग ठरवले आईसक्रीमच्या बहाण्याने बाहेर जाऊन तुला त्याच्या मनातल्या त्या भावना सांगायच्या मग मी सोबत नको म्हणून मला पुढे चालायला सांगितले...आणि तुला त्याच्यासोबत मागे ओढून तुझ्या कानात काही तरी सांगितले, हो ना?"
"ओह!! असे होते तर, मला तर तेव्हा ही काही सुचले नाही,ना आज तू हे सांगितल्यावर काही सुचत आहे "आरती एकदम शॉक होती..
आत्या बाहेर उभी होती, त्यांचे बोलणे ती ऐकत होती.तिला ही हे कळले होते.. ती ही शॉक झाली होती ...पण तिला आज आरतीच्या मनातल्या सूरज बद्दल च्या भावना कळल्या होत्या..
आत्या लगेच आत आली ," अग आवरा लवकर..मंडळी आली आहे बाहेर.किती वेळ थांबुन ठेवू त्यांना, सगळे वेळीच उरकले बरे, त्यांना परत लांब जायचे आहे "
"हो आत्या आलोच आम्ही खाली "आरती
----------------------------------------------------
पाहुणे पूजाला पाहून निघून गेले, सगळी आवरा आवरी झाली, सगळे खुश होते..पूजा कपडे बदलायला गेली. आरती ही आता निघण्याच्या तयारीत होती. दुपारचे 3 वाजले होते. आत्या स्वयंपाक घरात जाऊन किचन आवरत होती.
तिक्यात दारावरची बेल वाजली.
कोण आले इतक्या भर दुपारी...पाहुण्यांचे काही विसरले तर नाही ना, सूरज बघ जरा ...आत्या
आत्याच बाहेर येते, तर हॉल मध्ये सूरज आणि आरती गप्पा मारत बसलेले असतात..
आरती अजून इथेच आहेस? गेली नाही तू, बर जा जरा बघ कोण आलंय ते दारावर " आत्या
हो आत्या बघते ...आरती
आरतीने समोर जाऊन दार उघडले. तुम्ही?"
आरती कोण आहे गं?" सूरज
आत्या, "अग कोण आहे?त्यांना आत तर येऊ दे ग "
"हो आत्या,मी त्यांना आत बोलवतेच आहे "आरती
सूरज," मी ओळखले नाही तुम्हाला ,
कोणाला भेटायचे आहे तुम्हाला "
कोणाला भेटायचे आहे तुम्हाला "
आरती, "सूरज हे, तुमच्या शेती असलेल्या गावचे सरपंच किसन राव आहेत "
आत्या हात पुसत बाहेर येते. किसन राव बसलेले असतात, आत्या आल्यावर अदबीने उठून उभे रहातात," बसा बसा, मी ओळखते तुम्हाला, काय काम काढलत तुम्ही इकडे"
किसन " ते आमची धाकटी मुलगी सीमा बद्दल बोलायचे आहे जरा..लग्न करायचे वय आहे..मुलासाठी शोध घेत इथे आलो आहे. "
"मग मिळाला का कोणी मुलगा तुम्हाला ह्या गावात ?" आत्या बोलली
किसन, "बाई मी स्पष्टच बोलतो, मी तुमच्या मुलासाठी बोलायला आलो आहे, मला असाच जावई हवा आहे आणि मुलीला ही असाच मुलगा पसंत आहे, म्हणून येण्याची तसदी घ्यावी लागली "
किसन चे बोलणे ऐकून सगळे आवाक झाले, काय बोलण्याची रीत, काय अहंकार, आत्या बघत होती तिला आता त्याची लेक बघायची होती.. शेवटी बापाच्या वागण्यामुळे मनात चलबिचल जरी झाली असेल तरी त्यात मुलीचा काय दोष.. ती जर चांगली असेल तर?
आत्या त्यांना निरोप देऊन आत आली होती.. सगळे उरलेले काम पुन्हा आवरायला निघत होती तो पाहिले की, स्वयंपाक घर,हॉल, भांडी सगळी आवरून झाली होती...सगळे कसे चका चक दिसत होते... हे सगळे आवरलेले पाहून आत्या खुश झाली होती. नेमके हे कोणी केले असेल ह्यासाठी मागे पुढे बघत होती...
आरती हात धुवून आत्या समोर आली होती. आत्याला कळले हे नक्कीच आरतीचे काम असणार..असे माझे पसारे बऱ्याचदा तिने आवरून मला सुख दिले होते.. कधी कधी तर माझ्या मनातले पसारे ही ती आवरून घेत होती.
आत्याने जवळ आलेल्या आरतीच्या डोक्यावर हात ठेवला आणि गालावरून हात फिरवून एक पापी ही घेतली. मनात म्हणाली, " तुझ्या मनातली इच्छा देव पूर्ण करू दे ,"
पुढे बघू आत्या काय निर्णय घेणार आहे.किसन असा जरी असला तरी मुलगी बघून ठरवणार का ती सूरज साठी योग्य असेल का ..
क्रमशः....
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा