Login

ओढ तुझीच रे फक्त भाग 10 (अंतिम)

Odh Tujhich Re Phkt


भाग 10
अंतिम भाग

ओढ तुझीच रे फक्त


सूरज एकटा खिडकी जवळ बसला होता ,उतरत्या उन्हात बाहेर येणाऱ्या जाणाऱ्या लोकांकडे बघत होता, किती तरी लोक आपल्या आयुष्यात असेच येतात आणि जातात पण काही खास आपल्यासाठी जास्त खास होऊन रहातात ,तरी ते आपल्या आयुष्यात कायमस्वरूपी आपलेच होऊन राहतील का याची कधीच शास्वती आपण का देऊ शकत नाही.
प्रेम खरे असले जरी तरी सगळ्यांना ते समजवता येत नाही,आणि ते पटवता ही येत नाही. माझे ही हेच होत आहे. तिला सांगून मोकळा झालो आणि ती ही कबूल झाली पण जे माझे आहेत त्यांना मी माझी बाजू मांडली नाही तर, ह्या दोन गोष्टी जुळवून येणार नाही. मला ठाम रहायचे आहे फक्त मी आरतीला दिलेल्या वचनावर, ते ही सगळ्यांसमोर, मग होऊ दे आर की पार. मी आता आजच आईकडे जाऊन सगळे खरे काय जर नाही बोललो तर, मी त्या मुलीसोबत एकांतात बोलून मोकळं होणार आहे. मी जिच्यावर प्रेम केले आणि मी जिला लग्नाचे वचन दिले आहे, मी त्या मुलीसोबत लग्नगाठ बांधणार आहे. हे सत्य आहे, हेच वचनबद्ध असलेले माझे प्रेम आहे.

दार वाजते...

समोर पूजा असते..

शांत उभी ,पण प्रश्नार्थक नजरेने सूरज कडे बघत.

सगळीकडे जणू एक मोठी पोकळी निर्माण झाली, ती ही शब्द मनात घेऊन आलेली असते. तो ही बोलावे की नाही ह्या मनस्थितीत असतो.

मुखात आलेला शब्द परत मुखात दाबून खिडकी कडे तोंड करून पूजा कडे पाठ वळतो.

मोठा श्वास सोडत हात भिंतीवर आपटतो.. दोनदा.

पूजा,"दादा असे करून काय होणार, इजा स्वतःलाच होणार, ह्यावर इलाज शोध."

सूरज,"काय इलाज, मला तर आता खुद बोलणी करावी लागणार येणाऱ्या मुलीशी, बस्स !! हाच इलाज उरला आहे ."

पूजा,"बोलणी, तू बोलणी करणार,काय बोलतोस तू, उलट बोलणी होऊ देऊ नकोस हे कर, सरळ सांग तुला हे लग्न मान्य नाही ते."

सुरज,"हो तेच म्हणतो मी,सरळ आढे वेढे न घेता,काही किंतु परंतु न ठेवता मी बोलणार आहे, ह्याशिवाय दुसरी बोलणी करणार नाही मी."

पूजा,"अगदी बरोबर, हेच कर आईला ही त्याच वेळी समजू दे की, तू आरतीला सोडून इतर कोणत्या ही मुलीचा विचार करणार नाहीस ते, आपल्या नजरेतली आरती सोडून भलती का करायची, तू एक कर, तू सांग तू नौकरी सोडली आहेस."

सूरज,"तू बरोबर आहेस,फक्त नौकरी मोठी,पगार मोठा ह्या आटीवर ती मुलगी हो म्हणत असेल ही, पण मला ती कोणत्या ही मुद्द्यावर पटलेली नाही. असो ती स्वार्थी पण, मला माझा स्वार्थ आहे.आरतीने केलेले निस्वार्थी प्रेम मला कायमस्वरूपी हवे आहे, तिच्या आईने आपल्या आईवर केलेले ढीग भर उपकार मला ह्या निमित्ताने फेडायचे आहे, मला आरतीला खूप प्रेम द्यायचे आहे. तिचा खूप जीव आहे ग मामा वर,आणि त्याला ही खूप प्रेम देणार आणि त्याची काळजी घेणे हा माझा स्वार्थ आहे, त्यासाठी काही ही करावं लागलं तरी मी करणार आहे."

पूजा,"यु आर माय बेस्ट भाऊ ,मला तुझ्या कडून हीच !! हीच!! अपेक्षा होती, तू खरंच किती मनापासून प्रेम करतोस आरतीवर हे आज कळले मला, तुझा स्वार्थ खरंच पूर्णत्वास जावो,आरती तुझी होईल ह्यात तिळमात्र ही शंका नाही,त्याला आई ही आडवी येणार नाही."

सूरज,"नेमका आईचा काय ग हेतू असेल, काय स्वार्थ साधायचा असेल तिला हे स्थळ बोलावून, आणि ह्यात माझे काय हित साधत असावी ग आई, की उगाच एक जिद्द घेऊन बसली आहे कसली,असो तीला करू दे काही ,मी मात्र घाई करणार त्या मुलीला नकार द्यायची ,तिला तिचा दुसरा कोणी ही मिळो पण मला ती नको."


सूरज ताईला मिठीत घेतो, आणि तिच्या कपाळची पापी घेतो,ताई ही त्याची पाठ थोपटून सगळे तुझ्याच मनासारखे होईल म्हणते,आणि त्याच्या सोबत बराच वेळ मावळणार सूर्य बघत असते..

आई इकडे दोघांना खाली घरभर शोधत असते, चहा प्यायला बोलवत असते,सगळे पडदे ओढून घेत असते..दिवे लावते..बाबा ला बोलून त्यांच्या सोबत चहा घेते..सूरज आणि पूजाला खाली येण्यासाठी परत हाक देते..तरी त्यांना आईने मारलेली हाक ऐकू जात नाही.

आई दोघे ज्या खोलीत बसले होते तिथे जायला निघते,बाबा तिचा हात पकडून खाली बसवतात.

बाबा,"अग बस ग !! ,किती दिवसांनी आपण दोघे इतक्या निवांत पणे बसलो आहोत, तुला तर नेहमी कबाब में हड्डी का हवी असते कळत नाही, इतकी तू सुंदर दिसतेस ,इतकी ही श्याम रंगीन आहे मग तुला का पळायची घाई झाली आहे, नेहमीच हेच असते ग तुझे ,मला घाबरतेस ते ठीक आहे ,पण अति घाबरत जाऊ नकोस ग ,परत ह्या रोमँटिक मोड मध्ये त्यांचे कशाला भंग,बस जरा सोबत..मग सून आली की हे असे मला रोमॅंटिक व्हायला नही जमणार."

आई,"अहो काय हे तुमचे वागणे ,वय काय आपले, बोलताय काय जरा जास्तच नाही होत का हे,आणि सून तर आपलीच असणार कोणी परकी थोडीच असणार ती ,राहिला प्रश्न मी तुम्हाला घाबरण्याचा, तर ते स्वप्नात ही घडणार नाही, तसे ही घरात कोणाचा तरी धाक हवा हो पण तो तुमचा मुळीच नाही राहिला आता."

बाबा,"उद्या पाहुणे मुलीला घेऊन येणार आहेत मी ऐकले."

आई,"हो बरोबर ऐकले तुम्ही, घरात काय घडत आहे हे सगळं माहीत असून ही ऐकलं म्हणत आहात, काय करावं बाई, तुम्ही जरा लक्ष घालत जा, तुम्ही पाहुण्यांसोबत बोलत जा, स्थळ पसंत नाही म्हणून उद्या कुठे जाऊ नका.घरी थांबा,उद्याचा दिवस हा खास दिवस असणार सुरजच्या आयुष्यातला, मी दादाला ही बोलावणार आहे आणि आरतीला ही यावे लागणार ,सगळे त्या दोघांच्या समोर आणि त्यांच्या साक्षीने होऊ दे."

बाबा,"तू कमाल कर पण कोणाचे मन दुखवेल अशी कमाल करू नकोस, तुला त्या स्थळाला काय कळवायचे ते कळव, काय पाहुणचार आणि कौतुक करायचे ते तू कर, पण तुला आंनद होत आहेत म्हणून सगळ्यांना आंनद होईल असे नाही, आरतीला तर मुळीच बोलवू नकोस ,जे काही करायचे ते तुझे तू कर, हवे तर मी मदत करतो घरकामाला, समान आणायला, पण तुझ्या दादाला नको बोलून डागनी देऊ मनाला."

आता तर रोमँटिक मूड मध्ये असणारे सूरज चे वडील ही सुरजच्या आई वर चिडले होते, कारण त्यांचे स्थळाचे खुळ काही उतरत नव्हते, त्यांनी निर्णय घेतला होता, सीमाला सून म्हणून घरी आणायची.

-----------------------------------------------------------

तो दिवस उजेडला

आईने आवरा आवर सुरू केली..
सामानाची यादी केली
मुली साठी साडी आणि तिच्या घरच्यांसाठी टोपी टावेल यादी मध्ये लिहिले, काही मिठाई, सरबत, फरसाण, इत्यादी पदार्थ यादी मध्ये लिहिले होते.

घरातील सगळे जुने बेडशीट बदलले गेले होते, घर चकाचक केले होते, पडदे बदली केले होते.
खास क्रोकरी सेट काढला होता.. घर कसे अगदी नवे वाटत होते..रूम फ्रेशनर फवारले होते.. हॉल ची खास सजावट केली होती..

खरे तर हा कार्यक्रम नवरी मुली च्या घरी ही करता आला असता पण आत्याच्या मनात काही वेगळे होते. आज आरतीला मुदाम मदतीला बोलावले नव्हते. तिला पाहुण्यासोबत बोलावले होते, दादा ही तेव्हाच येणार होता. त्यांना आई आज बोलावणार नव्हती पण काही करणास्तव
तिने बोलावले होते..

पूजा तिच्या रूम मधून आज बाहेर येण्याच्या मूड मध्ये नव्हती ,सूरज ही शांत होता, गलबलाट आणि आवरा आवर ह्याचे पडसाद फक्त आईच्या चेहऱ्यावर जाणवत होते, बाबा खाली आले ते ही जणू निरुत्साह घेऊन, कोणताच आंनद त्याच्या चेहऱ्यावर दिसून येत नव्हता, ते काल म्हंटल्या प्रमाणे यादी हातात पडे पर्यंत उभे होते, एकदा की हुकूम ने हुकूम सोडला की ते बाजारात जाणार होते, आणि लिहिलेले समान घेऊन येणार होते. या मदतीपलीकडे त्यांना कोणती ही ढवळाढवळ करायची अजिबात इच्छा नव्हती. त्यांनी जणू ठरवले होते,"तू आणि तुझा कारभार. "

आई,"जा आता तुम्ही सगळे समान घेऊन या ते पाहुणे येण्या आधी, हो आणि साड्या आणायला विसरू नका ,मुलगी गोरी आहे ,तसा कलर आणा अगदी तिला साजेसा हवा ,होणारी सून आहे ती आपली."

बाबा यादी घेऊन घराच्या बाहेर पडतात.

इकडे आई आरतीला फोन लावते आणि तिला ठरलेल्या वेळेवर येण्यास सांगते .

-----------------------------------------------------------

इकडे आत्याचा फोन आल्यावर आरतीची चांगलीच घालमेल सुरू होते. आज पासून आत्याचे घरी जणू मला पाहुण्या सारखे जायचे आणि पाहुण्यासारखे काही वेळ बसून परत निघून यायचे असे समजायचे. इतकेच काय ते नाते निभवावे लागणार आहे. आता संपले सगळे ऋणानुबंध कारण आता नवी नाती आत्या सोबत जोडली जाणार आहे. तसे ह्या नात्यातील ओढ कमी होऊन मनामधील अंतरे वाढत जाणार आहे. आता आपला त्या घरावर आणि तिथल्या माणसांवर काही एक हक्क राहिला नाही, राहणार नाही ,आणि गाजवायचा ही नाही हे मनाला सांगावे लागणार. आत्यासमोर सुरजचे ही मनसुबे चालणार नाही ,तो जरी बोलला तरी मुलीच्या घरच्यांसोबत झालेल्या बोलणीला नकार देणे योग्य ठरणार नाही.

आरती,"बाबा आता मी ह्या गावात राहणार नाही हे ठरवले आहे, मला इथे राहण्याची इच्छा नाही, पुढचे शिक्षण घेण्यासाठी मला पुणे ठीक राहील, आणि तू ही माझ्यासोबत चल,हे घर विकून तिकडे आपले नवीन घर घेऊ ,पुढे ही खूप मार्ग आहेत,नवीन लोक असतील आपण तिकडे जाऊ,कधी तरी तू येत जा आत्याकडे भेटायला पण आता इथे नको मन भरले आता."

आरती एकदम टोकाचे बोलत होती, अशी नाराज हरलेली आरती बाबाने कधीच अनुभवली नव्हती, निराशा आणि मनातून तुटलेली,काही तरी खूप गमावलेली आरती उदास चेहऱ्याने, साश्रू नयनांनी ती तुटक बोलत होती, नको आता कोणती ओढ कोणत्याच नात्याची ओढ..

बाबा,"तू इतकी हतबल होऊ नकोस बाळा ,तू आहेस म्हणून मी आहे ,माझा आंनद तुझ्या आनंदात आहे,तू म्हणशील ते करू पण अगदी तू हार मानू नकोस, मला माझ्या नात्यांवर भरोसा आहे, सूरज नाही मिळाला तर अजून कोणी त्यापेक्षा जास्त प्रेम करणारा साथीदार नक्कीच तुझ्या नशिबात असेल हे नक्की."

आरती," नको बाबा आता स्वप्न नाही बघावे वाटत,आता मी पुण्याला जाणार आणि तू ही येणार हे नक्की, आपले धागे इथे इतकेच जुळत होते हेच सत्य ."

बाबा,"आज तरी थोडा वेळ जाऊ तिकडे, त्यांच्या आनंदात विरजण नको उगाच ,तू नाही आली तरी हरकत नाही ,मी जाऊन येतो ."

आरती, "ठीक आहे,मी ते सोहळे नाही पाहू शकणार तू जा."

बाबा छान तयार होत होता, वेळ झाला होता तसा तो आरतीकडे बघून उदास झाला होता..

तो निघणार इतक्यात ताईचा फोन येतो..

ताई,"अरे बाबा येतोस ना,किती वेळ लावणार आहेस, आरती येते ना सोबत ? "

बाबा,"नाही ती नाही येणार म्हणते. "

ताई, " तिला सोबत घेऊनच ये ,तसा येऊ नकोस."

बाबा, "अग ती येणार नाही,तू राहू दे ना तिला, मी येतो ना बस्स मग ."

ताई, "हे बरं नाही दिसत रे ,ती एकटी घरी काय करणार ल,इथे आल्यावर मन रमेल तिचे ,आन तिला,तिला सांग आत्या आग्रह करते खूप, ती माझे मन नाही मोडणार."

बाबा,"मी येत आहे, ती नाही येणार ,तिला बरं वाटत नाहीये."

इकडे आरती आत्या आणि बाबांचे बोलणे ऐकत होती,तिला आत्याने बोलावले आहे हे ऐकू येत होते, तरी ती बाबाकडे बघून येणार नाही अशी मान डोलावत होती. डोळ्यात पाणी होते. तोंड पडले होते. ती परत घरात गेली बराच वेळ आली नाही. इकडे बाबा ती असे का वागते हे पाहून तिथेच थबकले होते. त्यांचे ही मन पुढे ताईकडे जायला धजत नव्हते. लेकीचे मन मोडले होते... तिला जो आवडला होता आज त्याचे कोणा दुसऱ्या मुलीसोबत जमणार होते..

इकडे बराच वेळा नंतर आरती बाहेर आली होती, ती बाबाला म्हणाली,"थांबा बाबा मी येते, मी आत्यासाठी येते, कारण नाते नवीन जुळत असले तरी जुन्या नात्याची ओढ ही संपणार नाही,माझे हृदय इथे आहे हे मी विसरून जाऊ शकत नाही."

तिच्या ह्या शेवटच्या वाक्याने तर बाबा क्षणभर स्तब्ध झाले होते,तिला ह्या,माझे हृदय तिथे आहे ह्यातून काय म्हणायचे होते हे बाबाला जरा चटका लावून जाणारे वाटले,म्हणजे सुरजवर किती प्रेम आहे हे सांगायचे होते का तिला, की तिच्या तोंडातून हे अनावधानाने निघाले...

बाबा,"बाळ जरा विचार कर,नाही आलीस तरी हरकत नाही, मी आत्याला सांगेन तुला काय होत आहे ते,आणि वेळ मारून नेईन "

आरती,"नका सांगू कोणते ही कारण बाबा, मी बिलकुल नाराज होणार नाही, जे आपले होणार नाही ते मी स्वीकारत, मन घट्ट करत तुमच्यासोबत येते ,मी नेहमीसारखी छान आवरून येते, मला तुम्ही सोबत असल्यावर कोणी नसले तरी खूप काही माझ्या सोबत आहे, माझे नशीब माझ्यासोबत असल्यासारखे आहे. "

बाबा जरा थोडे सावरले होते आरतीचा थोडा ठाम विश्वास पाहून, तिने स्वतःला सावरले होते.
ती तयार होऊन आली होती, बाबांच्या आवडीची गुलाबी काठ पदर असली साडी घातली होती.. चेहऱ्यावर एक छान हास्य घेऊन ती तयार झाली होती. आतून मन तसेच जड आणि उदास होते पण त्याची जरा ही पुसटशी जणीव ही बाबाला होणार नाही याची काळजी घेत ती बाबांच्या हाताला धरून गाडीत बसली होती. ती आज अधिकच सुंदर दिसत होती. तिचे दुःख जितके जास्तीत जास्त सुंदरतेच्या आड लपवता येईल तितके लपवण्याचा प्रयत्न करण्यासाठी मुद्दाम छान सजली होती. सुगंधी मोगरे, अत्तर, लांब सडक सोडलेले काळे भोर केस, गळ्यात मोत्यांची चिंच पेटी, हातात कडे. ह्यात ती कुठल्या ही प्रकारे नाराज नाही हे ती भासवण्याचा प्रयत्न करीत होती. जेणे करून बाबा ला तिने तसे भासवले होते. तेणे करून सुरजला ही ती हेच भासवणार होती. तिला आता हेच असे स्वतःला ही भासवायचे होते, की ती कोणाच्या कोणत्या ही निर्णयामुळे दुःखी होणार नाही.

-----------------------------------------------------

इकडे सीमाच्या घरातील मंडळी छान अजून धजून तयार बसली होती , होणारी नवरी मुलगी ही खास तयार झाली होती, तिला आज खास छाप पडायची होती, होणाऱ्या नवऱ्या मुलाला आकर्षित करण्याचा एक ही चान्स सोडायचा नव्हता. त्याने कधी इतकी सुंदर मुलगी पहिलीच नसावी अशी तिची आई म्हणत होती. हे स्थळ म्हणजे सोन्याचे अंड देणारी कोंबडी असे तिच्या आईच्या मनात येत होते. हे स्थळ हातचे जाता कामा नये. सीमाची मोठी बहीण ही छान सजली होती..बाबा सुरजच्या घरच्यांचा फोन ची वाट बघत होते..

सीमा,"बाबा बघा अजून कसा तिकडून फोन आला नाही, त्यांचा इरादा तर बदलला नाही ना."

बाबा, "अग आवरा आवर चालू असेल म्हणून वेळ लागत असेल, येईल त्यांचा फोन, करणार होत्या त्या."

आई ( सीमाची ), " किती वेळ लावणार."

मोठी बहीण,"मी तर म्हणते आपणच जाऊ, वाट कशाला बघायची फोन ची."

आई,"मी काय म्हणते आता आपली सगळी मंडळी तयार आहेच तर आपण निघू, जरा त्याच्या घरी लवकर पोहचू, आराम करू,हवा खाऊ,पाहुणचार कसा करतात ते पाहू , ऊन पण वाढत आहे मग वेळेच्या आत जाऊ,मुलगा मुलगी जरा वेळ आप आपसात बोलतील, त्यांची ओळख होईल, ओळखीतून जवळीक वाढेल, जवळीक वाढली की ओढ निर्माण होईल,दोघे मनाने हृदयाने जवळ येतील,मग होकार द्यायला त्यांना वेळ लागणार नाही ."

सीमा,"आई तुला सगळीच कशी घाई ग,जरा वेळ दे मलाच इतक्या लवकर होकार द्यायचा नाही, ते आधीचे स्थळ त्यांचा कधी ही होकार येऊ शकतो, मग काय करणार ऐन वेळी आपण ,कसा यांना नकार कळणार,जरा शांत बस, सूरज पेक्षा मी त्याला जास्त प्राधान्य देते, तो जास्त पैसे वाला आहे, विदेशात असतो तो,हा तर इथेच साताऱ्यात असतो ."

आई,"त्याचा होकार आलाच नाही तर हे स्थळ फायनल आहे ,तू उगाच तारे तोडू नकोस."

बाबा, "चला आपल्याला मुलाच्या आईकडून बोलावणे आले आहे, फक्त इतकेच करा तिथे वाद घालून माझी अब्रू घालू नका, हो त्याला स्थळाची कमी नाही,त्या बाईच्या भावाची मुलगी सुरजला पसंत आहे,पण आईला आपली सीमा पसंत आहे, म्हणून मी पुढाकार घेत आहे "

सीमा, "बाबा तुम्हाला कोणी सांगितले होते ह्या स्थळासाठी लुडबुड करायला, मी माझे पाहून घेतले होते ना, मला जर आजच फोन आला त्या बैठकीत आधी पाहिलेल्या मुलाचा तर मी सरळ नकार देणार सुरजला,मग तुम्ही निपटारा करा,किंवा काय सांगायचे ते सांगा."

सीमाच्या ह्या बोलण्याने तर किसनराव च्या पायाखालची जमीन हलली,ते तिथेच गार झाले, इकडे सुरजच्या आईचा फोन येत होता,तिकडे सगळे त्यांची वाट बघत होते. इथे किसनराव ची आडकीत्यात सुपारी अशी गत झाली होती..

बाबा ( किसनराव ), "अग कशी तरी वेळ मारून घे,आता सगळे वाट बघत आहेत ती मंडळी,बापाची इज्जत ठेव जरा,मग मी सांगेन त्यांना,हो पण आधी त्या मुलाचा फोन येऊ दे,खात्री पटू दे मगच तू सुरजला नकार दे."

सीमा,"ठीक आहे,पण मी होकार देणार नाही,जरी त्याचा होकार असला तरी,नाहीतर मीच सरळ त्याला सांगून मोकळी होणार,की माझे इतर कोणावर प्रेम आहे आणि म्हणून मलाच हे लग्न मान्य नाही "

सगळे आता सुरजच्या घरी जायला निघतात, कोणाच्या ही चेहऱ्यावर आंनद नसतो,किसनराव टेन्शन मध्ये असतात, सीमा तिच्या निर्णयावर अडुन असते,आई फक्त जो जास्त पैसेवाला त्या स्थळाला प्राधान्य देते..ताई ही सीमाच्या बाजूने असते.


इकडून आरती आणि बाबा आत्याच्या दारात पोहचलेले असतात. तर तिकडून सीमाच्या घरच्यांची गाडी ही दाराच्या गेट मध्ये पोहचते..

इकडून सीमा येत असते तर तिकडून आरती समोरून येत असते. सीमा एक दिखाऊ सौंदर्य असते फक्त एक आकर्षण असते मोहात ओतप्रोत बुडालेले,तर आरती मनाचे सौंदर्य , मूळात सुंदर अशी. ओढ कशी लाघवी लावून जाणारी, कायमस्वरूपी मनाला मोहात पडणारी.
कोणाच्या मनाचा मान ठेवणारी, त्याग करून ही त्याग केला नाही असे भासवणारी, निस्वार्थी भाव असलेली. तर सीमा स्वार्थासाठी कोणत्या ही टोकाला जाणारी. आता कोणाचे पारडे जड असेल आणि कोणाच्या पारड्यात काय पडेल हे बघण्याची वेळ आली होती.. कोण कसे काय कोणाचे होणार हे बघायची वेळ आली होती..

जरी सीमा सुरजची होणारी बायको असली तरी तिच्यासाठी आरतीच्या मनात जरा ही ईर्षा नव्हती, तिने सीमाला पाहताच एक गोड smile दिली होती, तेच सीमाने आरतीला पाहताच तोंड मुरडले होते..खरे तर सीमा इथे नकार देणार हे ठरवूनच आली होती तरी तिला आरती बद्दल इतका तिरस्कार का असावा मनात..

आरतीला जरा सीमाचे हे वागणे पटले नव्हते, ती लगेच मनाची विचलित मनस्थिती सावरून लगेच आत निघून गेली होती.. जाता जाता तिला जोऱ्यात पायात काचेचा तुकडा घुसला ,तिच्या कळ आत डोक्यात गेली होती ,आणि ती जोऱ्यात आईच्या नावाने किंचाळली ...तिचा आवाज घरात सगळयांना ऐकू गेला ,सुरजने ही तिचा आवाज ऐकला, आणि आवाज ऐकताच तो सगळी आवरा आवर,त्याची तयारी सोडून तसाच बाहेर तिला सावरायला पळत आला, तिला पडत असताना तिला त्याचा हात दिला. त्याला तिची वेदना सहन होत नव्हती,आणि खास करून तिने आई च्या नावाने जी हाक मारली होती ती त्याच्या काळजात जणू बाण लागावा अशी घुसली होती,त्याने तिला उचलून घरात आणले होते. तिचे रक्त त्याच्या शर्ट ला लागले होते. ती आईच्या नावाने अजून ही रडत होती. आता जणू सगळ्या लपवत असलेल्या दुःखाची कळ ह्या काचेच्या सळसळत असलेल्या ठसठशीतून बाहेर निघत होती. सूरज तिला सोडू शकत नव्हता, तिचे दुःख बघू ही शकत नव्हता. आज काय प्रसंग आहे हा पुरता विसरला होता..

आत्या ही आरती जवळ आली होती ,तिचे ही काळीज पुरते हळहळले होते, शेवटी आरतीच्या आईचे काळीज होते ते,आई अशी हाक मारताच ते ही थाऱ्यावर नव्हतेच जणू, आत्याला ही कळ बघवत नव्हती, तिला आरतीसाठी खूप वाईट वाटत होते, लेकरू आईविना आहे म्हणून तिच्याबद्दल जास्त प्रेम दाटून येत होते, सुरजने तिला पुज्याच्या रूम मध्ये झोपवले,तिचे रक्त पुसून त्याला हळूच हळद लावून,पट्टी बांधली होती. तिच्यापासून जरा ही दूर होऊ शकत नव्हता. तिला जास्त वेदना होत होत्या,त्या सूरज जवळ आहे तो ही आजच पण तो माझा नाही याची जाणीव होती म्हणूनच त्याची कितीही गरज असली तरी तिने त्याचा हात धरण्याचा प्रयत्न करावा जरी वाटत असला तरी ते शक्य नव्हते.. तिने लगेच स्वतःचे मन सावरले ह्या स्थतीत आणि पटकन पुजाचा हात धरला..तिला बिलगली आणि वेदना असह्य होऊन ती रडू लागली. सूरज बघत होता पण त्याला तिने जवळ केले नाही ह्याची जाणीव होत होती. त्याने लगेच डॉक्टर ला बोलावले.

इकडे बाबाला ही आरतीचे दुःख कळत होते, पण ते काहीच करू शकत नव्हते. आता ही वेळ तिला स्वतःला स्वतःहून सावरून घेण्याची आहे, आज नाही सावरली तर कधीच सावरू शकणार नाही हे त्यांना कळत होते..ह्यात एक मात्र दिसले सूरज चे आरतीवर किती प्रेम आहे ते.

इकडे सूरज डॉक्टरला घेऊन येतो .

डॉक्टर आरतीची जखम बघतात ,ती खूप जिव्हारी लागलेली जखम खोलपर्यंत असल्यामुळे सेप्टिक होऊ नये म्हणून इंजेक्शन द्यावे लागेल असे सांगतात.

इकडे आरती पुजाचा हात घट्ट पकडून ठेवते.. डोळे गच्च मिटून ठेवते,तितक्यात त्यातून दोन अश्रू ओघळतांना सुरजला दिसल्यावर त्याला आठवते लहान असतांना आरतीला इंजेक्शन ची खूप भीती वाटत,आणि ती जोऱ्यात रडत आणि आईला बिलगत,किंवा त्याचा आणि पुजाचा हात धरत,तेव्हा तिला इंजेक्शन दिले की नाही याची जाणीव ही होत नसत. आज त्याला तसेच वाटते होते की,आरती माझा आणि पुजाचा हात धरेन, आई समोर उभी होती तिला आरतीची स्थिती बघावत नव्हती . इकडे आरतीने त्याचा हात धरण्यासाठी हात पुढे केला तर होताच पण तिला काय वाटले की, तिने लगेच पुजाचा हात पकडला आणि भिंतीकडे तोंड केले..

हा सगळा प्रकार सीमा आणि तिची आई बघत होत्या,त्यांना हा झालेला प्रकार आणि सुरजचे वागणे अजिबात पटले नव्हते. त्याचा खूप राग येत होता. त्यांना वाटले त्या मुलीसाठी सूरज ने इतके जवळ जाणे आणि तिला उचलून उर घेऊन जाणे योग्य नव्हते. ते ही आमची तमा न बाळगता .

इकडे आई सुरजला समजावून तयार व्हायला सांगते, तो शर्ट बदलायला सांगते आणि तो शर्ट धुवायला घेते, तोच सूरज म्हणतो," तो शर्ट धुवायला टाकू नको ,तो मला माझ्या जवळ तसाच ठेवायचा आहे,तो जणू माझ्या मनाला लागलेला घाव आहे आणि तो कायम तसाच ठसठसत राहील माझ्या मनात, तो आठवण असेल जिव्हारी लागलेली,मी केलेल्या चुकीची. "

आईला आता सुरजचे बोलणे मनाला लागले होते,तीकडे आरतीची आवस्थ बघवत नव्हती तर इकडे सुरजची आवस्थ बघवत नव्हती. तिला ह्या दोन जीवनाची होणारी घालमेल कळत होती,आता तर जास्तच कळत होती. ते दोघे फक्त माझ्या प्रेमापोटी बोलते होत नाही पण मी मार्ग काढेन,नाहीतर सरळ मीच आता ह्या मुलीला नकार कळवून मोकळे होईन.

इकडे सीमाला एक कॉल येतो,हा कॉल प्रदीप चा असतो,प्रदीप तो ज्याच्या होकाराची सीमा आतुरतेने वाट बघत असते आणि ज्याच्या मुळे ती सुरजला नकार द्यायला ही एका पायावर तयार असते..सीमा खूप खुश असते, कॉल घेताच प्रदिप तिकडून त्याचा तिला होकार आहे असे कळतो..

सीमा पळतच तिच्या ताई कडे येते ,तिथेच आई आणि तिचे बाबा किसनराव बसलेले असतात, ते सगळे आरतीच्या बाबा सोबत गप्पा मारत बसलेले असतात, इकडे सुरजचे बाबा सगळे समान घेऊन आलेले असतात.. उरतून सुरजची आई खाली येत असते. सूरज तयारी करण्यासाठी त्याच्या रूम मध्ये जात असतो..पूजा अजून ही आरतीसोबत तिला झोपी लावण्यासाठी बसलेली असते..

सीमा आईला आणि ताईला सगळ्यांपासून दूर बोलवते

सीमा,"आई ,ताई मी आज खूप खुश आहे "

आई,"काय झालं तुला खुश व्हायला,का इतकी लॉटरी लागल्या सारखी करतेस तू ."

सीमा,"अग तसेच समज हवे तर ."

ताई, "सीमा बोल काय झाले ग ,पटकन बोल."

सीमा,"अग मला तिकडून होकार आला आहे,त्या प्रदीप कडून ,त्यांना लग्नाला होकार दिला आहे आणि ते लोक आपल्या घरी येणार आहेत "

इकडे सीमाला होकार आल्याचे कळल्यावर आई ,ताई खूप खुश होत्या

आई,"अग पण ह्यांना कसा नकार कळवायचा, काय कारण सांगणार नकाराचे ,तुझ्या बाबाला तर आता तू घोळत पाडले आहेस,ते काय कारण सांगतील नकार का देत आहोत ह्याचे."

ताई लगेच मध्ये बोलते आणि म्हणते ,"अग सकाळी जे घडले तेच कारण पुढे करू आणि सांगू तुमच्या मुलाचे प्रकरण असून ही तुम्ही आमच्यापासून लपून का ठेवले."

सीमाला आता नकार द्यायला आयते कारण मिळाले होते.

इकडे बोलणी करण्यासाठी आलेले सगळे हॉल मध्ये जमले होते,सूरज ,सुरजचे आई बाबा, सीमा, तिचे आई बाबा,मामा सगळे आता बोलणी करणार इतक्यात सीमा म्हणाली मला मुलांसोबत काही एकांतात बोलायचे आहे.

सीमाची ही वागण्याची आणि बोलण्याची रीत बघता सगळे आवक झाले होते, मुलगीच स्वतःहून दोघात बोलण्यासाठी वेळ मागते,हे न पटण्यासारखे होते..आत्या तर बघत राहिली. सगळ्यांच्या चेहऱ्यावर प्रश्न चिन्ह होते जणू..

आत्याच मग पुढे येऊन म्हणाली, हरकत नाही तुम्ही बोला आणि ठरवा...हो पण त्या नंतर मला खूप महत्वाचे बोलायचे आहे.

सीमा आणि सूरज त्याच्या खोलीत जातात,

सीमा,"हे बघ सूरज मला मुळात एक स्थळ आले होते आणि तो मुलगा मला खूप मनापासून आवडला ही होता,पण त्याने होकार कळवळा नसल्याने माझ्या बाबाने तुझ्यासाठी मला न विचारता माझे स्थळ सुचवले होते,पण आजच त्या मुलाकडून होकार आला असल्याने मी तुझ्याशी लग्न करू शकत नाही, आणि हो खरे तर तुला ही हे स्थळ मान्य नव्हते हे सकाळी झालेले प्रकारातून दिसत होते ,तू इतके प्रेम करतोस आरतीवर तर तू स्वतःहून मला नकार द्यायला हवा होतास, मी मुलगी असून ही मला जो आवडतो त्यासाठी काही करू शकते तर तू हे का नाही करू शकत होतास. जर मला त्या मुलाने नकार दिला असता तर मी तुझ्याशी लग्न केले असते, मग जी तुझ्यावर इतके प्रेम करते तिचे काय झाले असते. देवाच्या कृपेने आज दोन मने दुखवण्याचा पापापासून मला देवाने वाचवले. आता तरी तू आरतीला होकार दे, सगळ्यांच्या समोर दे, तिला खूप बरं वाटेल की तू मला नकार दिला खास तिच्यासाठी,हे करच तू तिच्यासाठी."

सूरज जरा वेळ शांतच होता, त्याला सुचत नव्हते की हे काय चालले आहे, त्याला मनातून खूप आंनद झाला होता,त्याने सीमाचे खूप आभार मानले होते..इतके बोलून दोघे ही बाहेर आले होते
दोघांच्या ही चेहऱ्यावर आंनद आणि समाधान झळकत होते.. सुरजच्या ही मनासारखे झाले होते तर सीमाच्या ही ..

सूरज," खरे सांगायचे तर मीची तुला नकार देणार होतो,आज ठरवलेच होते जेव्हा दोघे बोलायला माझ्या रूम मध्ये येऊ तेव्हा तुला खरे सांगून नकार देणार होतो, आरती साठी मी काही ही करू शकतो,पण फक्त आईसाठी तग धरून होतो,मी ही आणि आरती ही,मी तर इतके दिवस योग्य क्षणाची वाट बघत होतो,तुला फोन करून सांगावे वाटत होते पण ती वेळ योग्य वाटत नव्हती ,आणि आज मी हे सगळ्यांच्या समोर माझे आणि आरतीचे नाते कबूल करणार आहे. ह्या नात्याला बाबा,मामा,ताई,मी आणि आरती ही तयार होतो आईला सांगण्याची वेळ आज आली आहे . "

बाहेर आल्यावर दोघांनी ही आपल्या नकाराची कबुली सगळ्यांच्या समोर जाहीर पणे दिली होती.. दोघांनी ही आपले कारण सांगितले होते..

आत्याला तर देव पावला असे वाटत होते, न बोलता स्वतः दोघांनी नकार दिला होता, ज्यात कोणाची मने दुखावली ही गेली नव्हती..बाबा आणि मामा खूप खुश होते, किसनरावांचे टेन्शन कमी झाले होते,उलट त्यांचा मान वाढला होता.

सगळ्यांनी आनंदाने एकमेकांचा निरोप घेतला होता, सीमा ह्या प्रसंगी समजूतदार सारखी वागली आणि तिने वेळ निभावून घेतली. तिने सूरज आणि आरतीच्या नात्याला कुठे ही डाग लावला नाही ह्या मुळे तिला ही एक समाधान वाटले होते. आपले सुख मिळावे म्हणून कोणाला दुखवू नये ना त्यांना ताईने सल्ले दिल्याप्रमाणे बदनाम ही करण्यात सुख मानू नये हे लक्षात आल्याने तिने नकार देण्यासाठी मधला मार्ग निवडला होता..

-----------------------------------------------------------

इकडे मामाचा आनंद गगनात मावत नव्हता ,आज त्याच्या आनंदाला पारा नव्हता ,आरतीच्या मनासारखे झाले होते ,त्यात त्याला खूप समाधान लाभले होते..

बाबा ही खूप खुश होते ,शेवटी आरतीच त्यांच्या घरची सून होणार हे नक्की झाले होते,आता सूरज बाबांना येऊन बिलगला होता, मामाच्या जवळ जाऊन पाया पडला होता, आईला तो अजून ही बोलत नव्हता. आईबद्दल थोडा राग होता. आईला खरे तर मनापासून वाटत होते की सुरजने आपल्या आणि आरतीच्या नात्याची कबुली द्यावी पण तो काही बोलायला सांगायला तयार होत नसल्याने ह्या स्थळाची मुद्दाम बोलणी करण्याचा घाट घातला होता. निदान ह्या निमित्ताने तरी नाक दाबले की तोंडातून कबुली दिली जाईल. पण झाले वेगळेच. ह्यात सुरजला आता आईबद्दल राग वाटू लागला होता..

आईने लांबून स्वतःचे कान पकडले आणि त्याची माफी मागितली, मग त्याला ही आईची यात चूक नसून चूक आपलीच आहे हे जसे सीमाने पटवून दिले तसे कळले की मीच आईला आमच्या नात्या बद्दल खरे काय ते जर सांगितले असते तर तिने ही कधीच नकार नसता दिला. तो आईकडे आला आणि तिला मिठी घेऊन तिला तिच्या होणाऱ्या सुनेकडे घेऊन गेला.. त्यांच्या मागे मामा आणि बाबाला ही येण्याचा सुरजने इशारा केला..
सगळेच जण आरती भोवती उभे होते.. तिच्याकडे एकटक बघून हसत होते.

बाबा,"मग आरती लागा आता लग्नाच्या कामाला, आता लग्नात तुझीच मेन भूमिका असणार बर,मग लवकर बऱ्या व्हा,लग्नाची खूप तयारी करायची आहे तुला,सुरजला तुझ्या चॉईस चे ड्रेस घ्यायचे आहेत."

सूरज, "हो एकदम बरोबर बाबा, पण तिच्या पायाची जखम बरी झाल्या नंतरचा मुहूर्त काढू साखरपुड्याचा,आणि तो बरा होण्यासाठी मी मदत करेन आरतीची ."

पूजा," हे काय चालू आहे तुमचे, आरतीला का उगाच अजून कसे दुःख होईल याकडे कल आहे तुमचा,सूरज तुझे ठरले ना लग्न ,आवडली ना तुला तुझी होणारी बायको,तुही आईच्या पसंतीने लग्नाला तयार झाला आहेस ना मग आता आरतीला का त्रास होईल असा वागतोस,जा तुझ्या होणाऱ्या बायकोला तुझी चॉईस विचार ."

सूरज,"अग तू का चिडतेस इतकी,बायकोला विचारले काय आणि आरतीला विचारले काय, आणि तुला माहीत आहे का माझ्या बायकीचे रास नाव ही आरतीच आहे ,ती म्हणणे तसे मी करत आहे आणि ती म्हणेन तसे मी करणार आहे."

सूरज लगेच आरतीकडे हात पुढे करतो आणि म्हणतो,"माझी चॉईस होईशील ,माझी साथ देशील अजन्म,मला तुझ्या दुःखात सोबत ठेवशील, होशील का तू माझी नवरी,आज सगळ्यांना साक्षी ठेवून तुझा हात माझ्या हातात विश्वासाने देशील ."

आरती सुरजकडे बघत होती ,हा काय म्हणत आहे,असे का म्हणत आहे तिला तिळमात्र ही कल्पना नव्हती, तिला सुचेना काय करावे ,खरच हा माझा हात मागत आहे की गम्मत करत आहे,की हे दिवा स्वप्न आहे जणू,की इंजेक्शन ची ग्लानी आहे. तीला कळत नव्हते. ती काही वेळ त्याच्याकडे बघतच होती. तिने त्याच्या हाताला स्पर्श ही केला. तो स्पर्श खरा होता. तिने बराच वेळ स्पर्श केला करत राहिली, मग बराच वेळ तिने त्याचा हात हातात धरून ठेवला तेव्हा कुठे तिला खरे वाटले. तिने त्याचा हात हातात घेऊन डोळ्याला ही लावला, तो त्याचा स्पर्श तिच्या अश्रूंनी नाहून निघाला. सूरज तिच्या खूप जवळ होता,तो आता ही तिचाच आहे का असेल का ह्यात थोडी शंका होती..

सूरज तिच्या जवळ बसला ,आणि तिला सांगितले,तिला खात्री पूर्वक वचन दिले,"हो मी आता कायमस्वरूपी तुझाच असणार आहे "

सगळ्यांना हीच ओढ हवी होती,जी त्या दोघांना कायम जोडून ठेवणारी होती..


--कथा समाप्त---