ओढ तुझ्या प्रेमाची भाग १

तुला ना कोणत्या गोष्टीचा रागच येत नाही बघ. मी असते ना तर त्याला चांगलच केलं असतं.
राधा एक सुस्वभावी मुलगी होती. आई बाबांनी अगदी लाडात वाढवली होती. राधाचा आई बाबांवर खूप जीव होता. राधा अभ्यासात हुशार तर होतीच त्यासोबत वक्तृत्व स्पर्धा, चित्रकला स्पर्धेत तिचा क्रमांक ठरलेला असायचा.

सर्वगुणसंपन्न अशी विद्यार्थीनी होती.

आई बाबांची छाती अभिमानाने फुलून येत जेव्हा कोणी राधाचे कौतुक करत असे.

राधाचा मोठा भाऊ रमेश त्याचाही राधावर जीव होता. बहीण भाऊ कमी आणि मित्र मैत्रिणी जास्त होते.

राधाची बालपणीची मैत्रीण ओवी म्हणजे तिचा जीव की प्राण. ओवी आणि राधा मैत्रिणी नसून बहिणीच होत्या.

एकमेकांची सुख दुःख त्या एकमेकींना सांगायच्या.

तर राधा ही आहे आपल्या कथेतील नायिका.
स्वभावाने गोड आणि हुशारही.

राधाचा दहावीचा निकाल लागला होता. राधा चांगल्या गुणांनी पास झाली.

ज्या कॉलेजमध्ये ऍडमिशन व्हावं अशी राधाची इच्छा होती त्याच कॉलेजमध्ये राधाला आणि ओवीला ऍडमिशन मिळलं.

राधाच्या तर आनंदाला सीमा उरली नव्हती.
आता ओवीदेखील आपल्यासोबत असणार ही भावना तिला सुखावणारी होती.


बघता बघता सुट्ट्या संपल्या आणि कॉलेज सुरू झाले.

कॉलेजची इमारत फार भव्य होती आणि कॉलेजच्या कॅम्पसची तर गोष्टच निराळी. मुलं आणि मुली वर्गात कमी आणि तिथे जास्त दिसायचे.

राधा तर अनेक स्वप्न डोळ्यात साठवून होती.
काहीही झाले तरी शिक्षणावर पूर्ण फोकस कारायचा हे तिने ठरवलं होतं.

कॉलेजचा पहिला दिवस होता.
मुलं आणि मुली सगळेच खुश होते.
कोणता वर्ग असेल, कोणते शिक्षक सगळेच एक्साईटेड होते.

राधा आणि ओवी स्वतःच्या वर्गात जाऊन बसल्या.

कोण असेल बरं आपले प्रोफेसर ह्या विचारात असतांना एक मुलगा भला मोठा चष्मा घालून आत शिरला आणि फळ्यासमोर उभा राहिला.

राधा आणि ओवी एकमेकींना पाहू लागल्या.
राधा, "ओवी, हा का तिथे उभा राहिला?"

ओवी त्याला निरखुन पाहत म्हणाली, "माहीत नाही गं. वय तर लहान दिसते आहे ह्याचे. हा प्रोफेसर तर दिसत नाही."

राधा देखील म्हणाली, "हो मलाही तेच वाटत आहे."

तो मुलगा बोलू लागला.

"मी राज, तुमचा अकाउंटचा प्रॉफेसर."

हे ऐकून ओवी म्हणाली.
"राधा हा तर खरंच प्रॉफेसर निघाला."

"हो गं, पण वाटत नाही ना?" राधा.

राधाला पाहून राज म्हणाला.

"मला तुमचं नाव कळेल का मिस?"

राधा आजूबाजूला पाहू लागली.

"मी तुमच्याशीच बोलतो आहे. मिस?"

"राधा, ते तुझ्याशीच बोलत आहे."

ओवीने तिला सांगितले.

राधा उठली आणि काही बोलणार तितक्यात
एक मॅडम आल्या.

"राज, काय चाललंय. जा तू तुझ्या ठिकाणी जाऊन बस."

राज लगेच स्वतःच्या सीटवर जाऊन बसला.
त्याचे मित्र आणि तो खी खी करून हसत होते.

एव्हाना वर्गातील सर्व मुलांना कल्पना आली होती की, राज मस्करी करत होता.

म्हणजे तो देखील स्टुडंट होता. विनाकारण प्रॉफेसर बनून नाटके करत होता.


"काय मुलगा आहे हा? किती आगावपणा?" ओवी रागात म्हणाली.

राधा नुसती गालातल्या गालात हसत होती.

ते पाहून ओवी म्हणाली, "तुला तर ना कसल्या गोष्टीचा रागच येत नाही. खिल्ली उडवली त्याने."

"ओवी, ठीक आहे गं. आता नाही असं वागणार तर कधी?" राधा.

"राधा, मला न कळतच नाही की हे सगळं तू इतक्या सहज कसं घेऊ शकते? मी असते ना तुझ्या ठिकाणी तर क्लास झाल्यावर त्याला बरोबरच केलं असतं."

ओवी तणतणत होती.

"ओवी बाळा शांत हो बरं. इतका राग तुझ्या मेंदूसाठी चांगला नाही. आधीच मेंदू तुझा इतका लहान त्यात किती प्रेशर घेशील. जस्ट इग्नोर."

ओवी शांत बसली.

🎭 Series Post

View all