ओढ तुझ्या प्रेमाची भाग ६

"असं वाटत आहे ना जाऊन त्याला कानाखाली द्यावी"
ओढ तुझ्या प्रेमाची भाग ६

गेल्या भागात आपण पाहिले की, वर्गातला एक प्रणव नावाचा मुलगा राधाला प्रपोज करतो. ती त्याला नाही म्हणते; पण राजसमोर ती मुद्दाम सांगते की, मी प्रणवला वेळ मागितला आहे. प्रणवच्या डोळ्यात प्रेम दिसत होतं. हे ऐकून राजला फार वाईट वाटतं. आता पाहू पुढे.

राधाने हे जाणून बुजून केलं होतं; पण याची कल्पना राजला नव्हती. राज दुखावला होता. तो निघून गेला. तो महत्त्वाचा काम आहे असं सांगून निघून गेला आणि त्याच्या पाठी अमोल देखील. राज काहीच बोलला नाही. अमोल विषय काढत होता, तरी तो शांतच बसला. न राहून शेवटी अमोलने राजचा हात पकडला आणि त्याला विचारले "राज, शांत बसणार आहेस की, काही बोलणार आहेस?"

राजच्या डोळ्यात पाणी आले होते. फक्त तो रडायचा बाकी होता. अमोलने त्याच्या खांद्यावर हात ठेवत त्याला शांत केलं. त्याचे सांत्वन केले.

अमोल म्हणाला, "राज, का असा लहान मुलागत वागत आहेस? राधाने होकार नाही दिला, तिने वेळ मागितला आहे."

राजच्या तोंडातून शब्द फुटत नव्हते. रडावलेल्या स्वरात तो म्हणाला,
"अमोल, राधा त्याला नकार देऊ शकत होती ना? गरजच काय वेळ मागायची?"

अमोल हसला. "प्रणवने प्रेम केलं आहे तर त्याच्या भावना तिच्यासमोर मांडल्या. तू का गप्प बसला आहे? तिला काय स्वप्न पडणार की तू तिच्यावर प्रेम करतो?"

राज पुन्हा म्हणाला, "अमोल, तुला काय वाटते तुला जाणवत नाही का माझं प्रेम? तिला दिसत नाही का माझं प्रेम? तिने तसं नव्हतं बोलायला पाहिजे. बस मला इतकंच वाटतं. प्रणवला सरळ नाही बोलायचं होतं."


अमोलला त्याची होणारी अवस्था कळत होती. त्याला इतकं माहीत होतं की, राधा प्रणवला होकार देणार नाही.

"राज, बघ मी तुला आधीच म्हणालो होतो, तू जर प्रपोज केलं नाही तर दुसरं कोणीतरी प्रपोज करणार आणि आज तसंच झालं. का नाही राधाला कोणी प्रपोज करणार? आहेच ती अशी सुंदर, सुस्वभावी मुलगी. प्रत्येकाच्या मनात भरणारी."


हे ऐकून राजला राग येत होता.

" अमोल, हे काही बोलू नको. मला हे ऐकवत नाही. ती फक्त माझी आहे."


" अरे वेड्या जर राधा तुझी आहे, तर मग तिच्याशी बोलत का नाही? असं शांत शांत राहून काय होणार आहे का? आणि असेही आता कॉलेज संपेल. जो तो त्याच्या मार्गाला जाईन. मला कळत नाही की, तु कधी सांगणार आहेस तिला?

राज अजूनही प्रणवच्या तंद्रीत होता. अजूनही प्रणवचा चेहरा डोळ्यासमोर येत होता. त्याला प्रचंड राग येत होता. 'असा कसा तो राधाला माझ्यासमोर घेऊन जाऊ शकतो? त्याची हिम्मत कशी झाली? अमोलच्या बोलण्याकडे त्याचं लक्ष नव्हतं. त्याला इतकंच खटकत होतं की, त्यांने असं केलंच कसं? राधा फक्त माझी आणि माझीच राहणार. तीच्यावर माझाच हक्क राहणार.'


"राज, मी तुझ्याशी बोलतो आहे. काहीतरी बोल." अमोल

राज म्हणाला, "आता काहीही होऊ दे आता ह्याच्यापुढे कोणी जर राधाच्या जवळ जरी भटकलं ना मी सोडणार नाही."

अमोल किंचित हसून म्हणाला, "काय करणार आहेस तू? आणि काय कारण देणार आहेस हे करण्यापाठी?"

" ते मी बघून घेईन काय करायचं. पण मला हे अजिबात पटलं नाही प्रणवने तिला प्रपोज केलं."

अमोल म्हणाला," मी तुला पुन्हा तेच सांगतो आहे राधा सारख्या मुलीला कोणीही हसत हसत स्वतःच्या आयुष्यात स्वीकार करेल. मला माहित आहे तू तिच्यावर प्रेम करतो; पण प्रेम करणं हे इनफ नाही. बघ मला असं वाटतं आता तिचा वाढदिवस येत आहे तर तू दिला तुझ्या मनातल्या भावना सांगितल्या तर बरं होईल."

राजला अमोलचं बोलणं पटत होतं. खरं तर तो चुकीचा बोलतच नव्हता. एक चांगला दिवस बघून राधाला मनातल्या भावना सांगण्यात काय हरकत होती? पण त्याला त्या विचाराने धडकी भरत होती. हातपाय गार पडत होते. हृदय धडधडत होतं. विचार करूनच इतकं सर्व होतं होतं, मग प्रत्यक्षात जर राधाला हे सगळं बोललं तर कसं होईल? अमोलला त्याची स्थिती काय होत आहे हे कळत होतं.

तो त्याला धीर देत म्हणाला, "हे बघ राज तुला आज ना उद्या ही गोष्ट बोलावीच लागणार आणि तू कितीही घाबरला आणि काहीही झालं तरी तुला हे पाऊल उचलायचा आहे. नाहीतर आज प्रणव आणि उद्या कोणी दुसऱ्या मुलाने प्रपोज केलं तर.."


राज म्हणाला, "तू प्लीज पुन्हा पुन्हा तेच नको बोलू. कोणी नाही तीला प्रपोज करणार."


अमोल म्हणाला,"राज, काय नातं आहे तुझं आणि राधाचे? मैत्री पलीकडे नातं मनात आहे ;पण प्रत्यक्षात जगासमोर काय नातं आहे? नुसतं मनात ठेवून उपयोग नाही. तुझी भावना राधापर्यंत पोहोचणार कशी? जर तू शांतच बसत राहिला. बघ मित्रा तुला धीर एकवटून राधाला बोलावं लागणार.

राजने केवळ मान हलवली. त्याचा आजचा दिवस फार वाईट गेला होता. त्याच कशातच मन लागत नव्हतं. सतत प्रणवचा चेहरा डोळ्यासमोर येत होता. असं वाटत होतं जाऊन दोन लावून द्यावे त्याला. तो पसेसिव्ह झाला होता.

' काय राज कोणत्या अधिकाराने तू प्रणवला मारणार आहेस? तू इतका राग राग करत आहेस. प्रणवची तर काहीच चूक नाही, चूक तुझी आहे. तू अजून राधाला काहीच बोलला नाही आणि अमोल बरोबर बोलतो आहे तुझं राधाचं नातं केवळ मैत्रीच आहे, त्यापलीकडे काहीच नाही. त्यामुळे तुला धीर धरून राधाला सगळं सांगावं लागणार. कसं? काय? कधी? कुठे? ते तुला बघायचं आहे. राजच्या मनात अनेक विचार घोळत होते; पण आज त्याला अस्वस्थ वाटत होतं. राधा फक्त माझी आहे आणि तिला जर कोणी असं बोलत असेल तर मी ते सहन करू शकत नाही. तिच्यावर फक्त आणि फक्त माझा अधिकार आहे.

राधा राजचे हावभाव आठवून हसत होती. 'किती रागावला होता आणि कसा निघून गेला तोंड पाडून. राज तुला मनातल्या भावना माझ्यासमोर बोलाव्या लागतीलच. तरच मी तुला हो म्हणणार आहे. तू जर शांत बसून राहिला तर त्याचा उपयोग नाही आणि जे आज मी केलं ते केवळ तू बोलतं व्हावं त्यासाठीच. त्या दिवसाची मी आतुरतेने वाट पाहत आहे ज्या दिवशी तू मला म्हणशील की, राधा मला तू आवडते. या वाक्याची मी वाट पाहत आहे."

राधा तिच्या स्वप्नात हरवली.

क्रमशः
अश्विनी कुणाल ओगले.
तिथे राजच्या मनाची घालमेल होत होती आणि इथे राधा राजच्या प्रपोसची वाट पाहत होती.
राज व्यक्त होईल का?

🎭 Series Post

View all