ओढ तुझ्या प्रेमाची भाग ७

प्रणवने मला प्रपोस केलं पण मी त्याला
गेल्या भागात आपण पाहिले की राज दुखी झाला होता. अमोल त्याला समजावतो, तुझ्या मनातल्या भावना राधापर्यंत पोहोचल्याच पाहिजे, त्यासाठी तुला बोललं पाहिजे. आता पाहू पुढे.

दुसऱ्या दिवशी राज कॉलेजमध्ये आला तेव्हा शांतच होता.राधाला चांगल्या प्रकारे माहीत होतं की, तो शांत का आहे ?

राधा त्याला बोलतं करण्याचा प्रयत्न करत होती, तरी देखील शांत होता. कालचा विचार आज त्याच्या डोक्यात घुमत होता.

ओवी राधाला म्हणाली,
" राधा, प्रणव पुन्हा काही बोलला का ?"
आता हे ऐकून राजला अजूनच राग आला.

त्याच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होते, ते त्याला खूप राग येत आहे.

राधा म्हणाली, "हो त्याने मेसेज केला होता, की तू मला कधी पर्यंत सांगणार आहेस करून?"

राज राधाला म्हणाला,
"राधा, प्रणवला काही बोलायची गरज नाही."

राधा मुद्दाम म्हणाली, "चांगलं तर मुलगा आहे तो."

राज म्हणाला, "हे बघ तुला मी सांगतो आहे ना आणि तुझ्या चांगल्यासाठी सांगतो आहे. तो फार वाईट मुलगा आहे, त्याला चांगला ओळखतो. तुम्हा मुलींना नाही कळणार."

राधा म्हणाली,"काय केले आहे त्यांने? इतका काय वाईट आहे तो ?"

राज म्हणाला, "राधा, तू प्रणवचा विषय सोडून दे. यापुढे प्रणवच नाव काढलं तर."

"तर काय राज ?"

राज "काही नाही." तो पुन्हा रागात निघून गेला. आज अमोल कॉलेजला आलाच नव्हता. त्यामुळे कोणासमोर मनमोकळ करावं हे त्याला सुचत नव्हतं. त्याने अमोलला फोन लावला.

अमोलला म्हणाला, "अमोल, मला राग येतो आहे."

अमोल, "कसला राग?"

"ओवी का प्रणवचा विषय काढते आहे? राधाला विचारत होती, काय म्हणाला का तो? मी राधाला म्हणालो आहे अजिबात त्याचा विषय काढायचा नाही आणि तो चांगला मुलगा नाही."


प्रकरण लक्षात आलं अमोल म्हणाला,"हे बघ राज तू पॅनिक नको होऊ. प्रणवने फक्त तिला विचारलं आहे. मला नाही वाटत राधा हो म्हणेल आणि मला असं वाटतं की, तिला तू आवडतोस त्यामुळे तर ती त्याला हो म्हणणार नाही हे शंभर टक्के खरं आहे."

राज म्हणाला, "खरंच अमोल तिला मी आवडतो का? तुला काय वाटतं अमोल?"

"हो रे बाळा, तिला तू आवडतो."
हे ऐकून कुठेतरी राजला बरं वाटलं. तिथे प्रणव समोरून येताना दिसला. राजच्या डोळ्यात अंगार होता.


'साला समोर आला'

अमोल म्हणाला, "काय म्हणालास? कोणाला साला बोलतो राज ?

"प्रणव." राज त्याच्यावर जळजळीत कटाक्ष टाकत म्हणाला.

अमोल "कंट्रोल राज किती ओव्हररिऍक्ट करतो आहेस? प्रणावने तुझं काय वाईट केले आहे का ? विनाकारण तू त्याला धारेवर धरू नकोस."

राज "तुला खरंच असं वाटतं त्याने काही केलं नाही ? त्यांने माझ्या राधाला प्रपोज केल आहे. मला ना असा राग येतो ना त्याच्यावर अमोल."


" राज, त्याला माहित आहे का तू राधा वर प्रेम करतो म्हणून ? असे केल्याने तुला त्रास होईल. किती त्रास करून घेशील ? जरा डोकं शांत ठेव."

राज "अमोल, तू बरोबर बोलतो आहे. मी आता राग करणार नाही. पण पुन्हा जर तो राधाच्या संपर्कात आला ना तर मग त्याचे काही खरं नाही."


अमोल "राज, प्लीज तुला मी सांगतो ना तू डोकं शांत ठेव. एक लक्षात ठेव तुला राधाशी बोलायचं आहे. तू प्रॉमिस कर तू राधाशी बोलणार आहे."

राजने दीर्घ श्वास घेतला.
" ठीक आहे मी राधाशी बोलेन."

राजला बोलायचं तर होतं ; पण तो विचार करून त्याला भीतीही वाटत होती.

तो एका ठिकाणी बसला त्याला खूप रडू आलं. सगळं मनाच्या विरोधात घडत होतं. त्याला कसं व्यक्त व्हावं काहीच सुचत नव्हतं. तितक्यात राधा आणि ओवी आली.

ओवीने राधाला सांगितले, " राज रडतो आहे."

राधाने निरखून पाहिलं, तर तो खरंच रडत होता.

राधा "ओवी, हा माझ्यामुळेच रडतो आहे का?"

ओवी म्हणाली "हो मलाही तेच वाटतंय. राधा तुला नाही वाटत का तू जरा जास्त केलं. तू खूप दुखावला आहे ग राधा."

"हो ओवी पण मला नव्हतं वाटलं की, राज असे रिऍक्ट करेन."

" राधा जा त्याच्याशी बोल." ओवी.

राधा राजकडे गेली, तिला पाहून त्याने लगेच डोळे पुसले.

राधा म्हणाली "राज काही प्रॉब्लेम."

राज "काही नाही, डोळ्यात कचरा गेला आहे."
राधाने स्वतःचा रुमाल दिला.

राजने डोळे पुसले आणि त्याच्या बाजूला बसली.

" आर यु ओके राज?"

"राधा मी ठीक आहे." राधा.

त्याला तर असं वाटत होतं आत्ताच बोलून मोकळं व्हावं. राधा आय लव यू; पण त्याने आवर घातला.

" राज, मला काहीतरी बोलायचं होतं." राधा

"हो बोल ना" राज

"राज काल मी मस्करी करत होते." राधा

" कसली मस्करी?" राज.

"काल प्रणवने मला प्रपोज तर केलं; पण मी त्याला नाही म्हटलं." राज आश्चर्यचकित झाला.

त्याला ऐकून खूप बरं वाटलं. तो हसू लागला. आनंदाने उड्या मारायच्याच बाकी होत्या.

"काय तू त्याला नाही म्हणाली?" राज

राधाने होकारअर्थी मान हलवली. " हो राज मी त्याला नाही म्हणाले. तो माझ्या टाईपचा नाही. आणि मला तशी मुलं आवडतही नाहीत."


प्रणवला राधा नाही म्हणाली हा विचार करून राज तर सुखावला होता. त्याचे टेन्शनच गायब झालं होतं. तो तिला निरखून पाहत म्हणाला " राधा, मग तुला कशी मुलं आवडतात?"

"खरं सांगू का मला ना कुटुंबाची काळजी घेणारे, थोडीशी हळवी, वेळप्रसंगी कणखर बनणारी अशी मुलं आवडतात."

खरंतर हे सारे गुण राजमध्ये होते. राधा हे सगळं त्याला ह्यासाठी सांगत होती की, तिला कळून चुकलं होतं काल प्रणव आणि तिच्यामध्ये जो संवाद झाला ते ऐकूनच तो हर्ट झाला होता.

राधाने विषय बदलला. " बाकी राज तुझा अभ्यास व्यवस्थित चालू आहे ना? "


"हो राधा अभ्यास तर व्यवस्थित चालू आहे फक्त अकाउंट मध्ये थोडा प्रॉब्लेम होतो."

राधा म्हणाली "काय अकाउंटचे प्रोफेसर तुम्हाला अकाउंटमध्ये प्रॉब्लेम होतो."


राज आणि राधा खळखळून हसू लागले.

"काही तुला अडचण असेल तर मला सांग. मी तुला हेल्प करेन." राधा.


राज म्हणाला "हो राधा."


" बरं चल मी निघते हा राज. क्लासला उशीर होईल. ओके बाय."

" बाय " राज .

मघाशी रडणारा राज आता इतका खूश झाला होता की, विचारायची सोय नव्हती. पुन्हा अमोलला फोन केला आणि म्हणाला , "अमोल गुड न्यूज आहे."

" ओ गुड न्यूज! काय गुड न्यूज आहे? तू राधाला सांगितलंस का? "


" नाही रे ती गुड न्यूज नाही. राधाने सांगितलं की, तिने प्रणवला नाही म्हटले आहे."


" व्हेरी गुड. म्हणजे तुझा रस्ता मोकळा." अमोल.

" हो अमोल तसेच समज. तुला मी सांगतो काय मला इतकं वाईट वाटत होतं, कालपासून कशातच मन लागत नव्हतं ; पण आता माझं टेन्शन नाहीसे झालं आहे बघ."


"बरं झालं. झालं ते चांगलं झालं. मी तुला म्हणालो होतो राधा त्याला होकार देणार नाही. "

" चल मी फोन ठेवतो मलाही क्लासला जायचं आहे, तू क्लासला येणार आहेस ना?"


"जरा बाबांची तब्येत बरी नव्हती, त्यांना मी दवाखान्यात घेऊन गेलो होतो. आज नाही जमणार यायला." अमोल.


" बरं ठीक आहे." राज.

राज खुश झाला होता. आता राधाशी चांगला दिवस बघून बोलायचे त्याने मनातच ठरवलं.

क्रमशः.

अश्विनी कुणाल ओगले.
कथेचा वापर youtube किंवा कुठेही करू नये नाहीतर कारवाई करण्यात येईल.

🎭 Series Post

View all