ओढ तुझ्या प्रेमाची भाग ११

Its About True Love
ओढ तुझ्या प्रेमाची भाग ११

पूर्वार्ध.
गेल्या भागात आपण पाहिले की, राज राधाला प्रपोस करतो. राधाच्या मनासारखे झाले होते. ही गोष्ट ती तिच्या मैत्रिणीला ओवीला सांगते. ओवी तिच्यासाठी खूप खुश होते. आता पाहू पुढे.
राज विचार करतो एकदा पायवर उभा राहिला की, तो राधासोबत लग्न करायचे आहे हे तिच्या आई बाबांना सांगणार. त्याला राधाचा चेहरा आठवत होता.
त्याची आई स्मिता त्याच्याशी बोलत होती, तरी देखील त्याचे लक्ष नव्हते.

त्याच्या गालावर हसू होते.
स्मिता “राज, काय विचार करतो आहेस?”

राज अजूनही विचारात होता.

दुसऱ्या वेळेस आई बोलली , तेव्हा त्याने आईकडे पाहिले.
“आई, काही म्हणालीस का?”
“राज, दोन वेळा आवाज दिला तरी तुझे लक्ष नाही.”
“बोल ना आई.
“मी काय म्हणते आज जरा माझ्यासोबत मार्केटमध्ये येशील का?”
“हो आई चालेल.” राज उत्तरला.
************************************


इथे राधाही प्रचंड खुश होती. सतत राजचे विचार डोक्यात येत होते.
मनाशीच संवाद साधत होती.
‘राधा, फायनली राजने तुला मनातलं सांगितले. मी खूप खुश आहे.
राज कसा बोलत होता? मला हेच हवं होतं. मी खूप खुश आहे. थॅंक्स राज. लव यू सो मच.'
मोबाईल मधील त्याचा फोटो काढला आणि प्रेमाने त्याचावर हात फिरवला.

तिला तर काय करू आणि काय नाही असे झाले होते.
वाटलं देखील नव्हतं की, ती असं कधी कोणाच्या प्रेमात पडेल. राज होताच असा की, कोणीही त्याच्या प्रेमात पडेल.
राधाही काही कमी नव्हती. ती देखील सुस्वभावी मुलगी होती.
राजने तर पहिल्या नजरेत तिला हेरले होते. त्याला अशीच गोड मुलगी पाहिजे होती.

ओवीचा फोन आला.

“राधा, काय मग आज तर तुला झोप लागणार नाही.” ओवी तिला चिडवत म्हणाली.

राधा जाणून होती की, ओवी चिडवते आहे तरी तिने प्रश्न विचारला.
“का बरं का झोप लागणार नाही.”

“हो का? सगळं माझ्या तोंडातून वदवून घ्यायचे ठरले आहे वाटतं.”

राधा केवळ लाजत होती.

“आज तुला राज झोपू देणार नाही.”

“तुझं आपलं काहीतरीच.” राधाचा चेहरा बघण्यासारखा होता.


तितक्यात रमेश आला.
त्याला पाहून राधा म्हणाली, “ओवी, मी फोन ठेवते दादा आला आहे.”

राधाने फोन ठेवला.

“दादा, काही काम होतं का?”
राकेशचा चेहरा उतरला होता. जरा गंभीर दिसत होता.
त्याला असं पाहून राधा काळजीत पडली.
“दादा, काय झाले? सर्व काही ठीक आहे ना?”

“राधा, हो तसं सगळं ठीक आहे पण..”

“पण काय दादा.”

राकेश नजर चोरू लागला. इथे तिथे पाहू लागला.

राधाची काळजी वाढली.

“दादा, काय झाले सांग ना? माझ्यापासून काही लपवू नको. प्लीज काय असेल ते पटकन सांग. माझ्या डोक्यात खूप विचार येत आहेत.”

“राहू दे राधा. नंतर सांगेन."

असं म्हणत तो निघू लगाला.
तिने राकेशचा हात घट्ट पकडला, “दादा, हे असं वागू नको. मी तुला म्हणते आहे, मला सांग काय ते.”

त्याने दीर्घश्वास घेतला. तिला बाजूला बसवलं.

“बघ राधा, मी फार विश्वासाने तुला सांगतो आहे. जे पण मी तुला सांगणार आहे ते तू शांतपणे ऐकुण घेणार आहेस.”

राधा लक्ष देवून ऐकू लागली.
“राधा, ही गोष्ट मला फार आधी समजली होती; पण मला वाटतं ही योग्य वेळ आहे सांगायची.” राकेश.

“कोणती गोष्ट?” राधाने उत्सुकतेपोटी विचारले.

राकेशचा चेहरा गंभीर झाला होता. राधाने त्याला असं कधीच पहिले नव्हते. राकेश नेहमी मस्करी कारायचा. इतकं गंभीर तिने त्यालं कधीच पाहिले नव्हते.
राधा समजून गेली नक्कीच काहीतरी मोठी गोष्ट आहे.

राकेश बोलू लागला.
“राधा, तुला ते मनोहर काका माहीत आहेत ना? आपल्याकडे यायचे.”
“हो मनोहर काका माहीत आहेत. त्यांना कसं विसरणार. नेहमीच त्यांचे येणे जाणे होते. त्यांचे काय?”

“राधा, मनोहर काकांचा मुलगा होता विक्रांत ज्याच्यासोबत तू खूप खेळायची.”

“हो दादा, आठवतो आहे. त्याचे काय?”
“राधा, आईने आणि बाबांनी खूप आधीच ठरवलं होतं की, तुझे लग्न त्याच्याशी लावायचे.”

हे ऐकताच राधा जोरात ओरडली.
“काय! हे काय बोलतो आहेस दादा. आई आणि बाबांनी इतकी मोठी गोष्ट माझ्यापासून लपवली. हे असं नाही करू शकत आई बाबा.”

तिला तर रडुच आले. हे काय नवीन. तिला तर धक्काच बसला. असं वाटलं आई बाबांशी जावून लगेच बोलाव.
‘माझ्या लग्नाचा निर्णय हे असं कसं घेवू शकतात. मला हे अजिबात पटलं नाही. मी हे होऊ देणार नाही.’

राकेश तिला म्हणाला, “बघ राधा, आई बाबाने जो निर्णय घेतला असणार तो विचारपूर्वक घेतला असणार. तू असं रीएक्ट नको करू.”
“दादा, हे तू बोलतो आहेस? अगदी मला कोणती कपडे घालायची, चप्पल कोणती घ्यायची, माझं कॉलेज, क्लास हे सारं आजवर मी ठरवले आहे आणि माझा जोडीदार निवडायचा अधिकार मला नाही. हे काय चालू आहे मला खरंच समजत नाही. माझं डोकं काहीच काम करेना. हे असं कसं वागू शकतात आई बाबा? मला अजूनही विश्वास बसत नाही.”

“राधा, बघ विक्रांत एक चांगला मुलगा आहे. तू खुश राहशील. आई बाबा कधीच आपला वाईट विचार करणार नाही. जे निर्णय घेतील ते योग्यच घेणार.
जे देखील मी आता बोललो त्याचा शांतपणे विचार कर.” असं बोलून तो निघून गेला.

राधाला तर अजूनही विश्वास बसत नव्हता की, आई बाबा असं करू शकतात.
माझ्या लग्नाचा निर्णय ते कसं काय घेऊ शकतात? मला ह्या बाबतीत अजिबात कल्पना देखील दिली नाही. तिच्या डोळ्यासमोर राजचा चेहरा तरळला.

हे मी राजला संगीतले तर किती वाईट वाटेल त्याला. नाही हे असले मी काही होऊ देणार नाही. आताच्या आता मी आई बाबाना जावून सांगून टाकते.
मला विक्रांतशी लग्न करायचे नाही. माझं राजवर प्रेम आहे आणि मी त्याच्याशीच लग्न करणार.

तिने बेडरूमचा दरवाजा जोरात आदळला बाहेर हॉलमध्ये आली.
आई बाबा फार खुश होते.
तिला फार राग आला.
‘इथे मला त्रास होतो आहे आणि आई बाबा दोघे खुश आहे.’
तिला पाहून आई राकेशला म्हणाली, “राकेश, राधाला सांगितले का?”
हे वाक्य ऐकताच राधा अजून चिडली.
रागाने सोफ्यावर बसत म्हणाली,
“आई- बाबा हे मी काय ऐकते आहे? तुम्ही मला हे सगळं आधी का सांगीतले नाही?”

आई बाबा एकमेकांकडे पाहू लागले.
राधाचा असा राग पहिल्यांदाच पाहिला होता.
आज राधा काही गप्प बसणार नव्हती.
खरं प्रेम केलं होतं राजवर ती अशी सहजा सहजी त्याला आयुष्यातून जाऊ देणार नव्हतीच.

काय होईल पुढे. जाणून घेण्यासाठी वाचत राहा ओढ तुझ्या प्रेमाची.
क्रमश:
कथा लेखन - अश्विनी कुणाल ओगले.
कथेचा वापर यूट्यूब किंवा कुठेही आढळून आल्यास कारवाई करण्यात येईल.

🎭 Series Post

View all