ओढ तुझ्या प्रेमाची भाग १६

प्रेम सर्वस्व
गेल्या भागात आपण पाहिले की राधा आणि तिच्या घरातले खुश होते.त्याचे कारण होते की , तिच्या भावाचे लग्न ठरले होते. राधा छान तयार होऊन कॉलेजला जाते, तिला राजच्या भेटीची ओढ लागली होती. आता पाहू पुढे.

कॉलेजला गेल्यावर तिच्या नजरेस ओवी पडते.
ओवी राधाला बघते आणि लगेच तिच्याजवळ येते.

"काय राधा, आज काय स्पेशल? आज छान तयार होऊन आली आहेस."

"थँक्स ओवी." राधाची नजर राजला शोधत होती.

"राधा, आज काय राजचं खरं नाही. आज तो फिदा होणार आहे."

"अगं माझी आई. हळू बोल, कोणी ऐकेल." राधा तिला हळू आवाजात बोलली. इथे तिथे पाहून तिने खात्री केली की, ओवी जे बोलली ते कोणी ऐकलं तर नाही ना?

"का हळू बोल. कळू दे संपूर्ण कॉलेजला राधा फक्त राजची आहे. प्यार किया तो डरना क्या?"

"ओवी, अगं काय झाले आहे तुला. तू इतक्या मोठयाने का बोलते आहेस? हळू ना कोणी ऐकेल."

राधाच्या चेहऱ्याचे भाव पाहून ओवीला हसू आले.

ती मोठ्याने हसू लागली.

"तुला हसायला येत आहे, इथे माझे हार्टबिट्स वाढत आहेत. तू मैत्रीण आहेस की काय?"

"राधा, किती घाबरते गं. कूल डाउन. मी आजूबाजूला कोणी नाही ही खात्री केली आणि मग मोठ्याने बोलले. डोन्ट वरी माय ब्युटीफुल राधा."


"तू पण ना ओवी. कधी काय वागशील आणि बोलशील काही पत्ता नाही."

"राधा, हे असं वागून बघ गं. भारी वाटतं. प्रत्येकवेळी समजदारीने वागणं कधी कधी बोअर वाटतं."


राधा हात जोडत म्हणाली, "नको मला काही ज्ञान देऊ. मी आहे तशी बरी आहे."


तितक्यात राधाला अमोल येतांना दिसला. सहसा अमोल आणि राज एकत्रच यायचे;पण आज काही राज दिसला नाही.


"हॅलो राधा, हॅलो मिस फायर." अमोल म्हणाला.

"हाय अमोल." राधाचे लक्ष गेटकडे होते.

"राधा, राज चार दिवस येणार नाही." अमोल म्हणाला.

"का? तो का येणार नाही?" तो बरा आहे ना?"

"तो बरा आहे. तो आई बाबासोबत गावी गेला आहे." अमोल.

"असा अचानक गावी? मला काही बोलला नाही." राधा काळजीपोटी म्हणाली.


"हो ते अचानक फिक्स झालं."अमोल.

हे ऐकून राधाचा चेहरा उतरला.

ओवी तिला समजावत म्हणाली, "राधा, चार दिवसाने तो परत येणार आहे. तू इतका मूड ऑफ का करून घेत आहेस?"

"हो ओवी तो चार दिवसाने येणार आहे; पण तो मला नेहमी सांगतो,जर त्याला यायचे नसेल तर . ह्यावेळेस त्याने असे का केले? मला का नाही त्याने सांगितले? कालच आमचं बोलणं झालं. तेव्हा तो काहीच बोलला नाही. काळजी वाटते."


"राधा, काळजी करू नको. असेल काही काम म्हणून गेला असेल गावी. त्याला वेळ नसेल, म्हणून त्याने तुला सांगितले." ओवी तिच्या खांद्यावर हात ठेवत म्हणाली.

"ओवी, कमीत कमी मॅसेज तरी करू शकत होता तो. का असं वागला."

राधाची काळजी बघून अमोल म्हणाला.

"राज मला म्हणाला आहे की, आलो की पहिला कॉल मी राधाला करणार आहे."

हे ऐकताच राधा खुश झाली.

"खरंच अमोल? असं म्हणाला का राज?"

"हो राधा." अमोल.

हे ऐकलं तरी देखील राधाला राजची काळजी वाटत होती.

तो सगळ्या गोष्टी राधाला सांगायचा. राधा देखील प्रत्येक गोष्ट त्याला सांगायची.

दिवसभर तिचा मूड ऑफ होता.

घरी आली तरी तोंड पाडून.

आईला म्हणाली, "आई, आज मला जेवण नको."

"राधा, बरं वाटत नाही का?"

"आई, मी येताना कॅन्टीनमध्ये खाऊन आले आहे. नको आहे जेवण. मी थकले आहे. मी झोपते जरा."

असं म्हणत ती रुममध्ये गेली.

रुममध्ये गेल्यावर ती आरशात बघून जणू राजशी बोलू लागली.

"काय राज आज खास तुझ्यासाठी इतकी तयार झाले आणि आज तूच नव्हता. का असं केलं राज? एकदा तरी सांगायचे की तू गावी जणार आहेस. तिचं मन कशातच लागत नव्हते. .उदास झाली होती. तिच्या डोळ्यात पाणी आले. राजवर राग देखील येत होता आणि त्याची खूप काळजी वाटत होती. फोन केला तर फोन देखील लागत नव्हता. मॅसेज पाठवला तर तो देखील त्याने पाहिला नव्हता.
त्याचा विचार डोक्यातून जाता जाईना. फार अस्वस्थ झाली होती आणि त्या वेळी तिला असं वाटत होतं फक्त एकदाच राजचा फोन यावा आणि सगळं ठीक आहे असं त्याने मला सांगावे.

अश्या वेळेस वैरी न चिंती ते मन चिंती असं होतं. तिला काहीबाही विचार येत होते. सगळं ठीक असेल ना? असं का केलं त्याने?

पहिल्यांदा असं झालं?

काय काय डोक्यात येत होते.
बोलावं तर कॉन्टॅक्ट नव्हता होत.
अमोल तर बोलला होता आल्यावर तो राधाशी बोलणार आहे.


तिने आवडीने घातलेला ड्रेस नाराजीत काढला.
उदास झाली. त्याने मॅसेज वाचला की नाही सतत पाहत होती. फोन लागत नव्हता तरी देखील पुन्हा पुन्हा फोन लावत होती.

काहीही करून त्याच्याशी बोलायचे होते.
त्याच्याशी बोलल्याशिवाय तिचा मूड ठीक होणार नव्हता.

राज जीव की प्राण होता.
राजने का असं केलं?

तिचं मन कशातच लागेना.

रात्री देखील ती न जेवताच झोपली.
झोपली कसली, रात्रभर राजच्या विचारात जागरण केले. डोळ्याला डोळा लागला नाही.
सतत राजची काळजी, चिंता सतावत होती.
रात्री देखील सतत मोबाईल बघत होती.

त्याचा काहीच रिस्पॉन्स नव्हता.
अजून तीन दिवस बाकी होते.
काय अवस्था होणार होती तिची देव जाणे.
राजसाठी व्याकुळ झाली होती.
वेडावली होती.


क्रमशः

कथा लेखन - अश्विनी कुणाल ओगले.