Login

ओढ तुझी लागली भाग 30

ते रिसॉर्ट वर आले. अतिशय सुंदर परिसर होता. त्यांच्या शिवाय कोणी नव्हत. आमंत्रण पत्रिका बघून आत ??


ओढ तुझी लागली भाग 30

©️®️शिल्पा सुतार
.......

पहाटे सगळे लवकर उठले. आरती आवरून तयार होती. तिने छान अनारकली ड्रेस घातला होता. घरातले रेडी होते.

"आरती देवाला नमस्कार कर. चला आटपा निघा ." सरला ताई आवाज देत होत्या.

आई, बाबा, आजी, राहुल, वरूण, आरतीच्या मैत्रिणी वरुणचे  मित्र सगळेच हजर होते. एकदम इमोशनल वातावरण तयार झालं होतं. आरतीच्या डोळ्यात पाणी होतं. ती देवाला नमस्कार करायला आत गेली.

बाकीचे सामान घेत होते." नका बोलू जास्त. मुद्दाम लक्ष देवु नका. आरती अजून रडेल. चला आटपा लवकर सकाळची सुरुवात रडून करू नको." आजीने सगळ्यांना बाहेर काढल.

आरती देवाला नमस्कार करून आली.

"आई-बाबांचा नमस्कार कर आणि चला आता आपल्याला रिसॉर्टवर जायचं आहे. नंदिनी मॅडमचा फोन येवून गेला. " मावशी.

आरती आई-बाबांना भेटली. सगळे मजा मस्ती करत होते. राहुल तिला बाहेर घेऊन आला. वरुणच्या मित्रांना गाणे लावले. ते सगळे पुढे नाचत होते. "आरती चल. सगळ्यांना नाचव लागेल. कंपलसरी आहे. आजी तू पण चल . " राहुल बोलत होता.

" हो चल बाबा. " आजी पुढे गेली.

आरती खुश होती. त्यामुळे सरला ताई सतीश राव खुश होते.

" चला लवकर", सतीश रावांनी टेप बंद केला त्यामुळे कोणी काही म्हटलं नाही.

आरती कार मधे बसली. मीनल सरला ताई अजून आत होत्या.  राहुल सामान घ्यायला आत आला. मीनल बाकीच सामान घेत होती. राहुलने तिच्या कडून सामान घेतल. मीनल बाजूला सरकून काम करत होती. ती त्याच्याशी बोलली नाही.

"मीनल... मीनल ऐक ना."

सरला ताई आल्या. "राहुल सगळं घेतल का बघ." मीनल बाजूला उभी होती.

"आई तू टेंशन घेऊ नकोस. तिकडे काही लागल तर मी आणून देईन. जा तू कार मधे बस. "

"किती चांगला आहे हा."

सरला ताई मीनल कडे बॅग देत होत्या. तिने ज्या बॅग घेतल्या त्या राहुल तिच्या कडून घेत होता." कोणी तरी आज छान दिसते आहे. पण चेहरा का रागीट?" राहुल अस बोलल्या मुळे मीनल  थोडी हसली.

आता का हा बोलण्याचा प्रयत्न करतो आहे?  सहज मैत्रिण म्हणून बोलत असेल. ती बाहेर निघून गेली.

सगळे गाडीत बसले. आरती मैत्रिणीं सोबत होती. लगेच गाड्या रिसॉर्टकडे निघाल्या.

मीनल गप्प होती. प्रिया विचारत होती. "काय झाल हिला?"

आरती बघत होती राहुल दादा कुठे आहे? हे दोघ बोलले की नाही अजून? काय अस?

ते रिसॉर्ट वर आले. अतिशय सुंदर परिसर होता. त्यांच्या शिवाय कोणी नव्हत. आमंत्रण पत्रिका  बघून आत सोडत होते. सिक्युरिटी होती. सगळे बघत होते. एवढी काय ग चेकिंग?

वरुण सांगत होता. "अस आहे या लोकांच काम. ऑफिस मधे ही खूप लोक आहेत सिक्युरिटी साठी."

त्यांना तीन रूम दिल्या होत्या. एक रूम जेन्ट्स साठी एक लेडिज साठी आणि आरती साठी वेगळी.  आरती आवर लगेच हळद आहे.
.......

वीर कडे पण खूप धावपळ होत होती. चला सगळेजण तयार होते. आपल्याला जायला पाहिजे तिकडे. शनायाच अजून आवरलं नव्हतं. सगळे तिला  रागवत होते.

वीर तर केव्हाचा आवरून सोफ्यावर बसला होता.  मामा कामात होते ते त्याला लांबून हसत होते. "झोपला ना तू रात्री?की जागा आहेस आरतीचे स्वप्नं बघत?"

मामा काहीही....

त्यांने दोन-तीनदा मोबाईल मध्ये बघितल आरती ऑनलाईन आहे का? तर तिने काल रात्री  पासून मोबाईल बघितला नव्हता. मेहेंदीचा  फोटो डीपी म्हणून ठेवलेला होता. तो बघत होता खुप सुंदर दिसत होती आरती. आज ती घरी येणार. चिडकी बोलते की नाही माझ्याशी.

घरात बरेच पाहुणे होते.

"चला निघा बाहेर. नाहीतर इथे दुपार होईल." आजी आवाज देत होत्या.

"हो अस नको नाहीतर मी आणि वीर जातो पुढे. " मामा अस म्हणताच सगळे हसत होते.

"वीरच ठीक आहे. तुला का घाई झाली तिकडे रिसॉर्ट वर जायची?" आजी बोलत होत्या.

"मी वीरला सपोर्ट करतो आहे."

आजी सगळं घेतला आहे का ते बघत होत्या . राहुल सर नंदिनी मॅडम सुद्धा बिझी होते. चला लवकर. सगळे गाडीत बसून निघाले. रिसॉर्ट वर पोहोचले.

सतीश राव राहुल स्वागताला उभे होते. बाकीचे मुल सोबत होते. "या वीरच स्वागत करायच म्हणजे अति झाल. वरुण, प्रकाश, राकेश हसत होते. तुम्हाला ही दुसरा नवरदेव मिळाला नाही का?"

शु...  हळू बाबा ओरडतील.

"फॉर्मलीटीची काही गरज नाही."  राहुल सर येवून भेटले.

"या वीर." वीर आणि मामा आत आले. त्यांना सतीश रावांनी हार घातले. वीर बघत होता वरुणची पूर्ण गँग होती. तो हसला त्या मुलांशी.

" तुझी आरती कुठे आहे?" मामा.

"काय माहिती?"

राहुल सर त्यांची टीम कामात होती. ते तिकडच्या लोकांना  कामा बाबतीत इन्स्ट्रक्शन देत होते. कोणालाही कुठल्याही गोष्टीची कमी पडायला नको.

वीर आणि फॅमिली आत आले. नंदिनी मॅडम पुढे होत्या. खाली हॉल मधे सरला ताई त्यांना भेटल्या. त्यांनी  हळद कुंकू लावून त्यांच स्वागत केल.

"आरती कुठे आहे?" त्या शोधत होत्या.

"तयार होते आहे."

"नाश्ता झाला की हळदीचा कार्यक्रम करून टाकु."

हो.

वीर रूम मधे आला. तयारी झाली. त्याने व्हाइट कुर्ता पायजमा घातला होता. त्यात तो कमालीचा हँड सम दिसत होता. शनाया व्हाइट यॅलो अनारकलीत खूप सुंदर दिसत होती. "चल दादा नाश्त्याला आई बोलवते आहे."

वीर, शनाया, मामा, मामी, आजी, नंदिनी मॅडम बाहेर आले. "बाबा कुठे आहेत?"

"काय माहिती ते तयार व्हायला आलेच नाहीत."

"ते बघ कोपर्‍यात मीटिंग सुरू आहे."

सगळे हसत होते. तिथल्या मॅनेजमेंट बद्दल ते बाकीच्यांना इंस्ट्रक्शन देत होते.

बरेच नातेवाईक येवून भेटत होते. जी हवी ती दिसत नाही. वरुण सगळ्यांना नाश्ता करून घ्या सांगत होता.  वीर समोर दिसला. तो थोडा पुढे गेला. बोलू की नको. वीर नाश्ता कर.

हो.

समोरून खूप आवाज येत होता. आरती मैत्रिणीं सोबत बाहेर आली. प्रिया, राही, मावशी दिसत होत्या. आरती कुठे आहे? वीर अधीर झाला होता.

आरतीच्या मनात धाकधूक होती. ती सगळ्यांना येवून भेटत होती. नंदिनी मॅडम, आजी भेटल्या. त्या आरतीची बाकीच्या पाहुण्यांशी ओळख करून देत होत्या. मामा मामी होते.  दोघांचा स्वभाव मोकळा वाटत होता. मामा वीर कडे बघत होता. छान आहे आरती.

आरतीने समोर बघितलं वीर बसलेला होता. तिला सुचलं नाही काही. ती अजून मैत्रिणींच्या मागे जावून उभी राहिली. शनाया उठून आली. ती आरती सोबत बोलत होती. नंदिनी मॅडम तिला आजीं कडे घेवून गेल्या.

आता वीरला आरती दिसली. पिवळी साडी नेसलेली होती. त्याच्यावरच व्हाईट  स्लीवलेस ब्लाउज घातलेला होता. केसांची हलकी वेणी घातली होती. त्याच्यावर भरपूर फुल होते. डोक्यावर पण बिंदी सारखे फुल लावलेले होते. हातावरची मेहंदी सुंदर रंगली होती. त्यावर ही फुल लावलेले होते. अतिशय सुंदर दिसत होती ती. नाजूक चेहरा त्यात ती  छान बोलत होती. हसत होती.

वीरला वाटलं तिचा फोटो घ्यावा. कसं काय घेणार पण. आज तर सगळे माझ्याकडेच बघता आहेत.

"चला नाष्टा करून घेऊ मग कार्यक्रम करता येईल."

सगळे नाश्त्याला गेले

प्रिया, राही, मीनल, आरती, राहुल, वरूण, राकेश, प्रकाश एका जागी बसलेले होते. अखिल, साहिल ही लग्नाला आले होते. ते आरतीला भेटायला आले. त्यांच्या सोबत वीर होता.

"तुला हे लग्न खरच करायचं आहे का वीर? " साहिल विचारत होता.

हो.

" तू आम्हाला काही सांगितलं नाही इतके दिवस लग्न जमल्याच. ग्रुपमध्येही येत नाही तु आजकाल. तुला माहिती आहे का सोनीयाला तुझा खूप राग आला आहे. "

" येऊ दे आता काय करणार मी? "

" वीर पण लग्न झाल्यानंतर आरतीशी नीट वाग. ती खूप साधी छान मुलगी आहे." अखिल अजूनही आरतीची काळजी करत होता.

विरला माहिती होता अखिलला आरती आवडते. त्याला एकदम अखिलचा राग आला.

अखिल आता आरतीशी बोलायला गेला होता.
आरती उठून त्याची जवळ आली.

माझ्याशी तर काही बोलली नाही ही सकाळपासून. आता बरी अखिल सोबत बोलत आहे. वीर चिडला.

" आरती आर यु सिरीयस तू खरच लग्न करते आहे वीर सोबत?"

"हो अखिल. थँक्स तू लग्नाला आलास."

" त्याने जर लग्नानंतर बदला घेतला तर? "

" काहीही होऊ दे अखिल. आता माझ्या मनाची तयारी झाली आहे.  वीर चांगला आहे. आता हल्ली चांगल बोलतो तो. "

"तुला काही ऑप्शन नव्हती का? या जगात हाच एक मुलगा आहे का?"

"आता हे बोलण्यात काही अर्थ आहे का अखिल? तेव्हा परिस्थिती अशी होती आणि वीरने समोरून लग्ना साठी विचारल. घरचे हो म्हटले. मला आधी पासून वीर आवडतो."

" वीर दिसतो तसा हीरो सारखा. अर्ध कॉलेज त्याच्या मागे होत. तो वागायला सॉफ्ट नाही. तुला त्रास देईल. तू थोडा विचार करायला हवा होता. मला एक फोन तर करायचा. तुझं लग्न कॅन्सल झालं हे मला नंतर समजलं. "

" नको ना अखिल आता तेच तेच बोलू. मी पुढे निघून गेली आहे."

"ठीक आहे आरती यापुढे काही लागलं तर मला सांग. आणि आज तू खूपच छान दिसते आहेस."

" थँक्यू अखिल तू माझी काळजी करतोस."

सगळ्यांचा नाश्ता झाला. अजूनही आरती आणि वीर एकमेकांशी बोलले नव्हते. फोटोग्राफर फोटो काढायला बोलवत होते. सगळ्या मैत्रिणी वीर त्याचे मित्र फोटो काढायला गेले. आधी मुली मुलींचे खूप फोटो निघत होते. शनाया  पण त्यांच्यात खूप छान ऍडजेस्ट झाली होती. तिची आणि मीनलची गट्टी जमली होती.

"किती ते फोटो. आजच्या दिवसात होईल का मुलींचे फोटो काढून? आम्ही पण वाट बघतो आहे." मुल बोलत होते. बाकीचे हसत होते. हो ना आपले फोटो घ्यायचे नाहीत तर का बोलवलं.

चला. फोटो ग्राफर मुलांना बोलवत होता.

आधी वीरचे फोटो घेतले . मग ग्रुपचे.

चला आता नवरदेव नवरीचे फोटो काढायचे आहेत. तेव्हा आरतीने पहिल्यांदा वीर कडे बघितलं.  चल आरती.  त्याने आवाज दिला. ती त्याच्या जवळ जाऊन उभी राहिली. तो तिच्याशी हसला. ती पण थोडीशी हसली.

"छान दिसते आहेस तू?"

यावर आरती तिने काही उत्तर दिलं नाही. ती थोडी लाजली होती. हे फुल वगैरे जास्त झाले वाटत. फ्रेंड्स ऐकत नाही. अति तयारी करून दिली.

दोघं अगदी साधे उभे राहून फोटो काढत होते. फोटोग्राफर वेगवेगळ्या पोज सांगत होत्या. दोघं ऐकत नव्हते. मीनल शनाया पुढे गेले. दोघांना छान उभं केलं. वीर खुश होता. तो मस्त आरतीच्या खांद्यावर हात ठेवून उभा होता. आरती ऑकवर्ड होती. "वीर हात काढ."

का?

"नीट उभा रहा."

"तू चिडून बोलल तर मी ऐकणार नाही. "

"अरे काय अस. प्लीज."

वीर ऐकत नव्हता. "आरती तू माझी बायको आहेस. "

"म्हणून काय झाल वीर." ती रागाने बघत होती.

"आज लग्न आहे आपल, जरा प्रेमाने वाग."

"माझ्या कडून काही अपेक्षा ठेवू नकोस. "

" नाही तुला माझ्या प्रेमात पाडल तर नाव बदलून टाकेन. तस ही हिला मी आवडतो. "वीर मनात म्हणाला.

मीनल मैत्रिणींशी बोलत उभी होती. समोरून राहुल तिच्याकडे बघत होता. तिने त्याच्याकडे बघितलं. हा काय सकाळपासून माझ्याकडे वेगळाच बघतो आहे. इतर वेळी तर काही बोलत नाही. आता आरतीचं लग्न झालं तर मी यांच्याकडे जाणार नाही.

राहुल तिच्याकडे चालत येत होता. बापरे काय करू? तो मीनल जवळ येऊन उभा राहिला. नेहमीप्रमाणे काही न बोलता. आता मीनलला खूपच राग येत होता.

आरती फोटो काढून निघत होती. "आरती एक मिनिट थोड बोलायच होत."

ती थांबली.

"आरती आज आपल्या आयुष्यातला महत्त्वाचा दिवस आहे. लग्न  एकदाच होतं. नंतर आपल्याला हेच क्षण आठवत राहतील. आपण मोकळं राहू या का एकमेकांसोबत. राग सोड ."

" वीर हे सगळं तुझ्या मनाप्रमाणे झाल ना? मागे तू बोलला होता मला तुझ्या सोबत रहायच आहे. तुझ्या सोबत किती जरी फोटो असले तरी काय हरकत आहे. "

"जे झालं ते गेलं आरती . माझ्यावर विश्वास ठेव. मला तू माझ्या आयुष्यात हवी आहेस. आनंदी रहा."

आरती काहीच म्हटली नाही.

" आरती कार्यक्रमाला उशीर होतो आहे चल." मावशी बोलवत होत्या.

वीर ही तिच्यासोबत आत मध्ये आला. आधी वीरची हळद होती. दुसऱ्या बाजूला आरतीची हळदीची तयारी सुरू होती. आरती तिथेच मागे खुर्च्यांवर मैत्रिणींसोबत बसली होती. बाकीच्या बोलत होत्या.  आरती एकदम गप्प होती. वीर चांगला वागतो आहे. नक्की काय आहे ते समजत नाही. पण मला त्याच्याशी लगेच मोकळ बोलता वागता येणार नाही.

मीनल सरला ताईंना मदत करत होती. मावशी होत्या सोबत. राहुल तिथेही मीनलच्या मागे होता. मीनल किंचित हसत होती. तिला छान वाटत होत राहुलच अस मागे मागे येण.

"काय झालं आहे राहुल? तुझं काही काम आहे का इथे आमच्या मध्ये? तू केव्हाचा या मीनल सोबत आहेस?" मावशी बोलत होत्या.

राहुलला कसंतरी वाटलं. बहुतेक मावशीला लक्षात आलं का मी मीनलच्या मागे फिरतो ते. "आईशी काम आहे. आई रूमची चावी दे. सामान हव आहे."  सरला ताईंनी चावी दिली. राहुल गेला.

" मीनल जा आतून पूजेच सामान घेवून ये. "

ती हळदी कुंकवाचा ताट घ्यायला गेली. राहुल वरूण तिथे काम करत होते. वरूण मीनल कडे बघत होता. "काय झालं मीनल? तुझी तब्येत तर ठीक आहे ना?  तू खूपच चांगली दिसते आहेस. काय यार मीनल आपल्या मुलांचा ग्रुप सोडणार वाटत. "

मीनल हसत होती. "वरुण कश्याला त्रास देतोस. मी मारेन ह. "

" बरोबर आहे. आज भारी दिसते आहेस तू. आणि काय ग तू आता हल्ली आमच्याकडे खूप काम करतेस,  तुला कोणाला इम्प्रेस करायचं आहे का?" तो राहुल कडे बघत म्हणाला.

राहुल मीनल एकमेकांना बघत होते. राहुलच्या हातातल काम तस होत.

"मला सांग मी मदत करू का राहुल दादा ? "

" ह कश्या बद्दल? " राहुलने सहज विचारल.

" तू हातात सामान घेवून तसा उभा आहे मीनल कडे बघत. जड होईल ते. "

अच्छा.. राहुलला हसू येत होतं. मीनल लाजली.

" काय झालं तुम्हा दोघांना?" वरुण अजूनही चिडवत होता.

मीनल वरूणला मारत होती.

"हे करू नको मीनल. तुला माहिती आहे का तुझा हात खूप लागतो. माझी पाठ गेली. तुझ्या नवऱ्याचं काही खरं नाही." तो सामान घेऊन बाहेर निघून गेला.

मीनल ही जात होती. राहुलने पुढे होऊन तिचा हात धरला.  मीनलला पहिल्यांदा खूप छान वाटलं. "राहुल काय आहे हे?"

"तेच जे आपल्याला दोघांना वाटतं पण कोणीही बोलत नाही. यासाठीच तू रागावलेली आहेस ना. आता मी बोलायला तयार आहे तर मोकळं बोल."

मीनल पहिल्यांदा घाबरली होती. "काकू वाट बघत आहेत मी जाते."

"अजिबात जमणार नाही. आधी मला सांग तुला माझ्याबद्दल काय वाटतं. "

"राहुल असं नको आपण नंतर भेटू. मी तुला सांगते फोन करून. इथे जर कोणी ऐकलं तर गोंधळ होईल."

"थोडी तर आयडिया दे."

मी जाते.

राहुल बाजूला सरकला. मीनल खूप खुश होती. मनाप्रमाणे झाल होत. " चल आरतीला हळद लावायची आहे." दोघ बाहेर आले.

0

🎭 Series Post

View all