ओढ तुझी लागली भाग 14
©️®️शिल्पा सुतार
.......
.......
वीर दुपारी हर्षल सोबत पूर्ण फॅक्टरी फिरून आला, सुंदर मोठे मोठे शॉप होते, त्यांच्याकडे बरेच लोक कामाला होते, खूप काम करतात आई बाबा, थोडी तरी त्याला जाणीव झाली.
रात्री घरी आल्यावर जेवून झोपला तो, बापरे पूर्ण आयुष्य अस रोज काम असेल का?
दोन दिवसानी ट्रीप जाणार होती आरती राही प्रिया मीनल शॉपिंग साठी आल्या होत्या, काय काय करायच, कुठे कुठे काय कपडे घालायचे त्या ठरवत होत्या , खूप खुश होत्या त्या, कॉलेज बंद असल्यामुळे आरती पण खुश होती.
सरला ताई चिवडा तयार करत होत्या, मुलींनी त्यांना खरेदी दाखवली, "मस्त मिळाले ड्रेस, तयारी झाली का तुमची?"
"करतो आहोत काकू," मीनल.
"तिकडे एकमेकांची काळजी घ्यायची,"
हो.
वीर ऑफिस मध्ये बिझी होता, साहिलचा फोन आला, "झाली का तयारी ट्रेकिंगची?"
"नाही अजून काय काय न्यायच आहे?" वीर.
"आज भेट सांगतो."
"मी ऑफिस जॉईन केल आहे , वेळ नसतो, फोन वर सांग, ट्रेकिंग डीटेल्स दे," वीर.
दुसर्या दिवशी वीर निघणार होता, ऑफिस मधे बरच काम होत, घरी यायला आठ वाजले, तो थकला होता, तसाच झोपला सकाळी लवकर निघायच होत , खूप धावपळ झाली, लिस्ट प्रमाणे पटापट बॅग भरली, नंदिनी मॅडम त्याच्या मागे पळत होत्या, "पैसे पाकीट कार्ड घेतल का?"
हो,
"फोन चार्जर? "
हो... धावपळीत तो निघाला,
मुली घरून निघाल्या, सरला ताई आजी खूप सूचना करत होत्या, राही प्रिया मीनल आरती हसत होत्या, आज आरती पण जीन्स वर होती, मिलिंद आले होते, सगळ्या कार मधे बसल्या, स्टेशन वर आल्या, बाकीच्या मुली सामान आत ठेवत होत्या. आरती मिलिंदशी बोलत होती. " तू नाही तर करमणार नाही मला, काळजी घे मला फोन कर, काही हवं असेल तर सांग,"
हो.
ट्रेन निघाली, आरती आत जावून बसली.
मुलीं साठी पूर्ण रेल्वे बोगी बूक होती, सात वाजता ट्रेन निघाली सकाळी त्या पोहोचणार होत्या, खूप धमाल येत होती,
ट्रेन सुरू झाल्यावर सगळ्या ओरडत होत्या ... खूप धमाल करायची आहे, येस मजा करू आपण.
....
....
मुल टेंशन मधे होते, "वीर नाही आला अजून? कुठे आहे तो? थोड आधी नाही का येता येत का याला? साहिल फोन करून बघ,"
हो.
वीर पळत स्टेशन वर आला, ट्रेन हळू निघाली होती, जे दार दिसेल त्यात आत शिरला, दारात उभा होता तो, थॅंक गाॅड ट्रेन मिळाली, तो खुश होता, ट्रेन जोरात स्टेशन बाहेर पडली, त्याने मित्रांना मेसेज केला ट्रेन मधे चढलो आहे, नेक्स्ट स्टेशन वर येतो तिकडे, घरी नंदिनी मॅडमला कळवल, त्याला नंतर लक्ष्यात आल की हा लेडिज डबा आहे. काय करू, तो तसा बॅग सांभाळुन उभा राहिला, टीसी आला तर ओरडेल मला,
एक मुलगी दारा जवळ आली, ओह एम जी हा कोण आहे? तिने दोघी तिघींना बोलवलं, "चला लवकर लेडिज डब्यात एक हीरो आला आहे,"
सगळ्या त्याला बघायला आल्या, वीर घाबरला,
"एक्सक्युज मी... तू इथे काय करतोस आहेस? तिकीट दाखव, हा लेडिज डबा आहे,"
"माझी ट्रेन मिस होत होती, म्हणून या डब्यात चुकून आलो, मी नेक्स्ट स्टेशन वर माझ्या डब्यात जाईल, मी काही त्रास देत नाही तुम्हाला, " वीर.
"अस का, तू काय त्रास देशील आम्हाला , आम्ही सोडू का तुला आता, " मुली हसत होत्या.
वीरला समजल ती मुलगी काय म्हणते ते, "हे बघा मी तुम्हाला भावा सारखं आहे, "
" व्हॉट भाऊ माय फूट चुपचाप आत चल, आमच्याशी बोल, आम्ही म्हणतो ते कर, "
हो.. हो.. आता बर्याच मुली जमा झाल्या. छान आहे हा.
" काय? हे बघा. लीव मी अलोन, " वीर थोडा घाबरला होता.
"अस कस एकट सोडणार तुला, आत चल , नाही तर याचा लाईव व्हिडीओ घ्या, हा त्रास देतो ते सांगू आपण नेक्स्ट स्टेशन वर पोलिस पकडतील याला, "
" हे बघा अस करू नका, तुम्हाला काही दया माया आहे की नाही," वीर.
बाकीच्या मुली हसत होत्या.
"मग चल आत," तो कसतरी आत आला, खूप मुली होत्या, कोणी ओळखीच आहे का तो बघत होता,
" तुझी बॅग बाजूला ठेव, "
" नको मी धरतो, "वीर,
कोणी बॅग लपवून ठेवली तर? त्याला भीती वाटत होती,
" नाव काय तुझ? "
वीर.
"जोरात सांग जेवला नाही का तू ?"
" अग आपल्या कॉलेजचा हीरो आहे हा , "
"माहिती आहे, तिकडे अॅटिट्युड मधे असतो, इथे काय झाल?"
"त्याला काही बोलू नका कोणी, मला आवडतो तो , " एक मुलगी बोलली.
सॉरी. वीर घाबरला.
"ती मनीषा तिला तू आवडतो,"
तो मनीषा कडे बघत होता, तिने स्माईल दिला, "जावू द्या मला, मी दारात उभा रहातो, परत येणार नाही, "
" घाबरू नको जास्त काही सांगत नाही आम्ही तुला , गाण लावा नाचुन दाखव वीर, "
"व्हॉट मी नाचणार नाही ," वीर.
" लाइव्ह सुरू करू का?"
" हे बघा एखादी मुलगी अस मुलांसोबत फसली तर आम्ही अस करु का?" वीर.
"हो करता तुम्ही, या पेक्षा वाईट वागतात, आम्ही अजून काहीच केल नाही तुला," एक डॅशिंग मुलगी पुढे आली.
"अस मला त्रास देवू नका, मी रिक्वेस्ट करतो," वीर.
" डान्स कर वीर, मग जा जिथे जायच तिथे, "
हो.. सगळ्या बोलल्या,
" रॅगिंग चांगल नाही अस करु नये ," वीर.
"आपण होस्टेल वर नाही,"
मीनल तिथून जात होती काय गर्दी आहे, तिने त्याला बघितल, ती पटकन आत आली, "आरती वीर आहे,"
"काय? कुठे आहे तो? "
" आपल्या डब्यात,"
"बापरे माझ्या मागे आला का हा? घरी समजल तर, " आरती घाबरली,
" चुकून आला वाटत तो लेडिज डब्यात , मुली त्रास देत आहेत त्याला," मीनल
"देवू दे आपल्याला काय, भांडकुदळ आहे तो, मला किती त्रास देतो तो, कर्म आहे हे, अजून छळायला पाहिजे त्याला, तो पण पिकनिकला येतो का? "आरती.
" तो कुठे जातो ते माहिती नाही, पण आपल्या डब्यात आहे, चल आरती आपण बघु, "मीनल.
त्या गेल्या, वीर मधे उभा होता, मुलींनी त्याला प्रश्न विचारून हैराण केल होत, मीनल आरती बघत होत्या, बिचारा, आरती हसत होती.
वीरने तिच्याकडे बघितल, "वॉव आरती बर झाल तु आहेस इथे, किती बर वाटल, तू पिकनिकला जातेस का? या ग्रुप सोबत आहेस का? तू हसते का मला?" त्याला राग आला, त्याने तिला पुढे ओढून घेतल, आरती जावून त्याच्यावर पडली, त्याने तिला मिठी मारली,
"वीर मूर्ख सोड मला, हेल्प मी मीनल, गर्ल्स," आरती.
"वीर सोड, वीर ऐकु आल ना, सोड तिला," मीनल.
तो आरतीला सोडत नव्हता, खूप गोंधळ झाला, सगळ्या मुली आजुबाजूला होत्या, त्या आरतीला ओढत होत्या, वीरची पकड घट्ट होती, आरती घाबरून गेली होती, ती अजूनही वीर जवळ होती, तो तिच्या कडे बघत होता, " गर्ल्स तुम्हाला डान्स बघायचा ना? "
हो.
"आरती माझ्या सोबत नाचेल तर मी नाचेल." वीर.
"नाही मी नाचणार नाही, सोड मला वीर, मीनल, मला मदत करा ना गर्ल्स, " आरती.
"नाही नाचायचं, मग अशी रहा माझ्या मिठीत, मी सोडणार नाही तुला," वीर.
"वीर सोड तिला," मीनल.
"जर आरती डान्स साठी हो बोल तर मी तिला सोडेल, नाही तर कोणी काही करू शकत नाही, मी पुढच्या स्टेशन वर घेवून जाईल तिला माझ्या सोबत, माझ्या डब्यात,"वीर.
" नाही वीर मला जावू दे," आरती रडायची बाकी होती, उगीच ऐकल मीनलच, इथे आली या वीरला बघायला, आणि इथे फसली, पिकनिक मधे शांतता नाही, काय करू?
" आरती तुझ्या जवळ खूप छान वाटत , मला वाटल नव्हत माझा प्रवास इतका छान होईल," तो हळूच बोलला.
आरती त्याच्या हाताला मारत होती, "काय करता आहेत तुम्ही मुली? मदत करा मला, मनीषा, मीनल, याला पकडा त्या बाजूने, जा ना बाकीच्यांनी प्रिया राहीला बोलवा,"
बाकीच्या मुली किती प्रयत्न करत होत्या, वीर पुढे काही चालल नाही त्यांच.
नेक्स्ट स्टेशन तीन तासाने आहे एकीने सांगितल, आरती घाबरून गेली होती, वीर अति करतो, तिला त्याच्या जवळ कसतरी वाटत होत, एक तर बाकीच्या मुलीं त्याला ढकलत होत्या तेव्हा वीर अजून आरती जवळ येत होता, त्याच्या स्पर्शाने ती घाबरून गेली होती, "ठीक आहे मी डान्स करते, सोड मला वीर, "
चालेल,
टेप आणा,
वीर हसत होता, अगदी मनासारखं झाल आज, तो आरती कडे बघत होता, त्याने तिला जवळ ओढल, तो तिच्या डोळ्यात बघत होता.
गाण सुरू झाल,
चाहे तुम कुछ ना कहो,
मेनै सून लिया,
के साथी प्यार का
मुझे चून लिया,
चुन लिया,
मैंने सुन लिया
मेनै सून लिया,
के साथी प्यार का
मुझे चून लिया,
चुन लिया,
मैंने सुन लिया
पहला नशा, पहला खुमार, नया प्यार है नया इंतज़ार
कर लू मैं क्या अपना हाल , ऐ दिले बेक़रार, मेरे दिले बेक़रार
तू ही बता
पहला नशा, पहला खुमार
कर लू मैं क्या अपना हाल , ऐ दिले बेक़रार, मेरे दिले बेक़रार
तू ही बता
पहला नशा, पहला खुमार
आरती वीर नाचत होते, वीर बिनधास्त होती, आरतीला जवळ घेवून नाचत होता, ति घाबरली होती , केव्हा एकदाचा हा डान्स संपतो अस झाल होत, तिला वीरने तिला पाठी मागून धरल होत, दोघ अगदी जवळ होते, वीर आरतीच्या डोळ्यात बघत होता, आरतीला तो सोबत असल्याने काही सुचत नव्हत, दोघ अगदी छान दिसत होते सोबत,
सगळ्या मुली त्या दोघांकडे श्वास रोखून बघत होते, वीरने आरतीला जवळ घेतल की सगळ्या उसासे भरत होत्या, किती भारी आहे हा वीर, मधेच त्याने तिला कमरेतुन उचलून घेवून गिरकी घेतली, हळू खाली उतरवल, ट्रेनने ब्रेक मारला, आरती पडत होती, वीरने तिला एकदम पकडल, ती वीरच्या मिठीत होती, दोघी तिघींनी फोटो घेतले चूप चाप,
मनीषा उठली, "मी नाचू का वीर तुझ्या सोबत?"
बाकीच्या हसत होत्या.
"नाही मनीषा फक्त आरती ," डान्स झाला, सगळे टाळ्या वाजवत होत्या, मनीषाला राग आला, मी सोडणार नाही आरतीला.
"तुमच्या दोघात केमिस्ट्री खूप छान आहे,"
"हो छान दिसतात ते सोबत,"
आरती बाजूला उभी होती. मीनल सोबत ती आत येत होती," उगीच ऐकल तुझ आणि इकडे आली मी,"
मीनल हसत होती.
" सोडा वीरला प्रॉमीस केल होत तुम्ही," एक मुलगी बोलली,
" आरती मी येवू का तुझ्या सोबत? " वीर.
"हो जा आरती सोबत," एक मुलगी बोलली.
"नाही हा नको, दिला तेवढा त्रास पुरे झाला, "आरती बोलली,
" आरती बसू दे थोडा वेळ त्याला तुझ्या सोबत, काय अस, तो तुझ्या सोबत कंफर्टेबल आहे," एक मुलगी.
वीर बघत होता काय ठरत, चल... मीनल बोलली.
तो आरती मीनल सोबत आत आला, आरती गप्प होती, रागाने बाजूला बसली होती, खिडकीतून वारा येत होता, तिचे केस उडत होते, वीर उभा होता, मीनल तिकडे काय झाल ते प्रिया राहीला सांगत होती,
बस... मीनलने त्याला तिची जागा दिली, ती आरती शेजारी बसली, वीर समोर बसला होता, तो तिच्या कडे बघत होता, मी इतका त्रास देतो हिला तरी काही बोलत नाही, वैतागली आहे ही मला, पण खूप छान आहे आरती.
बराच वेळ झाला, घरून डबे आणले होते, आता आरती राही प्रिया मीनल वीर एका ठिकाणी होते, त्या जेवायला बसल्या, वीर बाहेर बघत होता,
"हे घे वीर," मीनलने त्याला प्लेट दिली.
नको.
"खा थोड, माहिती नाही तुला आवडेल की नाही आमच जेवण," मीनल त्याच्याशी बोलत होती, त्याला जेवण आवडल, आरती फोन मध्ये बघत जेवत होती, वीर कडे बघण्या पेक्षा ति मोबाईल वापरत होती,
"तुम्ही सगळ्या बेस्ट फ्रेंड आहात ना," वीर.
"हो, आम्ही शाळेपासून सोबत आहोत," मीनल.
"मी नेहमी बघतो तुमच्या ग्रुप ला, "वीर.
" आम्ही पण नेहमी बघतो तुला," मीनल.
प्रिया रागाने मीनल कडे बघत होती, ती गप्प झाली,
वीर बघत होती आरती गप्प होती, "आरती मला भाजी दे," तो तिच्याशी बोलला, तिने तिच्या डब्यातील भाजी दिली,
" थँक्स, छान आहे जेवण, ही बटाट्याची भाजी छान आहे, " वीर.
" ती भाजी आरतीने केली आहे खूप छान करते ती स्वयंपाक ," मीनल.
"अरे वाह हिच्या कडे बघून वाटत नाही हिला काही येत असेल," वीर.
आरती आता रागात होती,
सगळे झोपायची तयारी करत होते, किती वेळ उतरायला, वीर वेळ बघत होता,
आरतीला फोन आला, ती फोनवर बोलत होती,
ही कोणाशी बोलते आहे हळू हळू? हिचा नवरा वाटत, काय बोलत असेल, त्रास देवु का हिला, तो तिच्या कडे बघत होता, आरतीने त्याच्या कडे रागाने बघितल, त्याने दुसरी कडे बघितल, आरती फोन घेवून बाजूला गेली, ती तिथे उभ राहून बोलत होती,
दोन तास झाले अजून एक तास, किती मुली आजुबाजूला, काय करू, किती बोलतात या, आरती कुठे गेली? तो आजुबाजूला बघत होता, समोरच्या बाजूला उभ राहुन आरती बोलत होती, हसून, गोड दिसत होती, तो तिच्या कडे बघत होता,
तिचा फोन झाला, ती जागेवर आली, मीनल प्रिया जागेवर नव्हत्या,
"बस आरती, " वीर तिला हाताने जागा दाखवत होता,
"या दोघी कुठे गेल्या?" ती राहीला विचारत होती,
"त्या वॉश रूम मधे गेल्या," वीरने सांगितल,
"वीर मी बोलते का तुझ्याशी? तू का त्रास देतो मला, वाटल पिकनिक मधे शांती मिळेल पण इथे ही तू आहेच, काय मिळत तुला अस करून?" आरती वैतागली.
"आरती शांत हो, मी मुद्दामून नाही आलो इथे, चुकून आलो तर तू इथे होतीस, तुझा आधार वाटला मला," वीर.
"हो ते समजल मला, म्हणून सोडत नव्हता का तू मला, ही कोणती पद्धत आहे, "आरती.
" सॉरी लागल का तुला? " त्याने तिचा हात फार घट्ट धरला होता. त्याला आठवल.
" ठीक आहे मी,"
"स्वयंपाक येतो तर तुला, मला खूप बर वाटल, माझी आवडती बटाट्याची भाजी छान जमते तुला, थँक्स," वीर.
"यू आर नॉट वेल कम, या पुढे मला हात लावला तर बघ, " आरती.
"आपली इथे पण भेट झाली म्हणजे नक्की आपल काहीतरी नात असेल ना आरती, "वीर.
" अस काही नाही, मला तुझ्याशी कोणतही नात नको आहे, "आरती.
"आरती चिडू नकोस, फोन वर बोलतांना सांगितल का मिलिंदला की तू माझ्या सोबत आहेस ते, डान्स केला सोबत, माझ्या मिठीत होतीस तू, एकत्र बसलो मस्त गप्पा मारत, डबा खाल्ला," वीर हसत होता,
आरती टेंशन मधे होती, " वीर खर सांग तू का अस करतोस? "
" तुला कारण माहिती आहे," वीर.
" माझा काही विचार आहे की नाही तुला? तू असा करतोस, माझ लग्न मोडेल, "आरती.
" तुमच्या प्रेमात एवढी ताकद असेल तर कोणी काहीही सांगितल किंवा तू कोणाशी बोलली तरी तुम्हाला दोघांना फरक पडायला नको ," वीर.
"ती विचार करत होती बरोबर बोलतो आहे वीर, मिलिंद आणि माझ नात भक्कम हव, किती जरी वीरने त्रास दिला तरी काय फरक पडतो, मी घरी गेली की मिलिंदला सगळ सांगेल, "आता आरतीला बर वाटत होत.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा