Login

ओढ तुझी लागली भाग 22

काका काकू किती त्रासात आहे. आरतीला कोणी काही बोललं तर ती सहन करू शकणार नाही. आधी तिने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे


ओढ तुझी लागली भाग 22

©️®️शिल्पा सुतार
.......

वीर विचार करत होता. आरतीचा एक भाऊ शांत आहे माझ्याशी बोलायला आलेला. तो मदत करू शकतो. त्याला कॉन्टॅक्ट करू का. त्याचा नंबर कुठून मिळेल. त्याने साहिलला फोन लावला.

"साहिल आरतीच्या भाऊ मोठा त्याचा फोन नंबर हवा आहे."

"काय झालं? "

"आरती माझ्याशी बोलत नाही. कस काय कॉन्टॅक्ट करू तिला समजत नाही. " वीर.

"मग हे काय अवघड आहे का तुझ्या साठी. घे चॅलेंज जावून भेट तिला. बोल काय बोलायच ते." साहिल अजून जुन्या मूड मधे होता.

"नाही साहिल आता अस करायच नाही. आधी चूक केली मी. माझ्या मुळे तिला त्रास झाला."

"बापरे वीर तू खूप सिरियस झाला. बघतो विचारतो प्रकाशला." त्याने जरा वेळाने राहुलचा नंबर पाठवला. वीरने मेसेज केला. "राहुल मी वीर मला बोलायच आहे. फोन करू का?"

राहुल फोन घेवून बाहेर गेला. "बोल वीर."

"मी आरतीला त्रास दिला मला कसतरी वाटत आहे. पण ते फोटो मी नाही शेअर केले. "

" मला माहिती आहे ते. का फोन केला होता? "राहुल.

" मला आरती सोबत लग्न करायचं आहे. माझ्यामुळे तिचं नुकसान झालं. मी खरंच आरतीला पसंत करतो. जर तुमच्या लोकांशी काही हरकत नसेल तर तू आरतीशी बोलून बघ ना. "

" ठीक आहे मी बोलून बघतो. पण खरच तुझ्या मनात असं काही नाही ना त्रास द्यायचं वगैरे . कारण आरती खूपच त्रासात आहे. तिची मानसिक स्थिती चांगली नाही. जर तीला काही त्रास झाला तर मी तुला सोडणार नाही. तुला मी दिसतो असा वरून शांत पण मी माझ्या बहिणीसाठी तितका स्टॅन्ड घेऊ शकतो. "

" राहुल मी अजिबातच असं काही करणार नाही. माझ्यावर विश्वास ठेव. आरती बाबत मी अस नाही करू शकत. आपण एकदा भेटून बोलू." वीर.

" हो वरूण आणि मला बोलायचं आहे तुझ्याशी . आपण एका जागी भेटू उद्या. "

" हो चालेल मी उद्या फोन करतो. "
......

दुसर्‍या दिवशी मीनल सकाळी लवकर आली. आज सतीश राव सरला ताई एका ठिकाणी लग्नाला जाणार होते. ते संध्याकाळी येणार होते. सरला ताई छान तयार झाल्या होत्या. मीनल त्यांच्या आजुबाजुला होती.

" काकू हे फुल लावा ना. "

" नाही मीनल. "

"काकू प्लीज. एवढी छान साडी नेसली गजरा नाही तर फुल लावा ना." ती त्यांचा पदर नीट करत होती," तुम्ही एवढ्या सुंदर आहात म्हणून आरती पण गोड दिसते."

"पण आमच्या दोघी पेक्षा मीनल तू खूप छान आणि सुंदर आहेस." सरला ताई.

"मी का काहीही काकू." मीनल.

"किती प्रेमळ काळजी घेणारी छान एवढी आहेस तू. आरती ला आम्हास किती जपतेस तू. "

" हो बरोबर आहे आई, मीनल तु गोड आहेस. "आरती.

"चला झाल का? "सतीश राव आवाज देत होते.

" हो आले. स्वयंपाक झाला आहे काळजी घे आरती. मीनलच ऐक आजींना जेवायला द्या. गोळ्या द्या. "

" हो जा तू."

वरुण कामात होता. इलेक्शन जिंकल्या पासून कॉलेजचे बरेच काम होते त्याला. तो तिकडे गेला होता. राहुल ऑफिसला गेला होता.

आरती मीनल टीव्ही बघत होत्या. आरतीच्या फोन वर मेसेज वाजला. तिने बघितल ठेवून दिला. जरा वेळाने परत मेसेज आला.

" कोण आहे ग आरती? "

"असच कोणी नाही."

वीर ऑफिसला निघाला होता. तो आरतीला मेसेज करत होता. "आरती बोल ना माझ्याशी. मी खरच काही केल नाही. चिडू नकोस. मला तुझ्या सोबत रहायच आहे."

"आरती बोलून घे त्याच्याशी. वीर करतो ना मेसेज." मीनल.

"नाही मीनल मी नाही बोलणार. " आरती

"आरती तुला वीर अजून आवडतो ना?" मीनलने भीत भीत विचारल

"नाही मीनल मला आता कोणा बद्द्ल काही वाटत नाही. "

" आरती अस कोणी मनातून जात नाही. आवडतो तर आवडतो. एवढ काय. असा विचार करून कस चालेल मोकळ सांग. "

"मीनल मी ओरडेन तुला. मला नाही आवडत वीर. बस समजल का आता. "

" तू डोळे बंद करून घेतले आहेत त्याला मी काय करणार. आधी वीरने तुला हो म्हटलं असत तर किती खुश असती तू. आता आहे ना चान्स. करून घे लग्न. इतका का राग आहे तुला त्याचा. तो किती मागे येत होता तुझ्या. त्याच्या डोळ्यात तुझ्या विषयी किती प्रेम होत. तो तुला बघून खुश असायचा. " मीनल तिला समजावत होती.

" म्हणून मला त्रास होईल अस वागत होता का तो. मला किती काहीही बोलला आहे तो. तुला काय माहिती. त्याला मी आवडत नाही ती सोनिया आवडते त्याच्या बरोबरीची. मला क्लास नाही. तो मला त्रास द्यायला अस करतो आहे. एकदा लग्न झालं की बघ तो बघणार नाही माझ्या कडे. मला भीती वाटते त्याची. "आरती.

" तो चिडत होता हे खर आहे. थोड फार चालायच. खर सांग तुला ही आवडत होत वीर तुझ्या मागे आलेला. "

आरती काही म्हटली नाही. आजी आली मग त्या गप्प बसल्या.

दुपारी त्यांनी जेवून घेतल. मीनल आलेली होती म्हणून आजी थोडी नाराज होती. पण तिचा आधार होता. ती सगळ सांभाळत होती.

औषध घेतल्या मुळे आरती दुपारी झोपली होती. आजी बाहेर बसली होती. पाच वाजता राहुल घरी आला. तो आत आला. मीनल आरती जवळ होती. मीनल उठून बसली.

" सॉरी मला माहिती नव्हत तू आली आहेस ते. झोप."

"ये ना राहुल."

" आरती कशी आहे?"

"ठीक आहे. चहा घेतो का? ठेवू का मी? " मीनल.

" मी करतो." त्याने आरती कडे एकदा बघितल. मीनल इकडे ये. ते दोघ किचन मधे गेले. मीनल ओट्या जवळ उभी होती. ती बघत होती राहुल फॉर्मल ड्रेस मधे खुप छान दिसतो. शर्टाच्या बाह्या फोल्ड केलेल्या. उंच छान. याला आवडत असेल का मी? स्वभावाने किती साधा आहे हा. मी त्याच्या पुढे टपोरी सारखी दिसते का? काही बोलत नाही. हा जिला मिळेल ती खूप लकी असेल. आयुष्य भर काहीच त्रास नाही होणार. आता ही किती काम करतो आहे. थोड चांगल राहू का मी. आरती सारख च्युडीदार वगैरे. माझ्या कडे चार पाच ड्रेस आहेत. ती रोज जीन्स घालत होती.

राहुल चहा ठेवत होता. "मीनल काही हव का तुला?" ती त्याच्या कडे बघत होती म्हणून त्याने विचारल.

नाही... तिला कसतरी वाटल. ती आता गॅस कडे बघत होती.

राहुल थोडासा हसला.

"काय केल मग आज दिवस भर? आरती काही बोलली का?"

"तिला वीरचे खुप मेसेज येत होते. ती बोलली नाही त्याच्याशी, तिला वीरचा राग आलेला आहे, मी समजवण्याचा प्रयत्न केला ती ऐकत नाही. "

" धक्का बसला आहे तिला. पण हे सोडून देवून तिने स्वतःचा विचार करायला हवा. " राहुल.

"हो तिला थोडा वेळ लागेल."

"मीनल तू समजव तिला."

हो राहुल.

" थँक्स तुझी खूप मदत होते." तो तिच्या बाजूला येत होता. मीनल घाबरली .मागे ओटा होता. काय करू? कुठे जावू? हा का येतो आहे इकडे? काय हव आहे याला. त्याने मला जवळ घेतल तर? हो म्हणू की नाही. मीनल गडबडली.

त्याने बाजूला वाकून तीन कप घेतले. तो त्याचा त्याचा चहा गाळत होता. मीनल गालातल्या गालात हसत होती. बापरे मी काहीही विचार करते.

"मीनल बिस्किट घे ना ते." तो कप घेवून बाहेर गेला. आजी जवळ बसुन चहा घेत होता. मीनल आली तशी आजी चिडली काय ही पोरगी रोज इथे असते. काय ते पँट शर्ट. हिचे केस.

"मीनल बस." राहुल खुर्ची देत होता. ती आजींच्या बाजूला बसली. त्याने तिला चहाचा कप दिला.

थोड्या वेळाने सरला ताई सतीश राव आले. अरे आई बाबा तुम्ही लवकर आले.

हो.. ते काही म्हटले नाही. दोघांचे चेहरे उतरलेले होते. राहुल त्यांच्या जवळ गेला. आजी मीनल पण पुढे हॉल मधे आल्या. त्यांनी आरतीच्या रूमच दार लोटून घेतल.

"काय झालं आई बाबा?"

" काही नाही."

"बाबा काय झाल? मोकळ बोला."

"तिकडे लग्नात सगळे आरती बद्दल बोलत होते. खूप नाव ठेवत होते आपल्याला. एक दोघांनी अपमान ही केला आमचा. कठिण झाल आहे हे. मिलिंदच्या घरचे मोठे लोक त्यामुळे बरेच जण त्यांना सपोर्ट करतात. आरतीची खूप बदनामी झाली आहे. आरती कस काय सामना करेल अश्या लोकांचा ते समजत नाही. आम्हाला आरतीची खूप काळजी वाटते आहे. " सतीश राव.

मीनल जावून सरला ताईं जवळ बसली. त्या काळजीत होत्या. "कोणीही विशेष बोलल नाही आमच्याशी अगदी वाळीत टाकल्या सारख करत होते. "

" काकू काळजी करायची नाही. आपल्याला माहिती आहे ना यात आरतीची काही चूक नाही. त्रास करून घ्यायचा नाही. " मीनल.

" अग पण लोकांच तोंड कोण धरणार? आधीच आरतीने धसका घेतला आहे. कस काय सहन करेल ती? मी तिला दुःखी नाही बघु शकत. " सरला ताई.

" आरतीला लांब ठेवल पाहिजे अश्या लोकांपासून. " सतीश राव.

" हो एक तर तिने हाताची नस कापून घेतली तेव्हा पासून मला भीती वाटते. "सरला ताई.

" बाबा वीर तयार आहे लग्नासाठी. विचार करायला काय हरकत आहे. " राहुल.

" हो तो चांगला आहे. आरती त्याला आधी पसंत करत होती. " मीनल.

" मी आणि वरुण भेटणार आहोत त्याला. बघु तर काय म्हणतो तो. " राहुल.

" हो भेटून घ्या."

" बाबा मला वाटत आरतीच लग्न लवकर करून टाका. तिला हा असा त्रास सहन होणार नाही. "

" हो आम्ही पण तोच विचार करतो आहोत. "

" वीर आणि त्याच्या घरचे चांगले आहेत. सुखी राहील आरती. "

आई बाबा आले म्हणून आरती उठून बाहेर येत होती. दारातून तिने सगळ ऐकल. आई बाबा दुःखी आहेत. माझ लग्न मोडल तर सगळे मला दोषी मानत आहेत. त्यांना लोक बोलले असतिल. किती लोकांना सांगणार नक्की काय झाल ते. ती परत आत जावून जागेवर झोपली. तिच्या डोळ्यात पाणी होत.

माझी काय चुकी आहे? का माझ्या मुळे बाकीचे लोक आई बाबांना बोलतात. त्यांचा अपमान करतात. काय करू मी? आई बाबा त्रासात आहेत काय बोलले असतील त्यांना लोक लग्नात. आई रडली का? त्यांच्या अपमान झाला असेल का?

राहुल दादा बोलत होता माझ लग्न करायच. वीर सोडुन मला कोणी हो बोलणार नाही का? काय झाल आहे एवढ? मिलिंदच्या घरच्यांनी माझी बदनामी केली आहे. काही ऑप्शन नाही. मी वीरला होकार देवु का? घरचे शांत खुश राहिले पाहिजे. थोड्या दिवसानी राहुल दादा वरुण दादाच लग्न ठरवाव लागेल. तो पर्यंत लोक विसरतील का हे. काय करू मी?

बाहेर अजूनही ते लोक बोलत होते. बाबा नाराज होते. राहुल त्यांना समजावत होता. मीनल चहा करत होती.

सरला ताई आत आल्या. "आरती उठते का? चल बेटा चहा घे."

आरती उठली फ्रेश होवुन आली. बाबा राहुल आता दुसर्‍या विषयावर बोलत होते. आजी काळजीत बसलेली होती. आई मीनल किचन मधे होत्या. ती आत जात होती.

"इकडे ये बेटा बस माझ्या जवळ. बर वाटत ना तुला? " सतीश राव.

"हो बाबा." ती त्यांच्या जवळ जावून बसली. सगळ्यां सोबत तिने चहा घेतला. ती शांत होती. आपण सगळ ऐकल अस समजू दिल नाही.

"कस झाल लग्न?"

"चांगल होत. नवरदेव नवरी ओळखीची होती." सतीश राव.

"तुम्ही रात्री येणार होते ना."

" लग्न लागलं मग काय करणार तिथे थांबून."

" हो बरोबर आहे. "

" काकू मी घरी जाते. आई वाट बघत असेल." मीनल.

" राहुल वेळ झाला आहे. हिला सोडून ये." सरला ताई.

ते दोघ निघाले. राहुल आता टेंशन मधे होता. तो रस्त्याने काही बोलला नाही. मीनलच घर आल. ती आत जात होती.

" मीनल उद्या येशील का? "

" हो. राहुल काळजी करू नकोस."

" मीनल थोडे दिवस घरी येत जा. आई बाबा बघते ना किती टेंशन मधे आहेत. आणि मला पण तू आलीस की चांगल वाटत."

मीनल लाजली. पहिल्यांदा तिला कोणी अस महत्व देवून प्रेमाने बोलत होत. राहुल मला ही आवडत तुझ्या सोबत. पण ती काही बोलली नाही. सगळे नेहमी तिचा राग राग करत होते. राहुल प्रेमाने वागत होता.

"मीनल आरतीच लग्न जमेल ना? "

" हो राहुल आरती अतिशय चांगली मुलगी आहे सगळ्यांना आवडते ती. वीरला भेट आणि ठरवून टाक आरतीच लग्न."

" पण आरती हो बोलेल का ? "

" ती काही बोलणार नाही. आधी ही काही बोलत नव्हती. आता ही बोलणार नाही. यात तीच चांगल आहे. काका काकू किती त्रासात आहे. आरतीला कोणी काही बोललं तर ती सहन करू शकणार नाही. आधी तिने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. आणि वीर आरती एकमेकांना पसंत करतात. आरतीला समजत नाही. ती रागात आहे. कन्फ्युज आहे ."

"बरोबर आहे. डिसिजन घ्यावा लागेल. आरती अगदी साधी भोळी आहे .म्हणून काळजी वाटते कस होईल तीच."

" तू ठरव. आरती होकार देईल. तिला काही प्रॉब्लेम नसेल. " मीनल.

" मी वरुण सोबत बोलतो. वीरला भेटतो. सांगतो तुला काय ठरत ते. "

हो... मी जाते.

हो. राहुल निघाला. मीनल बाहेर उभ राहून त्याला बघत होती.

0

🎭 Series Post

View all