ओढ तुझी लागली भाग 46
©️®️शिल्पा सुतार
.......
.......
"आरती उठ." सकाळी वीर आवाज देत होता.
"काय आहे?"
"खाली चल वॉक साठी."
"नाही मला झोपायच आहे. किती वाजले?"
"साडे सहा. उठ." वीर तीच ब्लँकेट ओढणार होता. नको अस चांगल वाटत नाही.
"दहा मिनिट झोपू दे. "
"आरती उठ फिट रहायला हव. दोन मिनिटात उठली नाही तर मी पाणी टाकेल."
"काय यार संध्याकाळी नाही जाता येणार का वॉक साठी." आरती उठली. पँट टी शर्ट घालून आली. केसाची पोनीटेल होती. शूज घालत होती ती.
"आरती भारी दिसते तू." ते फिरायला निघाले.
" वीर मला शूज हवे चांगल्यातले. "
" हो घेवू. "
" बरेच ड्रेस. मेक अप. खूप गोष्टी." आरती खूप बोलत होती.
" बापरे. तुला अजून नौकरी लागली नाही. पैसे कुठे आहेत तुझ्या कडे ? "
" तू देणार ना माझा नवरा. होकार दिला ना मी. " आरती हसून बघत होती.
" खरेदीच्या वेळी बरा नवरा आठवतो. आता होकार दिला तर फूल त्रास देणार का? " वीर बोलला .
"थांब बघते जरा." ती त्याच्या मागे पळत होती. वीर अजून पुढे पळाला.
"शनू नाही येत का वॉक ला? "
" आपण सांगू तिला उद्या पासून."
" वीर एक विचारू का?"
हो.
"तू माझ्याशी लग्न का केल? तुला वाईट वाटत होत का माझ लग्न मोडल म्हणून?"
" नाही अस नाही. तुला मी पाहिल्यांदा हॉस्पिटल मधे बघितल होत. तेव्हा मला तू आवडली होती. जेव्हा मला समजल तुझ लग्न दुसरीकडे जमल तेव्हा मला धक्का बसला. मी मनापासून तुला विचारत होतो तुला खरच ते लग्न करायच का ? आणि झाल माझ्या मनाप्रमाणे. सॉरी म्हणजे तू ओके आहे ना."
"हो मला काही वाटत नाही. आता मला इकडे आवडत."
" तुझा हात बघु." आरतीने हातची नस कापून घेतली होती तिथे वळ उमटला होता. "आरती अस परत कधीच करू नकोस. कुठलाच प्रॉब्लेम आपल्या जिवा पेक्षा मोठा नसतो. "
" नाही करणार. तो एक हळवा क्षण होता. नाही कंट्रोल करू शकले मी स्वतःला."
" माझा राग आला असेल ना तेव्हा तुला. जे झाल त्या साठी सॉरी. "
" आता काही नाही माझ्या मनात वीर. माफी का मागतोस? तू चांगला आहेस. मला आधार दिला. नाहीतर काही लोक. माझी चूक नव्हती तरी मला त्यांच्या आयुष्यातून बाजूला काढल. किती तो स्वार्थी पणा. " आरती सिरीयस झाली होती.
" पण आपले फोटो कोणी शेअर केले होते?" वीर विचारत होता.
"मनीषाने. ती पसंत करायची तुला. कधी बोलली की नाही नंतर ती तुझ्याशी ?"
"नाही बोलली काही. "
" छान होते पण आपले फोटो."
हो.. आरती हसत होती.
" वीर तुझ्या मागे खूप मुली होत्या."
"मी आहेच तसा. तु पण मला पसंत करत होती ना कॉलेज मधे? "
हो.
" ते सांग. "
" नाही वीर. "
" काय अस सांग ना. " तो हट्ट करत होता.
" मला तू रोज कॉलेज मधे दिसायचा. खूप हॅन्डसम. मला अस वाटत होत म्हणजे जावू दे. "
" सांग ना. "
" तू हसणार नाही ना? "
नाही.
" एखाद्या मुलीला वाटत एखादा राजकुमार असतो. तो तिला रॉयली ट्रीट करतो. घोड्यावरून घेवून जातो. तसा तू आहे माझ्या साठी. "
" आर यू सिरीयस. तुला अस ही वाटत. "
" मग त्यात काय वीर. "
" खोट असत ते. "
" माहिती आहे माझा राजकुमार किती भांडतो. "
" काय म्हटली?"
"काही नाही. "
" एक मिनिट तू मला भांडकुदळ म्हटली. "
नाही. आरती हसत होती.
" गेली तू आता. "वीर तिच्या मागे आला. पुढे होवुन तिचा हात धरला. हिसका मारून तिला जवळ ओढल. " वीर आपण बाहेर आहोत सोड मला."
" पटकन सांग मी कसा आहे. "
" चांगला एकदम. "
" कोण भांडत आपल्यात?"
मी .
गुड. त्याने तिचा हात सोडला.
" मला घोडा घ्यावा लागेल आता." वीर बोलला.
आरती हसत होती. "कश्याला तुझी बाईक आहे ना. मला तुझी बाईक खूप आवडते."
"जावू आपण लाॅग ड्राईव्हला. "
आरती विचार करत होती .चांगल वाटत याच्या सोबत.
वीर ही विचार करत होता. हिचा हात हातात घेवून छान वाटत. मी असा छान राहील आरती सोबत. काळजी करू नकोस डियर तू होकार दिला म्हणजे काही मी लगेच तुला खूप त्रास देणार नाही. तेवढ समजत मला. आपण असे राहू बरोबर सवय होईल.
" वीर आपण आता गैरसमज करून घ्यायचा नाही. काही वाटल तर डायरेक्ट बोलायच."
"हो चालेल आरती. तुला काही हव असेल तर मला सांग."
"म्हणून तेव्हा बोलले ना शॉपिंग करायची आहे."
"तुझ्या नवर्याची नवीन नौकरी आहे हे लक्ष्यात ठेव."
"तू बॉस ना तिथला."
"हो... तरी सगळ्या गोष्टीला हिशोब असतो. बाबा स्ट्रीक्ट आहेत. मागे इलेक्शनच्या वेळी किती ओरडले होते. खर्च कमी करायला सांगितला होता. पूर्ण हिशोब द्यायला लावला. त्या बदल्यात काम करून घेतल. फ्री काही नाही."
हो का.
दोघ बोलत घरी आले. राहुल सर नंदिनी मॅडम समोर हॉल मधे बसलेले होते. दोघांना एवढ बोलतांना बघून ते खुश होते." बघ होत आहे ना हळू हळू नीट. "
" हो असे राहू दे त्यांना. " नंदिनी मॅडम खुश होत्या.
" गुड मॉर्निंग आई बाबा. "
" आरती झाल का काम तुझ इंटर्नशिपच?" राहुल सर विचारत होते.
"हो बाबा वीरने केल काम. पाठवली मला मेल."
"कधी पासून जॉईन होणार?"
"आता परीक्षा झाली की होणार जॉईन. "
" किती दिवस आहे हे ट्रेनिंग?" नंदिनी मॅडम विचारत होत्या.
" चार महिन्याच सर्टिफिकेट हव."
" आई तुम्ही ऑफिस मधे काय काम करतात?" आरतीने विचारल.
"मी फायनान्स बघते. "
" आई ओव्हरआॅल बॉस आहे. घर ऑफिस सगळ आईच्या अंडर आहे. " वीरने सांगितल.
" मस्त आई. मला ही काहीतरी बनायच आहे. तुमच्या सारख स्ट्रॉग बोल्ड व्हायच आहे." आरतीने सांगितल.
ते बोलत होते आजी आल्या." हे काय घातल आहे तू आरती?" आरती घाबरली. एकदम उभी राहिली.
" आता मुलीना सासर माहेर हे ही समजत नाही. " आजी बडबड करत होत्या.
आरती पटकन रूम मधे निघून गेली.
" आई का बोलते तू तिला. शनाया मी सगळे जीन्स घालतात. पँट वापरतात. आरती छान दिसत होती. " नंदिनी मॅडमने दर वेळी प्रमाणे आरतीची बाजू घेतली.
" असू दे मला नाही आवडल."
आरतीने आंघोळ करून कॉलेजची तयारी केली. वीर तयार झाला. ती तिची बॅग घेत होती.
" आरती तू ठीक आहे ना? "
" हो काय झालं?"
"आजी ओरडली."
"काही हरकत नाही. मला काही वाटल नाही. "
दोघ खाली आले. आरती नेहमी प्रमाणे तीच काम करत होती. शनाया आली." वहिनी तू वॉकला गेली होती का?"
"हो शनु. तु येशील का उद्या पासून?"
"हो येईल मी."
ती कॉलेज मधे आली. लेक्चर सुरू झाल. मीनल, प्रिया, राही आलेल्या होत्या.
" आरती झाल का काम? काय म्हटला वीर?" प्रियाने विचारल.
"हो झाल काम ."
मैत्रिणी खुश होत्या. मीनल तिच्या कडे बघत होती. "मग त्या बदल्यात काय घेतल वीर ने? कशी काय मिळाली इंटर्नशिप? काल पर्यंत तर तो बोलत नव्हता तुझ्याशी ?"
"मीनल शिकवण्या कडे लक्ष दे जरा. आपल काम झाल ते महत्वाच." आरती ओरडली.
" काही तरी गडबड आहे मॅडम."
"अस काही नाही बाबा बोलले म्हणून वीर हो म्हटला." आरतीने सांगितल.
"तरीच म्हटलं अचानक बरी दिली इंटर्नशिप. "
" अग तो बिझी होता वेळ नव्हता त्याला. "
" ओह ठीक आहे. मी खुश आहे तुझ्या साठी. "
आरती छान हसत होती. खर तर ती लाजली होती. मी होकार द्यावा म्हणून वीर किती मागे लागला होता ही गोष्टी तिला आवडली होती.
लंच ब्रेक मधे घरून फोन आला." आरती कॉलेज झाल की ये घरी. "
"आई अस नेहमी नाही येवू शकत मी घरी सांगाव लागेल. मला टेंशन येत ग घरी विचारायला. "
"ये महत्वाच बोलायच आहे." सरला ताईंचा आवाज वेगळा वाटत होता.
" कशा बद्दल?"
"राहुल आणि मीनल बद्दल."
" ठीक आहे येते."
तिने राहुलला फोन केला. " काय झालं दादा?"
"मी घरी सांगितल."
"आईने मला संध्याकाळी बोलवलं आहे. "
" ये तू मी पण लवकर येतो. "
" मीनलला सांगितल का? "
नाही.
" आईच काय म्हणण आहे?"
" काहीच बोलली नाही ती. बाबांना ही सांगितल. मला खूप काळजी वाटते आरती. "
" ठीक आहे काळजी करू नकोस. मीनलला सांगू का? "
" हो सांग मी पण करतो मेसेज. "
" आधी तू कर मेसेज मग मी सांगते. मी वीरला फोन करते तो पर्यंत. "
हो.
तिने वीरला फोन केला.
" बोल काय सुरू आहे." वीर खुश होता.
" बिझी नाही ना? "
नाही.
" मी आज संध्याकाळी आई कडे जाते. " ती सगळ सांगत होती." तु येणार का तिकडे मला घ्यायला? "
" हो येईल ना. "
" मी घरी आईंना सांगते. "
हो.
तिने नंदिनी मॅडम फोन करून बोलून घेतल." ठीक आहे आरती रात्री लवकर ये."
"हो आई. वीर येईल तिकडे तुम्ही पण या ना. "
"नाही ग नंतरच्या कार्यक्रमाला येवू आम्ही. "
" मीनल तुला दादाचा मेसेज आला का?" आरती विचारत होती.
"हो मला भीती वाटते आहे आरती. नक्की काय झालं घरी? तसं काल राहुल बोलला होता की तो आज घरी सांगणार आहे." मीनल फोन बघत होती.
"काही घाबरण्यासारख नाही. लग्न जमल तुझ अस समज. मी घरी जावून बोलते. आई बाबा छान आहेत. उलट चांगल होईल. परीक्षा झाली की करून टाका लग्न."
" अग पण तेव्हा इंटर्नशिप असेल ना. " मीनल विचार करत होती.
" मग काय झाल तिथून जायच. मी नाही का येत माझ्या घरून कॉलेजला. "
" मला जमेल का? घरच करायच असेल. लगेच लग्न नको. आई एकटी राहील. " मीनल बोलत होती.
" मीनल अस करतात का? अग परीक्षा ट्रेनिंग काहीना काही तर सुरू असेलच. किती दिवस लग्न पुढे ढकलणार. आपण काकूं साठी आईच्या घरा जवळ घर बघू. नाहीतरी आमच घर मागच्या रूम रेंटने दिल्या आहेत ना त्यातल्या दोन रूम मोकळ्या करून घेवू. काकू तुझ्या जवळ राहतील. "
मीनल तरी काळजीत होती.
" मीनल एक विचारू? तुला करायच ना दादा सोबत लग्न?"
" हो आरती. राहुल खूप चांगला आहे. त्याच्या सोबत माझ चांगल होईल. "
" मग काय विचार करते आहे. "
" काही नाही असच आईची काळजी वाटत होती. पण तू म्हणते तस आई राहील जवळ. "
कॉलेज झाल्यावर ती मीनल सोबत आई कडे गेली. "आत ये मीनल. "
" नको मी संध्याकाळी येते राहुल आला की. "
" अग चल आम्ही काही तुला बोलणार नाही. "
" राहुलने सांगितल संध्याकाळी ये. तो फोन करेल."
"ठीक आहे मी तो पर्यंत आईशी बोलते. "
आरती आत गेली. सरला ताई आजी बोलत होत्या. आरती गेल्यामुळे त्या खुश होत्या.
"जेवुन घे चल."
आजी पण डायनिंग टेबल वर येवुन बसल्या.
"काय झालं आई? काय म्हटला दादा?" आरतीने विषय काढला.
"तो आणि मीनल पसंत करतात एकमेकांना."
"तुझ काय म्हणण आहे आई? "
" मीनलला लहान पणा पासुन बघितल आहे. काही हरकत नाही."
"बाबांना माहिती आहे का?"
"हो राहुलने आम्हाला दोघांना सांगितल."
"आजी तुझ काय म्हणण आहे?"
"ती पँट घालते. भांडते .मुलीं सारखी रहात नाही. काही येत की नाही स्वयंपाक पाणी. मला तर काही खर वाटत नाही तीच. "
"आजी हे अस आहे. तू बघितल नाही का मीनलला आपल्या कडे काम करतांना. तुझ्याशी भांडली का ती कधी? सांग आजी? "
नाही.
" मग उलट बोलली का काही? "
नाही.
" अपमान केला का? "
नाही.
" उलट ती मदत करते ना आपल्याला. आई बाबांशी नीट वागते. माझी लहानपणापासूनच मैत्रीण आहे. एकदा ही भांडली नाही. ती उलट माझी बाजू घेतली. मनाने खूप चांगली आहे ती. सांभाळून घेणारी आहे. कपडे बाहेरील दिखावा महत्वाचा नसतो ना आजी. मन चांगल हव. माणूस म्हणून ती व्यक्ति कशी आहे ते महत्त्वाच आहे. ती आईला सांभाळून घेईल. नीट करेल ती. आपला दादा भोळा आहे त्याला तीच साथ देईल. मेन म्हणजे दोघांच खूप पटत. अजून काय हव आपल्याला. आपल्या मुलांचा संसार नीट व्हावा हेच तर वाटत ना एका आईला. "
" हो बरोबर आहे. "
" आई आजी अजून एक बोलायच होत. "
" काय झालं?"
" मीनलला वडील नाही. तिची आई एकटी कशी राहील? त्यांना आपल्या त्या बाजूच्या मागच्या दोन रूमच घर ते मोकळ करून देता येईल का? तो भाडे करू कधी जाणार आहे? "
"तो मुलगा त्याला सिंगल रूम हवी आहे. त्याला बाजूला शिफ्ट करू. मीनलच्या आईला ती रूम देवू." सरला ताई बोलल्या.
"आजी ठीक आहे ना? "आरतीने विचारल.
" हो बेटा काही हरकत नाही. मी पण तुझ्या आजोबां शिवाय खूप वर्ष काढले आहेत. मला माहिती आहे एकट्या बाईला अस राहण किती अवघड आहे. मला काही हरकत नाही."
आरती खूप खुश होती." आई आजी तुम्ही दोघी खूप खूप चांगल्या आहात. मी दादा आणि मीनल साठी खुश आहे. आपण मीनल आणि काकूंना बोलवू या का संध्याकाळी घरी. "
" हो चालेल. "
मी दादाला फोन करते. तिने राहुलला फोन केला. त्याला काय काय झाल ते सांगितल." मीनल आणि काकूंना बोलवू या घरी आज. मला सारख येतं येणार नाही. "
" हो चालेल. "
सरला ताई फोन लावला. मीनलच्या आईशी बोलून घेतल. त्या येणार होत्या. त्या नंतर त्यांनी नंदिनी मॅडम फोन करून सगळ सांगितल.
"ही आनंदाची बातमी आहे. तुमच अभिनंदन." नंदिनी मॅडम बोलल्या.
"तुम्ही या ना आज इकडे."
"ऑफिस मधे आहे. पुढच्या कार्यक्रमाला येईल मी."
"ठीक आहे. "
आरतीने बाबांना फोन करून सांगितल. ते पण लवकर येणार होते.
वीरला त्यांनी फोन केला. "बोला बाबा."
सतीश राव सांगत होते. "तुम्ही घरी लवकर या."
" हो बाबा."
वरुण घरी आला. सगळ ऐकुन तो खुष होता.
"रात्री काय करू या ग सगळे येतील. " सरला ताई विचारत होत्या. त्या आरती मिळून ठरवत होते.
"पाव भाजी ठेवा." वरुणने सुचवल.
"चालेल का आई? म्हणजे खूप पोळ्या नाही कराव्या लागणार."
"हो चालेल. वरुण सामान घेवून ये. "
हो.
सरला ताईंनी लिस्ट दिली.
" थोडा स्वयंपाक करून घेवू."
हो. दोघी कामात होत्या.
सतीश राव पेढे गुलाब जाम घेवून आले.
ते सरला ताई आरतीशी छान बोलत बसले होते. "आरती तुझ्या साठी हा खाऊ. "
" बाबा किती खाणार मी. "
"घरी घेवून जा. "
हो.
तिच्या आवडीचा फरसाण होता. चिवडा होता. काजु कतली होती. चॉकलेट होते. तिने तीच सामान नीट ठेवल. प्रकाश, राकेश आले तर घेतील. सरला ताई हसत होत्या. मोठे झाले तरी किती भांडतात अजून हे.
"आई आजीला सांगितल का राहुल दादाच ?" वरुणने विचारल.
"हो त्यांना काही प्रोब्लेम नाही."
"कस झाल हे आश्चर्य?"
"आरतीने समजून सांगितल."
"आरती माझ्या वेळी हे लक्ष्यात ठेव."
हो.. आरती हसत होती.
सतीश राव. सरला ताई त्याच्या कडे बघत होते. तो बाहेर पळाला.
......
......
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा