ओढ तुझी लागली भाग 47
©️®️शिल्पा सुतार
.......
.......
राहुलच्या घरी जायच म्हणून मीनल टेंशन मधे होती. आजी डेंजर आहेत. आज नक्की त्या ओरडतील. मला या आधी एवढी भीती कधी वाटली नव्हती. तिने पूर्ण कपाट बाहेर कॉटवर काढून ठेवल होत. ती त्या कपड्यांकडे बघत होती.
" आवरल का मीनल काय आहे हे? " काकू बघत होत्या. किती तो पसारा.
" आई कोणता ड्रेस घालू? "
"कोणताही घाल पण आटोप लवकर . यात ड्रेस कमी आहेत. पँट जास्त आहेत. का काढले एवढे ड्रेस बाहेर?"
" आई एका ड्रेसची ओढणी मिळत नाही तर एकाची सलवार. "
" आधी कपडे नीट नाही का ठेवता येत मग? दर वेळी मी सांगते तुझ कपाट आवर. पण नाही ऐकायच तुला. तो घाल निळा. "
"नको त्यात मी जाढ दिसते. " मीनल ड्रेस हातात घेवून आरश्यात बघत होती.
"काहीही काय मीनल? ठीक आहे पिवळा घाल. "
" आई त्याची ओढणी सिम्पल आहे. "
" मग हिरवा? "
" नको इतका लग्नाला गेल्या सारखा. "
" तू तुझ्या मनाने घाल मग ड्रेस. नाहीतर हे घे पैसे नवीन ड्रेस घेवून ये पटकन. "
" नको कशाला खर्च."
"मीनल जायच आहे की नाही?"
"आई हा पिंक घालू का?"
"हो आटोप आता. "
मीनल इस्त्री करत होती.
त्यांची तयारी झाली. राहुलचा फोन आल्यावर त्या रिक्षाने आरती कडे आल्या.
वरुण नेहमी प्रमाणे बाहेर होता प्रकाश सोबत. तो मीनल कडे बघून हसत होता. या काकू.
" आई हा वरुण आहे. राहुलचा भाऊ. " त्या हसल्या. आत येत होत्या. वरुण मीनलला तू गेली असा इशारा करत होता.
"काय झालं वरुण?" तिने हळूच विचारल.
"वातावरण तापलेल आहे. सगळे चिडले आहेत तुझ्या वर. आजीने नकार दिला. आरतीने खूप समजवल. काही उपयोग नाही. तुला आजी ओरडणार."
"आत जावू की नको मग? आजी कुठे आहे ?"
"आजी किचन मधे असेल. ऑल द बेस्ट. बोलणे खायची तयारी ठेव."
मीनल खूप घाबरली होती. त्या दोघी आत येत होत्या. " मीनल अग तु अस सगळ्यांना नावाने बोलवू नको. "
" मग काय म्हणू आई? "
" अहो म्हणाव."
"आई इथे मला आधीच टेंशन आल आहे. नको ना आता. आजी ओरडल्या तर."
" म्हणून म्हणते नीट वाग. ज्याला त्याला त्यांचा मान दे. पाया पड आजींच्या."
हो.
आरती पुढे गेली. "या काकू ये मीनल. बसा ना. आई काकू आल्या. "
सरला ताई किचन मधे होत्या. त्या बाहेर आल्या. मीनल उठून उभी राहिली. तिने सरला ताईंच्या पाया पडल्या. "असू दे."
त्या दोघी बोलत होत्या." आरती आजींना बोलाव."
" हो आई. "
सतीश राव येवून बसले. आजी आल्या. मीनलने दोघांच्या पाया पडल्या. आरती चहा ठेवायला किचन मधे गेली. मीनल तिच्या मागे गेली. ती बघत होती आजी काय म्हणताय. पण त्या गप्प होत्या.
" आरती मी करते चहा."
"असू दे मीनल बस तू ."
"आरती काय झाल ग? काय म्हणताय सगळे? आजी ठीक आहेत ना?"
मीनल घाबरली हे बघून आरती हसत होती. " काय सांगू आता मी मीनल. सासरी अस असत. अर्धे लोक आपल्यावर चिडलेले असतात. का ते पण माहिती नसत ग. अशी मनधरणी करत रहायचं. " मला त्रास देते का रोज ही मीनल आता बघते जरा. "
"आता ग? वीर कडे ओरडतात का तुला?"
"हो मग आजी काम देतात. ओरडतात. इकडे तरी राहुल दादा तुझ्या साईडने आहे तिकडे मला वीर हेल्प करत नाही. काय सांगू मी. तुला तोंड द्यायच आहे या पुढे सगळ्यांना. मी काय आज रात्री चालली जाईल माझ्या घरी."
" आरती तुझे आई बाबा वरुण चांगले आहेत. "
" आजीच काय ? त्यांना सांभाळ. "
हो. मीनल परत टेंशन मधे होती.
बाहेर आवाज येत होता. राहुल आला होता. तो आत आवरायला गेला. राहुल आला मीनलला बर वाटत होत. आज राहुलशी बोलता आल तर बर होईल.
सतीश राव आत आले. मीनल आरती बोलत होत्या. मीनल गप्प उभी राहिली.
"आरती वीर कधी येत आहेत? त्यांना फोन करून बघ ."
"हो बाबा."
"जा तू आरती मी बघते चहाच. "मीनल बोलली.
आरतीने फोन लावला.
"आरती तू मला काही काम करू देणार आहे का आज?" वीर हसत म्हणाला.
"वीर तू आईकडे केव्हा येणार आहे बाबा विचारत आहेत."
"थोड्या वेळाने."
"सगळे वाट बघत आहेत. "
" तू पण का? "
आरती हसत होती. "इथे चालल काय आहे. काहीही बोलू नकोस. सगळे जमले आहे ये ना लवकर."
" हो निघतो. अर्धा तासात येतो. "
" बाबा येत आहेत ते." आरतीने सांगितल. सतीश राव बाहेर जावुन बसले.
"तू वीरला अहो म्हटली."
"हो वीरच्या आजी ओरडतात. ही पण आजी ओरडते. "
" मला ही अहो बोलाव लागेल का? "
" तुझ तू बघ. "
" आरती आजींनी नकार दिला ना. वरुण सांगत होता. " मीनल टेंशन मधे होती.
" नाही ग अस काही नाही तो वरुण दादा चिडवतो तुला माहिती आहे ना."
वीर राहुल सर केबिन मधे आला. "बाबा मला आरती कडे जायच आहे. मी लवकर निघू का. "
" हो.. मला ही आला होता त्यांच्या फोन. "
"तुम्ही येत आहात का?"
"नाही जमणार. एवढ्या लोकांच काय काम आहे. तू जावून ये ."
वीर निघाला.
सगळे पुढे बसलेले होते. वीर आला. आरती... ती बाहेर आली. वीर तिच्या सोबत होता . मी आलोच फ्रेश होऊन. त्याने त्याची बॅग आरती कडे दिली. दोघ आत आले.
"आरती ही तुझी रूम आहे का?"
"हो माझी आणि आजीची."
"हा तुझा बेड का?"
हो.
"किती कंफर्टेबल आहे ." छान सजवली होती तिने रूम.
"तुला सॉफ्ट टाॅईज आवडतात ना? "
"हो. मी घरी घेवून येवू का? "
" हो तुला हवे असतिल तर घे. तसा आपल्या कपाटात ऑलरेडी एक आहे . "
"कोणता?"
"पिंक."
" तू माझ्या कपाटाला का हात लावला? " आरती ओरडली.
" तू नव्हती तर तुझी आठवण येत होती. " वीर आरती कडे बघत होता. ती त्याच्याकडे बघत होती . तिला वाटल नव्हत वीर अस म्हणेल. तिने एकदम खाली बघितल. वीर पुढे झाला. ती मागे सरकली. काय करू आता . ती भिंतीला जावून टेकली. तो अजूनही तिच्या कडे येत होता. त्याने तिच्या बाजूने खाली वाकून टेबल वरचा टॉवेल उचलला. आलोच फ्रेश होऊन. तो गेल्यावर आरतीने मोकळा श्वास घेतला. मला वीर सोबत काही सुचत नाही.
वीर बाथरूम मधे होता. आरतीला आता वाटल मी काही करतो की काय. तो हसत होता. तिने होकार कसा दिला माहिती आहे. इंटर्नशिप साठी ती तयार झाली. मुद्दाम केल मी हे. अस सोबत राहिलो तर ती कंफर्टेबल होईल. बोलेल थोड. मग मनापासून होकार देईल. तो पर्यंत मी वाट बघेन. लव यू आरती.
"अटोप ना वीर. बाहेर सगळे वाट बघत आहेत. " आरती आवाज देत होती.
" पाच मिनिट ." तो बाहेर आला. खूप फ्रेश दिसत होता. तो शर्टची बाही वरती फोल्ड करत होता. आरती त्याच्या कडे बघत होती. खूप हॅन्डसम आहे हा.
"मदत कर." त्याने हात आरती पुढे धरला.
"तू कर ना तुझी तुझी तयारी."
"आता उशीर नाही होत का आरती. तू हेल्प केली तर लवकर आटपेल आपल. नाहीतर तुझ्या घरचे विचार करतील हे दोघ काय करता आहेत आत." वीर हसत होता. आरतीला हसू येत होत पण ती हसली नाही. काहीही बोलतो हा.
"ठीक आहे मी आरामात आवरतो मग, पटकन बाहेर येणार नाही. कोणाशी जास्त बोलणार नाही." वीर मुद्दामून बोलला.
"ब्लॅक मेल करतोस का?"
हो.
" दे हात. " आरतीने एक बाही फोल्ड करून दिली.
" वीर एक बोलायच होत."
काय?
"म्हणजे बळजबरी नाही पण तरी ही." ती अडखळली.
वीर तिच्या कडे बघत होता." काय झालं आरती मोकळ बोल. "
" वीर राहुल दादा करेल लग्नाचा खर्च पण त्याची ही नवीन नौकरी आहे. मीनल कडून खर्च शक्य नाही. मला माहिती आहे मी अजून काही कमवत नाही. तरी मला वाटत होत मी काहीतरी मदत करावी लग्नात. म्हणजे आपण दोघांनी."
"काही हरकत नाही आरती. आपण करू. "
" आपला किती बॅलन्स आहे?" आरती विचारत होती.
" माझ्या कडे भरपूर पैसे आहेत. किती हवे ते सांग. "
"माझ्या कडे ही आहेत थोडे."
"किती?" वीर उत्सुक होता.
"माझ्या कडे साठ हजार आहेत. आई बाबा माझ्या अकाऊंट वर नेहमी पैसे टाकतात. "
"तुझे असू दे. आपण तुझ्या अकाऊंट वर या पुढे पैसे साठवू. आता माझ्या कडून घे."
" ते घेणार नाहीत आपल्याला काहीतरी बोलाव लागेल."
" चालेल. आपण हॉल ची वगैरे जबाबदारी घेवू."
"वीर मला माहिती आहे तुझी पण नवीन नौकरी आहे. "
" आरती काही प्रॉब्लेम नाही. चल आता. नाहीतर बाकीचे खरच बोलतील की काय सुरू आहे आत. " आता ते दोघ हसत होते.
थॅन्क्स.
" अस चालणार नाही नुसत थॅन्क्स काय. "
मग? आरती लाजली.
"सांगेन नंतर. "
दोघ बोलत बाहेर आले. त्यांना प्रेमाने बोलतांना पाहून सगळे खुश होते.
सरला ताई, मीनल चहा देत होत्या. वीर मीनल सोबत हसला. राहुल, वरुण बसलेले होते, सतीश राव वीर सोबत बोलत होते.
आरती ओळख करून देत होती
वीर ह्या मीनलच्या आई
आणि हे वीर माझे मिस्टर.
आणि हे वीर माझे मिस्टर.
नमस्कार.
राहुल, मीनल समोर बसले होते. आरती वीर सोबत होती. वरुण, सतीश राव सोबत होते. आजी सरला ताई समोर बसलेल्या होत्या.
"राहुल मीनल काय म्हणण आहे तुमच? " त्या बोलल्या.
दोघ एकमेकांकडे बघत होते. "आम्हाला लग्न करायच आहे."
"तुम्ही कधी पासून सोबत आहात ?"
"ओळख आधी पासून होती. आताचा ठरवल लग्न करायच ते."
" मग तुम्हाला वेळ हवा का? की ठरवायचं पुढे. "
राहुल आरती कडे बघत होता.
" ठरवून टाकू आता दादा आणि मीनलच लग्न. ते पसंत करतात एकमेकांना. दादा ही सेटल आहे. काय हरकत आहे. हो ना बाबा ."
"बरोबर बोलते आहे आरती." सतीश राव बोलले.
सगळे ठरवत होते काय काय करायच. परीक्षा झाली की करून टाकू लग्न. राहुल खुश होता. मीनल शांत होती.
"काय झाल मीनल बोल मोकळ. "
" त्या वेळी माझ इंटर्नशिप असेल. "
" तू जा ना मग रोज. "
" जास्त सुट्ट्या घेता येणार नाही. "
चालेल.
ती राहुलशी हळू हळू बोलत होती. चेहरा उतरलेला होता. आरती लांबून बघत होती. पण कस काय सारख मधे मधे करणार. ते कपल आहेत. काही वाटल तर सांगतील.
आरती बाबा आणि वीर सोबत होती. वरुण त्यांच्या सोबत होता. चक्क वीर वरुण छान बोलत होते. वरुणला काम हव होत तर तो थोड वीरला माहिती विचारत होता. आरतीला बर वाटत होत. तिला त्या दिवशीचा हॉस्पिटल मधला प्रसंग आठवला दोघांनी किती मारामारी केली होती त्या दिवशी. असेच नीट रहा आता.
"आरती इकडे ये ना." आरती राहुल मीनल जवळ गेली.
"काय झालं दादा?"
" मीनलला काकूंची काळजी वाटते आहे ."
"काकू रहातील आपल्या जवळ. मागच्या रूम आहेत ना त्यातली दोन रूम असलेली रूम खाली होते आहे. मी बोललो आई सोबत. होवुन जाईल ते काम एका महिन्यात." आरती सांगत होती.
"चालेल का मीनल? " राहुल विचारता होता.
मीनल हो म्हटली.
"वाह.. आता काय बाबा मीनल वहिनी म्हणेल तेच होईल इकडे. दादा किती काळजी करतो आहे एका मुलीची. " आरती तिला चिडवत होती. मीनल राहुल हसत होते.
गुरुजी आले. लगेच एका महिन्या नंतरचा मुहूर्त होता.
काकू, सरला ताई सोबत गुरूजींशी बोलत होत्या. दोघींनी मिळून ठरवल. त्यांच्यात राहुल मीनल उभे होते.
" तुमच्या काय अपेक्षा आहेत आमच्या कडून? लग्न कस व्हायला हव. काही असेल तर सांगा. नाहीतर मी साध्या पद्धतीने लग्न करून देईल. " मीनलच्या आई बोलत होत्या.
"काकू तुम्ही एकट्या नाही आहात. मी आणि वीर आहोत तुमच्या सोबत. आपण दणक्यात करू लग्न. तात्पुरती तेव्हा मी मीनलच्या बाजूने होईल. " आरती बोलली.
" अजिबात नाही आरती. मी थोडे पैसे बाजूला टाकले आहेत. ते वापरणार. " त्या हळूच बोलल्या.
त्या दोघीं जवळ वीर आला. "काकू आरती बरोबर बोलते. मीनल मला बहिणी सारखी आहे. आम्ही मदत करणार. "
" नाही तुम्ही दोघ अस काही करणार नाही. "
" आम्ही ऐकणार नाही." आरती वीर म्हणाले.
" पूर्ण नाही थोडी मदत घेईन मी. "
राहुल उठून आला." मी बोलू का थोड. माझ लग्न मी करणार. कोणीही गडबड करायची नाही. काकू तुम्ही नाही. आरती वीर अजिबात नाही. आणि मला आणि मीनल ला अत्यंत साध्या पद्धतीने लग्न करायच आहे. "
हो. मीनल बोलली.
" आम्हाला काही ऐकु आल नाही. लग्ना साठी रिसॉर्ट बूकिंग आम्ही करू . " आरती म्हणाली.
सतीश राव, सरला ताई ऐकत होते.
" नाही आरती आम्हाला विधी महत्वाचे आहेत साध्या पद्धतीने लग्न होणार. घरचे मोजके लोक हवे. " राहुल बोलला.
" ठीक आहे पण मग लग्न कुठे करणार?"
"छोटा हॉल घेवू त्यात फक्त घरचे जवळचे लोक यांना बोलवू. मला गडबड गोंधळ आवडत नाही. "राहुल म्हणाला.
"आणि मीनलला काय वाटत. " आरतीने विचारल.
" आम्ही दोघांनी मिळुन ठरवल आहे हे. " मीनल म्हणाली.
" चालेल. खरेदी वगैरे आधी करून घेवू. " सरला ताई मीनलच्या आईला बोलत होत्या.
हो.
" अजून एक बोलायच होत आई बद्दल." मीनल सरला ताईंना म्हणाली.
" हो तू काळजी करू नको मीनल त्या रहातील इकडे."
कोण?
"काकू तुम्ही आमच्या सोबत इकडे रहायला या." आरतीने सांगितल.
नाही.
"आई याव लागेल." मीनलला हीच एक काळजी होती.
"अग मुलीच्या सासरी कस राहणार. "
" तुम्ही एकट्या काय करणार त्या पेक्षा इथे रहा."
"मी तुमच्या कडे नाही राहू शकत. "
" मागे आमचे घर आहेत. तिथे राहणार का?"
"मी विचार करेन. "
"विचार नाही आई हो म्हण तरच मी लग्नाला हो म्हणेल मी तुला एकटीला तिकडे नाही राहू देणार बाजूच्या बाई भांडतात. " मीनल काळजीत होती.
"मीनल आता नको बोलायला. "
"आता ठरव आई. "
राहुल पुढे आला." आई प्लीज इकडे शिफ्ट व्हा. आम्हाला बर वाटेल. नाहीतर मीनल मला लग्नाला होकार देत नाही प्लीज. "
" बर येईल मी. पण माझ माझ सेपरेट राहीन. " त्या आजींकडे बघत होत्या.
" मला काही अडचण नाही बाई. उलट तुम्ही इकडे आल्या तर सगळ्यांना एकमेकींचा आधार होईल. " आजी बोलल्या.
लग्न छान हॉल मधे करू. मेहेंदी हळद सगळे प्रोग्राम करू. सगळे ठरवत होते. काय काय करू या.
आता वीर चक्क वरुण सोबत बाहेर उभ राहून बोलत होता त्याच्या सोबत प्रकाश राकेश इतर दोन मुल ही होते. ऑफिस बद्दल गप्पा सुरू होत्या. कोणी त्यांना बघितल असत तर आश्चर्य चकित झाले असते.
"वरुण तु मला उद्या फोन कर. कॉलेज कधी संपेल कधी पासून काम सुरू करशील सगळे डिटेल्स दे. आपण बघु काय करता येईल."
"आमच काय?" राकेश प्रकाश विचारत होते.
"तुम्ही आधी शिक्षण पूर्ण करा प्रकाश राकेश."
"माझ झाल आहे शिक्षण." राकेश बोलला.
"ठीक आहे तुझ काम करून टाकू. तू तुझे डॉक्युमेंट्स मला मेल कर आणि प्रकाश नीट अभ्यास कर. "
हो.
सगळे निमुटपणे वीरच ऐकत होते.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा