Login

ओढ तुझी लागली भाग 48

ज्याच्यावर प्रेम असत तो मिळतोच ही कथा आहे आरती आणि वीर ची

ओढ तुझी लागली भाग 48

©️®️शिल्पा सुतार
.......

मीनल, राहुल, आरती टेरेस वर आले. "तुम्ही बोला मी आलेच." आरती निघून गेली.

राहुल मीनल कडे बघत होता. "झाल ना सगळं मना प्रमाणे की अजून काही आहे?"

"राहुल लगेच लग्न म्हणजे घाई नाही ना होत."

" लग्न करून घेवू. आज नाही तर थोडे दिवसानी करायच आहे ना. एक मिनिट मी पसंत तर आहे ना तुला? नाहीतर म्हणायची मला कोणी विचारल नाही."

मीनल हसत होती.

"सांग ना मीनल." राहुल तिच्या कडे बघत होता.

"सगळे म्हणतात तू शांत आहेस बोलत नाहीस. पण तू बाकिच्यां साठी वेगळा. माझ्या साठी वेगळा आहेस."

" म्हणजे कसा नीट सांग. "

" नको ना राहुल. "

" सांग पटकन. नाहीतरी घरी जाता येणार नाही. खाली जावून लगेच लग्न करू. "

काहीही. मीनल हसत होती. राहुलने तिचा हात धरला. ती हात सोडवून घेत होती पण त्याची पकड मजबूत होती. मीनल तिथे उभी होती.

"मीनल आता हो नाही नको छान सोबत राहू. "

" हो चालेल. "

राहुलने तिला मिठीत घेतल.

मीनल पटकन बाजूला जावून उभी राहिली." याला काय अर्थ आहे मीनल? आता आपण नवरा बायको होणार आहोत. तू माझ्या बद्दल काय वाटत ते सांगत नाही जवळ येत नाही. अस कस चालेल. "

"राहुल त्रास देवू नको. कोणी येईल. "

" दार लावू का? "

"नाही नको. तू पण जरा शांत रहा ना. अजून महिना आहे आपल्या लग्नाला. "

" त्या आधी थोडा ट्रेलर दाखवु दे." मुद्दाम राहुल मीनलच्या मागे येत होता. मीनल पुढे पळाली." खाली चल राहुल. मला काम आहेत. "

सरला ताई आरतीला आवाज देत होत्या. चला जेवून घ्या.

ते दोघ खाली आले. मीनल किचन मधे उभी होती. आरती कामात होती." काय मग मीनल वहिनी काय म्हटला दादा?"

" काही नाही. " ती लाजली होती.

"जेवण जाईल ना."

"आरती पुरे."

"आता का? मला वीर वरुन नेहमी चिडवत असतेस. मी तुला सोडणार नाही. हा बघ दादा आला तुझ्या मागे."

राहुल आत येवून पाणी पीत होता.

"कुठे आहेत बाकीचे दादा बोलव त्यांना जेवायला."

मुल आत आले. सगळे आश्चर्याने बघत होते. वीर मधे बसलेला होता. त्याच्या एका बाजूला वरुण दुसर्‍या बाजूला राकेश प्रकाश असे डायनिंग टेबल वर बसले होते. छान गप्पा सुरू होत्या त्यांच्या. "असच राहायच होत तर आधी का भांडले हे? "

राहुल आरती हसत होते. मीनल आली ती पण बघत होती. हे कसे काय बोलता आहेत. समोर राहुल सतीश राव बसले होते. एका बाजूला आजी होत्या. सरला ताई, आरती, मीनल तिची आई सगळे दुसरीकडे बसले.

"वरुण, राहुल तिकडे काय हव ते बघा." सरला ताईंनी सांगितल.

हो.

छान जेवण झालं. आवरून झाल. आम्ही निघतो आता मीनल सरला ताईंना सांगत होती.

"थांब मीनल आम्ही निघतो आहोत तुम्हाला घरी सोडतो."

आरतीने एका बॅग मधे तीच सामान घेतल. कॉलेजची बॅग तिची पर्स होती. एक कपड्याची बॅग होती. "किती ते सामान काय आहे यात." वीर बघत होता.

"असू दे माझ आहे हे. धर जरा . आई माझी पाण्याची बाटली दे."

आरतीने बाहेरून एक दोन चप्पल एका बॅग मधे भरून मोठ्या बॅग मधे टाकल्या. एक मोठा टेडी बेअर घेतला. सगळे बघत होते.

"झाल का?" वीरने परत विचारल.

हो... तिने आजीला मिठी मारली काळजी घे.

"तू येत रहा अधून मधून. "

"हो आता परीक्षा आहे तेव्हा येईल मी." ती आई बाबा दोघांना भेटली. राहुल ,दादा वरुण दादा बाय. ते कार मधे बसले.

"मी करतो वीर फोन." वरुण बोलला.

" हो नक्की."

मीनल आणि काकू मागे बसल्या होत्या. त्यांच घर आल.

"आरती, वीर आत येता का ?"

"नाही उशीर होतो आहे. उद्या भेटू कॉलेज मधे. "

काकू, मीनल खाली उतरल्या. "चल ना आरती पाच मिनिट. जावई पहिल्यांदा आले."

आरती वीर कडे बघत होती. त्याने कार बाजूला लावली. ते आत गेले. खूप साध दोन रूमच घर होत. नीटनेटक.

बसा.

दोघ काॅटवर बसले.

" चहा घेता का?"

" नको काकू."

" मी साखर आणते. " त्या किचन मधे गेल्या.

मीनल समोर बसलेली होती. "मग काय मॅडम खुश ना. "

" चूप ना. "

वीर, आरती, मीनल हसत होते.

"आपल्या ग्रुप मध्ये सांग. "

हो.

काकू शंकरपाळे घेवून आल्या." हे घे आरती."

"वाह काकू थँक्स. वीर हे माझ शाळेत सगळ्यात आवडत स्नॅक्स होत. मीनलचा डबा मीच खायचे."

"म्हणून दिल हे."

"एवढे का? काकू तुम्हाला आहेत ना?."

" हो आहेत." खारे, गोड दोन बरण्या होत्या.

" थँक्यू आम्ही निघतो आता."

हो.

आरती रस्त्यात शंकरपाळे खात होती.

वीर बघत होता. " पोट भरलं नाही का? "

" घे तू पण खा. "

" वाह काय चव आहे. क्रीस्पी एकदम. "

"मग काकू खूप छान करतात हे. "

"अजून दे ते बघू. "

" माझ्या कडे अजुन खावु आहे. चिवडा एकदम छान."

" तो कोणी दिला? "

" बाबानी आणला आणि चॉकलेट ही."

" खूप खावू नको जास्त जाठ होशील. "

"अभ्यास करतांना खाणार. शनायाला पण देणार. "

" माझ काय? "

" तुला नको ना जाठ होशील तू. "

"थोडस खायला हरकत नाही."

ते घरी आले. राहुल सर, नंदिनी मॅडम, शनाया, आजी पुढे बसलेले होते.

"बर झालं वहिनी तू आली मला बोर होत होतं. "

"हो जसे इतके दिवस ति इकडेच रहात होती. " आजी बोलल्या.

" बॅग मध्ये काय आहे? " शनाया विचारत होती.

"माझं सामान आहे आणि खाऊ आहे हा."

" एवढा खाऊ. "

" हो शंकरपाळे मीनलच्या मम्मीने दिले. हा बाकीचं खाऊ माझ्या बाबांनी आणला. "

"शनु छान आहेत शंकरपाळे. चिवडा खाल्ला नाही मी अजून." वीर सांगत होता.

"काय झालं ठरलं का तुझ्या भावाचं लग्न." नंदिनी मॅडम तिच्याशी बोलत होत्या.

" हो. आता परीक्षा झाली की लगेच आहे लग्न. "

" मीनल ताई सोबत ठरलं ना? "

" हो आपल्याला खूप मजा करायची आहे त्या लग्नात. "

"आरती आधी परीक्षा आहे हे लक्षात ठेव. " वीर बोलला.

हो.

आरतीने बॅग मधून सगळा खाऊ टेबल वर काढून ठेवला. काजू कतली फ्रीज मधे ठेवली. सरला ताईंनी पेढ्याचा बॉक्स दिला होता तो आईं कडे दिला.

"मी उद्या फोन करेन ह तुझ्या घरी. " त्या म्हटल्या.

हो. आरती खुश होती.

ती राहुल सरांना पेढा देत होती." बाबा तुम्ही लग्नाला यायच."

"हो नक्की."

ती आजींना पेढा द्यायला गेली. त्या आरती कडे बघत होत्या. " तुझ्या घरच्यांनी आज नंदिनीला, राहुल रावांना बोलवायला हव होत तिकडे. त्यांच्या मुलीला बोलवलं म्हणजे झालं का. जरा म्हणून पद्धती माहिती की नाही तुम्हा लोकांना. मुलाकडच्या मान द्यायला नको. नीट वागायला नको."

आरती घाबरून आजीं कडे बघत होती. बाकीचे ऐकत होते. राहुल सर नंदिनी मॅडम कडे बघत होते.

" विर तू ही का गेला तिकडे. तुझ्या आई बाबा बोलवल नाही. तू बोलायला पाहिजे होत त्यांना. " आजी अजून चिडलेल्या होत्या.

विर, शनाया, आरती कडे बघत होते ती नुसती उभी होती.

" आजी आईने फोन केला होता. " आरती हळूच बोलली.

"गप्प बस काही बोलू नको. मोठ्यानं उलट बोलायच अस शिकवल वाटत तुला."

आरती रडायवर आली होती." नाही आजी ऐकुन तरी घ्या."

" आई का बोलतेस तू आरतीला. तुला माहिती का काय आहे खर ते. आरतीच्या घरच्यांनी मला दुपारी फोन केला होता .मी बिझी होते. काय हे तू सारख तिला बोलत जावू नकोस. मला आवडत नाही फाॅरमॅलीटी. तिच्या घरचे तिला घरी बोलवतात त्यात काय. तिने जायला पाहिजे. तिच्या भावाला तिची गरज आहे. सारख तिचा छळ करू नकोस. आरती आय एम सॉरी बेटा. आजीच वय झाल. आधी नव्हती ती अशी. आता का अस करते ना समजत नाही. मी समजावते तिला." नंदिनी मॅडम बोलल्या.

" आई मी ठीक आहे. मला राग नाही आला." मी जाते रूम मधे. आरती वरती निघून गेली.

वीर नुसता बसलेला होता. राहुल सर आत निघून गेले. आजी पण झोपायला गेल्या .शनाया चिडलेली होती. "आई तू आजीला एकदा नीट समजवून सांग ना. ती सारख वहिनीला बोलते. तुम्ही लोक नसतात तेव्हा ही त्रास देते वहिनीला. काहीही बोलते. वहिनी घाबरून असते आजीला."

" हो मी उद्या बोलते."

"मी आत जातो. "

"ठीक आहे वीर तू जा रूम मध्ये आरती कडे बघ."

नंदिनी मॅडम आत आल्या राहुल सर चिडलेले होते. " सॉरी राहुल माझी आई कशी करते. तरी मी बोलली आता तिला."

" तू का माफी मागते?"

"एक तर आरती आता थोडी वीर सोबत बोलत होती. या घरात हसत बोलत होती. आज परत घाबरली ती. मला काळजी वाटते कस होईल. "

" नंदिनी राग मानू नको पण आता आजींना गावाला जावू दे."

"हो मलाही तेच वाटत. माझ्या भावाला किती त्रास असेल. आई वहिनीला नेहमी बोलते काय कराव. "

" एकदा थोड बोलून घे ना आजीं सोबत. "

" नेहमी बोलते मी ती ऐकत नाही. "

" वीर ला बोलायला सांग मग. "

" हो असच काहीतरी करते. "

आरती रूम मधे आली. तिने कपडे बदलले. आज किती छान मूड होता. राहुल दादा मीनल साठी मी किती खुश होती. पण या आजीं मुळे बोर झाल. तिला वाईट वाटत होत. ती शांत बसली होती. डोळ्यात पाणी होत.

वीर आत आला. तिने पटकन डोळे पुसले. ती कपडे कपाटात ठेवत होती. वीर तिच्या जवळ आला. "आरती सॉरी. तुझा मूड किती छान होता. आजीने तुला उगीच बोलल."

"माझ्या घरचे असे नाही आहेत वीर. ते नेहमी स्वतः पेक्षा दुसर्‍यांचा विचार करतात. "

" मला माहिती आहे ते आरती. डोन्ट वरी. "

"माझ्या आईने दुपारी केला होता फोन इकडे आपल्या घरी. आई बिझी होत्या. ऑफिस मधे होत्या. मी पण म्हटली होती त्यांना की या इकडे आईकडे. त्या नाही म्हटल्या. "

" हो मला माहिती आहे. तू का इतक सांगतेस. "

" कारण आजी माझ्या घरच्यांवर चुकीचा आरोप करत आहेत. मला भीती वाटते गैरसमज नको व्हायला. तुला किंवा घरच्यांना राग आला तर मी काय करू? "

" आजी काहीही बोलते. तुला वाईट वाटल का?"

तिने मानेने हो सांगितल.

" प्लीज रडू नकोस. सॉरी. मी बोलतो उद्या आजीशी. "

" नाही नको मला भीती वाटते. त्यांनी मला ओरडलं तर. मला आईकडे जायच. इथे नाही रहायच. "

" आरती शांत हो. मी आहे ना काहीही झाल तरी इथून जायच नाही. आपण वेगळ होणार नाही. घाबरायचं नाही. पुरे आता रडू नकोस. "

त्याने आरतीला जवळ घेतल. तिचे डोळे पुसले. आरतीला वीर जवळ शांत सेफ वाटत होत.

" थँक्स. सोड ना मला वीर. "

" अरे काय थांब ना अशी जवळ. छान वाटत आहे. " आरती लाजली. तिने त्याला फटका मारला. बाथरूम मधे जावुन तोंड धुतलं.

वीर विचार करत होता काय कराव आजीच? मी पण आधी आजीला मुद्दाम आरतीच नाव सांगत होतो. माझी पण चुकी झाली. आरती समोर येवुन बसली.

"काही काही गोष्टीं कडे दुर्लक्ष करायच आरती. "

" त्या पेक्षा त्या गोष्टी नीट केल्या तर? "

"एखाद्याचा स्वाभाव आता या वयात कसा बदलणार."

"मग त्यांच्या मुळे बाकीच्यांना त्रास झाला तरी हरकत नाही ना. पण त्यांना काही बोलायच नाही. म्हणजे मी काही महत्वाची नाही. मला वाईट वाटल तर वाटल. "

" अस नाही आरती. तू माझ्यासाठी काय आहे हे तुला ही माहिती आहे. "

"मला इथे शांत छान वाटत नाही. भीती वाटते. मला आईकडे जायच मी परीक्षा झाली की येईल. अश्या वातावरणात अभ्यास कसा होईल . "

नाही.

" वीर प्लीज. "

" मी बोलतो ना आजी सोबत. प्रॉमीस त्यात तुझ नाव कुठे येणार नाही. तुला कोणी काही बोलणार नाही. "

आरती पुस्तक घेवून काॅटवर बसली. ती टाइम टेबल करत होती. आता अगदी एक आठवडा बाकी आहे. नीट अभ्यास करायचा. बाकीच्या कोणा कडे लक्ष द्यायच नाही. आजी ओरडतात बाकीचे चांगले आहेत. वीर सोबत मी खाली जाईल नाहीतर आपल्या रूम मधे राहील.

" बर झाल शांत झाली ही. "

वीर फोन बघत होता. त्याला अनुचा त्या दिवशीचा मेसेज दिसला. अरे हिने केल का अप्लाय काय माहिती. त्याने मेसेज टाकला. "हाय अनु तू केल का या कंपनीत अप्लाय काय झालं पुढे?"

तिचा रीप्लाय आला नाही. तो आरती कडे बघत होता अस आरती समोर अनुशी बोलायला चांगल वाटत नाही. मी अनुला सांगणार आहे आरती बद्दल.

तो त्याच ऑफिसच काम करत होता. "आरती झाल का?"

"नाही थोड वाचते मी आत बसू का? तू झोप."

"नाही असू दे बस इथे. पाणी हव का?"

"हो माझी बॉटल भरून दे ना."

"हो आणतो. "

वीर पाणी घेवून आला. तो परत फोन कडे बघत होता. अनु चा काही रीप्लाय नाही.

"काय चाललय वीर कोणाशी बोलतो आहे? मित्र का?" आरतीने विचारल. वीर दचकला.

काय करू सांगू का हिला. मला अस चोरून लपून एका मुलीशी बोलायला आवडत नाही.

"आरती एक गोष्ट सांगू का? तू चिडणार नाही ना? "

" काय झालं."

" म्हणजे तू पूर्ण ऐकुन घे. तुला नाही आवडल तर मी तुझ ऐकेन."

"बोल तरी. "

"माझी एक मैत्रीण आहे. "

आरतीने पुस्तक बाजूला ठेवल. ती आश्चर्याने वीर कडे बघत होती.

" नाही म्हणजे तस नाही आरती. एकदम प्रोफेशनल रीलेशन आहे. आमचा एक लेखणीचा ग्रुप आहे त्यात ती माझ्याशी बोलते."

आरती बघत राहिली. "कोणता ग्रुप? माझा तर नाही ना. कोण आहे हा? " ती गप्प होती.

" ऑनलाईन आहे तिथे सगळे येतात एकमेकांशी बोलतात लिहिलेल शेअर करतात. खूप छान विचारांची देवाणघेवाण होते. "

"तू लिहितो का?"

"कधीतरी थोड. "

" कोण आहे ती मुलगी? काय नाव आहे? हे तू मला आधी का नाही सांगितल?"

"अग फक्त मैत्रिण आहे ती कधी बघितल नाही.
बहुतेक तुमच्या कॉलेजला आहे. तिला इंटर्नशिप हवी होती तर तिने मला विचारल. "

आरती अगदी शांत होवुन ऐकत होती. कोण आहे हा? सागर का? बापरे. कस विचारू ?

"काय नाव आहे मुलीच सांगितल तर बघते आमच्या क्लास मध्ये आहे का ती. "

अनुश्री.

आता आरती एकदम गप्प बसली होती. कठिण आहे हे इतके दिवस मी वीर सोबत बोलत होती की काय? काय करू सांगू का मीच ती अनुश्री. नको थोडी गम्मत करू.

"मग दिली का तिला इंटर्नशिप?" आरती रागात होती

" सांगितल तिला अप्लाय कर. "

" मला इंटर्नशिप देताना किती त्रास दिला तू. मला होकार द्यायला लावला. किती टेंशन मधे होती मी. सगळ्या जगाला विचारल आहे का काम. आणि आता तुझ्या मैत्रिणींना बरी इंटरनॅशनल देतो आहे. मला अजिबात चालणार नाही हे वीर. कशी आहे अनुश्री दिसायला? "

"माहिती नाही आरती."

" का तू कधी बघितलं नाही का तिला?"

"नाही ग्रुप वर कोणाचा डीपी नसतो आणि इतर वेळी बोलायचं नाही असं नियम आहे."

"पण त्या लोकांना तू कंपनीचे नाव सांगितलं तर त्यांना माहिती असेल ना की तू विर आहेस."

"नाही मी तिथे नाव बदलून लिहितो."

"काय नाव आहे तुझं तिकडे? "