Login

ओढ तुझी लागली भाग 49

ज्याच्यावर प्रेम असत तो मिळतोच ही कथा आहे आरती आणि वीरची
ओढ तुझी लागली भाग 49

©️®️शिल्पा सुतार
.......

आरती आता गप्प होती. ती काहीच का बोलत नाही हे बघून वीरला टेंशन आल होत. "आरती काय झालं प्लीज बोल. तुला वाटत तस माझ काही नाही."

खर तर तिला हसू येत होत. "सोनियाच्या बाबतीत अस बोलत होता. ती तुला मिठी मारते जवळ येवून बोलते. हात धरून फिरते. ते मला अजिबात आवडल नव्हत. आता हे नवीन अनुश्री प्रकरण. "

"अरे अस काही नाही. प्रकरण म्हणजे काय?"

"तुला किती मैत्रिणी आहेत टोटल सांग."

" अरे तुझा नवरा आहेच इतका हॅन्डसम. "

" आय एम सिरीयस. "

"सोनिया, अनु फक्त दोन. अरे त्या फक्त माझी मैत्रीणी आहेत. तू का इतकी इन्सेक्युअर होते? तुझ प्रेम आहे का माझ्यावर? की जुन्या विचारांची आहे का तू?" वीर हसत होता.

" हो आहे मी जुन्या विचारांची. आणि मी नाही ना तुझी मैत्रीण? आणि अनु काय? तिला लाडाने अनु बोलतोस. "

"नाही आरती. "

" मी उद्या आईकडे जाणार तिकडे राहील. " आरतीने तीच शस्त्र बाहेर काढल.

" नाही आरती. सॉरी मी कोणाशी बोलणार नाही. आजी ओरडली तर तिला बोलेल. तुला सपोर्ट करेन. प्लीज नको जावु." वीर गयावया करत होता. आरतीला हसू येत होत.

" ते मला माहिती नाही. मी जाणार. तू मला जुन्या विचारांची बोलला. "

" ठीक आहे सॉरी. मी कोणत्या मुलीशी बोलणार नाही. तुझ म्हणजे अस आहे तु पण बोलत नाही दुसर्‍याला बोलू देत नाही माझ्याशी. "

" दाखव तू काय काय लिहिलं ते." आरती बोलली.

"एवढ्यात मी काहीही लिहिलं नाही दोन-तीन महिन्यापासून. "

" का लिहीत नाहीस मग? "

" आता लिहिलं पुढच्या मीटला."

आरती सिरियस तोंड करत बोलली. " तुला बोलायच असेल तर थोडसं बोलायचं मुलींशी. पण पर्सनल नको. मिठी मारायची नाही. त्यांच्या मागे मागे करायच नाही. आणि जे बोलला ते मला सांगायच."

"ठीक आहे तू म्हणते तस. आरती पण मग मी कोणाला मिठी मारायची? तुला का?" तो हसत होता. मुद्दाम येवून गळ्यात पडला. आरती त्याला ढकलत होती. तो बाजूला होत नव्हता. याला काही बोलला की आपल्याला शिक्षा होते. वीर सरक ना. तो बाजूला बसला.

"हा घे फोन बघून घे कोणाकोणाचे मेसेज आहेत." वीरने तीला फोन दिला.

"हा कुठला नंबर आहे तुझा."

" लेखणीसाठी दुसरा नंबर वापरतो मी."

आरती बघत होती तिचेच मेसेज होते. बाकी कोणाशी बोलला नव्हता तो. तिला बर वाटल.

"घरी सगळ्यांना माहिती आहे का तू लिहितो ते ?"

"नाही. तुला सांगितल. मी माझे सिक्रेट तुला सांगतो. "

का?

" मला तू खूप आवडते. तुझ्या पासून कोणतीच गोष्ट लपवून ठेवावीशी वाटत नाही." वीर मनापासुन बोलत होता.

आरती गडबडली.

" आरती तुला आठवत त्या कॅम्प मधे त्या टेंट मधे मी तुला भेटायला आलो होतो तेव्हा तू खूप खूप छान दिसत होतीस. त्या आधी पासून मी प्रेम करतो तुझ्यावर " वीर तिच्या कडे बघत होता.

आरती त्याच्याकडे बघत होती . खूप प्रेम करतो हा माझ्यावर. ती तिच्या विचारात होती. हा वीर कस ना त्याच्या मनातल्या गोष्टी लगेच बोलून मोकळ होतो. छान रहातो. मीच टेंशन घेत बसते.

वीर तिच्या जवळ आला. त्याने तिच्या गालावर ओठ टेकवले. आरती या वेळी काही म्हटली नाही. थोडी बाजूला सरकली. ती लाजली होती. वीरने तिला जवळ ओढल. "आरती तुला माझ्या बद्दल काय वाटत? मला वाटत की तू कंफर्टेबल आहेस."

बापरे म्हणजे काय? वीर सोबत मला भीती वाटते. "मी एका मिनिटात आली."

"काय आता?"

ती उठून बाथरूम मध्ये गेली. खूप धड धड होत होती. ती तिथे थांबली पाच मिनिट.

वीर तिची वाट बघत होता. आरती... आरती त्याने आवाज दिला.

" हा का बोलवतो आहे? मला नाही जायच . याच लक्ष विचलित करायला हव."

तिने बाथरूम मधून वीरला दुसर्‍या नंबर वरून मेसेज केला. "हाय सागर. आज एवढ्या रात्री मेसेज केला. नाही केलं अप्लाय. फोनमध्ये वेबसाईटवर काहीच दिसत नाही. माझ्या कडे लॅपटॉप नाही. मला कुठेच इंटर्नशिप मिळाली नाही. काय करू प्लीज मदत कर."

वीर बघत होता अनुचा मेसेज आला आहे. ती मदत मागते आहे. काय करू. आरती कुठे आहे?

" मी उद्या बोलतो तुझ्याशी." त्याने अनुला मेसेज करून फोन बंद केला.

आरती समोर बोललो परत ती चौकशी करेल, चिडेल. माझ्या साठी आरती महत्वाची आहे. तिला राग येईल अस काही मी करणार नाही.

आरतीने बघितलं वीरचा मेसेज आला. अच्छा अस आहे का उद्या बोलणार आहे. बघू आता मला सांगतो का. तिने तिचा दुसऱ्या नंबर लॉक केला. ती बाहेर आली.

वीर झोपायची तयारी करत होता. त्याने काही न बोलता झोपून घेतलं. बहुतेक त्याला सांगायचं नसेल की अनुचा रिप्लाय आला.

आरतीने तीच सामान ठेवलं ती पण झोपली.

"आरती तू मुद्दामून बाथरुम मधे गेली होती ना?"

"नाही वीर. "

"परत सांगतो मोकळ रहा माझ्या सोबत."

काही खर नाही वीर हट्टाला पेटला आहे. अनुचा विषय काढु का?

"वीर अनुश्री खूप सुंदर असली तर."

" असू दे मला काय? ती फक्त मैत्रीण आहे."

" तुला कधी काही वाटलं नाही का तिच्याबद्दल?"

"मला तीच लिखाण, चांगले विचार आवडतात. या पलीकडे काही नाही तू काहीही विचार करू नको."

"असं कसं विचार करू नको माझ्या नवऱ्याला एक मैत्रीण आहे काय आहे कोण आहे ते तर मला जाणूनच घ्यायचं आहे. "

" मीच बघितलं नाही तिला अजून तर मी काय सांगू? "

" नक्की ना? "

वीर उठून बसला. आरती जवळ आला. आरती पटकन उठली मागे सरकली. त्याने तिचा हात हातात घेतला. " एकदम खरं सांगतो आहे आरती मी अनुला कधीच बघितलं नाही आणि भेटणार नाही. तसा योगही येणार नाही. ती फक्त वैचारिक मैत्री आहे. माझ्यावर विश्वास ठेव तुला वाटत असेल तर मी तिच्याशी कधी बोलणार नाही. "

"सॉरी वीर मी तुला उगाच चिडवत होती तू बोलू शकतो तुला ज्याच्याशी बोलायचं त्याच्याशी. "

" आरती मी परत सांगतो माझ फक्त तुझ्यावर प्रेम आहे बाकी कोणी नाही. " तो आरती कडे बघत होता. आरती थोडी बाजूला सरकली. झोपते मी.

" आरती आपला विचार कधी करणार? आपल्याला फिरायला जायच होत ना?"

"आता वेळ कुठे आहे परीक्षा झाली की इंटर्नशिप सुरू होईल."

"आपल्या इथे आहे ना तुझी इंटर्नशिप. एक दोन दिवस इकडे तिकडे. "

" पण सर्टिफिकेट वर तारीख बदलेल ना. मला भीती वाटते जर जे ट्रेनिंग घेतात त्यांनी मी जॉईन झाल्याची तारीख टाकली तर. तेव्हा तु म्हणशील तू तुझ बघ. "

" अस होणार नाही. मी आहे ना. "

" नाही मला नियमां प्रमाणे जायच. मध्येच सुट्टी घेता येईल ना. प्लीज वीर अस नको."

" बर काळजी करू नकोस." वीर अगदी आरती जवळ झोपला होता. आरतीला धड धड होत होती. ती अजून बाजूला सरकली. त्याने बघितल." आरती हे अस चालणार नाही. तू माझ्या पासून लांब का जाते ."

" नाही अस नाही वीर."

" मग काय आहे मनात एकदा बोलून टाक. माझ्या बाजूने मी एकटा प्रयत्न करतो." त्याने तिला जवळ ओढून घेतल मिठीत .झोप आता शांत. माझ्या सोबत रहायच.

" वीर एक बोलू का?"

हो .

"मला परीक्षे साठी आई कडे जायच आहे. "

"इथे थांब. "

"नाही ना मी येते ना 6-7 दिवसात .मला तिकडे माझ्या घरी रहायची सवय आहे. "

"ठीक आहे जा. "

"मग तू बाजूला हो ना. "

"का आता. "

"मी परीक्षेहून आली की राहू ना सोबत. हे बघ अस तू जवळ असला की मला काही सुचत नाही . अजून थोडे दिवस. प्लीज. "

" ठीक आहे नंतर काही सांगायच नाही. आणि मी काय करतोय? नुसती मिठी मारली. ते तर करेल मी. तुला राग येतो मी बाकीच्यांना मिठी मारली तर. आता बाकीचे नाहीत फक्त तू. रोज तुला जवळ घेणार. "

" तुला ना काही बोलण्यात अर्थ नाही. झोप आता. "

आरती सकाळी उठून अभ्यास करत होती. वीर जागा असला की किती बडबड करतो. नाहीतर त्रास देतो. काही अभ्यास होत नाही.

वीर उठला." गुड मॉर्निंग तू झोपली की नाही. "

" झोपली होती आता सहाला उठली. "

" वॉकला येतेस का? "

"नाही मला हा चॅप्टर संपवायचा आहे. बोलू नको. "

"ठीक आहे." वीर त्याच आवरून फिरून आला. आरती तरी अभ्यास करत होती.

"कॉलेजला जायच ना?"

हो.. ती उठली पटकन आवरून आली.

"आंघोळ नाही करायची का? "

" सकाळीच केली. "

" चल खाली ."

" वीर तू माझ्या सोबत रहाणार का? " खाली आजी असतिल आरती घाबरली होती.

" हो. आजीला घाबरते का तू?"

" हो. माझा आज अभ्यासाचा मूड आहे मला आता कोणाचा विचार करायचा नाही. त्या काही बोलल्या की दोन तीन तास जातात. मला आता या गोष्टी साठी वेळ नाही. माझ मन मला निगेटिव्ह करायच नाही."

" ठीक आहे. आरती एकदा जवळ ये मग संध्याकाळी भेटशील." आरती त्याच्या मिठीत होती.

" आता कस वाटतय. कंफर्टेबल ना. " वीर तिच्या कडे बघत होता.

हो.. ती बोलली

" अस होत एकदा दोनदा माझ्या जवळ ये नंतर काही वाटणार नाही. "

" वीर काहीही काय. " आरती हसत होती.

" अरे मी सांगतो ते ऐकत जा. "

"नको ना बोलू अस. माझी परिक्षा आहे. "

" मग रोज यायचं माझ्या जवळ. अस किती दिवस आपण एकमेकांना बघत बसणार. "

तो त्याच सामान घेत होता. आरती नुसती त्याच्या कडे बघत होती. किती छान तयार झाला आहे हा. एकदम मस्त दिसतो आहे. याला बघितल की केलेला अभ्यास विसरून जाते मी.

दोघ खाली आले. आजी खाली होत्या. बाकीचे आले नव्हते. आरती वीरच्या सोबत होती. चेहरा घाबरलेला होता . ती पटकन किचन मधे निघून गेली. वीर तिच्या मागे आला. "काय करते इथे? चल बाहेर. "

" नको वीर मी सांगितल ना मला शांतता हवी आहे."

" मी आहे ना चल. " ते दोघ बाहेर आले.

"नाश्ता कुठे आहे?" आजी आरती कडे बघून बोलल्या. ती आत जात होती वीरने तिचा हात धरला. "उमा ताई आणेल," तो आजीला बोलला.

आजी गडबडल्या. त्याने बरणीतुन थोडासा चिवडा घेतला.

" कश्याला खातो तो चिवडा वीर? कसा आहे काय आहे माहिती नाही. " आजी वीर कडून तो चिवडा घेत होत्या.

आरती नाराज होती. आजी माझ्या कडच्या खाऊ ला खराब समजतात.

" आजी तुला जर काही माहिती नसेल तर उगीच बोलू नकोस. आरतीने आणला तो चिवडा म्हणून बोलते ना. तुला माहिती का कधी कधी आपण सहज एखादा शेरा देतो. थोड बोलतो. त्यामुळे समोरच्या वर त्या गोष्टीचा किती विपरीत परिणाम होतो. जरा विचार करून अनुभव घेवून बोल ना." वीरने आजी कडून त्याच्या चिवडा ओढून घेतला.

"काय झाल वीर? रात्रीतून बरच समजवल वाटत तुला तुझ्या बायकोने. " आजी अजून रागात होत्या.

" नाही ती काही बोलली नाही. साधी आहे ती. मला दिसत ना. मी पण तिला त्रास देत होतो पण ते एका लिमिट मधे. गम्मत म्हणून. तिला हर्ट नाही करत होतो मी. तिची तेवढी काळजी घेत होतो. तुला उठता बसता कोणी बोलला तर कस वाटेल. "

"वीर नको ना बोलू प्लीज शांत हो." आरती हळूच बोलली.

" तू थांब जरा आरती मी बोलतो आहे ना आणि हे तुझ्या साठी सुरू आहे. आजी ऐक नुसती आरती साठी नाही तर मामीला पण त्रास द्यायचा नाही. शांत रहात जा जरा. जे समोर दिसेल तेच सत्य नसत. त्या आधी बर्‍याच गोष्टी घडून गेल्या असतात. सगळ्यां तुला माहिती नसतात. विचार करून बोलत जा. जे दोषी नाहीत त्यांना उगीच बोलत जावू नकोस. मुळातच घरची सुन म्हणजे ती चुकीची तिच्या घरचे चुकीचे हे काय आहे. विचार बदल नाहीतर तू एकटी पडशील. आणि आता काय बोलली तू आरती ने माझे कान भरले रात्रीतून. हो ऐकणार मी तीच. तिला कोणी नाही माझ्या शिवाय. ती माझी बायको आहे. ती. कंफर्टेबल रहायला हवी. तिची परीक्षा आहे आता. शांती ठेव घरात. "

" वीर प्लीज शांत हो ना." आरती परत बोलली.

आजी रागाने आरती कडे बघत होत्या. राहुल सर, नंदिनी मॅडम, शनाया समोर होते.

उमा ताई पोहे घेवून आल्या. बाकीचे आले त्यांनी सगळ्यांना पोहे दिले. चहा आणला .

आजी आता गप्प होत्या. त्या नाश्ता करत नव्हत्या. नंदिनी मॅडम त्यांच्या जवळ गेल्या. "आई खावून घे."

"नको मला. इथे कोणाला मोठ्यांचा मान ठेवता येत नाही. मी इथे राहणार नाही. मला तिकडे घरी पोहोचवून दे."

"आई वीर काय म्हणतो ते एकदा विचार कर ना. कश्याला त्रास करून घेते."

आजी अजून रागात होत्या. त्यांची अपेक्षा होती आरती वीरने त्यांची माफी मागावी. वीर आरामात पोहे खात होता. आरतीला माहिती होत या नंतर ओरडतील.

नंदिनी मॅडमने समजल्यावर आजी पोहे खात होत्या. संध्याकाळी बघते या आरतीला.

" दादा बर झाल पण तू थोड बोलला आजीला. " शनाया हळूच बोलली.

"हे काम कधीच आरतीने करायला हव होत. इतके दिवस तू का ऐकुन घेतल तीच ?" तो आरती कडे बघून बोलला.

"मी काय बोलणार त्यांना मोठ्या आहेत त्या. "

"म्हणून आजीला बोलायची तुला ऐकायची सवय झाली."

" काय करू मग मी नवीन लग्न झालं. मी काही बोलत नाही तरी त्या चिडलेल्या असतात. अजून उलट बोलली असती तर काय झालं असत. तू समजा त्यांच ऐकुन मला आईकडे जायला सांगितल असत तर? मी घाबरली होती ."

" वीर विचार करत होता. बरोबर आहे एक तर लग्न झाल्या पासून काय काय सुरू आहे. आमचे ही भांडण झाले. जावू दे आता ठीक करू आपण."

" वीर तू घरी नाही बघून आजी मला ओरडतील संध्याकाळी. मला भीती वाटते. मी आई कडे जावू का?" आरती हळूच बोलली.

"नाही आरती तोंड दे या गोष्टीला. तुला होत असलेला त्रास तूच नीट करायचा."

"अरे पण त्या माझ ऐकत नाहीत. उलट बोलल तर भांडण होईल."

" तू काही बोलू नकोस. शनू संध्याकाळची आरतीची जबाबदारी तुझी. थोडे दिवस सपोर्ट हवा तिला. आजी काही बोलली तर मला सांग."

"हो दादा."

" ठीक आहे का आता आरती?"

"हो थँक्स वीर, शनु . "

आरती आता खुश होती. ती वीरच्या जवळ होती. तो थोडा जरी इकडे तिकडे गेला तरी घाबरत होती. त्याच्या कडे बघत होती.

वीर राहूल सरां सोबत बोलत होता. लगेच मीटिंग होती. दोघ बरोबर ऑफिसला निघाले. वीर बोलता बोलता चालला गेला. मला भेटायला आला नाही. आरतीला वाईट वाटल.

ती वरती गेली. बॅग घेतली. जावु दे कामात असेल तो. दार उघडून वीर पटकन आत आला. "सॉरी मीटिंगच्या टेंशन मधे तुला बाय बोललो नाही. येतो मी."

ती पटकन पुढे झाली त्याला मिठी मारली.

"काय झाल आरती?"

"काही नाही." दोघ काही बोलले नाही. दोघांना समजत होत त्यांच एकमेकांवर प्रेम आहे. आधार वाटतो एकमेकांचा.

"सरक ना सोड मला. बाबा वाट बघत आहेत. " वीर बोलला. आरती हसली.

" उलट झाल ना आता. तुझे डायलॉग मी बोललो सरक जावू दे वगैरे." वीर बोलला.

"लवकर ये. "

"हो. गुड लक विश कर ."

" ऑल द बेस्ट छान होईल काम. "

त्याने तिच्या गालावर ओठ टेकवले. बाय. तो पळत निघून गेला.

आरती पाच मिनिट तिथे भीतींला पाठ लावून उभी होती. वीर लव यु. त्याच जवळ येण स्पर्श हवाहवासा आहे.


0

🎭 Series Post

View all