ओढ तुझी लागली भाग 50
©️®️शिल्पा सुतार
.......
.......
वीर ऑफिसला गेला. आरती तो गेला तिकडे बघत होती. याचा सहवास अगदी हवाहवासा वाटतो. तिने तिच्या गालाला हात लावला. थोड्या वेळा पूर्वी वीर ने त्याचे ओठ तिथे टेकवले होते. गालावर गुलाबी रंग दाटला होता. काय होत आहे हे. वीर मला तुझ्या सोबत रहायच आहे. कस सांगू त्याला. तिचा फोन वाजत होता. ती स्वप्नंमयी दुनियेतून भानावर आली. मीनलचा फोन होता. "आरती माझी वही आण."
"हो घेतली आहे. येते लगेच." तिने फोन ठेवला.
चला आटपा कॉलेज साठी निघावं लागेल. तीने बॅग घेतली खाली नंदिनी मॅडम होत्या. "डबा घेवून जा आरती."
"हो आई." तिने आतून डबा घेतला. दुसर्या डब्यात चिवडा पण घेतला. आजी समोर बसलेल्या होत्या. तिने त्यांच्या कडे लक्ष दिलं नाही. ती कॉलेजला निघाली.
वीरने आज माझी बाजू घेतली. खूप खूप चांगला आहे तो. त्याच्या बाजूने नेहमी मला सपोर्ट करतो. खूप प्रेम देतो. मी पण नीट राहील त्याच्या जवळ. मला खूप खूप आवडतो तो.
तिने मोबाईल हातात घेतला.
एवढ्या मोठ्या प्रॅक्टिकल जगात किती छान वाटत ना जेव्हा कोणी आपल असत. आधार देत. प्रेम देत आणि म्हणत मी आहे तू काळजी करू नकोस. त्याच्या भरोशावर आपण निश्चिंत असतो.
वीर माझ्या साठी तू असा आहे. माझा लाइफ पार्टनर. माझ वर्ल्ड. सगळ काही. माझ खूप प्रेम आहे तुझ्यावर. या पुढे तू म्हणशील ते करेन मी .
पूर्वी मी तुझा राग राग केला. सॉरी.
हॉस्पिटल मधे तू भेटलास. तेव्हा अस वाटल होत तू हीरो नाही. वाईट मुलगा आहेस. पण तेव्हा परिस्थिती तशी होती. वरुण दादा पण भांडत होता तुझ्याशी. जावू दे.
पण आता मी मान्य करते तू सगळ्यात चांगला आहेस. माझ्या आयुष्यातला माझा हीरो आहेस . तु मला खूप आवडतो.
कॉलेज मधे तूला बघून मी खुश व्हायचे. तु खूप हॅन्डसम आहेस. आता समजल तुझ मन ही तितक छान आहे.
आय मीन इट. फ्रॉम द बॉटम ऑफ माय हार्ट. लव यू.
मला तुझ्या सोबत रहायच आहे.
वीर माझ्या साठी तू असा आहे. माझा लाइफ पार्टनर. माझ वर्ल्ड. सगळ काही. माझ खूप प्रेम आहे तुझ्यावर. या पुढे तू म्हणशील ते करेन मी .
पूर्वी मी तुझा राग राग केला. सॉरी.
हॉस्पिटल मधे तू भेटलास. तेव्हा अस वाटल होत तू हीरो नाही. वाईट मुलगा आहेस. पण तेव्हा परिस्थिती तशी होती. वरुण दादा पण भांडत होता तुझ्याशी. जावू दे.
पण आता मी मान्य करते तू सगळ्यात चांगला आहेस. माझ्या आयुष्यातला माझा हीरो आहेस . तु मला खूप आवडतो.
कॉलेज मधे तूला बघून मी खुश व्हायचे. तु खूप हॅन्डसम आहेस. आता समजल तुझ मन ही तितक छान आहे.
आय मीन इट. फ्रॉम द बॉटम ऑफ माय हार्ट. लव यू.
मला तुझ्या सोबत रहायच आहे.
काय करू पाठवू का हे त्याला. त्याला समजल तर मी लिहिते ते. मीच अनुश्री आहे. नाही समजणार मी होकार दिला त्यात तो सगळ विसरून जाईल. त्याची मोठी मीटिंग आहे. काय करू पाठवू का?
आता नको वाटत त्याच्या पासून दूर रहाण. परीक्षा आहे. मला अभ्यास सुचत नाही. सारख वीर चे विचार मनात येतात . पाठवते मेसेज.
आता नको वाटत त्याच्या पासून दूर रहाण. परीक्षा आहे. मला अभ्यास सुचत नाही. सारख वीर चे विचार मनात येतात . पाठवते मेसेज.
तिने मेसेज पाठवला.
काय होत काय माहिती. तिने पटकन मोबाईल बंद करून बॅग मधे ठेवला. काय करू ओह माय गॉड. डिलीट करू का मेसेज. नको. या नात्यात मला पुढे जायच आहे. वीर चांगला आहे. तिने पाणी पिल मोठा श्वास घेतला. काय रीएक्ट होईल वीर? मला फोन करेन का? की माझ्या जवळ येईल. की त्याला माहिती असेल मी प्रेम करते ते. काय होईल नक्की? काही सुचत नाही.
वीर ऑफिस मधे आला. हर्षल रेडी होता. "आले का ते लोक?"
"हो वीर चल कॉन्फरन्स रूम मधे."
राहुल सर बसलेले होते. "आपल प्रेझेंटेशन रेडी आहे का?" त्यांनी भारदस्त आवाजात विचारल.
हो बाबा. वीर समोर उभ राहुल लॅपटॉप स्क्रीनला जोडत होता. हर्षल राहुल सर सोबत पॉईंट्स डीसकस करत होता. वीरचा फोन वाजला. त्याने तो हातात घेतला. सायलेंट वर टाकला. लगेच मीटिंग सुरू झाली.
आरती कॉलेजला आली. वीरने अजून मेसेज बघितला नाही. बघेल. लगेच लेक्चर सुरू झाल. त्या नंतर सबमिशन होत.
वीरची मीटिंग झाली. खूप छान प्रेझेंटेशन झाल होत. ऑर्डर आपल्याला मिळेल खात्री होती. राहुल सर खुश होते. ते त्या लोकांसोबत लंचला गेले. वीर त्याच्या केबिन मधे आला. सकाळ पासुन धावपळ सुरू आहे. इतर मेल तो बघत होता. एका महत्त्वाच्या मेलला रीप्लाय दिला. मॅनेजर दीक्षित रीपोर्ट देत होते. एका ऑर्डर बाबतीत किती रेट घ्यायचा ?
"थांबा बाबांना विचारतो." त्याने मोबाईल हातात घेतला. आरतीचा काहीतरी मेसेज आलेला आहे.
तो राहुल सरां सोबत बोलला. दीक्षित गेले.
आरतीने काय पाठवल तो वाचत होता. खूप खुश होता. ओह माय गॉड. म्हणजे काय? आरतीने होकार दिला का. लव यू दिसत आहे लिहिलेल. काय रीप्लाय करू काही. समजत नाही. त्याने दोन तीन वेळा मेसेज वाचला.
आरती मला लकी आहे. लव यू. काहीतरी स्पेशल करायला हव.
आरती मला लकी आहे. लव यू. काहीतरी स्पेशल करायला हव.
लंच ब्रेक झाला. आरती बघत होती. वीरने मेसेज वाचलेला आहे. रीप्लाय का दिला नाही. बिझी असेल तो.
वर्गात खूप गोंधळ सुरू होता. सगळ्या मुली मीनल मागे लागल्या होत्या. पार्टी दे. लग्न जमल काल काही सांगितल नाही.
"लग्न झाल्यावर देईल पार्टी."
"तेव्हा कुठे तू भेटणार आम्हाला. लग्न करून संसारात रमशील."
आरती हसुन बघत होती.
"आरती तू दे पार्टी तुझी वहिनी आहे ही."
"उद्या देईल ओके."
नंतर त्या मुली लायब्ररीत गेल्या. लेक्चर नव्हते.
"घरी जायच का?" राही विचारत होती.
"नको दोन तास इथे शांततेत अभ्यास करते मी. नको घरी." आरतीला आजी आठवल्या. आज त्या नक्की बोलतील मला. मी लवकर घरी जाणार नाही.
"काय झाल वीर त्रास देतो का?" प्रिया विचारत होती.
"नाही तो खूप चांगला आहे. आजी ग मला बोलल्या काल . जावू दे. मला नाही बोलायच त्या विषयावर. चला अभ्यास करू. नाहीतर तुम्हाला घरी जायच तर जा. मी चार नंतर जाईल घरी. " आरती बॅग घेवून एका जागी बसली.
" नाही आम्ही बसतो."
"आज दोन चॅप्टर करते मी. त्या शिवाय उठणार नाही." आरती ने नोट्स बाहेर काढल्या. सगळ्या मुली सिरियसली अभ्यास करत होत्या.
चार वाजता त्या कॅन्टीन मध्ये चहा घ्यायला आल्या. वरुण तिथे होता." दादा अभ्यास कर. "
हो.
" नाहीतर वीर देणार नाही ह काम. ते लोक स्ट्रीक्ट आहेत मला ही अस केल होत. अजिबात नाते संबंध बघत नाहीत ते. प्रकाश पुस्तक कुठे आहेत. या पुढे तू पण अभ्यास करायचा. दादाला सांगायचा काय?" आरती रागवत होती.
"हो आरती."
"काही अडलं तर मला विचार."
" आरती डेंजर आहे. " प्रकाश बोलत होता.
" हो अभ्यासाच्या बाबतीत स्ट्रीक्ट आहे. "
आरती कॉलेज बाहेर आली. मैत्रिणी गेल्या. तिने ड्रायवरला फोन केला.
" आलो पाच मिनिटात. "
ती गेट कडे जात होती.
" हॅलो आरती."
तिला ओळखीचा आवाज आला. तिच्या चेहर्यावर एकदम हसू आल.... वीर.
"हो माझा आवाज बरोबर ओळखते तू आरती . कुठे चाललीस?" वीर एकदम तिच्या मागे मागे येत होता.
"माझ्या घरी. तुला काय पण ? का मागे येतोस माझ्या." आरती त्याच्या कडे बघत बोलली.
"कारण मला तू खूप आवडते. आणि तुला ही मी आवडतो."
"अस बोलू नकोस वीर. मी माझ्या नवर्याला सांगेल. "
"कोणालाही सांग मी घाबरत नाही. माझ्या जवळ प्रूफ आहे एक ."
"अस का. काय दाखव. " आरती थांबली.
"आज कोणी तरी मला गोड मेसेज केला आहे .म्हणून शहानिशा करायला आलो आहे. "
"मग केली का शहानिशा? काय समजल?"
" थोड्या वेळाने सांगतो. चल. " त्याने कारच दार उघडल आरती बसली.
वीर कार चालवत होता.
" वीर तू इकडे कसा काय? आत का नाही आला?"
"नको आत तुझा भाऊ असेल ."वीर मुद्दामून घाबरतो अस दाखवत होता.
" त्याला तू तुझ्या बाजूने वळवून घेतल ना. "
" तरी नको मला वेळ घालवायचा नव्हता. मला तुझ्या सोबत रहायच आहे. एक तर आता ताजा ताजा होकार आला आहे. त्या संधीच सोन करायच आहे. "
"म्हणजे? कुठे जातो आपण वीर. सांग ना. " तो फक्त हसत होता. आरती थोडी घाबरली. नक्की काय प्लॅन आहे याचा. हनीमून साठी जातो की काय. समजेल.
"ड्रायवर काकांना सांगाव लागेल." आरती बॅग मधून फोन बाहेर काढत होती.
"माहिती आहे त्यांना."
"तुझी मीटिंग कशी झाली?"
"खूप छान झाली. आपल्याला ऑर्डर मिळेल. "
"आज लवकर ऑफिस मधून सुट्टी कशी मिळाली?"
"तस स्पेशल कारण होत ना. मग काय करणार. ऑफिस मधे मन लागत नव्हत माझ. "
" बाबा काय म्हटले?"
"म्हटले जा बायकोला घेवून फिरून ये मस्त."
काहीही.. आता ती हसत होती. वीर बघत होता किती गोड दिसते ही.
" वीर सांग ना कुठे चाललो आपण ? "
" जावू कुठे तरी. "
"वीर नीट सांग ना."
" वेट अॅण्ड वॉच. नाहीतरी आता काळजीच काही कारण नाही. तू तुझ्या नवर्या सोबत आहेस. तुला आवडत माझ्या सोबत. मी म्हणेल तेच करणार तू. मग का विचारतेस. या पुढे पतीची सेवा करण त्याला खूप प्रेम देण हेच काम आहे तुझ." वीर हसत होता.
मेसेज खूप सिरीयसली घेतला वाटत याने. आरती लाजली होती. मला वाटत तेच आहे आम्ही नक्की फिरायला जातो आहोत. वीर सोबत अस एकत्र राहण ओह माय गॉड. हा जवळ येईल माझ्या .कस वाटेल. सांगता येत नाही. मी चांगली तर दिसते ना. कपडे नाही सोबत. लिपस्टिक लावली असती थोडी.
कार गावाबाहेर आली. थोडा छोटा रस्ता सुरू झाला.
" वीर घरी सांगाव लागेल. आई वाट बघतील."
"माहिती आहे आईला."
खूप गार वारा सुटला होता. आजुबाजूला खूप झाडी होती. शांत छान वातावरण होत. उतरत ऊन. पक्षि घरी चालले होते. वीर ने कारच्या काचा खाली घेतल्या. थंड हवा आत आली. "वाह काय छान वाटत इथे. इथे आसपास पाणी आहे का? "
" हो ती बघ नदी. "
ते एका प्रोपर्टी बाहेर आले. वॉचमनने गेट उघडल. कार आत मधे आली. त्या बाजूला वर्कर्सचे घर होते. मधे मोठ शेत होत. आत आजुन एक छोट गेट होत तिथे आत बंगला होता. कोणी नव्हत तिथे.
"कोणाच घर आहे हे. किती छान आहे. "
" हे आपल घर आहे. "
टुमदार बंगला होता. खाली वरती रूम होते. सुंदर मेंटेन केलेला. खूप शांतता होती. दोघ आत आले. आतून इंटीरियर छान होत. आरती सगळीकडे फिरून बघत होती.
मागे स्विमिंग पूल होता. गार्डन होत पुढे शेत होत मोठा परिसर होता. त्या बाजूला भाजी लावलेली आहे. तिकडे अजून बरेच पीक होते. "वीर काय काय लावला आहे शेतात?"
"वरच्या बाल्कनीत तून दिसेल. पण आत्ता नाही सकाळी. आता खूप अंधार आहे. उद्या बघु आपण."
"कोण करत हे काम?"
"वर्कर्स आहेत."
"किती शांत वाटत इकडे. का आलो आपण? वापस केव्हा जायचं? अंधार असेल ना रस्त्यात जातांना."
"आरती किती प्रश्न विचारणार. आता जायच नाही आपल्याला. आज आपण इथे आहोत. उद्या जावू. "
"इथे कस राहणार? मला भीती वाटते. "
" मी आहे ना. "
" तुझी तर भीती वाटते. " आरती एकदम बोलली. ती आता गप्प होती. वीर कडे बघत होती. थोड हसत होता. तो एकदम तिच्या मागे आला. आरती पुढे पळत होती. दोन तीन पावलात तिला पकडल. स्वतः जवळ ओढून घेतल.
" वीर नको. "
" हे दोन तीन वाक्य आता तू विसरून जा." त्याने तिला स्वतः जवळ बसवल." बोल आता. माझी भीती वाटते का?"
"नाही तस नाही तू खूप चांगला आहेस .आपल्याला सोबत रहायची सवय नाही. " आरती हळूच बोलली.
"मग आता सवय करून घे. लाजू नको एवढी. "
"बाजूला सरक ना."
नाही.
"कोणी येईल. "
" विचारल्या शिवाय कोणी येत नाही इथे. त्यात त्यांना माहिती आहे आपण दोघ आत आहोत. तुला आवडल इथे."
" हो छान आहे घर. "
" आम्ही रहायचो सुट्टीत खूप मजा यायची. मी, शनू, आई, आजी, मामा सगळे असायचे ." वीर बरच गम्मत जमत सांगत होता.
" वीर भूक लागली. जेवायला काय आहे? "
" चहा घेणार का जेवण आठ नंतर मिळेल. "
हो.
त्याने फोन वरून चहा, पाणी बॉटल *सँडविच मागवले.
" चल वरती फ्रेश होवू. "
ते वरती गेले." ही आई बाबांची रूम. ही आपली रूम. ही शनुची रूम. "
फोन वाजत होता. वीर ने फोन उचलला. तो खाली गेला. काहीतरी बोलत होता. चहा घेवून वरती आला. आरती त्यांच्या रूम मधे होती. खूप छान रूम होती. बाल्कनीतुन गार वारा येत होता. चहा छान होता. खावून झाल.
" वीर ही भांडी."
"मी ठेवतो तू असू दे. "
" खाली माझी बॅग आहे ती आण."
"का आता?"
"थोड वाचते मी."
"आज नाही."
" चार पाच दिवस राहिले परीक्षेला. मला टेंशन आल आहे."
"उद्या कर अभ्यास. आज माझ्या जवळ रहा."
"ठीक आहे बॅग तर आण."
हो.
दोघ टीव्ही बघत होते. फोन वाजला वीर काहीतरी बोलत होता.
"आरती तयार हो. कपाटात तुझ सामान आहे. मी आलो पाच मिनिटात. "
" वीर काय आहे?"
"तु तयार हो मग सांगतो. "
"नाही. घरी जायचं. " आता आरतीला टेंशन आल होत. इतक्या वेळ ती शांत होती. पण ही तयारी वगैरे म्हणजे नक्की काय आहे. काही खर नाही आज. मला ही काय सुचलं वीर ला मेसेज केला. परीक्षेनंतर तरी होकार दिला असता. आता हा ऐकत नाही.
" आरती इकडे ये बस. तुला माहिती का तू माझ्या आयुष्यातली अत्यंत आवडती व्यक्ती आहे. माझ खूप प्रेम आहे तुझ्या वर. ज्या दिवसापासून तुला बघितल सुचत नव्हत मला काही. इतकी छान निरागस कोणी असू शकत. तुझ साध राहण दुसर्याची काळजी घेणे खूप आवडल होत. मला किती त्रास झाला होता जेव्हा समजल तुझ लग्न जमल ते. ही माझी नाही दुसर्याची होईल. आरती रात्र रात्र भर मला झोप येत नव्हती. तुझा विचार सुरु असायचा. तू का दुसरीकडे होकार दिला. मग मी तुझी माहिती काढली. मला समजल तुला मी आवडतो खूप आनंद झाला होता मला. आधी मी मुद्दाम तुला त्रास देत होतो. आपोआपच तुझ्यावरच माझ प्रेम घट्ट झाल. एक दिवस जरी तू दिसली नाही तर मी घाबरायचो. तुला त्रास झाला मला त्रास व्हायचा. मी तुझ्या डोळ्यात पाणी बघू शकत नव्हतो. देवाच्या कृपेने आज आपण सोबत आहोत आपल एकमेकांवर प्रेम आहे. का लांब रहायच छान सुरुवात करू आपल्या सुंदर जिवनाला. चालेल ना?"
ती हो बोलली.
त्याने तिला घट्ट मिठीत घेतल. "आरती आय लव यु. मला तुझ्या सोबत रहायच आहे. तुला खूप खूप प्रेम द्यायच आहे. माझी साथ देणार ना. कुठलीही गोष्ट सुरुवातीला नको वाटते. पण सुरुवात करावी लागेल ना. तुला आवडतो ना मी. "
हो.
" छान सोबत राहू काळजी करू नकोस. विचार करण बंद कर. जा तयार हो."
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा