ओढ तुझी लागली भाग 51
©️®️शिल्पा सुतार
.......
.......
वीरने समजवल. आरती तयार व्हायला आत गेली. पाच मिनिट ती तिथे बसुन होती. बरोबर बोलतो आहे वीर. मला ही त्याच्या सोबत रहायच आहे .ती तयारी साठी उठली. काॅटवर साडी ठेवलेली होती. डार्क ब्लू प्लेन साडी. नेसणार कशी? साडी नेसता येत होती पण परफेक्ट नाही. इतके दिवस बाकीचे मदत करत होते. तिने दार उघडल.
"वीर इकडे ये. मला नीट साडी नेसता येत नाही."
"काही हरकत नाही आपल्याला कुठे जायच नाही. माझ्या साठी नेसायची आहे. मी मदत करु का?" तो मुद्दामून आत येत होता.
"नाही जा मी करते ट्राय."
ती साडी नेसली. केस मोकळे सोडले. तयारी केली. टिकली लावली. हातात बांगड्या मंगळसूत्र सगळ खूप शोभत होत. चेहर्यावर वेगळ तेज होत.
" झाल का? " वीर आवाज देत होता.
हो
" ये मग बाहेर. "
ती हळूच बाहेर आली. वीर समोर उभा होता. "ओह माय गॉड, किती सुंदर दिसते आहे ही ."
"अस नको बघू वीर." ती पण हसत होती.
"छान नेसली की साडी." वीर बोलला. तिची परफेक्ट फिगर. डार्क साडी तून दिसणार अंग. अगदी सुंदर. केस किती छान आहेत हिचे . वीर भान हरपुन गेला होता. त्याने हात पुढे केला. चल.
ते दोघ टेरेस वर गेले. शांत गार वातावरण होत. गारव्याने अंगावर काटा येत होता. " इथे थंडी वाजते. "
" माझ्या जवळ थांब मग. जावू थोड्या वेळाने खाली."
ते डायनिंग टेबल वर येवून बसले. समोर तिचा आवडता चॉकलेट केक होता .
" हे कधी अरेंज केल? " आरती विचारत होती.
"दुपारी. आवडल का?"
"हो. थँक्स."
त्याने तिला गुलाबाच फुल दिल. गिफ्ट दिल.
"यात काय आहे?"
"बघ उघडून. "
आत गोल्ड चैन, पेंडंट, मॅचिंग कानातले, अंगठी, बांगड्या पण होत्या. किती सुंदर आहे हे. त्यातले हिरे खूप चमकत होते. " हे महाग असेल वीर. "
" तुझ्या साठी काहीही. "
" उद्या घालते."
" हो तुझ आहे तु ठरव."
दोघांनी मिळून केक कापला.
जेवण तयार होत. पनीरची भाजी, पुलाव, पोळी. सगळं आरतीच्या आवडीच होत.
"वीर इथे खूप अंधार आहे. कोणी आल तर?"
"कोण कश्याला येईल? इथे सिक्युरिटी भरपूर आहे आणि तो बघ जवळच गाव आहे. काळजी सारख नाही. तस तुला भीती वाटत असेल तर मी आहे. माझ्या जवळ ये." त्याने तिला मागून मिठी मारली. वीर दाखवत होता ते गेट आहे. तिथे पर्यंत आपली जमीन आहे. या टोकापासून त्या टोकापर्यंत. उद्या जावू आपण तिकडे वॉकला.
" हो. आज चांदण खूप छान पडल ना. "
" हो त्यांना समजल असेल आज आपण दोघ टेरेस वर वेळ घालवणार आहोत म्हणून आकाश एवढ छान वातावरण आहे. त्यात तू इतकी सुंदर दिसते." त्याने त्याची मिठी घट्ट केली.
आरती त्याच्या पासून बाजूला व्हायची धडपड करत होती. तो तिला सोडत नव्हता." वीर सरक ना. "
"नाही आरती आज माझ्या पासून तुझी सुटका नाही. उगीच त्रास करून घेवू नकोस. डान्स? "
" म्युझिक कुठे आहे?"
"आहे ना आपल्या मनातल म्युझिक." त्याने तिच्या कमरेवर हात ठेवला. तिला जवळ ओढून घेतल. हातात हात होते. तो तिच्या डोळ्यात बघत होता. तिची नजर खाली गेली. ते नाचत होते. मधेच तो तिला मिठीत घेत होता.
"आरती आपली डान्स साठी केमेस्ट्री खूप छान आहे आठवत ना."
आरती हसली." हो वीर ट्रेन मधे किती छान नाचलो होतो आपण. तुला काय वाटल होत तेव्हा?"
"खुप छान वाटल होत. वाटत होत तू अशी माझ्या जवळ रहायला हवी. तुझ्या बरोबरचा तो ट्रेन प्रवास नेहमी लक्ष्यात राहील. तू अतिशय गोड दिसत होती. पण वैतागली होतीस. मी खूप त्रास द्यायचो का तुला? "
"हो. त्रास म्हणजे कोणी वीर अस जरी म्हटलं तरी माझे हात पाय थरथर कापत होते तेव्हा. अस कस कोणत्याही मुला सोबत नाचणार. मला भीती वाटत होती. "
आता?
"आता नाही वाटत भीती. तू खूप खूप चांगला आहेस. मला समजून घेतो. खूप प्रेम करतो. "
अजून?
" अजून काही नाही तू आवडतो. "
" आरती लव यू. "
" लव यू टु."
टेरेस वर गादी होती.
त्याने तिला दोघी हातात उचलून घेतल. अलगद खाली झोपवल. तिने डोळे मिटून घेतले." आरती डोळे उघड माझ्या कडे बघ."
" वीर मी तुझ माझ्या जवळ असण फील करत होते. "
त्याने तिला मिठीत घेतल. दोघ आता वरती आकाशात तारे बघत होते.
"आम्ही सुट्टीत यायचो ना तर मी तासनतास अस चांदण बघायचो. तेव्हा माझ स्वप्नं होत की मी माझ्या आवडत्या व्यक्ति सोबत असेच क्षण घालवेन."
वीर तिच्या जवळ येत होता. त्याने तिच्या ओठांवर ओठ टेकवले. ती एकदम त्याच्या मिठीत सामावून गेली. काही समजत नव्हत काय सुरू आहे. पण खूप छान वाटत होत.
" आरती तू ठीक आहे ना."
हो .
ते दोघ खाली आले. वीरने दार लावून घेतल. हो नाही चा प्रश्न नव्हता दोघांना एकमेकांचा सहवास हवा हवासा होता. पूर्ण जगाचा विसर त्यांना पडला होता. एकमेकांचे होण्या साठी ते अधीर झाले होते.
आरती सकाळी उठली. वीर झोपलेला होता. तिने तिची बॅग घेतली. ती अभ्यास करत होती .
वीर उठला. "आरती केव्हा उठलीस?"
"थोड्या वेळा पूर्वी. "
तो येवून तीचा मांडीवर डोक ठेवून झोपला होता .
"वीर सरक जरा."
"झोपू दे ना."
" काल काही अभ्यास झाला नाही. परीक्षा किती जवळ आली."
"हो का. का बर झाला नाही अभ्यास?" वीर हसत होता.
वीर प्लीज.
"आरती चल ना वॉक ला. इथे अतिशय छान वाटत. "
" हो दहा मिनिट थांब हा चॅप्टर संपवते मग जावू. तू सरक ना." आरती त्याला ढकलत होती.
" नाही मी इथेच थांबेल. "
" ठीक आहे मग गप्प रहा. "
आरती वाचत होती. वीर तिथे त्याच्या मेल चेक करत होता.
" चल ड्रेस बदल. "
"माझे कपडे नाहीत इथे."
"ती बघ बॅग त्यातून घे. "
" अरे किती दिवस राहणार आपण इथे?"
"आता इथे रहायच्या आपण ." वीर मुद्दाम चिडवत होता.
"नाही इथून कॉलेज लांब आहे. रोज कस येणार जाणार. "
"पण इथे छान एकांत आहे फक्त तू आणि मी." त्याने आरतीला परत जवळ मिठीत घेतल. आरती लाजली.
"वीर घरी जायचं."
" आज संध्याकाळी जावू आता माझ्या जवळ रहायच. "
ते फिरायला निघाले. बाहेर काम करणार्या काकांच कुटुंब रहात होत. "वीर साहेब नाश्त्याला काय हव?"
"आरती काय सांगू या. "
" जे तयार असेल ते द्या."
" पोहे आहेत."
चालेल.
सुंदर वातावरण होत बाहेर. जातांना ते शेत बघत होते. " आपण भाजी घेवून जावू घरी. "
हो.
ते नदी किनारी गेले एका खडकावर बसले होते. स्वच्छ वाहत पाणी होत. "इथे किती छान वाटत ना टेंशन फ्री . "
" म्हणून म्हणतो इथे राहू आपण. फक्त तू आणि मी. भरपूर प्रेम करायचं आरामात रहायच. " वीर ने तिला जवळ ओढल.
"वीर तुझे विचार काही बरोबर वाटत नाही मला. सोड आपण बाहेर आहोत. "
" थोड्या वेळाने बघ."
"अस का." ती त्याच्या अंगावर पाणी उडवत होती.
" आरती नको."
ती ऐकत नव्हती.
"गेली तू. "
" पकडून दाखव." आरती पुढे पळली. वीर तिच्या मागे होता. थोड पुढे गेली. एक मोठ डॉग आरती कडे पळत आला. ती घाबरली. "वीर मला वाचव. " ती वीर पर्यंत पळत आली. वीरला मिठी मारली. तो पर्यंत तो डॉग दोघां पर्यंत आला. तो अंगावर उड्या मारत होता.
" आरती घाबरू नकोस शांत हो." शेरू... शेरू... वीर हाक मारत होता." आरती सोड ना मला. "
" नाही वीर प्लीज मला तुझ्या सोबत राहू दे. हा शेरू चावेल मला. "
आरती वीर जवळ होती म्हणून शेरू चिडला होता. तो तिचा ड्रेस तोंडात धरून ओढत होता.
"वीर बघ हा माझा ड्रेस चावतो. "
" आरती बाजूला सरक. शेरूला राग आला आहे."
"का पण? "
"तू माझ्या जवळ आहे तर. तो माझा डॉग आहे. माझ्या वर खूप प्रेम करतो. शेरू चूप. सोड तिला. ये इकडे. "
आरती बाजूला उभी राहिली. शेरू वीर जवळ होता.
"आरती इकडे ये. याला हात लाव."
" नको. "
" काही करत नाही तो गोड आहे. "
"नको मला जायच इथून."
" तू पुढे गेली तर शेरू मागे येईल. "
नको.
" ये इकडे मग. " वीरने आरतीचा हात शेरूच्या पाठीवर फिरवला. शेरू अगदी गप्प झाला.
"छान आहे हा शेरू."
"शेरू ही आरती. माझी आरती. "
" वीर त्याला काय समजत."
"खूप समजत त्याला. हुशार आहे शेरू."
शेरू आता आरतीच्या मागे मागे होता.
" हा कुठे होता काल पासुन. कुठून आणल. "
" वॉच मन जवळ. मामाने दिल. चल शेरू."
"नको ना मला भीती वाटते."
" काही करत नाही तो. चल आत. " ते आत आले डायनिंग टेबल खाली आरतीच्या एकदम जवळ शेरू बसला होता आरती खुर्ची वरती मांडी घालून बसली होती. "वीर प्लीज इकडे ये ना माझ्या जवळ बस."
"काय झालं आरती."
"मला वाचव. याला बांधता येणार नाही का. हा का माझ्या मागे मागे आहे. "
" तू आहेच तेवढी गोड.
"याला बाहेर सोड ना. मला धडधड होते. "
" तू माझ ऐकल तर बाहेर सोडेल. "
" बोल काय? "
" माझ्या जवळ यायच."
"आत्ता?"
हो
"मला अभ्यास आहे."
शेरू... तो उठून उभा राहिला. एकदम आरती जवळ जावून तो आरतीचा हात चाटत होता.
"नको वीर. प्लीज याला घे ना."
" मग हो ना. "
हो. त्याने वॉचमनला बोलवलं. तो शेरूला घेवून गेला. वीर आरती जवळ आला. त्याने तिला उचलल वरती घेवून आला. दोघ रमले होते. थोड्या वेळाने आरती सोफ्यावर येवून बसली. वीर त्याच्या मागे होता.
" वीर तू मला का एवढा त्रास देतोस." आरती आता चिडली होती. वीर हसत होता.
"आरती तू गोड आहेस."
"सरक आता मला थोडा अभ्यास करू दे. मी नापास होईल ना. "
" आज जरी पेपर दिला तरी पास होशील तू एवढी हुशार आहेस."
"घरी केव्हा जायचं?"
संध्याकाळी.
मैत्रिणींचा ग्रुप वर खूप मेसेज आलेले होते.
" कुठे आहेस आरती? आज का नाही आलीस कॉलेज ला?" मीनल ने विचारल.
"काही महत्त्वाच होत का आज? " आरतीने रिप्लाय दिला.
" यायच नव्हत तर आधी सांगता येत नाही का? आम्ही मूर्खासारख इथे तुझी वाट बघत आहोत. "
हा वीर मला काही सुचू देईल तर सांगेल ना मी काही. किती त्रास देतो आहे हा... आरती विचार करत होती.
" सॉरी गर्ल्स."
" घरी तुला आजी ओरडतात म्हणून येते ना तू इकडे." मीनल विचारत होती.
हो ना.
" आरती पण नक्की कुठे आहेस तू ?" राही ने मेसेज टाकला
" घरी आहे मी आता परीक्षेला येईल. मी आईकडे येणार आहे. "
" वीर येवू देईल का?"
"माहिती नाही. काय म्हणतो तो."
"भांडण मिटल का तुमच ?"
"हो मी शांत असते आता घरात. "
"बर झालं. "
"अभ्यास करा. परीक्षेत काही आमच्या बद्दल प्रश्न येणार नाही. " आरती हसत होती.
वीर जवळ येवून बसला." काय म्हणताय फ्रेंड्स? "
" कॉलेज ला का नाही आली विचारता आहेत."
"सांगायच ना मग वीर सोबत फार्म हाऊसवर आहे मी हनीमून साठी."
"वीर गप्प बस. त्या माझ्या साठी कॉलेज मधे आल्या. आता काही शिकवत नाही ना. "
" मग का जाता तुम्ही कॉलेज ला. "
"घरी बोर होत. तुम्ही सगळे ऑफिसला जातात. घरात कोण फक्त आजी आणि मी. त्यात आजी ओरडतात."
वीर बघत होता.
सॉरी.
" आरती तू उगीच नको जावू कॉलेज मधे. घरी रहा. आपण सांगू उमा ताईला. ती देईल तुला काय हव ते रूम मधे. आजीला नको घाबरू. "
" मी आईकडे जाते उद्या. "
"परीक्षा कधी आहे. तीन दिवसांनी. "
" मग आत्ता पासून काय?"
"पाहिल्या पेपर चा अभ्यास करावा लागेल मी येते ना दहा दिवसात. "
"दहा दिवस जास्त नाही का होत. मी तुझ्या शिवाय कसा राहू ते माहिती नाही. नंतर जा. "
"वीर प्लीज जायच मला. टेंशन आल आहे. "
"सांगतो नंतर आजचा उद्याचा दिवस कसा जातो त्यावर आहे. "
"मी ऐकते ना तुझ प्लीज. "
" ठीक आहे जा. "
आरती खुश होती. तिने वीरला मिठी मारली. "उद्या तू ऑफिस ला जातांना मला घरी सोडून दे. "
" हो आता बाजूला हो. माझा कंट्रोल जातो आहे. नाहीतर परत तुझ काही खर नाही. "
ओके.
दुपारी काय जेवायच ते वीर ने खाली जावून सांगितल. आरती ने दोन तास अभ्यास केला. वीरने ऑफिसच काम केल.
दोघांच जेवण झालं. आरती चल आराम कर.
दोघ सोबत होते. संध्याकाळी निघू या.
हो.
"खूप छान वाटल तुझ्या सोबत आपण फिरायला जावू."
"हो नक्की."
निघतांना वीरने तिला जवळ घेतल. "जावुशी वाटत नाही इथून. त्यात तू उद्या आईकडे जाणार."
"हो मी आईकडे जाणार. " आरती खुश होती.
" मी नाही बोलणार. "
" बर सॉरी तू तिकडे ये मला भेटायला. "
" पण तिकडे तू आजी सोबत रहाते ना. कस वाटेल ते तू मी आजी एका खोलीत."
आता आरती खूप हसत होती.
" वरती आहे रूम मला भीती वाटायची म्हणून आजी सोबत रहायची."
"मी आलो तर आपण वरती राहू."
"म्हणजे तू माझ्या घरी झोपायला येणार. "
" तू नाही का माझ्या घरी झोपत रोज."
" बर पण सुट्टी असेल तेव्हा ये. दुसर्या दिवशी पेपर असेल तर मग अभ्यास असतो."
ओके .
"वीर शेरू आहे बाहेर मला भीती वाटते."
" चल मी आहे ना. "
ते बाहेर आले. शेरू पळत आला. आता तो वीर ऐवजी आरतीच्या मागे होता.
" झाल याच्यावर ही केली जादु. शेरू माझ्या कडे बघायला तयार नाही. "
आरती त्याच्या पाठीवरून हात फिरवत होती. तो लाडाने तिच्या कडे बघत होता. आरती कार मधे बसत होती. शेरू आत यायची घाई करत होता.
"शेरू तू नाही येवू शकत बाहेर हो."
तो ऐकत नव्हता पुढच्या सीट वर आरती शेरू दाटीवाटीने बसले होते.
" वीर याला घे ना. शेरू प्लीज जा. मी येईल परत." तिने त्याच्या कपाळावर पापी दिली.
"अरे वाह शेरू आवडला का?"
"हो आता नाही भीती वाटत. छान आहे हा. फक्त उड्या मारल्या की भीती वाटते. "
वॉचमन आला भाजी घेवून त्याने मागे डिकीत सामान ठेवल. तो शेरूला घेवून गेला. तो लांबून इकडे बघत होता. भुंकत होता. वीर त्याच्या जवळ गेला." शांत हो छान रहा मी येईल परत. "
ते निघाले. "किती गोड आहे ना हा."
"कोण मी?"
"तू नाही वीर शेरू ."
"आरती मी सोडून तू कोणाला ही छान बोलायच नाही. "
आरती हसत होती." एवढ काय. "
"मला छान बोल ."
"बर वीर तू खूप छान आहे. "
"मग आज काय प्लॅन आहे."
"काही नाही. "
" आज आपण बाल्कनीत गप्पा मारत बसू."
"ठीक आहे. " ते निघाले.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा