ओढ तुझी लागली भाग 52
©️®️शिल्पा सुतार
.......
.......
वीर आरती घरी आले. गेट मधून कार आत आली.
" किती छान होता ना हा ब्रेक. आपण असा नेहमी एकमेकांसाठी वेळ काढायचा ." वीर बोलला.
"हो नक्की." आरती खुश होती. ती कार मधून सामान काढत होती. "कोण आलय? कार कोणाची आहे?"
वीरने ओळखल सोनिया आली आहे वाटत. काय कटकट आहे.
आत सोनिया, तिची आई, शनाया, नंदिनी मॅडम बसलेल्या होत्या.
" आरती वीर या. "
सोनिया वीरला भेटली. वीर या वेळी पटकन बाजूला झाला. आरतीला राग येईल अशी कोणती गोष्ट त्याला करायची नव्हती. "हॅलो अॅण्टी. "
"बाहेर गेलेले का कुठे?"
हो.
सोनिया आरती कडे बघत होती. आरती सगळ सामान घेऊन उभी होती. वीर तिच्या जवळ गेला. "दे इकडे ती बॅग."
"मला थोड काम आहे." वीर बॅग घेऊन वरती निघून गेला. तो गेला तिकडे सोनिया बघत होती.
"ये आरती बेटा बस."
शनाया आरती आल्या मुळे खुश होती." वहिनी तू नव्हती तर किती बोर झाल."
"कुठे गेले होते हे?" सोनिया विचारत होती.
"ते बाहेर गेले होते."
उमा ताई कॉफी घेवून आल्या. त्यांनी सगळ्यांना कॉफी दिली. आजी समोर बसलेल्या होत्या. त्या आरतीची काल पासुन वाट बघत होत्या. कधी तिला बोलते अस त्यांना झाल होत. आरतीने त्यांच्या कडे परत दुर्लक्ष केल.
वीर रूम मधे होता " ही कॉफी नेवून दे त्याला आरती. "
हो आई .
"मी देवू का कॉफी ?" सोनिया बोलली.
"नको मी आहे ना." आरती उठली. कॉफी घेवून ती रूम मधे आली. तिच्या मागे सोनिया शनाया पण आल्या.
" ही का आली इथे?" आरती हळूच शनायाला विचारता होती.
"माहिती नाही वहिनी. अशी करते ती."
वीर टीव्ही बघत होता. तो नीट उठून बसला. त्याच्या जवळ सोनिया बसली. "वीर कॉफी."
आरती त्याच्या कडे बघत होती. तो उठून काॅट वर बसला. सोनिया शेजारी शनु बसली.
आरती सामान आत नेवून ठेवत होती. ती येवून वीर जवळ बसली.
वीर सोनिया पासून दूर होता म्हणून आरती खुश होती. पण मी आईकडे असती तर हा अस बोलला नसता का हिच्याशी? आता तीला राग आला होता. "मी भाजी खाली ठेवून येते."
"असू दे आरती बॅग जड आहे. थांब मी येतो." ते दोघ बॅग घेऊन खाली गेले. किचन मधे भाजी ठेवली.
"ही का आली इकडे?" आरती विचारत होती.
"काय माहिती."
"तू बोलत का नाही तिच्याशी?"
"तुला नाही आवडत म्हणून." वीर तिच्या जवळ येत होता.
"नको वीर कोणी येईल. " तरी त्याने तिला कमरेत हात घालून जवळ ओढल.
" सोड ना. उमा ताई येतील." आरती इकडे तिकडे बघत होती.
"मला माहिती नाही. किती छान मूड होता माझा. वाटल होत घरी जावून छान तुला जवळ घेवू. या सोनियाला बघून बोर झाल."
"अस का? मी आईकडे असती आणि ती इकडे आली असती तर?"
"तरी मी बोललो नसतो." आता वीर हसत होता.
आरती चिडली. "तु का हसत आहेस? म्हणजे मी नसतांना तू तिच्या सोबत मजेत गप्पा केल्या असत्या."
"नाही आरती."
"हो अस आहे. माझ्याशी अजिबात बोलू नकोस. सोड मला. " आरती चिडली.
" जी गोष्ट झाली नाही ती आठवून तू रागावते म्हणजे काय." वीर तिला थांबवत होता.
ती रागाने आत निघून गेली.
काय यार काल या वेळी आम्ही किती प्रेमाने बोलत होतो. आणि आज काय हे?
आरती.. आरती.. तो तिच्या मागे गेला.
आरती.. आरती.. तो तिच्या मागे गेला.
आरती आता रूम मध्ये जावुन सोनिया शनायाशी बोलत होती.
वीर स्टडी रूम मध्ये बसलेला होता. थोड्या वेळाने त्या गेल्या. आरती अभ्यासाला बसली. शनाया तिच्या सोबत होती. थोड्या वेळाने नंदिनी मॅडम सगळ्यांना बोलवायला आल्या.
"आई मी उद्या आई कडे जावू का? परीक्षा झाल्यावर येईल."
"हो जा."
"कधी पर्यंत आहे तुझी परीक्षा वहिनी?"
आरती सांगत होती.
"माझी पण परीक्षा एक दिवस आधी संपेल ."
"तू येशील का आईकडे आपण गर्ल्स पार्टी करू. मग येवू घरी."
" हो येईल ना. आई मी जाईल. "
हो जा.
दोघी खुश होत्या.
" माझ काय?" वीर विचारत होता. आता आरती, शनाया, नंदिनी मॅडम हसत होत्या. "तुम्ही सगळ्या तिकडे मजा करणार. हे चालणार नाही. माझ्या सोबत रहायच. "
" तू पण ये तिकडे. सगळे किती मागे पुढे करतात तुझ्या. काय हव नको अगदी हातात देतात. जावई बापू." आरती बोलत होती.
"हो दादा एवढी खातीरदारी." शनाया विचारत होती.
हो.
"आपण इकडे ही पार्टी करू दादा."
"चालेल मजा येईल."
"चला जेवून घ्या." नंदिनी मॅडम,शनाया पुढे गेल्या.
आरती वीर कडे बघत होती.
" काय झाल चल ना. आजींची भीती वाटते का? "
हो .
"मी आहे ना. पण त्या बदल्यात... " वीर तिच्या कडे येत होता. आरती पुढे पळाली. " वीर या शिवाय तुला काही सुचत नाही का?"
"नाही ना तुझ्या प्रेमात पार आंधळा झालो आहे मी. "
ते खाली गेले. वीर आजीं जवळ बसला. आजी चिडलेल्या होत्या. त्या दुसरीकडे बघत होत्या. " आजी मग काय केल दोन दिवस?"
आजी बोलल्या नाहीत.
"आजी काय झालं बोल ना. माझा राग आला का. सॉरी मी बोललो तुला. तू मला हव ते बोल. "
" मला कोणाशी काही बोलायच नाही. " आजी रागाने बोलल्या.
" मी आरतीची बाजू घेतली म्हणून चिडली का? आजी तू आरतीला काही बोलू नको."
"नाही बोलणार. कोणाला काही नाही बोलणार. काहीही करा."
"आजी तू आरतीला समजून घ्यायला हव ना. ती आधीच आपल्या घरी गोंधळून गेली आहे. तिला आधार दे प्रेम दे. मग बघ ती किती करेल तुझ. एवढ माझ म्हणण होत."
आजी तरी गप्प होत्या.
वीर आता आरती. शनायाशी बोलत होता.
आरती ताट करत होती. ती शनायाला शेरू बद्दल सांगत होती. "किती गोड आहे तो शेरू. "
" वहिनी तो मोठा झाला असेल ना? मी बरेच दिवस झाले तिकडे गेली नाही. "
" कोणी तरी खूप घाबरल होत शेरूला. " वीर चिडवत होता.
"किती मोठा आहे तो शेरू. त्यात उड्या मारतो भीती वाटणारच." आरती काय काय झालं ते सांगत होती.
" बरोबर आहे वहिनी. "
"शनू आपण जावू एकदा आरामात. आजी तू येशील ना फार्म हाऊसवर ." वीर परत आजींना विचारत होता.
नंदिनी मॅडम, राहुल सर आले. जेवण झाल. आरती, वीर, शनाया बाहेर फिरत होते.
" चल आरती." वीर आरती कडे बघत होता. ती लाजली
"मला पण अभ्यास आहे. " शनाया आत आली.
दोघ रूम मध्ये आले. वीर तिच्या जवळ बसलेला होता. " आरती घरी आल्या पासून तू माझ्या कडे काहीच लक्ष देत नाही. एक तर तू आता दहा दिवस घरी नाहीस."
" मी थोडा अभ्यास करू का." आरती वीर जवळून उठत होती.
"नाही उद्या पासून तू घरी नाहीस. माझ्या सोबत वेळ घालव. हे घे तुला." त्याने चॉकलेट दिल.
"कुठून आणतो तू रोज चॉकलेट?"
" आहेत माझ्या कडे. "
दाखव ?
नाही .
"वीर दाखव कुठे आहेत. " तिने त्याला ओढत कपाटा जवळ आणल.
उघड हे.
" माझ्यावर खूप अत्याचार होत आहे. माझ कपाट गेल आता. " वीरने तिला मागून मिठी मारली. मुद्दाम त्रास द्यायला सुरुवात केली.
"सोड मला वीर. " तिने कपाटातून 5-10 चॉकलेट घेतले. मला त्या दिवशी दिल नाही ना आता बघते.
" आरती चॉकलेट वापस ठेव नाहीतर तुझ काही खर नाही."
आरतीने ऐकल नाही तिने चॉकलेट तिच्या कपाटात ठेवले.
"अशी दादागिरी असते इथे." वीर तिला बोलत होता. आरती वर काही फरक पडला नाही. ती आरामात चॉकलेट खात होती.
वीर तिच्या जवळ आला. "चल आता आराम कर."
"परीक्षेला दोन दिवस बाकी आहेत. अजिबात अभ्यास करू देत नाही तू."
"मग तू का गोड आहेस एवढी? ओह चॉकलेट खाते नेहमी. "
आरती हसत होती.
"तुला यायच ना माझ्या जवळ?"
हो. तिने त्याला मोठी मारली.
सकाळी आरती आवरत होती. वीर तिच्या मागे मागे होता. तिने बॅग मधे सामान ठेवल की तो ते काढून घेत होता. "काय सुरू आहे हे वीर? "
"उद्या जा ना आज नको."
" माझा अभ्यास बाकी आहे. जाते ना प्लीज. मला ही हे अवघड जात आहे. तुला सोडून नाही रहाता येणार."
"मग इथून जा परीक्षेसाठी. "
"नाही. घरी जाते."
ठीक आहे. त्याने तिला मिठीत घेतल.
"मला करमणार नाही."
मलाही.
आता ते नाश्त्याला खाली आले. नाश्ता झाला. आई, बाबा, शनाया, आजी मी आईकडे जाते.
" ऑल द बेस्ट बेटा लवकर ये. "
हो.
ती वीर सोबत निघाली. चेहर्यावर खूप आनंद होता.
" आरती हे बरोबर नाही तू खुश वाटते आहेस." वीर कंप्लेंट करत होता.
"अरे मग कोणाला ही आपल्या आई बाबां कडे जातांना आनंद वाटेल ना."
"मला रोज फोन करायचा आणि मी तिकडे तुझ्या कडे आलो की आपण वरती रहायच."
" हो पण येण्या आधी सांग दुसर्या दिवशी पेपर असेल तर."
हो.
घर आल. वीरने तिचा हात धरून ठेवला.
"सोड ना वीर जाते ना मी. चल आत येतोस का? "
" नाही उशीर होतो आहे. निघू मी. "
" हो. बाय. "
"नक्की रहायचं ना तुला इथे. "
हो.
" घरी यायच असेल तर सांग मी येईल घ्यायला. " वीर गेला. आरती बॅग घेवून आत आली.
" आई आरती आली." वरुण घरी होता.
आई, आजी किचन मधे होत्या. आरती जावून भेटली. " आता मी इथे खूप दिवस आहे . "ती खुश होती. वरुण येवून बसला.
" एकटी आली का तू?" सरला ताई विचारत होत्या.
" नाही वीर आले होते. "
" आत का नाही आले? "
" उशीर होत होता. नाश्त्याला काय आहे? "
"थालीपीठ लावू का?"
हो. आरती खात होती. वरुण त्याच्या कामात होता.
"आजी घे."
"नको मी खाल्ल."
"अगदी अर्ध पण नाही खाल्ल त्यांनी. " सरला ताई सांगत होत्या.
" आजी डायट वर आहेस का? "
म्हणजे?
" सुंदर बारीक व्हायचं का?"
" हो या वयात काय करणार मी डायट. " आजी हसत होत्या.
आरतीने फ्रेंड्सला सांगितल घरी आल्याच. "आजी आई मी वरची खोली घेते. रात्री अभ्यास असेल. आजीला डिस्टर्ब नको. माझ्या फ्रेंड्स पण येतील."
ठीक आहे.
वीर आला तर बर पडेल असा विचार तिने केला. तेव्हा अचानक त्याच्या साठी वरच्या खोलीत गेलो तर बरं वाटणार नाही. ती वीर चा विचार करून लाजली होती.
आरतीने तीची बॅग तिचं सामान तिची बुक्स वरच्या रूम मध्ये ठेवल.
वरूण मदत करत होता.
" झाला का दादा अभ्यास? परीक्षेला अगदी दोन-तीन दिवसच बाकी आहे."
"हो करतो आहे."
वीर ऑफिसला पोहोचला होता. त्याचा मेसेज आला.
आरतीने लगेच अभ्यासाला सुरुवात केली. जे जे लेसन बाकी होते ते सगळे आधी करून घेऊ आणि उद्यापासून पहिल्या पेपरचा अभ्यास करू असं तिने टाईम टेबल तयार केला.
" दुपारी जेवायला काय करू? " सरला ताई वरती येवून बसल्या .
" काहीही कर तुझ्या हातच्या सगळ्या भाज्या छान होतात."
"बेटा ठीक आहे ना तिकडे घरी सगळे?"
"हो आई."
छान दिसते आहे आरती. त्या मनात विचार करत होत्या.
"आजी कश्या आहेत?"
"आई त्या आजी मला खूप ओरडल्या होत्या. बोलल्या तुम्ही आई बाबांना प्रोग्रामला बोलवलं नाही. "
" अरे आपण बोलावलं होत. "
" हो ना वीर बोलला त्यांना. माझी बाजू घेतली. "
" अरे वाह. लक्ष देवू नकोस आजीं कडे. तू उलट उत्तर देवु नकोस. वीर चांगले वागतात ना ."
" हो आई वीर चांगला आहे आई. माझ प्रेम आहे वीर वर. आता राग येत नाही. "
" अस रहा छान. ऐकत जा त्यांच. "
"हो आई. "
दुपारी मीनल आली." कुठे आहे आरती? "
" वरती आहे रूममध्ये. " वरुणने सांगितल.
" तू काय करते आहेस इकडे वहिनी? मुद्दाम आरती आल्याचा चान्स घेतलेला दिसतो आहे. "
मीनल लाजली." वरुण सरक बाजूला जावू दे. "
" दादा संध्याकाळी येईल."
" माहिती आहे मला."
" अरे हो मी अस कस विसरलो. आता आमच्या पेक्षा जास्त तुला त्याची माहिती असेल. बॅग मधे काय आहे?"
बूक्स.
" खाऊ आहे का? "
" हो शंकरपाळे आरती साठी आईने दिले . "
" दे ना. "
" वाटी आण. "
ती वरती आली.
" तू इकडे शिफ्ट झाली का?
हो.
" का बर? तू आजी सोबत राहते ना?"
"रात्री अभ्यास असतो. आजी लवकर झोपते. तू काय इतक्या चौकशी करते आहेस मीनल. मी काही तुझी आणि दादाची रूम नाही घेतली."
"आरती काहीही." मीनल हसत होती. वरती दोन तीन रूम होत्या.
"तुझी आणि राहुल दादाची रूम बाजूची आहे."
ती काही म्हटली नाही.
वरुण येवून त्यांच्यात बसला. "दे शंकरपाळे."
" चला आता अभ्यासाला बसा. " ते शांतपणे अभ्यास करत होते. थोड्या वेळाने वरुण खाली गेला.
"मी निघते आता." मीनल बोलली.
"दादा येईपर्यंत नाही थांबणार का? किती नाटक सुरू आहे मीनल." आरती हसत होती.
अस नाही.
थोड्या वेळाने राहुल आला. मीनल आरती किचन मधे चहा करत होत्या. राहुल खुश होता. मीनल मुद्दाम तीच तीच काम करत होती.
" आरती केव्हा आलीस?"
"सकाळी. आता परीक्षा होई पर्यंत इथेच आहे मी. "
चला छान. म्हणजे आरती इथे आहे तर मीनल रोज येईल.
" मीनल दादाचा पण चहा ठेव." मी आलेच जरा. ती बाहेर निघून गेली.
राहुल ओट्या जवळ उभा होता. मीनल गॅस कडे बघत होती. "आज वेळ मिळाला तुला इकडे यायला. मी भेटायला ये बोलतो तर येत नाही. आज मी सोडायला येतो मला बोलायच आहे तुझ्याशी. "
"हो. चहा झाला की निघु. आई आली असेल. "
आरती सगळ्यांना चहा देत होती. मीनल वरुण जवळ बसली होती. "मी निघते आता काकू." ती सरला ताईंना बोलली
राहुल तयार होता.
"तू कुठे चालला आहेस दादा?" आरती वरुण तिथे होते. वरुणने अस विचारल्यावर ते हसत होते.
तो गडबडला.
" जा जावून या फिरून या." आरती बोलली.
" येतांना आमच्या साठी आईस्क्रीम आण. नाहीतर उद्या पासून आम्ही मीनल वहिनीला त्रास देवू. " वरुण बोलला. आरतीने त्याला सपोर्ट केला.
ठीक आहे. ते दोघ गेले.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा