Login

ओढ तुझी लागली भाग 53

ज्याच्यावर प्रेम असत तो मिळतोच ही कथा आहे आरती आणि वीर ची
ओढ तुझी लागली भाग 53

©️®️शिल्पा सुतार
.......

मीनल बाईकवर राहुलला चिटकून बसली होती. दोघ शांत होते. ते मंदिरात आले. दर्शन झाल. ते बागेत येवून बसले.

" मीनल एकदम कशी काय शांत झालीस तू? सगळ ठीक आहे ना घरी ? " राहुल विचारत होता. आजकाल काही बोलत नाही ही.

" हो ठीक आहे ."

" मग कसल टेंशन आहे? अभ्यास झाला नाही का? मी आहे ना. तुला कोणी काही बोलणार नाही. " राहुल एकटा हसत होता.

"अभ्यास झाला आहे . "

" मग आपल्या लग्नाच टेंशन आल का? मी तर खूप उत्साही आहे."

मीनल शांत होती.

" मीनल मोकळ बोल. काळजी करू नकोस जे आहे ते नीट सांग. "

"राहुल आईने लोन साठी अप्लाय केल आहे."

"काय? किती पैसे हवे आहेत?"

"बहुतेक दीड लाख. "

का ?

"आपल्या लग्नाचा खर्च कसा होईल त्या शिवाय . "

"काकू का करतात अस? "

" माहिती नाही." आता ती रडत होती.

मीनल शांत हो. रडू नकोस. त्याने तिला जवळ घेतल.

"आई कसे काय ते पैसे परत करेल? एक तर तिला किती कमी पगार आहे. आम्ही रोजचा खर्च कसा करतो आमच आम्हाला माहिती. त्यात या लोन चे हफ्ते असतिल. " मीनल खूप बोलत होती. त्यांची कठिण परिस्थिती होती. कधी कधी घरात भाजी सुद्धा नसायची.

"आज येतो मी घरी आपण बोलू त्यांच्याशी." राहुलला ही कसतरी वाटत होत.

"ती ऐकत नाही. मी किती समजवल."

" मी बोलतो ना. झाली का लग्नाची तयारी सुरू?"

"नाही. पैसे नसतील. म्हणून लोनची घाई सुरू आहे तिची."

"कठिण आहे. आपल लग्न आपण खर्च करू. काय काय हव लिस्ट करून ठेव. "

हो.

" आपण घरी सांगू आम्हाला रजिस्टर पद्धतीने लग्न करायच आहे. खरेदी दागिने काही नको. म्हणजे काकू ऐकतील."

" हो चालेल. " आता मीनलला बर वाटल.

"रजीस्टर झाल की लगेच वैदिक पद्धतीने लग्न करू. ती पूजा होण महत्वाच आहे. आणि तू अजिबात काळजी करू नकोस."

राहुल थँक्स.

" थँक्स नाही. फिरायला कुठे जायचं ते ठरव ?"

मीनल लाजली. "लगेच इंटर्नशिप आहे. नंतर बघू मध्येच सुट्टी घेवू. "

" चालेल पण माझा ही विचार कर थोडा. "

मीनल लाजली होती. " चल निघू या."

ते दोघ मीनलच्या घरी आले.

" या आत. " काकूंना आनंद झाला होता. मीनल चहा कर.

" नको चहा थोड घाईत आहे. काकू एक बोलायचं होत."

" काय झालं? " त्या टेंशन मधे होत्या.

" आम्ही रजिस्टर पद्धतीने लग्न करणार आहोत. खरेदी दागिने वगैरे काही नको."

"काय झालं मीनल काही बोलली का?"

"हो ते आई तू लोन नको घेवू. " मीनल परत बोलली.

"मीनल तू कशाला यांना सांगत बसली. राहुल तुम्ही काळजी करू नका होत आहे ठीक. "

" नाही काकू आमच लग्न आमची जबाबदारी आम्ही करू."

" मीनलच्या लग्नाची खरेदी इकडे होईल तुम्ही दोघ ऐका जरा. " काकू बोलल्या.

" काकू साध्या पद्धतीने लग्न होणार आहे. जो खर्च असेल तो मीच करेल. तुम्ही अजिबात काही करायच नाही या बाबतीत मी अजिबात ऐकणार नाही. आमच ठरलं आहे. आणि कोणी ऐकल नाही तर ते मला आवडणार नाही. " राहुल आता थोड जोरात बोलला.

"ठीक आहे तुम्ही ठरवल आहे तर काही प्रोब्लेम नाही . पण एक सांगू का ही जनरीत असते तुम्ही दोघ का ऐकत नाही. लोक मला नाव ठेवतील ." काकू बोलत होत्या.

"आम्हाला नाही आवडत गडबड गोंधळ. कोण बोलेल तुम्हाला मला सांगा मी बोलल त्यांच्याशी. " राहुल निघाला मीनल बाहेर पर्यंत आली. "मी बोलतो आई बाबांशी तू काळजी करू नकोस. "

" राहुल थँक्स."

" टेंशन फ्री हो. छान अभ्यास कर पास व्हायला हव."

" हो ते होईल मी. "

" मग परीक्षा झाली की. आपण खरेदी करू. "

" आरती राहील ना तो पर्यंत. " मीनल विचारत होती.

" माहिती नाही. "
....

रात्री आरती सरला ताई मदत करत होती." दादाच्या लग्नाची तयारी कधी पासून करणार? "

" सुरू आहे आता पुढच्या आठवड्यात खरेदी करून घेवू."

सगळे जेवायला होते. सतीश राव नुसते आरतीची काळजी घेत होते." हिला आधी जेवायला दे. जास्त भाजी दे. "

"हो बाबा मी ठीक आहे." आरती बोलली.

"वीर जेवायला देतो तिला तिकडे. " वरुण राहुल हसत होते.

"बरोबर आहे सतीशच. वाटत लेकी बद्दल. हसू नका. " आजी ओरडली.

रात्री वीरचा फोन आला. "काय करते आहेस आरती? अजिबात करमत नाही इकडे. मी येवू का तिकडे."

"अजून बारा तास झाले नाही मला इकडे येवून. वीर तू अति करतोस. " आरती हसत होती.

" काय करू मी? बघ माझ किती प्रेम आहे तुझ्या वर."

"पुरे. आता नाही. शनिवारी ये. "

" अरे शनिवार यायला अजून तीन-चार दिवस आहे." वीर हट्ट करत होता.

" तेव्हा माझे दोन पेपर होतील. पुढचा पेपर सोमवारी आहे म्हणून म्हटलं शनिवारी ये . नाहीतर आपण माझी परिक्षा झाल्यावर भेटू. " आरती बोलली.

" नाही अस नको शनिवारी येतो मी. काही इलाज नाही. बायको पुढे मी काही बोलता येत नाही. " वीर बारीक आवाजात बोलत होता.

आरती हसत होती. नाटक नुसत.

" भेटू मग शनिवारी. अजून दोन दिवस. "

हो बाय. आरतीने फोन ठेवला.
......

रात्री लेखकांची ऑनलाईन मीट होती. वीरला अनुश्री आठवली. हिला मिळाली का इंटर्नशिप? आपण तर तिला विसरूनच गेलो होतो. आज विचारू.

बरेच लेखक जॉईन झाले होते. अनु अजून आली नव्हती. वीर वाट बघत होता. अनुश्री जॉईन झाली. तिने बघितलं वीर आहे का. मुद्दाम तिने त्याला हाय पाठवलं.

"बरं झालं अनु तू जॉईन झाली मला तुझ्याशी बोलायचं होतं."

आरती बघत होती काय म्हणतो आहे हा. मी घरी नाही तर कसं बोलतो हिच्याशी.

"अनु तुला इंटर्नशिप मिळाली का?"

" एका ठिकाणी होणार आहे काम. अजून मेल आली नाही."

" तुमच्या लोकांची परीक्षा झाल्या लगेच आहे ना इंटरशिप. नाव द्यायचं होतं ना टीचर कडे. " आरतीने अस सांगितल होत. ते वीर ला आठवल.

" हो मग मला कुठे मिळत नाही. तर मी टीचरला सांगितल मी दोन दिवसात सांगते. "

" एका ठिकाणी होऊ शकतं काम. पण तू बघ तुला यायचं असेल तर माझी बळजबरी नाही. मी तुला दिलं होतं ते व्ही एस इंडस्ट्री. "

" तिथे नको. "

" का काय झालं त्या कंपनीत काय प्रॉब्लेम आहे?"

" तिथे अप्लाय कसं करायचं ते समजत नाही आणि मोठी आहे ती कंपनी." मुद्दाम आरतीने सांगितलं.

"काळजी कशाला करतेस. कुठेतरी काम करायचं आहे तुमच्या लोकांचं तर जास्त नाही चार महिन्याचा आहे ना ट्रेनिंग ."

"तुला बरीच माहिती आहे."

" हो अनुश्री. मला पण तुला एक गोष्ट सांगायची आहे. "

काय?

" म्हणजे पर्सनल आहे. बोलू की नको समजत नाही."

"तुला वाटल तर सांग. "

" माझं पण एवढ्यात लग्न झालं आहे. माझी बायको ती पण तुझ्या कॉलेजला आहे. ती सुद्धा इंटर्नशिप करते आहे."

" कुठल्या कंपनीत? "

"व्ही एस इंडस्ट्री. "

" तिने कस अप्लाय केल?" आरती विचारतांना हसत होती.

" बहुतेक वेबसाईट वरून."

" बघते मी. "

" ठीक आहे मग काही लागलं तर सांग. "

हो.

वीर चांगला आहे. व्यवस्थित बोलतो तो मुलींशी. मी सांगून देऊ का त्याला मी अनुश्री आहे. आज त्याने माझ्या बद्दल सांगितल. इतके दिवस लग्न झाल ते सांगितल नव्हत.

"अनु तू काय लिहिल?" ग्रुप वर मेसेज येत होते.

" काही नाही परीक्षा आहे. अभ्यास आहे खूप. "

" अस कस थोड लिही ना."

प्लीज. बर्‍याच रीक्वेस्ट येत होत्या.

बर.

दोन मिनिटांनी तिने पोस्ट केल.

तुझ्या प्रत्येक गोष्टीत माझा सहभाग असतो. मी कोणती गोष्ट तुला विचारल्याशिवाय करत नाही. किती छान आहे ना हे एकमेकांवर अवलंबून असण. दोघांनाही एकमेकांशिवाय करमत नाही. हेच तर असतं नात्यांचा गुपित. दोघे एकत्र येतात. एक अधिक एक दोन होतात. खूप छान असते ही प्रेमाची बेरीज. आयुष्यभर आधार देते.

वीर वाचत होता. किती छान ओळी आहेत ह्या प्रेमाची बेरीज. आरतीने वाचायला हव. तिला पाठवतो.

अनु प्रेमात पडली वाटत. लग्न झाल म्हणजे हे होणारच. किती सुंदर आपल स्वतः च अस जग तयार होत. आरती लव यु. मिस यू. त्याने आरतीला अनुने लिहिलेल तिला पाठवून दिल.

त्याचा मेसेज बघून आरती खूप हसत होती. थोड्या वेळाने मेसेज आला. "वाचल का किती छान लिहल आहे अनु ने."

"अरे माझी परिक्षा आहे आणि तू काय पाठवतो आहे मला वीर." आरती मुद्दाम बोलली.

"एक मिनिट लागत नाही वाच. इतकी कशी अरसिक तू." वीर बोलला.

"असू दे मी जशी आहे तशी आहे. काय लिहिल आहे तिने तूच सांग."

"एकमेकांना विचारायच काही करतांना."

" ते तर करतोच ना आपण. त्यात काय? हा कॉमन सेन्स आहे." आरती हसत होती.

" तरी नाही लक्षात येत बाकीच्यांचा. अस एकमेकाला महत्व दिल तर प्रेम वाढत. " वीर छान सांगत होता.

"ठीक आहे मी झोपते."

"आरती किती बोर आहेस तू. "

" तू मला त्या अनु वरून बोर बोलतो आहेस ना वीर. "

" नाही ग. "

"मला काव्य लिखाण समजत नाही. सगळ्यांना सगळ जमत नाही."

"ठीक आहे. आता नको रागावू."

"वीर तू काय लिहिल आज?"

" लिहिल पण शेअर नाही केल. "

" मला पाठव."

वीर ने मेसेज केला.

प्रेमात तुझ्या नी माझ्या. नाही अपेक्षा काही. न कसली बंधने. निर्विवाद प्रेम फक्त एकमेकांवर. न बोलता काही माझ्या मनाचे भाव तू जाणले. जे हव ते मनापासुन दिले. मागणे न आता काही. न कोणती आशा. एकमेकांसोबत जगण हेच मनी माझ्या.

वाह काय सुंदर लिहिल आहे. आरती मनात म्हटली. तिने त्या ओळी दोन तीनदा वाचल्या. पण ती गप्प होती.

"आरती आवडल का काय लिहिल मी ते." वीर उत्सुक होता.

"समजल नाही काही. अवघड वाटत आहे." ती मुद्दाम भोळेपणाने बोलली.

" झोप तू आरती. किती बोर बायको आहे. देव बर अश्या जोड्या बनवत." तो रागाने ऑफलाइन गेला.

आरती खूप हसत होती. बिचारा किती त्रास देते मी त्याला.
आरती पाणी प्यायला खाली आली. आई बाबा हॉल मधे बसलेले होते. राहुल त्यांच्याशी बोलत होता. ती येवून बसली.

"काय झालं?"

"आरती अग मीनलच्या आईने लोन साठी अप्लाय केल. " राहुल सांगत होता.

" काय? पण का? "

" लग्नाच खर्च कसा होईल पैसे नाहीत म्हणून अजून खरेदी सुरू केली नाही त्यांनी ."

"काय गरज आहे आपण आहोत ना."

"हो त्या ऐकत नाही स्वाभिमानी आहेत."

आता?

"मी सांगितल आम्हाला रजिस्टर पद्धतीने लग्न करायच आहे. त्या नंतर वैदिक पद्धतीने लग्न पूजा करू. साड्या दागिने काही नको अस सांगितल. त्या म्हणतात लोक नाव ठेवतील. "

" कश्याला कोण काही बोलेल. आपण पूर्वी पासून त्यांना ओळखतो. किती कष्ट केले त्यांनी. कायम जॉब केला. कोणाचा आधार नाही. घर ही किती साध आहे. "

" हो ना. आई बाबा तुम्ही काय म्हणताय. "

" आम्हाला ही कसतरी वाटल ऐकुन. चांगले लोक आहेत ते. आपण करू खर्च. कर्ज घ्यायची गरज नाही. " सतीश राव बोलले.

"माझा ही बँक बॅलन्स आहे. " राहुल बोलला.

" आपण ही गोष्ट थोडी वेगळया पद्धतीने हॅन्डल करायला हवी. घेवू दे त्यांना लोन. करू दे खरेदी. नंतर तुम्ही शाळेत जावून पैसे भरून टाका. कारण अस काहीच करू दिल नाही तर त्यांना कायम वाईट वाटेल. आपल्या समोर त्या खाली मान करून रहातील. अस बरोबर नाही. " सरला ताई बोलत होत्या. सगळे ऐकत होते.

" हो आई म्हणते ते बरोबर आहे. आपण त्यांचा मान जपला पाहिजे. " आरती बोलली.

" ठीक आहे मी मीनलला करतो फोन. " तो त्याच्या रूम मधे गेला. मीनलला सगळं सांगितल.

" ठीक आहे राहुल आई ऐकत नाही. घेवू दे तिला शाळेतून पैसे. जास्त मिळणार नाही मला माहिती आहे.
नंतर देवू आपण. "आता मीनल ठीक होती. दोघ बराच वेळ बोलत होते.

सकाळी मीनल उठली. आवरून आली. काकू स्वयंपाक करत होत्या.

" आई मी आरती कडे जाते."

"मीनल आता ते तुझ सासर आहे. सारख का जाते. "

" अग आरती परीक्षे साठी आली आहे. तीच बोलावते. आता मी नाही गेली तर काय कारण सांगू? "

" जा तू पण अभ्यास करून पटकन ये. राहुल नसतात ना घरी?"

"नाही तो ऑफिसला गेला असेल."

"काल ते म्हटले ते मला पटल नाही. मी लोन साठी अप्लाय करणार आहे. आपला आपला खर्च आपण करू. मला चांगल वाटत नाही ते. " त्या मीनलला सांगत होत्या.

" ठीक आहे आई. पण थोडे घे पैसे. एवढे दीड लाख लागणार नाही."

" तुला हे साध्य पद्धतीने लग्न मान्य आहे ना? "

" हो लग्नात उगीच खर्च करायचा मला पटत नाही. त्या पेक्षा ते पैसे भविष्यात आपल्याला स्वतःसाठी वापरता येतील. "

" बरोबर आहे तुझ मीनल. तरी पण आपण थोड साड्या घेवू तुझ्यासाठी, तुझ्या सासुबाई, आरती, आजीं साठी साडी घ्यावी लागेल . तुला एखादा दागिना करू . "

" नंतर ते पैसे कसे वापस करणार. " मीनल काळजीत होती.

" पगारातून कापायला सांगेल. "

" मी पण लोनचे पैसे देवू लागेल. आता मला ही थोडे फार पैसे मिळतील ना. "

" हो चालेल आपण दोघी मिळून करू. "

आता मीनलच्या आई खुश होत्या.

" आई मी तीन चार तास जाते आरती कडे. "

हो.

" घर काम राहू दे मी करेन."

काकू शाळेत गेल्या. मीनल आवरून आरती कडे गेली.


0

🎭 Series Post

View all