Login

ओढ तुझी लागली भाग 54

ज्याच्यावर प्रेम असत तो मिळतोच ही कथा आहे आरती आणि वीर ची
ओढ तुझी लागली भाग 54

©️®️शिल्पा सुतार
.......

वीरने ऑफिसला जातांना आरतीला फोन केला. "काय करते आहेस तू?"

"आता नाश्ता झाला आता आवरते आणि स्टडी करते . तू केला का नाश्ता?"

हो.

"आई बाबा शनु कसे आहेत?"

"सगळे ठीक आहेत. आजी पण ठीक आहे."

"सॉरी आजी बद्दल विसरली होती बोलतांना." आरतीला कसतरी वाटल.

"ती पण घरची मेंबर आहे. तू आजीला घाबरू नकोस . तिच्या बरोबर अॅडजेस्ट व्हायचा प्रयत्न कर."

" हो नक्की. " बापरे. आजीं सोबत कस एडजेस्ट करणार. मला वाटल होत आजी आता गेल्या की लवकर येणार नाहीत. जावू दे. तिकडे गेल्यावर आधी सारख बोलू त्यांच्याशी.

"वीर तू नेहमी एकटा जातो का ऑफिसला? "

" कधी कधी बाबा असतात. "

" आता थोडे दिवसांनी मी तुझ्या सोबत ऑफिसला येईल." आरती खुश होती.

" माझ्या सोबत का? तुझ तुझ यायच. " वीरला चान्स सापडला होता तिला चीडवायचा.

" अरे का अस? एका बाजूला जातो ना मग वेगवेगळ का? तुला माझ्या सोबत नाही यायच का?"

" लोक म्हणतील ही मुलगी वीर साहेबां सोबत फिरते."

"स्वतःलाच काय साहेब? मग फिरू दे माझा नवरा आहे तू. " ती हसत होती.

" अस जमणार नाही. तू ट्रेनी. मी बॉस. माझ्या सोबत यायला चार्ज लागतील. "

" आता तू माझ्या कडून पेट्रोलचे पैसे घेणार आहे का? "

"नाही त्या पेक्षा जास्त. "

" बापरे. काय आहे ते? " तिला समजल होत तो काय म्हणतोय ते.

"सांगेन वेळेवर. चल बाय ऑफिस आल. "

"ओके बाय."

आरती अभ्यासाला बसली. एक लेसन झाल्या वर मीनल आली." आज का उशीर केला? "

"आई येवू देत नव्हती."

का?

" म्हणत होती ते तुझ होणार सासर आहे . सारख सारख तिकडे नको जावु."

"काकू ना अति करतात. आता हेच तुझ घर आहे. मस्त यायच. छान रहायच. मी पण नंतर जास्त येणार नाही. "

" तिला वाटत इथे येवून मी राहुल सोबत असते. तो ऑफिसला जातो ना नेहमी. किती संध्याकाळी येतो. मी कशाला रोज त्याच्याशी बोलत बसेन. "

" तेच तर. टेंशन नको घेवू राहुल दादा तुझा होणारा नवरा आहे. लोन च काय झालं? "

" आई घेणार आहे. ऐकत नाही जावू दे घेवू दे. आपण नंतर शाळेत जावून पैसे देवून देवू ."

" लग्ना साठी काय घेणार आहे? शालू की घागरा?"

" शालू ठीक आहे ना नंतर वापरता येतो."

हो.

" तू काय घालणार आहे? "

"मी माझा शालू. "

" पाहिल्या पेपरचा अभ्यास करते का?"

"हो आज आणि उद्या चल अभ्यास करू." दोघी शांत होत्या बर्‍या पैकी अभ्यास झाला होता. दुसर्‍या दिवशी मीनल आली नाही .आरतीला बोर होत होत .ती वरुणला त्रास देत होती.

परीक्षा सुरू झाली. आज पहिला पेपर होता. वीरचा मेसेज आला ."ऑल द बेस्ट."

आरतीने थँक्स पाठवल.

छान गेला पेपर. तिने घरी येवून वीरला मेसेज करून सांगितल. लगेच दुसर्‍या दिवशी पेपर होता. अजिबात वेळ नव्हता. तो पण पेपर छान गेला.

आज संध्याकाळी वीर येईल. आरती खुश होती. तिने कोणाला सांगितल नाही. ति कॉलेजहून आल्यावर लगेच अभ्यासाला बसली. नंतर जमणार नाही. केव्हा येईल वीर.

संध्याकाळी वीरचा फोन आला. "थोड कामात आहे. मी आज येणार नाही."

"वीर प्लीज ये ना. काय अस? मी दोन तीन दिवसा पासुन तुझी वाट बघत आहे." ती एकदम बोलली. नंतर गप्प बसली.

वीर हसत होता. "परत बोल."

"जा काही येवू नकोस. जास्त करतो तू."

"तुला मी हवा आहे. बरोबर ना."

आरती लाजली होती. गप्प होती.

" नीट सांगितल तर येईल मी." वीर मुद्दाम करत होता.

" वीर तू ये. माझ्यासाठी. मला तुझ्या सोबत रहायच आहे. बस का?"

"खाली आलो आहे. ये मला तुला बघायच आहे."

आरती पळत खाली आली. वीर वरुण सोबत बोलत होता. आजी, सरला ताई पण बसलेल्या होत्या. तो छान हसला तिच्याशी. तिला सुचत नव्हत काय कराव. ती पटकन किचन मधे गेली. चहा उकळत होता. तिने कपबशी घेतली. दूध कुठे आहे? काय करू.

वीर आला तर आधी मला भेटायला यायच ना त्याने. फ्रेश होऊन येतो अस सांगायच. मी बोलणार नाही त्याच्याशी.

ती चहा घेवून पुढे गेली. वीर जवळ बसली. राहुल दादा पण आला तेवढ्यात. वीर खूप बिझी होता. वरुण राहुल खूप गप्पा मारत होते. आरती आत आली.

"आई आज वीर इथे रहातील."

"हो माहिती आहे आल्या आल्या सांगितल त्यांनी. स्वयंपाक काय करू या? काय आवडत त्यांना? तुझ्या बाबांना फोन करून श्रीखंड आणायला सांग."

"आई ते गोड खात नाही चहात साखर नसते."

"असू दे थोड श्रीखंड आणायला सांग."

बर.. तिने बाबांना फोन केला.

" ठीक आहे आणतो. अजून तुला काय हव? "

" काही नको बाबा."

सरला ताई स्वयंपाक करत होत्या आरती मदत करत होती.

आरती.. आवाज आला वीर उभा होता. मी फ्रेश होऊन येतो. ते दोघ वरती आले. वीरने दार लावून घेतल. एकदम आरतीला मिठी मारली. आरती त्याच्या जवळ खुश होती.

" तू आला मला का नाही सांगितल." ती मुद्दाम चिडली होती.

"मग मला कस समजल असत तू माझी वाट बघत की नाही." तो हसत होता.

"ही आपली रूम का?"

"नाही... तुझी"

"आणि तू?"

"मी आजी जवळ राहणार."

"अस का? मी जावू नाही दिल तर."

" हे माझ घर आहे. माझे दोन भाऊ आहेत इथे मदतीला."

" पण तुझे भाऊ माझ ऐकतात. आता काय करू या? मी जावु का वापस घरी. "

नको.. तिने परत त्याला मिठी मारली.

" सरक मला आटपू दे. नाहीतर बाकीच्यांना वाटेल काय करता आहेत हे. "

आरती हसत होती." सारख काय तेच बोलतो वीर. "

" मी खाली आहे आईला मदत करते. तू ये बाबा येतील. "

" हो आलोच. "

सतीश राव आले. त्यांनी नेहमी प्रमाणे खूप सामान आणल होत.

" बाबा तुम्ही एवढ एक्स्ट्रा सामान का आणता?" आरती बघत होती काय काय आहे ते.

"हा खाऊ तुझ्या साठी. खारी चहा सोबत खाता ना तुम्ही. "

"आम्ही काही लहान नाही .जाढ होऊ अश्याने ."

"काही होत नाही. " ते बाहेर बसले होते. वीर आला ते बोलत होते. प्रकाश राकेश आले होते. राकेशला जॉब मिळाला होता. वीरने काम दिल होत. त्यांच्या दुसर्‍या कंपनीत शॉप मध्ये काम होत. चांगला पगार होता.

कंपनीचा मालक ओळखीचा आहे हे तो सगळ्यांना सांगत होता. वरुणला परीक्षा झाल्यावर बोलवलं होत ऑफिस मधे. प्रकाश एक वर्ष नापास झाल्या मुळे ग्रॅजुएट व्हायला अजून वेळ होता.

स्वयंपाक झाला होता. चला जेवायला.

वरुण राहुल मदत करत होते. त्यांच बघून वीर ही मदतीला आला.

"राहू द्या तुम्ही." सरला ताई, बाबा दोघ बोलले.

अरे वाह जावई म्हणून काम करू देत नाही आणि मला त्यांच्या घरी किती काम देतात. माझ्या घरचे वीर सोबत प्रेमाने वागतात. तिकडे ही चांगले आहेत बाकीचे. आजी सोडून. तरी वेगळ वाटत.

जेवायला खुप पदार्थ होत. वरण भात, दोन भाज्या, कोशिंबीर, भजी, पुरी, श्रीखंड. वीर आज पहिल्यांदा त्यांच्या कडे जेवायला होता. सगळे त्याला खूप आग्रह करत होते.

लकी असत जावई होण. आरती विचार करत होती.

"खुप छान झाला आहे बेत. काकू खूप छान चव आहे तुमच्या हाताला." वीर बोलला.

"काकू काय आई म्हणत जा." आरतीने सांगितल.

ठीक आहे.

आवरून झाल. ते टेरेस वर गेले. राहुल आईस्क्रीम घेवून आला. आरती हे घे.

"दादा ठीक वाटतो ना आता वीर."

"एकदम पर्फेक्ट. काळजीच काही कारण नाही. चांगला रहातो तो. आज इकडे मीनल नाही आली का?"

"नाही आली. त्या काकू रागवतात तिला ."

का ?

"म्हणतात सारख आपल्या घरी यायच नाही त्यांना वाटत मीनल आणि तू फिरत असतात. "

"जरी फिरलो तर काय झाल. माझी होणारी बायको आहे ती. " राहुल वैतागला होता.

" हो थोडे दिवस कर सहन नंतर मीनल आपल्या कडे येईल. "

ते दोघ बोलत होते. वीर आला. "तुमच्या दोघंच खूप पटत ना. मला ओरडायला तुम्ही दोघ आले होते. नेहमी हळू हळू बोलत असतात. " आता ते हसत होते.

" हो दादा खूप छान आहे. सपोर्ट करतो. समजूतदार आहे. "

" काही टेंशन?" वीर दोघांकडे बघत होता.

" मीनल आली नाही ना तर दादा विचारात होता. "

" हो ना. का नाही आली मीनल?"

"काकूंनी नाही पाठवल. "

" काय एक एक. "

राहुलचा फोन आला. तो बाजूला गेला.

" वीर अरे एक सांगायच होत मीनलच्या आईने लोन साठी अप्लाय केल. "

काय किती?

" दीड लाख. त्या ऐकत नाही. नंतर कस काय वापस करतील. मीनल काळजीत आहे. "

"कोणत्या शाळेत आहेत त्या कामाला? "

आरतीने नाव सांगितल.

" ओळखीचे आहेत ते लोक आपण करू काही तरी मदत ."

"ठीक आहे."

ते दोघ त्यांच्या रूम मध्ये आले. आरती बेडशीट टाकत होती. वीर तिला मदत करत होता. तो मुद्दामून तिच्या मागे मागे जात होता. तिला रस्त्यात अडवत होता.

" वीर बाजूला उभ रहा. मी करते ना काम. आणि तुझ्या मुळे माझा अभ्यास झाला नाही. "

" ओह सॉरी. मग आता कर तू अभ्यास. मी झोपतो." तो थोडस हसत होता. त्याला माहिती होत तिला त्याच्या जवळ यायच आहे. तो मुद्दाम अस करत होता.

आरती त्याच्या कडे बघत होती.

"चालेल ना?" त्याने परत विचारल.

ती मानेने नाही म्हटली.

त्याने तिला जवळ ओढून घेतल. "ह्या परीक्षे पुरत ठीक आहे. पण अस इतके दिवस माझ्या पासून दूर रहायच नाही. खूप आठवण येत होती तुझी. लव यु."

" मला ही. वीर आता एक आठवडा. मग मी घरी येईन. "

त्याने पुढे येवून लाइट बंद केला.

सकाळी नाश्त्या झाल्यावर वीर घरी गेला. आरती पुढच्या पेपरचा अभ्यास करत होती. चांगला गेला तो पेपर.

आता सगळे पेपर झाले होते. सगळ्या मैत्रिणींना पेपर सोपे गेले.

" आज संध्याकाळी पार्टी करायची ना? " आरती विचारत होती.

हो नक्की.

तिने शनायाला फोन केला. "येते आहेस का तू इकडे?

"हो वहिनी वीर दादा येणार आहे का? "

"माहिती नाही बहुतेक आपल्याला घ्यायला येईल. "

साडेपाच वाजता शनाया आली. ड्रायव्हर सोडून गेला. ती आज पहिल्यांदा आरतीकडे आली होती. "खूपच छान घर आहे तुमचं. "

"लहान आहे."

"नाही खूपच मस्त आहे." ती सरला ताई, आजींना भेटली.

सरला ताईंनी तिला चहा दिला. "पोहे करू का ग थोडे? "

" नको वरती खाण होणार आहे. आमची आता पार्टी आहे. आई तू पण चल. आजी ये. " आरती बोलवत होती.

" नको मला जिने चढले जात नाही. मी बसते पुढे. " आजी म्हटल्या.

तिने वीरला फोन केला. "तू येतो आहे का इकडे?"

" तुमची मुलींची पार्टी आहे ना. मग मी काय करू तिकडे?"

" आम्हाला घ्यायला ये."

तू आज येत आहे का?"

"हो मी येऊ ना आज? की उद्या येऊ? "

वीर खुश होता." नाही आज ये. खूपच बोर होता आरती तू नाही तर. आजची तुमची पार्टी झाली की फोन कर. मी येतो घ्यायला."

प्रिया, राही, मीनल आल्या होत्या. खूप खाण्याचे पदार्थ ऑर्डर केले होते. त्या सामान वरती टेरेसवर ठेवत होत्या. शनाया त्यांना मदत करत होती. अजून एक दोन मैत्रिणी ही सोबत होत्या.

गप्पा गोष्टींना सुरुवात झाली. खूप मजा येत होती. सरला ताई थोड्यावेळ मुलींमध्ये येऊन बसल्या. सतीश राव आल्यानंतर त्याखाली गेल्या.

मध्ये एकदा दोनदा वरूण, प्रकाश आणि राकेश आले होते. मुलींनी त्या तिघांना बाहेर काढलं. "आमच्यात काय काम आहे तुमच?"

"अरे आपण लहानपणापासून फ्रेंड्स आहोत ना. येवू द्या ना."

"ही गर्ल्स पार्टी आहे." प्रियाने सांगितल.

"नाश्त्याला तर द्या आम्हाला?"

" नाही काहीच मिळणार नाही ."

"ठीक आहे मग आम्ही तुमच्यासाठी आईस्क्रीम आणल होतं. ते मिळणार नाही."

" दे ना वरुण प्लीज. "प्रिया बोलली बाकीच्या हसत होत्या.

" मग तीन प्लेटमध्ये नाश्ता द्या. "

मीनलने समोसा ढोकळे आणि चिप्स दिले.

"मीनल वहिनी तूच सगळ्यात चांगली आहे. माझ्याकडे नेहमी व्यवस्थित लक्ष द्यायचं. तुझा खूप फायदा होईल."

मीनल खूप हसत होती.

" तू आम्हाला एवढे खाण्याची पदार्थ दिले त्यामुळे एक माहिती तुला देतो. राहुल दादा खाली आलेला आहे. वाटलं तर पार्टीतुन चुपचाप अर्धा तास जाऊन ये खाली. " तो एकदम हळूच तिला माहिती देत होता.

मीनल लाजली होती आणि हसत होती. ती मुलींमध्ये येऊन बसली.

त्यांच्या कॉलेजच्या गप्पा सुरू होत्या. शनाया ऐकत होती." छान आहे तुमचं कॉलेज. "

" तुझं कॉलेज कसं आहे शनू?" आरती विचारत होती.

ती सांगत होती.

"तुमच्या ग्रुपमध्ये बॉईज आहेत का?" राही विचारत होती.

"हो खूप बॉईज आहेत."

" चांगले आहेत का ते दिसायला. "

" हो खूप हँडसम आहेत. "आता त्या मुली हसत होत्या.

ती काय सांगते ते आरती ऐकत होती. वाटत मुलींना अस. मला पण कॉलेज मधे विर किती आवडत होता. त्याला बघायला जायची मी रोज. आज तो माझा आहे. तिला वीरच्या आठवणी ने खूप छान वाटत होत.

"डान्स करू या चला. "सगळ्या मुली नाचत होत्या. जेवणाची ऑर्डर आली. ते द्यायला वरुण आला.

"हॅलो लेडिज थोड हळू नाचा. आम्ही खाली किती घाबरलो माहिती का. आमची बिल्डिंग पडायला नको. "

" तू सारख का वरती येतो वरुण? " राही बोलली.

"किती छान वाटत आहे इथे. "

"नाही जा तू. "

" एक मिनिट. मीनल तुला निरोप दिला दादाने. तुला भेटायला बोलवलं आहे ."

"जा ना." मीनल राही त्याला ओरडत होत्या.

" खरच वहिनी. माझ ऐक. आई बाबा बाहेर बसलेले आहेत. किचन मधे कोणी नाही. दादा तुझी वाट बघतो आहे. "मीनल ने त्याला बाहेर ठकलल. सगळ्या मुली हसत होत्या.


0

🎭 Series Post

View all