ओढ तुझी लागली भाग 55
©️®️शिल्पा सुतार
.......
.......
वीरचा फोन येत होता." येवू का घ्यायला?"
" एक मिनिट मुलीनो अर्धा तासात होईल ना आपल जेवण." आरती विचारत होती.
हो.
" ठीक आहे ये वीर. जेवण झाल का?"
"हो खाल्ल मी थोड. आता भूक नाही. "
आरतीने फोन ठेवला.
" तू आजच जाते का आरती?" राहीने विचारल.
हो.
"काय घाई एवढी? " प्रिया त्यांच्यात येवून उभी राहिली.
" अग वीर वाट बघत असेल. कधीची माहेरी आहे ती. " राही बोलली.
" गप्प बस बावळट शनाया आहे इथे." आरती ओरडली.
जेवण खूप छान होत . खूप मजा आली. आपण अस महिन्यातून एकदा भेटत राहू.
"आता मीनलच लग्न आहे लगेच तेव्हा मजा करू." प्रिया बोलली.
सगळ्या खाली आल्या. "काकू आम्ही निघतो."
" येत रहा ग. "
हो.
बाकीच्या गेल्या. मीनल बाजूला उभी होती. राहुल समोरून तिच्या कडे बघत होता. आरती वरती होती ती तिची बॅग पॅक करत होती. तिने तीच सामान खाली आणून ठेवल.
शनाया वरुण राकेश सोबत बोलत होती.
राहुल मीनल आत किचन मधे बोलत होते. "आता खरेदी सुरू कर आपल्या लग्नाची ."
" राहुल आईला शाळेतून सहज पैसे मिळाले." मीनल सांगत होती.
"कसे काय. लोन नाही का?"
"नाही त्यांनी सांगितल लग्नाला मदत म्हणून दिले. "
" कोणी सांगितल?"
"आईने. तिला ही आश्चर्य वाटत होत .कोणी केल असेल हे? शाळा का देईल असे पैसे?"
"काय माहिती?"
"आरती आणि वीर त्यांनी मदत केली असेल का? "
" हो बहुतेक. पण कस विचारणार ? वीरच्या ओळखी आहेत. आपण ते पैसे वीरला वापस करू. "
हो .
" खरेदीला सुरुवात कर आता. काळजी करू नको जे हव ते घे. " राहुलने सांगितल.
"सोबत जावू खरेदी साठी." मीनल हळूच बोलली.
"अरे वाह आज आमच्यावर बरीच मेहेरबानी होते आहे."
राहुल प्लीज. ती खाली बघत होती.
"आता आपण सोबत असू. तू एवढी लाजली तर कस होईल."
....
....
सरला ताई फराळ पॅक करत होत्या.
"आई नको देवु इतक. थोडस दे माझ्या पुरत." आरती त्यांच्या जवळ उभी होती.
"काय झालं?" त्या तिच्या कडे बघत होत्या.
" मागच्या वेळी आजी बोलल्या चिवडा चांगल नाही ." आरतीने हळूच सांगितल.
" कोणी खाल्ला नाही का?"
"सगळ्यांनी खाल्ला आजी सोडून. "
"लक्ष नको देवू. असू दे ना थोडा. खाली हात कस जाशील तू. हे लाडू तुझ्या सासुबाईंना दे. त्यांनी आवडले होते." त्यांनी चिवडा लाडू पॅक केले.
हो.
वीर आला. सगळे हॉल मधे बसले होते.
"वीर जेवण करा ना." बाबा बोलले.
" नाही मी घरी जावून जेवेल. "
"लग्ना साठी कधी येते तू आरती? तुम्ही वीर शनाया? "
" खरेदीला येईल. लग्नच्या दोन तीन दिवस आधी येईल नंतर हो पूजा असेल ना. "
" हो तू लागशील मदतीला. आम्ही येतो तुमच्या कडे आमंत्रण द्यायला." सरला ताई बोलत होत्या.
हो.
मीनलचा फोन वाजत होता. "मला जायच आहे उशीर होतो आहे. आईचा फोन येवून गेला. "
"मी सोडून देवु का मीनल?" आरती बोलली.
"नाही मी जातो तू बसते ना ?" राहुल तयार होवुन आला.
"आम्ही पण निघतो." ती राहुल मीनलला भेटली. ते गेले.
"चला आता ."
"थांबा चहा होऊ द्या."
चहा नको... आरती आजी आई बाबा वरुणला भेटली. ते निघाले. वरुण तीच सामान गाडीत ठेवत होता. दादा बाय.
रस्त्यात त्यांनी ज्यूस पिला घरच्यांसाठी घेतला.
ते घरी आले. नंदिनी मॅडम, राहुल सर, आजी बसलेले होते. शनाया खूप बोलत होती. तिला आवडल होत इकडे. काय काय मजा केली ते ती सांगत होती.
ते घरी आले. नंदिनी मॅडम, राहुल सर, आजी बसलेले होते. शनाया खूप बोलत होती. तिला आवडल होत इकडे. काय काय मजा केली ते ती सांगत होती.
आजी आरती कडे बघत होत्या. ती नेहमी प्रमाणे आणलेल सामान टेबल वर ठेवत होती. "आई हे बेसनचे लाडू. आईने तुम्हाला दिले. ते लगेच डब्यात काढायला सांगितले. कोणता डबा घेवू."
"चल मी आली."
"काय आहे बॅग मधे?" वीर विचारत होता.
" चिवडा आहे. "
" दे थोडा आणि मला जेवायला दे. "
हो. आरतीने फराळ किचन मधे ठेवला. आत जावून वीरच ताट केल.
" चल तू पण जेव माझ्यासोबत. "
" नाही आम्ही आज खूप खाल्लं आहे." आरती बोलली.
" हो खूप छान होत ते जेवण. कोणत हॉटेल वहिनी."
आरती सांगत होती.
"त्या साईडला छान हॉटेल आहेत. "
"चला आता तुझी एक दोन दिवस सुट्टी राहिली त्यानंतर ऑफिसचं काम सुरू होईल. "
" मला जमेल का काम वीर?"
"त्यात काय हुशार आहेस तू."
शनाया तिच्या रूम मध्ये होती. जेवण झालं वीर आजी जवळ बसलेला होता .आजी आता त्याच्याशी नेहमी प्रमाणे नीट बोलत होत्या.
मी नव्हते तेव्हा आजी नीट झाल्या वाटतं. पण त्या माझ्याशी बोलत नाही. काय करू. मी बोलू का. काय बोलणार ती पण वीर जवळ बसली. ते काय बोलता ते ऐकत होती. वीर त्यांना तिकडे आईकडे काय झालं ते सांगत होता. वीरला कोणाच मन जिंकण खूप छान येत. त्याच्याशी किती छान बोलतात आजी. जस काही झालं नाही. त्यांच्या नातूच सगळं ऐकतात तो कितीही बोलला तर चांगला. माझा एक ही शब्द ऐकुन घेत नाही. जावू दे काम असल की बोलायच.
वीर आरती रूम मध्ये आले. छान वाटत आहे आपल्या रूममध्ये. ति तिचं सामान आत मध्ये नेऊन ठेवत होती. ती बाहेर येऊन बसली. सोफ्यावर एक छान टेडी बेअर होता. आरती बघतच राहिली तिने पटकन टेडी बेअर ला जवळ घेतलं. "माझ्यासाठी आहे का?"
हो .
थँक्यू .ती खूपच खुश होती.
"कधी घेतला?"
"कपाटात होता तुझ्या साठी बाहेर काढला."
"उद्या काय करायचं? सुट्टी एन्जॉय करू." त्याने तिला जवळ घेतल.
संध्याकाळी डिनर साठी जायचं का?
चालेल जाऊ.
" मला सकाळी ऑफिस आहे मी नाश्त्याच्या वेळी विचारतो सगळ्यांनी सोबत जाऊ."
"हो चालेल."
" वीर ऑफिस साठी काय काय तयारी करावी लागेल? "
" एक दोन दिवस ऑफिसला गेले की समजेल. "
"पण पहिल्या दिवशी काय घेऊन येऊ?"
" एक वही पेन राहू दे सोबत. तुझा डबा पाण्याची बाटली. "
"तुझं पण सुरुवातीला ट्रेनिंग होतं का ऑफिसमध्ये? "
" हो सहा महिने ट्रेनिंग होतं."
" ओरडायची का तुला तिथे? "
" हो हर्षलने घेतलं होत माझं ट्रेनिंग. मला सुरुवातीला खूप अवघड गेलं होतं. खूप स्ट्रिक्ट आहे तो. "
" मला ही ओरडतील का? "
"मला काय माहिती? तू एवढ टेंशन घेवु नकोस. "
" तू माझ्या सोबत असशील का?"
"नाही मी माझ काम करेल. तिकडे कारण नसतांना माझ्याशी बोलायच नाही. "
" काय अस वीर प्लीज."
"हो.. मी पण आई बाबां सोबत बोलत नाही तिकडे. त्यांना सर मॅडम म्हणतो. प्रोफेशनल वागायच. "
ठीक आहे.
" चल आता बोलतच बसणार आहे का? माझ्याजवळ ये. कधीची वाट बघतो आहे तुझी."
सकाळी चहा नाश्ता करून वीर ऑफिसला चालला गेला. शनाया आरती दोघींना सुट्टी होती. काय करूया आज?
नंदिनी मॅडम आत मध्ये आल्या." चला आपल्याला शॉपिंगला जायचं आहे. "
दोघींना खूप आनंद झाला. काय काय घ्यायचं याची मोठी लिस्ट तयार होती.
" आई पार्लरला जायचं आहे. " शनाया बोलली.
"ठीक आहे पण तिथे जास्त वेळ घालवायचा नाही."
हो.
त्या दुकानात गेल्या .आरती साठी खूप छान कॉटन ड्रेस घेतले. पूर्ण सेट होता. ऑफिसमध्ये असेच ड्रेस छान दिसतात. फॉर्मल पॅन्ट आणि शर्टही घेतले.
शनायाने जीन्स-टॉप घेतले. "वहिनी माझ्यासाठी एक दोन कुर्ते बघ ना. तुझे ड्रेस छान असतात. "
नंदिनी मॅडम जीन्स घेऊन आल्या. "आरती तू घालते ना जीन्स?"
"हो आई."
"हे बघ हा ब्रँड खूप छान आहे. घे तुला."
दोन जीन्स आणि दोन टॉप घेतले.
"थँक्यू आई खूप छान आहे ड्रेस."
नंदिनी मॅडमने स्वतःसाठी पण ड्रेस घेतले. सगळ्यांसाठी नाइटी घेतल्या. अजून काय हव. शनायाने लिपस्टिक घेतली. आरतीने ही लाइट कलर घेतली.
" वाह गुड चॉईस वहिनी माझ्या साठी बघ असा शेड. "
नंतर त्या रेस्टॉरंटमध्ये आल्या. छान जेवण केलं
"आजी घरी एकटी राहिली." शनायाला आठवण आली
" हो झालं आहे तीच जेवण मी थोड्या वेळापूर्वी फोन केला होता." तिघी घरी आल्या. आरतीने तीच सामान नीट ठेवल बापरे किती ड्रेस घेतले. किती छान छान ते ही. तिने जरा वेळ आराम केला. संध्याकाळी वीर वापस. "उठा मॅडम मजा सुरू आहे."
" अरे आम्ही बाहेर गेलो होतो. मला खूप ड्रेस घेतले. लिपस्टिक घेतली. "
" खुश ना मग. "
" हो आई चांगल्या आहेत. "
वीर हसत होता. छान आहे तुझ. आधी माहिती असत तुला एवढी शॉपिंग आवडते तर तुला शॉपिंगला नेल असत.
"आटोप आरती उशीर होतो ना जायच ना डिनर साठी. "
हो.
शनाया रूम मध्ये आली." वहिनी जीन्स घालूया का? "
वीर बघत होता.
" दादा आज आम्ही शॉपिंगला गेलो होतो. आम्हाला खूप ड्रेस घेतले आईने. वहिनीला पण ऑफिसला जायचं आहे ना तर ड्रेस लागतील. नवीन जीन्स पण घेतली आहे."
" जा मग पटकन तयार होऊन या. उशीर होतो आहे."
आरती आत मध्ये तयार होत होती. जीन्स-टॉप घालून ती बाहेर आली. केस मोकळे सोडलेले होते. लाईट मेकअप केलेला अतिशय सुंदर दिसत होती ती.
" हे असे ड्रेस घेतले आहे का तू ऑफिसला जायला? "
" चांगली नाही दिसत का मी? "
" जरा जास्ती चांगली दिसते आहे. ऑफिसमध्ये जीन्स चालत नाही."
"नाही कॉटनची ड्रेस घेतले आहेत. जीन्स अशीच घेतली चांगली नाही दिसत आहे का? बदलू का?"
" सांगितलं ना मी जास्त चांगली दिसते आहे. वेगळ्या भाषेत सांगू का? "त्याने तिला जवळ ओढलं.
" वीर उशीर होतो आहे सोड ना मला." वीर तिच्या गालावरून हात फिरवत होता. त्याचा हात हळू हळू ओठांवर आला. ती थोडी मागे सरकली. वीर पुढे आला. तो तिच्या जवळ येणार तेवढ्यात..
" शनु ये ना. " वीर एकदम मागे झाला. आरती पटकन त्याला ढकलून पळून गेली.
"आरती... आधी इकडे ये आधी. "
" शक्य नाही. "
" आज रात्री खूप त्रास देईल तुला. पटकन ये इकडे. "
ती खाली निघून गेली.
तो तयार झाला .आरती शनाया जवळ होती. वीर आला चला निघू या. ती हसुन त्याच्या कडे बघत होती. "सोडणार नाही तुला. बघ आज."
सगळे छान जेवून आले.
रात्री उशिरा बाल्कनीत बसून वीर आणि आरती गप्पा मारत होते." मग आता काय? तू तेव्हा पळून गेली होतीस."
"अरे मग अस काय करतोस तू. माझी तयारी खराब झाली असती."
"आता काही प्रॉब्लेम नाही ना."
नाही.
दोघ छान रमले. दुसऱ्या दिवशी सुट्टी होती म्हणून उठायची घाई नव्हती.
आज नंदिनी मॅडमने खास स्वयंपाक केला होता. आरती त्यांच्या मदतीला होती. मध्ये मध्ये ती ऑफिस बद्दल सगळं विचारात होती. उद्यापासून ट्रेनिंग सुरू होणार आहे याचा तिला टेन्शन येत होतं.
"काय करायचं असतं आई ऑफिस मध्ये?"
"काही नाही ते लोक बरोबर सांगतील समजेल एका दोन दिवसात तू टेन्शन घेऊ नको."
"मी ऑफिसला कसं जाणार आहे आई?"
"सगळे जातात ना इथून वीर राहुल सोबत जा."
"पण ते लोक संध्याकाळी उशिरापर्यंत थांबतात माझ ऑफिस साडेपाचला सुटेल."
" ड्रायव्हर काकांना फोन करायचा ते येतील तुला घ्यायला. नाहीतर टॅक्सीनी घरी यायचं. मी तुला देते पैसे. "
छान जेवण झालं. आरती ने रात्री दुसर्या दिवशी ची तयारी केली.
सकाळी आरती गप्प होती. ती सगळ्यात आधी तयार होती. नाश्ता ही नीट केला नाही.
उमा ताईंनी डबा दिला.
" आरती हे घे पैसे. "
" आहेत वीर कडून घेतले. "
" असू दे तरी तिकडून जास्त लागतात पैसे. ड्रायवर काकांचा नंबर सेव कर."
हो.
.....
.....
"बाबा तुम्ही केव्हा येतं या ऑफिस मधे?" वीरने विचारल.
"अकरा नंतर." त्यांच्या दोन तीन फॅक्टरी होती राहुल सर वेगवेगळया ठिकाणी ही जात होते.
"वहिनी ऑल द बेस्ट डु वेल. "
" थॅन्क्स शनू. "
कार मधे ही ती शांत होती. वीर ही फोन वर बोलत होता. आरती त्याच्या कडे बघत होती. पाच मिनिट त्याने इशारा केला. त्याचा फोन झाला.
" आरती ऑल द बेस्ट. हे बघ नीट मन लावून शिक सगळ वेळेवर जेव. एक टीप देतो. ऑफिस मधे फोन वापरु नकोस. सगळ्यांशी हळू आवाजात बोल. "
" म्हणजे मी जोरात बोलते? भांडते का?" आरती ओरडली.
"बघ अस आहे. "
दोघ हसत होते. मेन गेट मधून कार आत आली .आज पहिल्यांदा आरती ऑफिस मधे आली होती. पार्किंग मधे ती उतरली. मोठा परिसर होता. मागे शॉप होते पुढे ऑफिस होत. त्यात बरेच डिपार्टमेंट होते. एका बाजूला कॅन्टीन होती समोर गार्डन होत.
" समोर रिसेप्शन मधे जा. ट्रेनिंग साठी आलेला मेल दाखव."
" वीर तू येतो का?"
" नाही बाय भेटू रात्री." तो निघाला.
ती त्याच्या कडे बघत होती.
"काय आता जा पटकन. तुला इथे जवळ नाही घेता येणार सीसीटीव्ही कॅमेरे आहेत. बी प्रोफेशनल."
ती आत आली मोठ रिसेप्शन होत. दोन मुली एक मुलगा तिथे काम करत होते. तिने मेल दाखवला. त्यांनी एका हॉल कडे जायला सांगितल. ती आत गेली पाच सहा मूल खुर्च्यांवर बसलेले होते.
अरे बापरे सगळे मुल असतिल का इथे काय यार. ते मूल तिच्याशी हसले ती समोरच्या खुर्चीवर बसली. "तुझ सामान समोर ठेव तिथून एक वहि पेन घे." एका मुलाने सांगितल.
दहा मिनिट झाल. अजून दोन मुल आले. आरती आता विचार करत होती बहुतेक मी एकटी मुलगी वाटत यांच्यात एक ही मैत्रीण नाही सोबत. जस असेल तस असेल. ते नऊ झाले होते.
दोन तीन ऑफिसचे लोक आले. सगळे उठून उभे राहिले.
" बसा. वेलकम तू व्ही एस इंडस्ट्रीज."
तेवढ्यात एक मुलगी घाईने आत आली. तिला बघून आरतीला खूप बर वाटल.
ती पण छान हसली. "सॉरी लेट झाल लांब रहाते मी. हाय. मी नीता."
"मी आरती."
मस्त बोल्ड बिनधास्त मुलगी होती ती. त्या दोघी बोलत होत्या.
"एक्सक्युज मी लेडिज बोलू नका. "
सॉरी.
नीता आहे सोबत आरतीला बर वाटत होत.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा