ओढ तुझी लागली भाग 56
©️®️शिल्पा सुतार
.......
.......
ऑफिसची टीम कंपनीची माहिती देत होते. खूप मोठा कारभार होता.
आरती मनापासून ऐकत होती. इथे खुप काम असत वाटत. बाबा आणि वीरला मी किती लाईटली घेते. आई पण पूर्वी फूल टाइम ऑफिस मधे असायच्या. ही या लोकांची मेहनत आहे.
"हॅलो मॅडम तुम्ही बोला."
नीताने तिला कोपरा मारला. तिने इकडे तिकडे बघितल. सगळे तिच्या कडे बघत होते.
"काय विचार सुरू आहे? इकडे लक्ष द्या. "
ती उभी राहिली. सॉरी सर.
"नाव सांगा तुमच. "
"हो मी आरती सावंत. "
"कोणत कॉलेज?"
" तिने नाव सांगितल."
"या कंपनी बद्दल कोणी सांगितल?"
काय करू. बी प्रोफेशनल." कॉलेज मध्ये समजल. मग वेबसाईट वरून अप्लाय केल."
"ठीक आहे बसा."
बाकीचे इनट्रोडक्शन देत होते.
त्यांनी माहिती पत्रक वाटले. हे वाचा.
ते सर गेले.
सगळे एकमेकांशी बोलत होते. छान होते मुल. नीता पण मस्त होती.
" तू कोणत्या कॉलेज मधे होती?" आरतीने विचारल.
तिने सांगितल." तूझा इंटरव्ह्यू कोणी घेतला?" नीता विचारत होती.
माझा इंटरव्ह्यू कोणी घेतला नाही. म्हणजे बाकीच्यांचा घेतला वाटत. माझ काम वीरने केल म्हणजे थँक्यू वीर.
"एक मॅडम होत्या." तिने खोट सांगितल.
तुझा नीता?
"माझा पण इंटरव्ह्यू एका मॅडमने घेतला .अश्या छान कंपनीत काम मिळायला हव."
" हो ना. ते ट्रेनिंग झाल्यावर घेतील ना आपल्याला?" आरतीने विचारल.
" हुशार चांगल्या लोकांना घेतात."
"बरोबर आहे."
बराच वेळ त्या कंपनीची माहिती वाचत होत्या. आता कंटाळा आला होता. ओनर कोण आहेत? सगळे बोलत होते.
" इमानदार म्हणून कोणी तरी आहेत राहुल इनामदार." एकाने सांगितल.
" व्ही एस काय आहे?"
"ओह वाही फॉर वीर .एस फॉर शनाया वाटत. " आरतीला आत्ता समजल.
बारा नंतर एक सर आत मध्ये आले. त्यांच्यासोबत एक असिस्टंट होता. अजून सकाळी जे नाव विचारत होते ते सुरेश सर होते. ते थोड बोलले माझ नाव हर्षल आहे. मी इथे जनरल मॅनेजर आहे. ते कंपनी बद्दल बोलत होते. तुमच ट्रेनिंग शेड्यूल दुपार पर्यंत मिळेल. कोणाला काही प्रश्न असतिल तर विचारा?
या सरांनी घेतल वीरच ट्रेनिंग. सिरियस दिसता आहेत हे.
एक दोघांनी प्रश्न विचारले.
ठीक आहे काही नियम ते सांगत होते. रोजच दिलेल काम पूर्ण करायच. न सांगता सुट्टी घ्यायची नाही. फोन वापरायचा नाही. फॉर्मल ड्रेस हवा.
वीर मीटिंग मधे होता. तो केबिन मधे आला. हर्षल आला. काय काम झाले ते तो सांगत होता.
"ट्रेनिंग सुरू आहे ना आज पासून?"
"हो. विशेष काही नाही आज फक्त इंट्रोडक्शन आहे."
"ओके. कुठे आहेत ते ट्रेनि?"
" ट्रेनिंग हॉल मधे."
" किती वेळ असेल आज ट्रेनिंग?"
"आज लवकर सुट्टी होईल."
"तू घेणार का ट्रेनिंग."
"मी लक्ष ठेवेल. सुरेश अणि अर्जुन सर घेतील. "
ठीक आहे. हे का एवढे प्रश्न विचारता आहेत.
" वीर तुला घ्याव लागेल एखाद लेक्चर. "
"काय मी नाही. "
" हो याव लागेल ट्रेनिंग मधे उत्साह येतो. "
असा तो मोठ्या मोठ्या मीटिंग घेत होता. पण आरती समोर तो लाजत होता.
लंच ब्रेक झाला. वीर कुठे असेल? फोन करून बघू का? नको. आरतीने तिचा डबा बाहेर काढला.
"मी डबा नाही आणला कॅन्टीन मधे जावु या का?" नीता सोबत ती कॅन्टीन मध्ये गेली. तिने जेवण घेतल. छान होती वेज थाळी.
"माझा डबा खा नीता."
"तू केला का स्वयंपाक आरती?
"नाही उमा ताईंनी."
"आरती तुझ लग्न कधी झाल." ती मंगळसूत्र कडे बघत होती.
"आता दोन महिने झाले."
"इथे या गावातच आहे का सासर? "
हो.
" माहेर कुठल?"
" ते ही याच गावात आहे . "
" काय ग लव मॅरेज का? "
" नाही अरेंज मॅरेज."
"लवकर झाल खूप."
" नीता तू कधी करणार लग्न? "
"नक्की नाही. मला एवढ्यात अस अडकून पडायच नाही."
"अडकून पडायच म्हणजे काय? छान असत कोणा सोबत रहाण, प्रेमाच नात असत ते एकमेकांशी. आधार असतो. कोणी तरी असत आपल्यासाठी. त्यात बर्डन कुठे आहे. "
" बापरे आरती तू किती छान बोलतेस. "
" माझ राहू दे तू आयुष्या बद्दल पाॅझीटीव्ह रहा. "
" चल आटोप."
ती कॅन्टीन मधून येतांना इकडे तिकडे बघत होती. वीर दिसला नाही. बाबा नव्हते.
दुपारी एक तास लेक्चर होत. नंतर चार वाजता चहा झाल्यावर सगळ्यांना घरी जायला सांगितल. आरती तिची बॅग घेत होती.
" नीता कस जाणार तू घरी? "
" मी स्कूटर वर. तू?"
आता काय सांगू हिला ड्रायवर येईल घ्यायला. नको बडेजाव ठीक नाही.
" मी माझी माझी बघते टॅक्सी. "
" तू कुठे रहाते? "
आरतीने एरिया सांगितला.
" चल मी त्या बाजूने पुढे जाईल मेन रोड वर सोडते. " तिथून आरती हे घर दहा मिनिटात होत.
ती घरी आली कोणीच घरी नव्हत. आजी बागेत फेर्या मारत होत्या. ती सोफ्यावर बसून मोबाईल बघत होती. चिवडा घेतला होता तिने खायला. उमा ताईंनी चहा ठेवला होता. आजी येवून तिच्या बाजूला बसल्या. ती थोडी सावध झाली. उमा ताईंनी चहा आणून दिला.
"घ्या आजी." तिने दिला.
"वीर नाही आला का?"
"ते मला दिसले नाहीत ऑफिस मधे. माझ दुसरीकडे काम होत."
"या रविवारी मी जाते वापस गावाला." आजींनी सांगितल.
"माझ्या भावाच्या लग्ना पर्यंत थांबा ना आजी."
"कधी आहे लग्न?"
" पुढच्या शनिवारी. आई येणार आहे आमंत्रण द्यायला."
" ठीक आहे मी विचार करते. "
" आजी चिवडा घेता का? " आरतीने हळूच विचारल.
"हो थोडा आण अर्धा लाडू पण दे."
आरतीला बर वाटल तिने किचन मधून पटकन आजीं साठी फराळ आणला. शनाया आली ती पण खात होती. "काकू हे फराळाचे पदार्थ छान करतात."
" हो पूर्वी ऑर्डर घ्यायची ती. आता आम्ही नाही करू देत जास्तीच काम." आरतीने सांगितल.
" बायकांच जिवन अस कामात जात काय करणार. "आजी बोलल्या.
" आजीने खूप कष्ट करून आईच शिक्षण केल आहे."
आरती आजीं कडे बघत होती चांगल्या वाटतात या अश्या शांत.
नंदिनी मॅडम आल्या.
" आई तुम्ही ऑफिस मधे होत्या का? "
"हो आज दुसर्या फॅक्टरीत गेले होते. तुझा कसा होता पहिला दिवस? "
" काही विशेष शिकवलं नाही इंट्रोडक्शन होत. "
" वहिनी कोणी ओळखीच आहे का तिकडे? "
"नाही एक मुलगी आहे नीता आणि आठ मुल."
"मग दादा भेटला का तिकडे? काय म्हटले सगळे. "
" नाही भेटले ते. "
आरती किचन मधे मदत करत होती. आजींनी तिला आज मसाले भात करायला सांगितल होता. ती आणि शनाया यू ट्यूब वर रेसीपी बघत होत्या. त्या नुसार सगळ सामान आहे का शनाया उमा ताईंना विचारता होती.
" आजी मसाले भात नाही होणार. दोन भाज्या नाहीत आणि मसाले मधले एक वस्तू नाही." शनाया सांगायला आली.
"जे आहे ते टाका ना."
"अस कस? मग नीट नाही झाला तर सगळे ओरडतात."
"काय ह्या आजकालच्या मुली. जे आहे ते वापरायच. एडजेस्ट करत पुढे जायच. आहे त्या सामानात पदार्थ करता आला पाहिजे. चला काय नाही मी बघते." आजींच्या मदतीने छान स्वयंपाक झाला.
" आजी तुझ्या कडून शिकायला मिळाल. "
वीर, राहुल सर आले ते खूप बोलत होते.
" चहा देवु का की जेवणार. " नंदिनी मॅडम विचारत होत्या.
ते बोलत होते त्यांच लक्ष नव्हत. एका ऑर्डर बाबतीत प्रॉब्लेम आला होता. मोठी ऑर्डर कॅन्सल झाली तर खूप तोटा होणार होता. पार्ट रीजेक्ट झाला होता. ओरीजिनल डिझाईन मॅच होत नव्हती.
" मी आलोच फ्रेश होऊन." राहुल सर उठले. वीर पण रूम मधे गेला.
नंदिनी मॅडम तिथे बसलेला होत्या. शनाया, आरती त्यांच्या जवळ बसल्या होत्या. शनायाने नंदिनी मॅडम कडून ड्रॉइंग घेतल. शनाया बघत होती ते ड्रॉइंग. काय झाल असेल या पार्टला.
"आई काय आहे हे या ड्रॉइंगच."
"बेटा ते ओरीजिनल ड्रॉइंग आहे. तसा आहे आपला पार्ट. तरी रीजेक्ट झाला. काय प्रोब्लेम आला असेल."
"आपल पार्ट कुठे आहे? "
"बघायचा का?"
हो आई.
नंदिनी मॅडमने फोन मध्ये ईमेल उघडली. सेम टु सेम ड्रॉइंग असलेला सारखा पार्ट होता. मग काय झाल असेल याच? इंजिनिअरिंग डिझाईन तपासाव लागेल. उद्या पाठवणार आहोत तो पार्ट लॅब मधे.
"अश्या ही लॅब असतात?"
हो.
आरती अगदी नीट ती डिझाईन बघत होती." शनाया फरक आहे हे बघ."
"आई वहिनी बघ काय सांगते आहे."
"काय आरती."
राहुल सर ही येवून बसले. "बोल बेटा."
"या दोन डिझाईन मधे फरक आहे. हा स्क्रू बघा आपल्या पार्ट मधे बाहेर दिसतो आहे. इथे ओरीजिनल फोटो मधे पूर्ण आत आहे. जसा त्या पार्ट चा भाग."
"ओह आपण स्क्रू सोडून बाकी पूर्ण पार्ट चेक करत होतो. बरोबर आहे आरतीच त्यामुळे तो पार्ट आत जावून सैल होत असेल. " राहुल सर बोलले. त्यांनी फोन लावला." लगेच चेक करा. स्क्रू चा डायमेन्शन चुकलं आहे."
वीर खाली आला.
" आपला प्रॉब्लेम ठीक होईल अस वाटत. " स्क्रू बद्दल राहुल सर सांगत होते. उद्या दुपार पर्यंत समजेल. आरती हुशार आहे.
खरच आरती माझ्या साठी ती लकी आहे. सुरुवाती पासून जेव्हा जेव्हा मी तिच्या सोबत असायचो. तेव्हा चांगल झाल आहे. वीर खुश होता.
आरतीची सगळे तारीफ करत होते ती डायनिंग टेबल वर ताट करत होती. वीर तिच्या जवळ येवून बसला. "कसा होता तुझा आजचा दिवस?"
"चांगला गेला. मला नाव विचारल."
" मग काय नाव सांगितल."
"आरती सावंत. तेच आहे ना माझ नाव." ती हसत होती.
"का आरती वीर इनामदार ही आहे की."
"पण डॉक्युमेंट वर आरती सावंत आहे तेच राहू देते."
"ठीक आहे. आता काय मॅडम रोज ऑफिसला येणार . "
" वीर तू कुठे बसतोस?"
"माझी केबिन ऑफिसच्या त्या बाजूला आहे. "
" कॅन्टीन कडे का?"
" नाही मध्य भागी. "
सगळे जेवायला बसले. खूप छान झाला आहे मसाले भात. आजी आरती शनाया कडे बघत होत्या. "आजी तू बरोबर आहेस जे असेल त्या सामानात मनापासून स्वयंपाक करायचा. रेसीपी बघायची पण स्वतः च्या मनाच ही करायच."
बरोबर.
आजी अश्या चांगल्या वागल्या तर बर वाटत.
रात्री गर्ल्स ग्रुप वर खूप मेसेज येत होते.
"कसा होता पहिला दिवस काय काय केल." प्रिया.
"मला तर कंटाळा आला होता." मीनल ने मेसेज केला.
" हो ना कॉलेज मधे होतो तेच बर होत. " राही बोलली.
" आमचा आज काही झाल नाही. बोर झाल तिकडे. " आरती ने मेसेज केला
" तुला काय प्रॉब्लेम आहे आरती? मस्त वीर सोबत रहायच."
"मला आज वीर दिसला ही नाही. "
"अस कस शक्य आहे. तो कायम तुझ्या मागे असतो." प्रिया हसत होती.
"आम्ही स्ट्रीक्टली प्रोफेशनल आहोत."
"आरती कोणी आहे का सोबत?" मीनलने विचारल.
" हो एक मुलगी आहे नीता नाव तीच. चला आराम करते. "
वीर आत आला. आरती जवळ बसला." वीर तुम्ही लोक खूप मेहनत घेतात. प्राउड ऑफ यू. "
"आई बाबांनी खूप केल या बिझनेस साठी, आपल्याला मेहनत घ्यावी लागेल."
" हो नक्की. करू आपण. "
" चल आता आराम करू. माझी बायको थकली ऑफिस ला जावून ."
" वीर काहीही काय." ती हसत होती. वीरने तिला जवळ घेतल.
दुसऱ्या दिवशी ती वीर बरोबर ऑफिसला जायला निघाली.
" आज बरं वाटतं आहे ना कालपेक्षा. "
" आज बरं वाटतं आहे ना कालपेक्षा. "
हो.
"असंच वाटेल ऑफिसमध्ये नंतर काही वाटणार नाही. "
" आपली कंपनी खूप मोठी आहे. काल मी माहिती वाचली. तीन चार युनिट आहेत ना वेगवेगळ्या ठिकाणी."
हो.
"वीर मला जमेल ना हे ट्रेनिंग? अवघड आहे."
"काळजी करू नको ते जे सांगितल ते काम करायच. "
ऑफिसमध्ये पोचल्यानंतर आरती तिच्या ट्रेनिंगच्या हॉलमध्ये जाऊन बसली. आता बऱ्यापैकी ओळखी झाल्या होत्या.
नीताला लवकर यायला सांगितल्यामुळे ती लवकर आली होती. अर्जुन सर आले. सगळे उठून उभे राहिले. आज आपण दहा लोकांचे दोन ग्रुप तयार करणार आहोत.
त्यांना आज वेगळा टास्क होते. पूर्ण कंपनी बघायची. तुम्ही जर मालक असते तर काय बदल केले असते किंवा काय सगळ्यात चांगला आहे हे नोट करायच.
नीता वेगळया ग्रुप मधे होती आरती वेगळया. नीता मुद्दाम इकडे येवून बघत होती.
"काय आहे नीता तिकडे जा."
बाकीचे हसत होते. आरती बरोबरचे चौघे मुल धडपडे होते. आधी त्यांना कंपनीची एक साईड दाखवली. त्यांनी पटापट नोट्स घेतले.
दुपारी त्यांनी तिथे जेवण केल. आज नीताने डबा आणला होता. त्यांच्या छान ग्रुप तयार झाला होता. गप्पांचा आवाज बाहेर पर्यंत जात होता.
सुरेश सर आत आले. "इथे ऑफिस मधे एवढ्या गप्पा मारायच्या नाहीत. आपल आपल काम करा."
आता त्यांना शॉप फ्लोअर वर नेल पूर्ण कंपनी दाखवत होते. मधल्या भागात वीरची केबिन आहे तिकडे त्या लोकांना नेल नव्हत.
कुठे आहे हा वीर ? आरती त्याला बघायला अधीर झाली होती.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा