ओढ तुझी लागली भाग 57
©️®️शिल्पा सुतार
.......
.......
ऑफिस मध्ये वीर, राहुल सर बाकीच्या लोकांची मीटिंग सुरू होती. आरतीने सांगितल्या प्रमाणे स्क्रूची मेजरमेंट चुकली होती. ते नीट केल. पार्ट लगेच त्या कंपनीत पाठवला. त्या लोकांच ओके आल. राहुल सर, वीर, हर्षल खुश होते. खूप मोठी ऑर्डर होती ती. ते तिघे बोलत होते. समोरून आरती, नीता बाकीचे ट्रेनी जात होते. त्यांना इकडेच दिसत नव्हत. वीर आरती कडे बघत होता. त्याला एकदम वाटल जावून भेटाव तिला. मेसेज करू का? उपयोग नाही. तिचा फोन बॅग मधे असेल.
" आज काय सुरू आहे ट्रेनिंग हर्षल ?" वीरने विचारल.
"त्यांना कंपनी दाखवली. टास्क दिला कंपनी बद्दल काय बदल केले पाहिजे किंवा आहे ते काय काय आवडलं ते सांगायचा आहे ."
"बर झाल हुशार असतात हे यंग मुल. सजेशन्स असले तर सांग ." राहुल सर बोलले. वीर हर्षल त्यांच्या कडे बघत होते.
"तुम्ही पण दोघ यंग आहात खूप हुशार आहात. " आता ते हसत होते.
मीटिंग झाली होती. हर्षल, वीर बाहेर आले. आरती नीता समोरून शॉप बघून येत होत्या. वीर मुद्दामून तिथे उभा होता. सुरेश सर होते त्यांच्या सोबत.
"आरती समोर कोण आहे बघ." नीता बोलली.
"ते हर्षल सर आहेत. "
" त्यांच्या बाजूला. "
तिने समोरून वीरला ओळखल. तिला एकदम हसू आल. बर झाल दिसला हा.
" काय माहिती कोण आहे ? "आरती मुद्दामून म्हटली.
"हॅन्डसम मुलगा आहे. काय डॅशिंग पर्सनॅलिटी आहे. इथे काम करतो का तो. आपली ओळख करून द्यायला हवी."
नीता वीर बद्दल अस बोलली. आरतीला राग आला होता. ते त्या शॉप जवळ गेले. बरेच मुल वीर, हर्षल जवळ उभे होते. आरती मागे होती.
" हे आहेत वीर इनामदार. सीईओ या कंपनीचे. "
" आरती मालक आहे. किती छान. हॅन्डसम ही मालदार पार्टी ही. " त्या दोघी हसत होत्या.
वीर सगळ्यांशी बोलत होता. हॅलो.. तो त्या दोघींना म्हटला.
"हाय सर." नीता पुढे गेली.
वीर आरती कडे बघत होता. "हाय." ती बोलली.
" समजत आहे ना जे सुरू आहे ते?"
"हो सर."
"कॅरी आॅन."
ते गेले. सगळे वीर बद्दल बोलत होते. काय छान आहेत ते सर. विशेष वय नाही वाटत.
"लग्न झाल आहे का?" नीता विचारत होती. बाकीचे मुल हसत होते." झाल किवा नाही झाल तरी तुला काय ते तुला भाव देतील अस वाटत का?"
"आरती तर मॅरीड आहे. इथे मीच एक आहे ना बॅचलर सुंदर मुलगी . "
आरती गप्प होती. नीता इनोसन्ट होती. तिला अभिमान वाटत होता. वीर तिचा आहे.
पाच वाजता तिने फोन बघितला. वीरचा मेसेज आलेला होता. "जाण्या आधी सांग. "
" मी घरी जाते आहे ." तिने रिप्लाय दिला.
"आरती माझ्या केबिन मध्ये ये."
"नको. कुठे आहे केबिन माहिती नाही? काय काम आहे? " आरतीने मेसेज केला.
"एवढ काय कोणी अनोळखी बोलवत असल्या सारख करते? उलट मी बोलावल्यावर तू पळत यायला हव. "
"आपल्याला कोणी सोबत बघितल तर? "
"बघु दे .काय फरक पडतो. या वीर ची बायको आहेस तू. तुला नको का ही आयडेंटिटी?"
"तस नाही वीर तू म्हटला होता ना प्रोफेशनल रहायचं म्हणून. सॉरी. येते. "
" बाबा बोलवता आहेत. त्यांच्या सोबत मीटिंग आहे आता आपली . लवकर आटोप. "
"मी पण आहे का मीटिंग मधे?"
"हो आरती."
.....
.....
चल... निता बोलवत होती.
"तू नीघ मी आज थोड्या वेळाने येते." आरती बॅग घेत होती.
" काय काम आहे?"
"माझी टॅक्सी येणार आहे. खूप चालव लागत. मेन रोड पासून तिथून रिक्षा टॅक्सी मिळत नाही."
" ठीक आहे. "ती गेली.
आरतीने वीरला मेसेज केला. "घ्यायला तर ये. "
हो.
आरती बाहेर आली. ती मेन ऑफिस कडे गेली. तिथे सगळे हेड ऑफ डिपार्टमेंट. जनरल मॅनेजर बसत होते. राहुल, सर, वीर यांच्या केबिन होत्या. आत फायनान्स डिपार्टमेंट होत.
" कुठे आहे हा? ती आजुबाजुला बघत होती."
" कोण हव आहे? "हर्षल विचारता होता. तो तेव्हा नेमक बाहेर जात होता. " तु ट्रेनि आहेस ना? इकडे काय करतेस?"
"हो सर मी ट्रेनि आहे."
" मग झाल तुमच आजच. ट्रेनिंग गेट तिकडे आहे."
" वीरच्या केबिन मधे जायच आहे ?" ती हळूच बोलली.
"वीर? फक्त वीर?" काही मॅनर्स आहेत का नाही या मुलीला. तो विचार करत होता.
"ऑफिस मधे कोणालाही नावाने हाक मारू नये. सर मॅडम म्हणाव. वीर तर आपला बॉस आहे ना . "
" सॉरी. वीर सरांची केबिन कुठे आहे. "
" कशासाठी?" ही काय वीरला बघून त्याच्यावर लट्टू झाली का? " हे बघ सर कोणाला असे भेटत नाही. तु घरी जा."
" नाही ते मीटिंग आहे." तिला काय बोलाव सुचत नव्हत.
" तुझी कोणा सोबत? "
" वीर, राहुल सरां सोबत. "
" कोणी सांगितल? "
" वीर सरांनी. "
" काय सुरू आहे हे? " हर्षल गोंधळला.
वीर समोरून आला. चल आरती. ती पटकन त्याच्या बाजूला जावून उभी राहिली.
हर्षल त्या दोघांकडे बघत होता.
" मी वाट बघत होतो. चल चहा घेवू." त्याने आरतीची बॅग घेतली. " एवढा मोठा डबा आणते तू? "
" नाही आज नीताचा पण डबा आणला होता पाण्याची बाटली आहे. "
" हर्षल मीटिंग आहे ना? आम्ही येतो थोड्या वेळात. ओळख करून देतो. ही आरती माझी बायको. हे हर्षल सर जनरल मॅनेजर. पूर्ण कंपनी हॅन्डल करतात. "
त्याला विश्वास वाटत नव्हता. ही वीरची बायको. किती साधी आहे. या मॅडमला ट्रेनिंगची काय गरज आहे. तरीच वीरला वीर म्हणत होती. मी ओरडलो तिला. एच आर वाल्या मॅडम बोलत होत्या एका मुलीचा इंटरव्ह्यू झाला नाही. तिला असच घेतल. ती आरती आहे म्हणजे. वीरने घेतल तिला.
ते दोघ बोलत होते. छान आहे जोडी. दोघ ही लहान वाटतात. ते आत गेले.
" किती छान आहे तुझी केबिन वीर. स्वच्छ सुंदर. सगळ्या वस्तु नीट ठेवल्या आहेत. बाबा कुठे आहेत? काय असेल मीटिंग मधे."
"त्यांची केबिन तिकडे समोर आहे. आरती तू आज किती महत्वाच काम केल आहे माहिती का."
काय?
"ते स्क्रू ची डिझाईन चुकली होती. आता तो पार्ट अप्रुव झाला. नाहीतर आपल खूप मोठ नुकसान झाल असत. "
" आहेच मी हुशार. "
चहा आला, सँडविच आले." वाह माझ आवडत."
.....
.....
अर्जुन सर बाहेर उभे होते." चला मीटिंग आहे ना. वीर कुठे आहे? उशीर झाला तर राहुल सर ओरडतील. "
"वीर केबिन मधे आहेत."
"बोलव मग. "
"थांब दहा मिनिट."
"काय झालं."
"त्यांची बायको आहे तिथे."
"काय केव्हा आल्या त्या मॅडम? "
" इथे आहे ट्रेनिंगला."
कोण?
आरती.
" ती सिम्पल मुलगी."
"हो गळ्यात मंगळसूत्र आहे ती."
"आपण काही बोललो तर नाही ना त्या मॅडमला. बर लवकर समजल. " अर्जुन सर बोलले.
" साधे आहेत हे लोक. आपण आपल काम करायच ट्रेनिंग नीट घ्यायच. चुकल तर बोलायच. वीरला मी किती बोलायचो ट्रेनिंग सुरू असतांना. काही प्रॉब्लेम नाही त्यांना. आपण आपल शिकवायचं. " हर्षल सांगत होता.
" बरोबर आहे. "
राहुल सरांचा फोन आला.
" चल आरती बाबा बोलवता आहेत." ते दोघ बाहेर आले. सगळे त्यांच्या कडे बघत होते. ते आत केबिन मध्ये आले.
" ये बेटा आरती इथे बस."
अर्जुन, हर्षल, वीर अजून एक दोन होते. फायनान्सच्या मॅडम ही होत्या.
"हॅलो एव्हरीवन आज मीटिंग मधे एक नवीन मेंबर आहे. मी ओळख करून देतो. ही आहे आरती वीर इनामदार. सगळ्यात लहान आणि हुशार मेंबर."
वेलकम मॅडम.. हॅलो.. बरेच बोलले. आरती हसून रीप्लाय देत होती.
" आज आरतीने पार्ट मधे मोठा फॉल्ट शोधून आपल्याला मदत केली आहे."
सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या.
एवढ मोठ काम केल का मी? आरती गडबडली. ती अगदी वीर जवळ बसली होती. त्याला ही समजत होत पाहिल्यांदा ती अशी मीटिंगला आली. तो तिला सांभाळत होता.
मीटिंग झाली.
"वीर तू आत्ता घरी येणार का? "
" नाही मला अजून थोड काम आहे. "
" मी जाते मग." तिने तीच सामान वीरच्या केबिन मधून घेतल. ड्रायवर काका आले. रस्त्यातून तिने सरला ताई फोन केला.
"काय सुरू आहे आरती?"
"आई ट्रेनिंग सुरू आहे खूप बिझी आहे मी."
"तुम्ही सगळेच बिझी मग लग्नाची तयारी कशी करायची?"
" येते मी लवकर ."
" आम्ही पण उद्या येतो तिकडे तुझ्या घरी आमंत्रण द्यायला."
"हो नक्की या."
रात्री ती शनाया दादाच्या लग्नात काय घालायच ते ठरवत होत्या. जेवताना तिने उद्या आई बाबा येणार आहेत ते सांगितल.
दुसर्या दिवशी ती एकटी ऑफिस कडे निघाली. ती ऑफिस मधे आली. ट्रेनिंग हॉल मध्ये येवून बसली. आज सगळ्यांना तिथे जागेवर चहा आला. सुरेश सर शिकवायला आले. ते आरती कडे वेगळ बघत होते.
"काय झालं यांना काही चुकलं का माझ?" आरती विचार करत होती.
"काल काय काय पॉईंट्स काढले बघू?"
सगळे पॉईंट्स दाखवत होते.
"खूप छान सगळ्यांनी छान बदल सांगितले. जे आवडत ते सांगितल. यावर नक्की आम्ही विचार करू. आरती मॅडम मेन ऑफिस ही आज बघून घ्या. काही सजेशन्स असतिल तर सांगा. सरांनी सांगितल आहे. "
"हो नक्की."
त्या दिवसाच ट्रेनिंग सुरू झाल.
वीर राहुल सरां सोबत दुसर्या फॅक्टरीत गेला होता. थोड काम झाल. आज तिथे वरुणला बोलवलं होत. तो आत आला. राहुल सरांनी थोडे प्रश्न विचारले. त्याच काम झाल होत. नौकरी लागली. त्याने लगेच जॉईन केल. ऑफिस वर्क होत. थोड शॉप फ्लोअरवर ही काम होत. तिथे राकेश होता कामाला. वरुण थोडे दिवस एक्स्पिरियन्स घेणार होता. मग पुढच शिक्षण करणार होता.
वरुण आणि नवीन मुलांच ट्रेनिंग सुरू झाल.
नवीन पार्टची ट्रायल होती तिथे. ट्रायल सक्सेस फुल झाली. वीर या ऑफिस मध्ये आला. नेहमीचे काम सुरू झाल.
लंच ब्रेक मध्ये नीता आरती जेवत होती. "आरती तू रोज माझा डबा नको आणु."
"काय झालं आवडत नाही का?"
"नाही ग किती छान आहे भाजी. मला कसतरी वाटत."
"नाटक नको आहे जेव पटापट. खूप काम आहे."
आरती संध्याकाळी वेळेत घरी गेली.
संध्याकाळी पत्रिका द्यायला सरला ताई, सतीश राव आले. नंदिनी मॅडम घरी होत्या. "आरती आता हे जेवण करून जातील."
"हो आई." आरती आत स्वयंपाकाच बघत होती . उमा ताईंनी चहा दिला. ती चहा घेवून बाहेर आली.
"तू कधी येते आहेस घरी?" सरला ताई विचारत होत्या.
"गुरुवारी येते ."
"शनिवारी लग्न आहे. इतक्या उशीरा चालणार नाही. लवकर ये."
"अग पण ऑफिसला जाव लागेल. "
" तिथून जा मी ड्रायवर पाठवेल." नंदिनी मॅडम म्हटल्या.
" शनाया तू पण ये आरती सोबत. "
" हो आईसोबत येईल लग्नाच्या दिवशी. "
" मेहंदी हळदी ला ही ये ना." सरला ताई आग्रह करत होत्या.
"हो येवू आम्ही. "
थोड्या वेळाने वीर, राहुल सर आले. ते बोलत बसले. सतीश रावांनी पत्रिका दिली. सरला ताई आजींना आग्रह करत होत्या." तुम्ही या दोन दिवस आधी आम्हाला मदत होईल. तुमच्या अनुभवाचा फायदा होईल. "
" मी नंदिनी सोबत लग्नाच्या दिवशी येईल. "
जेवण झालं. ते गेले.
वीर आरती रूम मधे आले. आरती आवरत होती.
"ठीक सुरू आहे ना ऑफिस मध्ये काम. आज आली नाहीस तू मला भेटायला." वीर विचारत होता.
"सगळे ट्रेनि सोबत असतात."
"तुझ्या सगळ्या फ्रेंड्सला मिळाल ना काम? "
" हो सगळ्या बिझी झाल्या. "
वीर विचार करत होता. अनुश्रीच काम झाल की नाही? मला काळजी वाटते आहे. तिने मला मदत मागितली होती. विचारतो तिला.
मुलींच्या ग्रुप वर खूप मेसेज येत होते. लग्नात काय करायच ते ठरवत होत्या. आरती गप्पा मारत बसली.
वीरने अनुश्रीला मेसेज केला." झाल का तुझ काम? "
थोडा वेळ त्याने वाट बघितली रीप्लायची. रीप्लाय आला नाही .
"आरती चल आता आराम कर."
" वीर तू कधी येशील लग्न घरी?"
" मी डायरेक्ट लग्नाला येईल. म्हणजे हळदी साठी येईल. पण रात्री घरी येईल तिकडे थांबणार नाही. "
ठीक आहे.
लग्नाची पूर्ण तयारी झाली होती . रविवार सुट्टीच एडजेस्ट होईल. शुक्रवार शनिवारी सुट्टी मागावी लागेल.
"वीर सुट्टीच कोणा कडे सांगू? मी उद्या ऑफिस झाल की आईकडे जाईल. रविवारी रात्री वापस येईल."
" तुमच ट्रेनिंग घेतात त्या सरांना विचार."
" गुरुवारी विचारल तर चालेल का?"
"एक दिवस आधी सांग. आणि काय हे इतके दिवस शक्य नाही. दोन दिवस आधी जा. मी कसा राहू."
" आईच्या मदतीला कोणी नाही. जावू दे ना. दादासाठी जायच मला."
"ओके. काही लागल तर सांग."
सकाळी आरतीने लग्नाची तयारी केली." वीर हे बघ तुझे कपडे. हे हळदीला घाल. हा ड्रेस लग्नाला. "
" अजून काही सूचना?" वीरने तिला जवळ ओढल होत.
" वीर सरक खूप आवरायच बाकी आहे."
"अस चालणार नाही तू किती आनंदाने तयारी करते आहे. माझा विचार कर थोडा. "
आरती हसत होती.
"आपण नंतर मामा कडे जावू आजीला सोडायला. "
" चालेल." दोघ ऑफिसला जायला निघाले.
राहुलची खरेदी पूर्ण झाली होती. मीनल राहुलचे छान मॅचिंग कपडे होते.
" मीनल ब्लाऊज शिवून आले का?" काकू विचारत होत्या.
" हो आई फक्त हळदीच्या साडी वरच ब्लाऊज राहील. तुझी साडी रेडी आहे का?"
"हो... नवीन साड्या तुझ्या बॅग मधे ठेव. "
"आई दोन दिवस राहिले मग प्रोग्राम सुरु होतील. "
"हो ना. काळजी करायची नाही. तुला खूप चांगले लोक मिळाले आहेत . मेन म्हणजे रोजच्या जेवणाची काळजी नाही. नाहीतर आमचे दिवस गरिबीत गेले. मी तुझ्या साठी खूप खुश आहे मीनल. "त्यांनी मीनलला जवळ घेतल. तीच मन भरून आलं होत. ती आईची मिठी अनुभवत होती.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा