Login

ओढ तुझी लागली भाग 59

ज्याच्यावर प्रेम असत तो मिळतोच ही कथा आहे आरती आणि वीर ची
ओढ तुझी लागली भाग 59

©️®️शिल्पा सुतार
.......

दुसर्‍या दिवशी सकाळ पासून घरात धावपळ सुरू होती. दुपारनंतर आधी राहुलची हळद होती. त्यानंतर ती हळद मीनल लागणार होती. लगेच उद्या लग्न होतं.

सकाळपासून सरला ताई आणि आरती बॅग भरत होत्या. द्यायचं घ्यायचं सामान नीट ठेव. दागिने कुठे आहेत. साड्या नीट ठेव. अस काम सुरू होत. स्वयंपाकाला बाया असल्यामुळे ते एक काम कमी झाला होतं. आजी तिकडे लक्ष देवून होत्या.

वरूण, राकेश, प्रकाश सगळेच मुलं खूप कामात होते.

लग्ना साठी घराच्या जवळच एक सुंदर हॉल घेतलेला होता. त्याच्या बाजूला मंदिर होतं. तिथे वैदिक पद्धतीने लग्न होणार होतं. लगेच रजिस्टर लग्न होतं. साधा छान कार्यक्रम होता. कमी आमंत्रण दिलेले होते.

मीनलच्या घरी पण लग्नाची गडबड सुरू होती. तिच्या आईने हळदीची पूर्ण तयारी केली होती. मीनलची बॅग भरून तयार होती. तिच सकाळपासून दोन वेळा तिचं रडून झाल होतं.

" पुरे आता मीनल. मेहंदी लागल्यावर रडू नये. एवढी धीराची तू. बोल्ड मुलगी एकदम हळवी कशी झाली? एकदम बदलली ही. " मावशी ओरडत होती. तिची मावशी मदतीला आलेली होती.

"ती माझ्या काळजीने अशी हळवी झाली आहे. किती वेळा सांगितल तिला मी की राहील ठीक तरी ऐकत नाही. हिच्या सासरचे लोक चांगले आहेत. ते मला एकट पाडणार नाहीत. " काकू सांगत होत्या.

" आई तिकडची रूम खाली झाली आहे. आरतीने दोन-तीन दिवसांपूर्वी सांगितलं. तू कधी शिफ्ट होते आहे तिकडे?" मीनलने विचारल.

"होईल लवकर. कार्यक्रम होऊ दे. एक तारखेच्या सुमारास येईल मी तिकडे. तोपर्यंत तुझी मावशी आहे माझ्यासोबत."

" मावशी असताना शिफ्ट करून घे सामान."

"हो चालेल."

रात्री हळद लागल्यानंतर लगेच बांगड्या भरायचा कार्यक्रम होता .चल मीनल तयारीला लाग. काकू बॅग मधून पिवळी साडी बाहेर काढत होत्या. "तुझ्या मैत्रिणी आल्या नाहीत?"

" त्या तिकडे आरती कडे गेल्या आहेत येतील थोड्या वेळाने."

आरतीने वीर ला फोन केला." केव्हा येतो आहेस तू? "

" थोड्यावेळाने. आता निघतोच ऑफिस मधून. "

तिने नंदिनी मॅडमला फोन केला." तुम्ही येत आहात का आई? थोड्या वेळाने हळद आहे."

" माझ आज नाही जमणार. थोड काम आहे. शनाया आजी येत आहेत."

ठीक आहे.

"आई आजी येत आहेत." आरती घाईने आत आली.

"येवू दे त्यात घाबरण्यासारखं काय आहे?" सरला ताई विचारत होत्या.

" भीती वाटते त्यांचा मानपान नीट होईल ना. त्या चिडतात नंतर माझ्या वर."

"आपण सगळ्यांच करतो तस करू. काळजी करू नकोस."

शनाया आणि आजी ड्रायव्हर सोबत घरी आल्या. त्यांचं छान स्वागत झालं. आरती आजींना भेटली." बर झालं आजी तुम्ही आल्या." सरला ताईंनी त्यांना चहा दिला.

शनाया खूप मदत करत होती घरात. तिची वरुण, प्रकाश, राकेश सोबत मस्त मैत्री झाली होती.

आजी आरतीच्या आजी सोबत रमल्या होत्या. कार्यक्रमाची व्यवस्था बघून त्यांना चांगलं वाटत होतं. हे लोक आपण समजतो तितकी साधे नाहीत. चांगले आहेत. किती आपुलकी प्रेम वाटत इकडे.

वीर घरी गेला. कपडे बदलून आरती कडे आला. सतीश राव, राहुल दादा सोबत तो बसला होता. खूप मजा येत होती.

मांडवात हळदीची तयारी होत आली होती. आरती तिच्या मैत्रिणी शनाया सगळ्या एन्जॉय करत होत्या. वीर आणि आरतीच्या हातून हळद होती. आधी छोटी पूजा झाल्यानंतर लगेच हळद लावायला सुरुवात होणार होती . राहुल पांढर्‍या कुर्ता मधे छान दिसत होता. त्याच्या चेहर्‍यावर खूप तेज होत. काहीही करण्या आधी तो आरतीला हाक मारत होता.

बाहेर बँड जोरात वाजत होता. त्याच्यावर छोटी मुलं नाचत होते. खूप सुंदर वातावरण तयार झालं होतं. राहुल खूप खुश होता. आजींना पुढे होवुन त्याची नजर काढली.

"वीर, आरती उठा. " दोघांनी मिळून हळद लावायला सुरुवात केली. खूप फोटो निघत होते. खूप अभिनंदन दादा. राहुल दादाने आरती वीरला जवळ घेतल. सगळे येवून हळद लावत होते. ओवाळणी टाकत होते.

आरती पिवळ्या साडीत खूप सुंदर दिसत होती. वीरची नजर तिच्या वर होती. "ही साडी कोणाची आहे."

माझी.

"कधी नेसली नाही आधी."

"आता आईने घेतली मला."

"किती सुंदर दिसतेस तू. आज घरी चल."

"नाही मी रविवारी येईल."

"मी बोलतो ना. नवर्‍याच ऐकायची काही पद्धत आहे की नाही."

"नाही मी ऐकणार नाही." आरती हसत होती.

"मी माझ्या बायकोला घरी नेतो आहे मी सांगेन तुझ्या बाबांना. ते नाही म्हणणार नाहीत."

" वीर नको ना अस करू. का त्रास देतोस. "

" मग एवढी सुंदर का दिसतेस मी कस कंट्रोल करणार. "

सरला ताई आवाज देत होत्या.

" आरती आई बोलवते आहे. " वरुण, राकेश, प्रकाश या दोघां कडे बघत होते. " काय बोलत असतात हे दोघ नेहमी."

"काय माहिती आपल्याला कुठे आहे गर्ल फ्रेंड. गरीब बिचारे आपण." तिघे एकमेकांकडे बघत होते.

राहुलची उष्टी हळद घेऊन आरती आणि वीर मीनलच्या घरी निघाले. बाकीच्या मैत्रीणी सोबत होत्या. मीनल कडे हळदीचीच वाट बघत होते. लगेच हळदीचा कार्यक्रम सुरू झाला. मावशी आणि काकांच्या हातून तिला हळद लागली . त्यांनी आरती आणि वीर च छान स्वागत केलं. सरबत प्यायला दिलं. खूप गम्मत सुरू होती.

आरती वीर ने पण मीनलला हळद लावली. काकू खूप धावपळीत होत्या. मीनल पिवळ्या रंगाच्या साडीत खूपच सुंदर दिसत होती. त्यात फुलांचा साज तिला शोभत होता. मावशीने मुंडावळ्या बांधल्या. काकूंनी पुढे येवून तिला काळा टीका लावला.

विरने सगळ्यांचे खूप फोटो काढले. मीनलचा फोटो शूट झाला. ते घरी वापस आले.

राहुल आरतीची वाट बघत होता. "झालं का तिकडे हळदीचा कार्यक्रम."

"हो झाला खूप छान दिसत होती मीनल. विरने खूप फोटो काढले आहे तिचे." आरती सांगत होती.

"दाखव."

" असे मिळणार नाहीत फोटो." सगळे राहुलला खूप त्रास देत होते

वीर मुद्दाम वरूण राकेश आणि प्रकाशला फोटो दाखवत होता. ते सगळे राहुलला फोन दिसणार नाही अशा पद्धतीने बसले होते. राहुल सारखा वाकून बघत होता.

" या फोटोत मीनल किती छान दिसते आहे ना."

हो ना.

त्याला काहीही दिसलं नाही. तो वैतागला होता. "काय सुरू आहे मला एकतरी फोटो दाखवा."

"पार्टी दे मग."

हो सगळे बोलत होते.

"काय घाई आहे याला मीनलचे फोटो बघायची." राकेश बोलत होता.

"एक दिवस अजून नंतर मीनल तुझी बायकोच होणार आहे तेव्हा आरामात बघत बस तिच्या कडे." बाकीचे मित्र चिडवत होते.

" कोणीच राहुल दादाला त्रास देऊ नका. वीर फोन दे इकडे." तिने राहुल दादाला मीनलचे फोटो दाखवले. खूप सुंदर पोज मध्ये फोटो घेतले होते. मीनल साडीत खूप सुंदर दिसत होती. चेहऱ्यावर अत्यंत तेज होतं. हातात खूप बांगड्या होत्या. गजरे लावलेले होते. लाजरे फोटो होते.

राहुल बघतच बसला. किती वेगळी आणि छान दिसते आहे मीनल.

बँड वर मुल नाचत होते. आरती आत काम करत होती सगळ्या मुलांनी तिला बाहेर ओढून नेलं. खूप मजा येत होती. वीर शनाया पण त्यांच्यात एक झाले होते. सरला ताई, सतीश राव नाचत होते. राहुल आधी सारखा शांत राहिला नव्हता खूप एन्जॉय करत होता.

जेवण झाल. वीर आरतीला इशारा करत होता.

"नाही वीर."

"फक्त पाच मिनिट."

"नाही."

"मी गोंधळ घालेन. रुसून बसेल."

"चांगल ब्लॅक मेल करतोस. चल. " सामान घ्यायच म्हणून ते दोघ वरती रूम मधे आले. वीरने दार लावून घेतल. तिला जवळ घेतल. आरतीला त्याच्या मिठीत खूप छान वाटत होत. ती अगदी शांत झाली होती.

"बर झाल ना इथे आलीस."

" हो वीर उद्या लवकर ये. मला तुझ्या शिवाय करमत नाही."

"घरी चलतेस का? सकाळी लवकर इकडे आणून सोडतो तुला."

"नको सगळे हसतील. रविवारी येईल मी ."

"ठीक आहे. नंतर याची कसर भरून काढणार आहे मी. आम्ही निघतो आता."

हो.

वीर, शनाया, आजी घरी गेल्या. आरती सतीश रावांसोबत मांडवात बसलेली होती. गप्पा सुरू होत्या त्यांच्या.

" चला आता झोपा उद्या लवकर मुहूर्त आहे. "

राहुल आरतीला सांगत होता फोन लाव.

बाबा आत मध्ये गेल्यानंतर आरतीने मीनलला व्हिडिओ कॉल लावला. मीनल घरात बसलेली होती. आजूबाजूला सगळे नातेवाईक होते. हातात हिरवा चुडा. मुंडावळ्या बांधलेली मीनल खूप सुंदर दिसत होती.

आरतीच्या फोनमध्ये सगळे दिसत होते. मीनल लाजली. सगळे बोलत होते. राहुल कडे कोणी फोन देत नव्हतं. शेवटी आरती राहुल जवळ जाऊन बसली. दोघे एकमेकांकडे बघत होते.

"काही बोलणार आहात की नाही आता."

"त्यांचा एकमेकाकडे बघूनच पोट भरलं आहे."

"सकाळी भेटू मग मीनल वहिनी."

ती लाजली.

आरतीने फोन ठेवला. "दादा मी खूप खुश आहे तुझ्या साठी."

सकाळी सगळे भराभर आवरत होते.

वीर, नंदिनी मॅडम, शनाया, आजी सगळे हॉलवर येणार होते. बाबांचं नक्की नव्हतं.

मीनलच्या घरचे हॉलवर आधीच आलेले होते. छान सुटसुटीत छोटा हॉल होता. मीनल मैत्रिणींसोबत आत मध्ये बसली होती. थोड्या वेळाने लग्नाची तयारी करणार होती.

आरती, राहुल, वरूण सगळे हॉलवर आले त्यांचे स्वागत झालं. मीनल कुठे आहे सगळे विचारात होते? तिला बाहेर बोलवलं. वीर, शनाया, आजी, नंदिनी मॅडम, राहुल सर सगळे झाले होते. त्यांना सतीश राव सरलाताई जाऊन भेटले.

लगेच नाश्ता झाला. चला आता लग्नाची तयारी करा.

पार्लर वाल्या ताई मीनलला तयार करत होत्या. बाकीच्या मैत्रिणींची पण तयारी झाली होती.

आरती तयार होती तिने लग्नाचा शालू घातलेला होता. त्यावर ज्वेलरी गजरा शोभत होता. वीर कुर्ता मधे छान दिसत होता शनायाने अनारकली घातला होता.

आरती राहुल दादाला तयार करत होती. ते सगळेच एका जागी होते खूप मजा येत होती. फेटा बांधुन राहुल दादा खूप रूबाबदार दिसत होता.

आरती जिथे जाईल तिथे विर तिच्या मागे होता. "वीर तू बाजूला थांब ना मला काम आहेत."

"मी पण येणार."

"काय अस चल तू दादाला तयार कर."

सगळे त्या दोघांची गंमत बघत होते.

वीर वरुण जवळ उभा होता. राहुल तयार झाला. खूपच छान तयारी झाली होती. बाहेर बॅन्ड वाजत होता. राहुल वरुण राकेशच्या मदतीने घोड्यावर बसला. लगेच मिरवणुकीला सुरुवात झाली. आरतीच्या सगळ्या मैत्रिणी मिरवणूक हजर होत्या. शनाया सुद्धा होती. मंदिरात दर्शन झाल्यानंतर मिरवणूक वापस निघाली. लगेच नाचायला सुरुवात झाली. सगळे एकमेकाला ओढून नाचत होते. राहुल आणि वरूणचे मित्र खूप नाचत होते ते खूप वर्षापासून तिथेच राहत होते त्यामुळे बरेच ओळखीचे होते. नाही म्हणता म्हणता बरेच लोक जमले होते.

आरती मैत्रिणींसोबत नाचत होती. वीर बाजूला उभा होता. त्याला आत मध्ये ओढलं. तो आता आरती सोबत नाचत होता.

मिरवणूक हॉलवर वापस आली. मीनलच्या मावशीने राहुलला ओवाळून आत घेतलं. बाकीच्यांना हळद कुंकू देऊन स्वागत केलं. सगळे स्टेजवर होते. राहुल बघत होता मीनल कधी येते.

मीनलची खूप छान तयारी झाली होती. मरुन रंगाचा शालू खूप सुंदर दिसत होता. त्यात हातात घातलेला चुडा. सुंदर रंगलेली मेहंदी, मुंडावळ्या, केसाची हेअर स्टाईल खूपच छान. ती मैत्रीण सोबत आली. लगेच मंगलाष्टक सुरू झाले. लग्न लागलं. पुढच्या पूजा सुरू होत्या. सप्तपदी झाली. तरुण मंडळी खूप मजा करत होते. नवरदेव नवरीला त्रास देत होते.

मांडवात आहेराचा कार्यक्रम सुरू झाला. सगळ्यांना साड्या वाटल्या. सरला ताई या वेळी खूप उत्साही होत्या.

आरती आणि वीरला पण पाटावर बसवलं होतं. वीरला सोन्याची चैन आणि आरतीला नेकलेस सेट दिला. त्या दोघांनी घ्यायला नकार दिला. खूप आग्रह झाला. या फाॅरम्यालिटीची काय गरज आहे. वीरच्या घरच्यांचा योग्य मानपान झाला.

नंतर जेवणाची पंगत बसली. सगळे जोडीने बसले होते. एकमेकायला घास खाऊ घालत होते. राहुल मीनल अगदी सोबत रमले होते त्यांना बघून काकू खुश होत्या. मीनलच नशीब चांगल तिला राहुल सारखा मुलगा मिळाला. त्या दोघांना गोड खाऊ घालायला गेल्या.

"आरती आपल्या लग्नाला जेव्हा पाच वर्षे होतील तेव्हा आपण परत लग्न करू. मला आपल लग्न काही आठवत नाही. आपण नुसतेच रुसलेलं होतो. " वीर हळूच तिच्या जवळ येत म्हणाला.

" चालेल असंच करू. पण लोक पंचविसावा लग्नाच्या वाढदिवसाला परत लग्न करताना. आपण पाचव्या वर्षी करायचं? " आरती हसत होती.

" तेव्हा आपण फोटोत ओल्ड दिसू ना म्हणून."

"ठीक आहे मला घागरा घ्यायचा."

"आपण फिरायला पण जाऊ. पण तेव्हा आपल्या सोबत आपले मुलं असतील त्यांना घरी राहू देवू . "आरती वीर कडे बघत होती. तिने विचारच केला नव्हता मुलांबद्दल. ती लाजली. तिच्या चेहऱ्याकडे विर बघत होता." आरती हे तर होणारच आहे ना. मला दोन मुल हवे. तुझ्या सारखे गोड. "

" वीर इथे अस नको ना बोलू अस कोणी ऐकेल. "

" ऐकल तर ऐकल मी माझ्या बायको सोबत गोड गप्पा नाही मारू शकत का?" दोघ छान हसत होते.

"लव बर्डस नुसत्या गप्पांनी पोट भरणार का जेवा." वरुण, राकेश त्यांना हसत होते.
.....

कथा संपत आली आहे. वाचकांचे खूप आभार

0

🎭 Series Post

View all